Scheme Closed: 'लाडक्या बहिणीं'ना पुन्हा दे धक्का! राज्य सरकारची खास योजना बंद; आर्थिक चणचण ठरलं कारण

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू करण्यात आलेली 'कॅप्टिव्ह मार्केट योजना' आता आर्थिक कारणास्तव बंद करण्याचा निर्णय वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Free Saree Scheme Closed: काही दिवसांपूर्वीच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना जोरदार धक्का देत  योजनेतून तब्बल ९२ लाख लाभार्थी वगळले होते. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून लाखो महिलांची नावे वगळली गेल्याची चर्चा अद्याप थांबलेली नाही, तोच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना आणखी एक धक्का दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू करण्यात आलेली 'कॅप्टिव्ह मार्केट योजना' आता आर्थिक कारणास्तव बंद करण्याचा निर्णय वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे.

Monsoon 2026: आषाढीआधी महाराष्ट्रात धो-धो पाऊस! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना मुसळधारचा इशारा,वाचा नवा अंदाज

लाडक्या बहिणींना धक्का, साडीची स्कीम बंद!

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने लाडक्या बहिणींना मिळणारी मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  ​२०२३ मध्ये राज्याच्या 'एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणा'ंतर्गत ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेद्वारे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या सुमारे २४ लाख ५८ हजार ७४७ कुटुंबांतील महिलांना वर्षातून एकदा, सणासुदीच्या काळात मोफत साडी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. २०२८ पर्यंत ही योजना लागू राहणार होती.

Advertisement

मात्र, अवघ्या काही वर्षांतच सरकारच्या तिजोरीवर ताण आल्याचे कारण देत ही योजना गुंडाळण्यात आली आहे. गुरुवारी वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी हे अंत्योदय गटातीलच आहेत. अशातच, योजनेची व्याप्ती वाढवण्याऐवजी आधीच सुरू असलेल्या योजना बंद करण्याच्या निर्णयामुळे गरिबांच्या मुखातील घास हिरावला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

ऐन सणासुदीच्या तोंडावर सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे गरजू महिलावर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण देत सरकारने लोककल्याणकारी योजनांना कात्री लावल्याने विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.

(नक्की वाचा: Pune News: लोणावळ्यात जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा, लोहगडसह 'या' पर्यटनस्थळांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय)