2 months ago

बहीण- भावाच्या नात्याला पवित्र धाग्यात बांधणारा सण म्हणजे रक्षाबंधन. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठाही फुलून गेल्या असून खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राजकीय वर्तुळात सध्या राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपांनी राजकारण तापले आहे. याबाबतही जोरदार घडामोडी घडताना दिसत आहेत. 

Aug 09, 2025 22:49 (IST)

Nagpur : नागपूरमध्ये महालक्ष्मी मंदिराचा भाग कोसळला, 17 जखमी

नागपूर शहराजवळ कोराडीमधील महालक्ष्मी जगदंबा माता देवस्थान परिसरातील एका प्रवेशद्वाराचा निर्माणधीन एक भाग कोसळल्याची माहिती आहे. खापरखेडा येथून कोराडी मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर प्रवेशद्वार निर्माणधीन असून त्याचा एक भाग कोसळला. या अपघातामध्ये 17 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या देवस्थान समितीचे अध्यक्ष आहेत. 

Aug 09, 2025 18:41 (IST)

Live Update : नागपुरात भटक्या कुत्र्याचा चिमुरडीवर हल्ला

नागपुरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी पुन्हा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात चिमुरडी रक्तबंबाळ झाली आहे.  नागपूरच्या त्रिमूर्ती नगर येथील देशपांडे ले आऊट मध्ये अचानक आठ ते दहा बेवारस कुत्र्यांनी अचानकपणे एका 5 वषी॔य लहान  मुलीवर वार करुन चिमुकल्या मुलीला रक्तबंबाळ केले आहे.

या घटनेने त्रिमूर्तीनगर परिसराच्या  नागरिकांत दहशतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

Aug 09, 2025 17:00 (IST)

Live Update : अकोल्यात विवाहित तरुणाला पळवून नेलं, जिल्ह्यात खळबळ

अकोल्याच्या बोरगाव मंजू गावात मनीष चव्हाण या विवाहित तरुणाला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मुर्तीजापुर तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेने मनीषला पळवून नेल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. काही महिन्यांपूर्वीच मनीषचे लग्न झाले होते. विवाहानंतर त्याची एका विवाहित महिलेबरोबर ओळख वाढली होती. या प्रकरणी पळून नेणाऱ्या महिलेबरोबरच आणखी दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Aug 09, 2025 15:55 (IST)

Live Update : पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

पुण्यातील फुरसुंगी परिसरात सासू, सासरे आणि नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आत्महत्या केली आहे. सीमा राखपसारे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेच नाव आहे. फुरसुंगी पोलीस स्टेशन मध्ये सासू-सासरे नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सीमानं गळफास घेऊन आत्महत्या केली अशी तक्रार त्यांच्या वडिलांनी केली.  पती बेरोजगार असल्याने नोकरी बाबत विचारल्यास सतत घरात पत्नीसोबत भांडण होत असे. पती, तसंच दिराकडूनही मुलीला मारहाण झाली.  सासरच्या लोकांकडून सतत मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याने सीमाने उचललं टोकाचं पाऊल, अशी तक्रार त्यांच्या वडिलांनी केली आहे. 

Advertisement
Aug 09, 2025 15:20 (IST)

Live Update : पुण्यात पुमा कंपनीच्या बनावट गोष्टींची विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा

पुण्यात पुमा कंपनीच्या बनावट गोष्टींची विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांचा छापा टाकला. या दुकानात  डुप्लिकेट टी शर्ट, नायट्रो शुज, चप्पल, ट्रॅक पॅन्टची विक्री सुरु होती. या कारवाईमध्ये 8 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

पुण्यातील आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्टायलॉक्स फॅशन नावाच्या दुकानात होत होती बनावट मालाची विक्री सुरु होती. 

पुमा कंपनीचे कॉपीराईट केलेले वेगवेगळ्या रंगाचे बनावट टी शर्ट, नायट्रो शुज, चप्पल, ट्रॅक पॅन्ट वर पुमा कंपनीचे नाव व लोगो वापरुन कॉपीराईट कायद्याचा भंग करणाऱ्या आंबेगावातील दुकानावर पोलिसांनी छापे घातले. बनावट वस्तूंची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक  शिवम लालबाबू गुप्ता असे अटक केलेल्या आरोपीचे नाव

Aug 09, 2025 11:33 (IST)

LIVE Updates: बारामतीत शिकाऊ विमानाचा अपघात

बारामतीत विमान प्रशिक्षण देणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात झालेला आहे. विमान लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक मिळत असून विमान लँडिंग करताना पुढचं चाक वाकड झाल्याने हा विमान झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

रेड बर्ड या प्रशिक्षण संस्थेचे विमान हे होते.सकाळी पावणे आठच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. 

