Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग सज्ज! पंढरीच्या वाटेवर प्रथमोपचारापासून आयसीयूपर्यंत सुविधा

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे ुपंढरीकडे प्रस्थान होणार आहे. एकीकडे वारकऱ्यांना आषाढी वारेचे वेध लागले असतानच प्रशासनही वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

'पाऊले चालते पंढरीची वाट...' जून महिना सुरु झाला की वेध लागतात ते आषाढी वारीचे. आषाढी वारीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून चार दिवसांनी जगतगुरु तुकोबाराया आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे ुपंढरीकडे प्रस्थान होणार आहे. एकीकडे वारकऱ्यांना आषाढी वारेचे वेध लागले असतानच प्रशासनही वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्यात आणि एकूणच वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्य आरोग्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून, त्यांना संपूर्ण पालखी मार्गावर सर्दी खोकल्यासारख्या प्राथमिक उपचारापासून अतिदक्षता विभागातील अत्यावश्यक उपचार पुरविण्याचे सूक्ष्म आणि व्यापक नियोजन केले आहे. 

वारी मार्गावर विशेषज्ज्ञ, डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी असे मिळून वारी पंढरीची 1303 आरोग्यविषयक मनुष्यबळ सेवा देणार आहे.वारकऱ्यांच्या सेवेसाठी 331 रुग्णवाहिका, 1 हजार 350 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरवर्षी वारी दरम्यान १५ लाखांहून अधिक वारकऱ्यांना प्राथमिक आणि अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरवण्यात येतात.यंदा त्यामध्ये आणखी नवीन सेवांचा समावेश केला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash : 'गणपती बाप्पामुळे वाचले', मृत्यूला चकवा देणाऱ्या महिलेचा थरारक अनुभव )

दरम्यान, पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी मध्य रेल्वे कडून विशेष 80 फेऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागपूर ते मिरज, अमरावती, खामगाव , भुसावळ , लातूर , कोल्हापूर, पुणे आणि कलबुर्गी या स्टेशन पासून पंढरपूर रेल्वे स्थानकापर्यंत विशेष 80 गाड्यांची व्यवस्था मध्य रेल्वेने भाविकांसाठी केली आहे. या सर्व रेल्वेच्या फेऱ्या आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही रेल्वे डब्याच्या असणार आहेत. दोन जुलैपासून ते दहा जुलै पर्यंत या विशेष रेल्वे गाड्या पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी धावणार आहेत. त्यामुळे कर्नाटक, विदर्भ, मराठवाडा यासह दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्र रेल्वेने पंढरपूरला मोठ्या प्रमाणावर जोडला जाईल.

Advertisement

(नक्की वाचा - Beed News : लग्नाळू मुलांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक, बीडमधील धक्कादायक प्रकरण)

Topics mentioned in this article