2 days ago

Maharashtra LIVE Blog: लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणपती बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली असून प्रशासनही सज्ज झाले आहे. दुसरीकडे राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे. आज सकाळीच मुंबईमध्ये काही ठिकाणी पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. 

Aug 25, 2025 20:28 (IST)

सिंहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पाच मुलांची हवेली पोलिसांनी केली सुटका

सिंहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पाच मुलांची हवेली पोलिसांनी केली सुटका 

ट्रेकिंगसाठी गेले असता रस्ता चुकल्याने अडकले होते सिंहगडावर 

व्हिडिओ पाठवून ट्रेकरने मागवली होती पोलिसांकडे मदत

 

चार तासाच्या थरारानंतर पाच ही ट्रेकची पुणे पोलिसांकडून सुखरूपरीत्या सुटका

Aug 25, 2025 18:52 (IST)

रोहित पवार मुंबई महापालिका आयुक्तांच्या भेटीला

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस रोहित पवार महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. मुंबईतील विविध समस्यांवर ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

Aug 25, 2025 18:42 (IST)

Live Update : पुणे रेव्ह पार्टी, रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

पुणे ड्रग्स पार्टी प्रकरण 

पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता 

रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी 

रोहिणी खडसे यांच्यावर पुणे पोलीस लवकरच गुन्हा दाखल करण्याची शक्यता

Aug 25, 2025 17:17 (IST)

Live Update : सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेली पाच मुले सिंहगडावर अडकली

सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेली पाच मुले सिंहगडावर अडकली 

पोलिसांकडूनही या मुलांचा शोध सुरू 

मुलांनी व्हिडिओ काढत दिली माहिती 

चार दिवसापासून गौतम गायकवाड हा ही सिंहगडावरून होता बेपत्ता 

त्याच्या शोधा नंतर पुन्हा पाच मुलं सिंहगडावर अडकली

Advertisement
Aug 25, 2025 16:26 (IST)

Live Update : गणेशोत्सवा निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार उद्या किंवा परवा होणार

 गणेशोत्सवा निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार उद्या किंवा परवा होणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचाही पगार या महिन्यात लवकर होणार असल्याचं सरकारने आधीच जाहीर केलं आहे. आता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगारही लवकर होणार आहे.  

Aug 25, 2025 15:57 (IST)

Live Update : नाशिकमध्ये आदिवासी बांधवांच्या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात

- नाशिकमध्ये आदिवासी बांधवांच्या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात

- राज्यभरातील आदिवासी संघटनाची मोर्चात हजेरी 

- गेल्या 45 दिवसांपासून आदिवासी विभागाच्या वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या रोजंदारी शिक्षक कर्मचाऱ्यांचे सुरू आहे आंदोलन

- आदिवासी विकास मंत्री लक्ष देत नसल्याने आदिवासी बांधव झाले आहेत आक्रमक

- तपोवन परिसरातून सुरू झालेला मोर्चा पंचवटी, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे आदिवासी आयुक्तालयावर धडकणार

Advertisement
Aug 25, 2025 14:44 (IST)

Live Update : ठाणे शहरातील पहिली मेट्रो ट्रायल रनसाठी सज्ज, ती 10 स्थानकं कोणती?

ठाणे शहरातील पहिली मेट्रो ट्रायल रनसाठी सज्ज 

सप्टेंबर महिन्यात एमएमआरडीएची ट्रायल रनची तयारी 

आज मेट्रोचे काही डबे स्टेशनवर या मार्गिकेवर ठेवण्यात आले 

काही डबे आज रात्री ट्रॅकवर ठेवण्यात येतील 

हा उन्नत मार्ग असल्याने क्रेनच्या मदतीने मेट्रो डबे ट्रॅकवर ठेवण्यात आले 

ठाण्यातील मेट्रो मार्गिका ४-४ अ मधील १० स्थानकांवर होणार ट्रायल रन 

मेट्रो लाईन -४ मेट्रो रेल्वे स्टेशनच युद्धपातळीवर काम सुरू...

