Mumbai News: सुवर्णसंधी! तुम्हीही कंटेट क्रिएटर व्हा अन् लाखोंची कमाई करा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government social media influencer Corse: तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्ये (Job-oriented skills) देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत आधुनिक आणि महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम सुरू केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Government course For Content Creator: सोशल मीडियाच्या जगात सध्या लाखो क्रिएटर्स (Creators) सक्रिय आहेत, जे अगदी सामान्य कुटुंबातून येऊनही लाखोंची कमाई करत आहेत. यामुळेच अनेकांना सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (Social Media Influencer) होण्याची इच्छा आहे. या इच्छुकांसाठी आणि तरुणांना रोजगाराभिमुख कौशल्ये (Job-oriented skills) देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत आधुनिक आणि महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम सुरू केला आहे.

आयटीआय आणि पॉलिटेक्निकमध्ये संधी:

राज्यातील आयटीआय (ITI) आणि पॉलिटेक्निक (Polytechnic) महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी हा नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमामुळे हे विद्यार्थी भविष्यात व्यावसायिक सोशल मीडिया इन्फ्लुएंजर म्हणून काम करू शकणार आहेत. सरकारचा हा निर्णय पारंपरिक शिक्षणासोबतच आधुनिक मागणीनुसार कौशल्ये देण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.

७५ हजार प्रशिक्षणार्थ्यांना लाभ: या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ७५ हजार प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. पुढील वर्षात ही संख्या १ लाखापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. यामुळे केवळ कौशल्यच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात तरुणांसाठी थेट कमाईचे साधन उपलब्ध होणार आहे.

अभ्यासक्रमाचे विषय

  • सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing): व्यवसायांसाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर कसा करावा.
  • कंटेंट निर्मिती (Content Creation): आकर्षक आणि व्हायरल होणारा कंटेंट तयार करण्याची कला.
  • कॅम्पेन मॅनेजमेंट (Campaign Management): जाहिरात मोहिम (Campaigns) आखणे आणि व्यवस्थापित करणे.
  • ड्रोन तंत्रज्ञान (Drone Technology): कंटेंट निर्मितीसाठी उपयुक्त ठरणारे ड्रोन तंत्रज्ञान.

दरम्यान, हा कोर्स केवळ मनोरंजनासाठी नाही, तर पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून डिझाइन करण्यात आला आहे. यामध्ये खालील महत्त्वाचे विषय शिकवले जातील. हा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी केवळ स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकणार नाहीत, तर कंपन्यांसाठी कंटेंट निर्मितीचे कामही करू शकतील.

Advertisement