राज्यातल्या शेतकऱ्यांवर आता नवं संकट, एका क्लिकवर होतंय खातं रिकामं! वाचा काय आहे प्रकार?

Cyber Fraud : महाराष्ट्रातील कित्येक शेतकरी सध्या एका वेगळ्या संकटात सापडले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

New Cyber Fraud in Maharashtra : महाराष्ट्रातील कित्येक शेतकरी सध्या एका वेगळ्या संकटात सापडले आहे. या सायबर संकटामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातील कित्येक शेतकऱ्यांना SMS किंवा WhatsApp द्वारे किसान सन्मान निधी नावाने संदेश मिळाला आहे. त्यांनी उत्सुकतेने link वर क्लिक केले तर बँक खाते रिकामे होते किंवा त्यांच्या खात्यातील रक्कम अन्यत्र वळती केली जाते.  नाशिक, मराठवाड्यातील कित्येक शेतकऱ्यांना अशा प्रकारे सायबर गुन्हेगारानी लक्ष्य केल्याची माहिती उघड झाली आहे.

काय आहे प्रकरण?

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या नावानं एस एम एस किंवा व्हॉट्सॲप वर एखादे आर्थिक आकर्षण किंवा लालुच दाखवणाऱ्या ए पी के फॉरमॅट च्या लिंक्स येत आहेत ज्यावर उत्सुकतेने शेतकऱ्याने क्लिक केले तर त्याची बँक खाती रिकामी होत आहेत. पीएम किसान योजनेच्या नावावर एका ऍप ची लिंक सुद्धा सोशल मीडियावर फिरते आहे. ही लिंक क्लिक केल्यास न कळत एक ऍप डाउनलोड होते आणि फोन हॅक होऊन शेतकऱ्याच्या खात्यातील रक्कम अन्यत्र वळती केली जाते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राज्याच्या कृषी विभागाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकारच्या सायबर चोरीच्या घटनाविषयी प्रत्येक शेतकऱ्याला सावध राहण्याचे सांगण्यात येत आहे.  शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधी या नावानं येणाऱ्या कोणत्याही लिंक्स उघडण्यापूर्वी सावधपणे विचार करावा असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना केले जात आहे.

नागपूर जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र मनोहरे यांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना सांगितले की, नाशिक आणि मराठवाड्यातील कही जिल्ह्यांमध्ये असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आमच्या विदर्भात देखील व्हॉट्सॲप ग्रुप्स वर आणि अन्य समाज माध्यमांवर अशा लिंक्स फिरत आहेत. मात्र अद्याप त्याद्वारे कुणाची फसवणूक झाल्याची तक्रार नागपूर जिल्ह्यातून आलेली नाही. पण तरीही शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याविषयी आम्ही सातत्याने आवाहन करीत आहोत.  

Advertisement

( नक्की वाचा : Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंच्या उत्तरानं वाढलं टेन्शन )
 

वेगवेगळ्या सोशल मीडिया ग्रुप्स वर हे आवाहन व्हायरल करण्याचे सांगत आहोत. डॉट ए पी के (APK) फॉरमॅट च्या लिंक्स आल्या तर अजिबात त्यावर क्लिक करू नये आणि सायबर पोलिस तसेच आम्हाला सूचित करण्यात यावे, असे आवाहन करीत आहोत. समजा चुकून कोणी लिंक वर क्लिक केले असेल आणि काही आर्थिक हानी झाली असेल तर सायबर पोलिसांत तक्रार करावी आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अशी लिंक आल्यास ती न उघडता थेट डिलिट करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. 

आपली माहिती तपासण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर know your status वर क्लिक करून आपला नोंदणीकृत क्रमांक टाकून आपली माहिती तपासता येऊ शकता.

Advertisement