१०.५ किमीच्या पहिल्या फेजच ट्रायल रन 

🛑 १० स्थानके ...

१) कॅडबरी 

२) माजीवाडा 

३) कपूरबावाडी 

४) मानपाडा 

५) टिकूजी -नी -वाडी 

६) डोंगरी पाडा 

७) विजय गार्डन , 

८) कासरवाडावली, 

९) गोवानिवाडा 

१०) गायमुख

Aug 25, 2025 14:18 (IST)

Live Update : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणीची आज बैठक पार पडणार आहे

पक्षप्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्शवभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे

Advertisement
Aug 25, 2025 12:49 (IST)

Live Update : आंबेनळी घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला

रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा आंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.  पावसाळ्या दरम्यान वारंवार घडणाऱ्या दरड दुर्घटनेच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर रायगड आणि सातारा जिल्हा प्रशासनाने वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता.  या बंदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तर आगामी गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्याची मागणी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून केली जात होती.  या मागणीच्या अनुषंघाने रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी परिपत्रक काढून आंबेनळी घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला केला असून अतिवृष्टीचे काळात घाटातुन वाहतुक बंद ठेवण्याच्या निर्देश देखील केल्या आहेत.

Aug 25, 2025 11:08 (IST)

Live Update : पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या सततच्या कोंडीने प्रवासी त्रस्त

आज सकाळी  पुणे-नाशिक महामार्गावर टोलनाका (शिरोली फाटा) ते राजरत्न हॉटेल या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहनांची कोंडी झाली. या कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

अचानक वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे रांगा लागल्या असून वाहतूक संथगतीने सुरू होती. सकाळच्या व्यस्त वेळेत झालेल्या या कोंडीमुळे कार्यालयीन प्रवासी उशिरा पोहोचल्याचे दिसून आले.

वाहतूक पोलिसांनी तत्काळ गाड्या बाजूला काढून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला असून काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली.

Aug 25, 2025 11:07 (IST)

Live Update : नाशिकमध्ये तुफान पाऊस, गोदावरी नदीला पूरपरिस्थिती

हवामान विभागाच्या वतीने राज्यात पुन्हा पाच दिवस पावसाची संततधार सुरू असल्या च्या सांगितल्यानंतर कालपासूनच राज्यातील काही भागांमध्ये पाऊस हा पडू लागला नाशिक जिल्ह्यासह ग्रामीण भागामध्ये देखील पाऊस पडल्यानंतर नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे परिणामी नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा एकदा आता पूर परिस्थिती निर्माण झाली आहे 

Aug 25, 2025 10:30 (IST)

Live Update : मुंबईत सर्वत्र मोठी वाहतूक कोंडी

मुंबईत सर्वत्र मोठी वाहतूक कोंडी 

पूर्व आणि पश्चिम दूर्तगती मार्गावर वाहतूक खूप धीम्या गतीने 

Aug 25, 2025 10:24 (IST)

Live Update : नंदुरबार जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाला सुरुवात.....

नंदुरबार जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाला सुरुवात.....

- सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी आणि कामावर जाणारे चाकरमान्यांवर यांना जाण्यासाठी मोठी अडचण होत आहे.....

- सलग पाच दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांना मोठा फायदा होत आहे.....

- आज सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने याचा परिणाम धरण क्षेत्रावर होणार आहे.....

- जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा लागली होती त्यामुळे सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत होणार.....

- जिल्ह्यातील अनेक भागात 65 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे....

Aug 25, 2025 10:19 (IST)

Live Update : मोठी बातंमी! भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांच्या नावाची घोषणा

भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांच्या नावाची घोषणा

Aug 25, 2025 09:25 (IST)

Live Update : मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता, भरती-ओहोटी कधी?

Aug 25, 2025 08:52 (IST)

Live Update : मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशीराने

मुंबईत पहाटेपासून संततधार सुरू असून लोकलवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. 

