लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सवाची (Ganeshotsav State Festival) मान्यता मिळाली आहे. आज औचित्याच्या मुद्द्यामध्ये हा विषय मांडण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी यासंदर्भात घोषणा केली.
पुण्याचे आमदार हेमंत रासने यांची मागणी मान्य...
गणेशोत्सवावरील निर्बंध रद्द करून 24 तास उत्सवाला परवानगी द्यावी अशी मागणी पुण्याचे आमदार हेमंत रासने यांनी आज विधानसभेत केली होती. यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मोठी घोषणा केली. पंढरपुरच्या वारीप्रमाणे गणेशोत्सवाचं नियोजन केलं जावं आणि यासाठी १०० कोटींचा निधी द्यावा अशी मागणी रासने यांनी केली होती. दरम्यान विधानसभेत आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली आणि उत्सवावरील निर्बंध मुक्त करून 500 कोटींचा निधी दिला जाईल असं जाहीर केलं..