Maharashtra Hotels Open 24 Hours : दसऱ्याच्या निमित्ताने राज्य सरकार सीमोल्लंघन करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील दुकानं, मॉल, हॉटेल, सिनेमागृह, नाट्यगृह आणि इतर आस्थापनं आता 24 तास खुली ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदित्य ठाकरे यांनी नाइल लाइफची संकल्पना मांडली होती. मात्र त्यावेळी भाजपकडून यावर टीका करण्यात आली होती. आता मात्र भाजप सरकारकडून नाइट लाइफचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योग विभागाकडून यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यानुसार, आठवड्यातील सर्व दिवस आस्थापनं सुरू ठेवता येणार आहे. मद्याची दुकानं आणि इतर आस्थापनांमध्ये गोंधळ होऊ नये यासाठी नवं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये मद्यपानगृह, बार, परमिट रूम, हुक्का पार्लर, देशी बार यांना वगळण्यात आलं आहे.
कर्मचाऱ्यांची सुट्टी कशी असेल?
राज्य सरकारने आस्थापनांना 24 तास खुली राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र याचवेळी कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबतही विशेष निर्णय घेण्यात आला आहे. आस्थापनांना आठवड्यातील प्रत्येक दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून एक दिवस सलग 24 तासांची आठवड्याची सुट्टी देणं बंधनकारक असेल.
राज्यात 24 तास काय सुरू राहणार
हॉटेल
सिनेमागृह
नाट्यगृह
निवासी हॉटेल
मनोरंजनासंदर्भातील आस्थापनं
सर्व दुकाने
काय बंद राहणार?
बार
वाईन शॉप
हुक्का पार्लर
देशी बार
बार परमिट रूम