Aug 25, 2025 08:51 (IST)

Live Update : रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट वाहतुकीसाठी खुला

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.  पावसाळ्या दरम्यान वारंवार घडणाऱ्या दरड दुर्घटनेच्या घटनांच्या पार्श्वभुमीवर रायगड आणि पुणे जिल्हा प्रशासनाने वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता.  या बंदीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तर आगामी गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्याची मागणी वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून केली जात होती.  या मागणीच्या अनुषंघाने रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी परिपत्रक काढून वरंध घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला केला असून अतिवृष्टीचे काळात घाटातुन वाहतुक बंद ठेवण्याच्या निर्देश देखील केल्या आहेत.

Aug 25, 2025 08:43 (IST)

Live Update : मुंबई राजधानी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना...

मुंबई राजधानी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना... 

प्रेशर पाईपमध्ये बिघाड झाल्याने मनमाडजवळच्या पानेवाडी स्थानकावर गाडी होती...

30 तासांपेक्षा जास्त वेळ झाला गाडी विलंब...

रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर करण्यात आले काम...

कर्मचाऱ्यांनी बिघाड दुरुस्त केल्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना..

Aug 25, 2025 08:21 (IST)

Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी नेत्यांची पत्रकार परिषद, मोठी घोषणा होण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी नेत्यांची पत्रकार परिषद

बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवलेसह अनेक शेतकरी नेते पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार

शेतकरी नेत्यांकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता

पत्रकार परिषदेमधून शेतकरी नेते नेमकं काय बोलणार?

Aug 25, 2025 07:31 (IST)

Live Update : कोल्हापुरात ज्यादा नफ्याचे आमिष दाखवून 63 लाखांची फसवणूक

कोल्हापुरात ज्यादा नफ्याचे आमिष दाखवून एका कंपनीमध्ये गुंतवणूक लावून जवळपास 63 लाखांची फसवणूक करण्यात आलीये. व्हीबीएसएल इंडिया नावाच्या कंपनीचे आयुर्वेदिक औषधे, गुणकारी पेये आणि दैनंदिन वापरातील विविध वस्तू विक्रीसाठी फ्रेंचाईजी घ्या असा प्रचार केला जात होता. यामध्ये ठराविक रक्कम गुंतवणुक केल्यानंतर 30 टक्के नफा मिळवून देऊ असं आमिष दिलं जात होतं. जिल्ह्यात 100 हून अधिक लोक या अमिषाला बळी पडले असल्याची शक्यता आहे.. आतापर्यंत सतरा जणांनी या प्रकरणाची फिर्याद दिलीये. जयसिंगपूर पोलिस ठाण्यात या फसवणूक प्रकरणाचा पाच जणांविरुद्ध  गुन्हा दाखल झाला आहे. विजय जगदाळे, नंदा जगदाळे, संकेत सूर्यवंशी, सलीम आळतेकर आणि सचिन उदगावे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार 17 मे ते 16 ऑगस्ट 2024 या मुदतीत झाला आहे.

Aug 25, 2025 07:30 (IST)

Live Update : येवल्यात गणपतीला पैठणीची आकर्षक सजावट, फेटा, पितांबर, शेल्यासाठी पैठणीचा वापर.

 नाशिकच्या येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी  प्रसिद्ध पैठणीचा गणेशोत्सवावर पगडा पाहायला मिळत असून, येवल्यात पैठणीचा वापर करून गणरायाच्या मूर्तीला आकर्षक पद्धतीने सजावट केली जात आहे विशेष करून गणरायाचा फेटा , पितांबर ,शेला व  इतर वस्त्रासाठी पैठणी वापर करून  गणरायाला आकर्षक पद्धतीने सजविण्यात येत आहे.पारंपरिक मराठमोळा थाट, नाजूक डिझाइन आणि पैठणीच्या रंगीबेरंगी झळाळीमुळे गणरायाच्या खुललेल्या  रूपातील गणेश मूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Aug 25, 2025 07:29 (IST)

Live Update : त्या दिवशी कल्याण शीळ फाट्यावरील वाहतूक कोंडीचं काय होतं कारण?

