Gram Panchayat News: राज्यातील सर्व ग्रामपंचायती राहणार बंद! गावगाड्याचा कारभार होणार ठप्प; कधी अन् कारण काय?

अखिल भारतीय सरपंच परिषदेने याबाबतची माहिती दिली आहे. या दिवशी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Grampanchayat Closed:  राज्यभरातील गावगाड्यांचा कारभार येत्या शुक्रवारी म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी बंद राहणार आहे. राज्यभरातील ग्रामपंचायत स्तरावरील विविध मागण्यांसाठी 20 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेने याबाबतची माहिती दिली आहे. या दिवशी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्यभरातील ग्रामपंचायती बंद

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील ग्रामपंचायती २० फेब्रुवारीला बंद राहणार आहेत. राज्यातील १६ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने किंवा संपल्यानंतर शासकीय कर्मचारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आल्याने गावांच्या विकासकामांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी केला आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात २० फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायती एकदिवसीय लाक्षणिक संपावर जाणार असल्याची घोषणा परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

Nagpur News: भाजप नगरसेविकेच्या पतीवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला; नागपुरात खळबळ

काय आहेत मागण्या? 

जिल्हा नियोजन समितीत ग्रामपंचायतींचा प्रतिनिधी समाविष्ट करावा,  सरपंच व उपसरपंच यांचे थकीत मानधन तातडीने द्यावे,  विधान परिषद निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार द्यावा ग्रामपंचायतींमधील कॉम्प्युटर ऑपरेटरांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशा महत्त्वाच्या मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या बंदमुळे गावगाड्यातील अनेक महत्त्वाची कामे रखडणार आहेत. तसेच  ग्रामपंचायत स्तरावरील कारभार, विकासकामे आणि नागरिकांशी संबंधित अनेक सेवा सुविधांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. आता या आंदोलनावर शासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  UTS App: रेल्वे प्रवाशांसाठी सोईस्कर असलेलं UTS अ‍ॅप बंद होणार; नवीन अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार)