Shivraj Rakshe : 'खरं तर पंचांना गोळ्याच घालायला पाहिजे'; डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं राक्षेला समर्थन

Maharashtra Kesari : त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो, चंद्रहार पाटलांनी सांगितली महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यानची ती आठवण.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Kesari 2025 : यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेत्यापेक्षाही मारहाणीच्या कृत्यामुळे अधिक चर्चिली जात आहे. नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांना निकाल न पटल्याने त्यांनी पंचाची कॉलर पकडली आणि त्याला लाथ मारली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात समिश्र स्वरुपातील प्रतिक्रिया समोर येत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवराज राक्षे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी पंचाकडून मला वाईट शिवी देण्यात आली होती. आईविषयी अपशब्द ऐकल्यानंतर मला संताप आला आणि त्यातच मी हे कृत्य केल्याचं शिवराज राक्षे यांनी म्हटलं आहे. यानंतर राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. लोकसभा निवडणूक लढवणारा आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुढे सरसावले आहेत. त्यांनी राक्षेला पाठिंबा दिला आहे. शिवराज राक्षेने खरं तर पंचाना गोळ्या घालायला पाहिजेत, असं पाटील यावेळी म्हणाले. 

नक्की वाचा - Maharashtra Kesari 2025 : 'आता पुढची लढाई कोर्टात', शिवराज राक्षेने थोपटले दंड!

मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलोय. त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. या प्रकरणात पृथ्वीराज मोहोळचं मी अभिनंदन करतो,  त्यात पृथ्वीराची काही चूक नाही. मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे. 

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..
दरम्यान शिवराज राक्षे याने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याशिवाय शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील लढतीचाही एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिवराज राक्षे याची पाठ जमिनीला टेकली नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे हा सामना हरला नसल्याचा दावा राक्षेंकडून केला जात आहे. इथं जर न्याय मिळाला नाही तर कोर्टात जाणार असल्याचं शिवराज राक्षे यावेळी म्हणाले. पंचांना चुकीचा निर्णय द्यायला एक मिनिट लागतो, मात्र पैलवान वर्षानुवर्षे मेहनत करुन तयारी करीत असतो, असंही राक्षे यावेळी म्हणाले.

Advertisement