कल्याण शीळ रोडवर गेले काही दिवस प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, यातच मध्यरात्री अचानक मोठा

दिशा दर्शक फलक अचानक रस्त्यावर कोसळला आणि काही काळ दोन्ही साईडची वाहतुक ठप्प झाली होती.दरम्यान घटनास्थळी मनसे नेते राजू पाटील, पदाधिकारी योगेश पाटील घटनास्थळी पोहचले आणि पोलीस, फायब्रिगेड यांना बोलवून घेऊन पडलेला फलक बाजूला काढला.. दरम्यान या घटनेत एक बाइक स्वार जखमी होता होता वाचला..

Aug 25, 2025 07:13 (IST)

मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात

काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस 

दोन दिवसाची विश्रांती घेतलेल्या पावसाची मुंबईत पुन्हा हजेरी

सध्य स्थितीला या पावसाचा मुंबईतील रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम नाही

Aug 25, 2025 07:05 (IST)

नंदुरबार जिल्ह्यात चालू हंगामात मका पिकाची रेकॉर्डब्रेक लागवड

नंदुरबार जिल्ह्यात यंदा खरीप हंगाम पेरणी पूर्ण झाली असून मकाच्या पेरणी क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. खरीप हंगामात कापूस आणि ज्वारीला अधिक पसंती देणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा मका लागवडीवर सर्वाधिक भर दिला आहे. यंदाच्या हंगामात सरासरी ३७ हजार ८९१ हेक्टर क्षेत्रात मका पेरणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील ५३ हजार ८७३ हेक्टरवर मका पेरणी करत विक्रम नोंदवला आहे. जिल्ह्यात आजवर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मका लागवड झाली आहे. परिणामी जिल्ह्यात प्रथमच मका लागवड क्षेत्रात १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे, गेल्या हंगामात लाल आणि पांढरा या दोन्ही मका उत्पादनांना अधिक भाव मिळाल्याने यंदा पेरा वाढला असल्याचे बोलले जात आहे.

Aug 25, 2025 07:04 (IST)

कोल्हापुरात ज्यादा नफ्याचे आमिष दाखवून 63 लाखांची फसवणूक

कोल्हापुरात ज्यादा नफ्याचे आमिष दाखवून एका कंपनीमध्ये गुंतवणूक लावून जवळपास 63 लाखांची फसवणूक करण्यात आलीये. व्हीबीएसएल इंडिया नावाच्या कंपनीचे आयुर्वेदिक औषधे, गुणकारी पेये आणि दैनंदिन वापरातील विविध वस्तू विक्रीसाठी फ्रेंचाईजी घ्या असा प्रचार केला जात होता. यामध्ये ठराविक रक्कम गुंतवणुक केल्यानंतर 30 टक्के नफा मिळवून देऊ असं आमिष दिलं जात होतं. जिल्ह्यात 100 हून अधिक लोक या अमिषाला बळी पडले असल्याची शक्यता आहे.. आतापर्यंत सतरा जणांनी या प्रकरणाची फिर्याद दिलीये. जयसिंगपूर पोलिस ठाण्यात या फसवणूक प्रकरणाचा पाच जणांविरुद्ध  गुन्हा दाखल झाला आहे. विजय जगदाळे, नंदा जगदाळे, संकेत सूर्यवंशी, सलीम आळतेकर आणि सचिन उदगावे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार 17 मे ते 16 ऑगस्ट 2024 या मुदतीत झाला आहे.

Aug 25, 2025 07:04 (IST)

कोंबड्यांच्या झुंजींच्या नावाखाली जुगाराचा अड्डा, गडचिरोलीत कारवाई

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी कोंबड्यांच्या झुंजींच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांवर कारवाई केली आहे. अहेरी पोलिसांनी टेकुलगुडा आणि तलवाडा गावांमध्ये  केलेल्या या कारवाईत १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून सुमारे ४ लाख ८६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.