Advertisement
Aug 09, 2025 09:49 (IST)

LIVE Updates: ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन, छगन भुजबळांची हजेरी

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेसकडून पद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत ही यात्रा असणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, तुषार गांधी हे सहभागी होणार आहेत.

Aug 09, 2025 09:00 (IST)

LIVE Update: ठाकरे बंधुंच्या युतीमुळे मविआचं फिस्कटणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट

महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

पालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधुंची युती झाल्यास, काँग्रेस शिवसेनेसोबत युतीधर्म तोडणार

काँग्रेसचा पालिका निवडणुकीसाठी एकला चलो'चा नारा

राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा नकार

विश्वसनीय सूत्रांची ndtv मराठीला माहिती

Advertisement
Aug 09, 2025 08:58 (IST)

LIVE Updates: नाशिकच्या वडनेर भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय मुलाचा मृत्यू

- नाशिकच्या वडनेर भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय मुलाचा मृत्यू

- आयुष भगत या मुलावर बिबट्याने केला होता हल्ला 

- घरासमोर खेळत असताना बिबट्याने मुलावर हल्ला करून नेले होते उचलून 

- रात्री उशिरा स्थानिक नागरिक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतले असता एका शेतात आढळून आला मृतदेह

- बिबट्याच्या हल्ल्यात आयुषच्या मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ

Aug 09, 2025 08:58 (IST)

LIVE Updates: पुणेकरांना पाणी वापरावर मर्यादा, महापालिका आयुक्तांचा निर्णय

पाणी वापरावर मर्यादा यावी यासाठी महापालिका आयुक्ताचा निर्णय 

शहरात १०० टक्के पाणी मीटर बसवा 

शहरातील २ लाख ६३ नळ जोडणीपैकी अवघे १ लाख ८५ हजार मीटर बसवण्यात आले 

अजून ७७ हजार बाकी आहेत एका महिन्यात कस उद्दिष्ट पूर्ण होणार याची चर्चा  

दिवसाला २ हजार मीटर बसवणे अपेक्षित असताना अवघी ३०० मीटर बसवले जातात

Aug 09, 2025 08:57 (IST)

LIVE Update:महापालिका आयुक्त कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांचे आंदोलन, सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्रास

महापालिका आयुक्त कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केल ते शेकल सुरक्षा कर्मचाऱ्यांवर 

सुरक्षा व्यवस्थेत कसूर केल्याप्रकरणी सुरक्षा रक्षकांची दुसरीकडे बदली 

सुरक्ष रक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आलेत 

सुरक्षा रक्षक असताना मनसे पदाधिकारी विनापरवानगी आत कसे घुसले आणि त्यानंतर गोंधळ झाला 

सुरक्षेत कसूर ठेवल्या विरोधात सुरक्षा रक्षकांची बदली

Aug 09, 2025 07:38 (IST)

LIVE Updates: मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा तास उशिरा, प्रवाशांचा संताप

मुंबई नागपूर विशेष ट्रेन सहा तास उलटल्या नंतर आली

प्रवासी प्रचंड संतप्त प्रवश्यानी रेल्वे स्थानकात घातला राडा

मध्य रात्री १२ वाजता येणारी विशेष ट्रेन सहा तास उलटले तरी आली न्हवती

रेल्वे प्रशासनाचा चालकाशी संपर्कच होत नसल्याचे अधिकारी दिले कारण

अधिकाऱ्यांना ही घातला प्रवाश्यांनी घेराव 

सहा वाजता निघणारी गीतांजली एक्सप्रेस जाऊ देणार नाही असा घेतला प्रवाश्यांनी पवित्रा 

आज सकाळी 7 वाजता ही ट्रेन निघाली

Aug 09, 2025 06:32 (IST)

LIVE Updates: प्रथेनुसार रत्नागिरी पोलिसांनीही केली समुद्राची पूजा

नारळी पौर्णिमेनिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी समुद्राला नारळ अर्पण केला. रत्नागिरीतील मांडवी जेटी येथे पोलिसांतर्फे मानाचा नारळ वाजतगाजत नेऊन तिथे विधिवत पूजा करण्यात आली. आणि  समुद्राला रक्षण करण्याचे साकडे घालून जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याहस्ते नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी, व इतर पोलीस उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही प्रथा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामध्ये आज देखील कायम आहे.

Aug 09, 2025 06:31 (IST)

LIVE Updates: परतूर शहरात पोलिसांनी केल्या चार तलवार जप्त...

परतूर शहरातील एका घरात धारधार तलवारी असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय खबऱ्याकडून मिळताच परतूर पोलिसांनी पारडगाव रस्त्याच्या बाजुला असलेल्या घरामध्ये धाड टाकून चार अवैधरित्या लपवलेल्या धारधार तलवारी जप्त करत संतोष लक्ष्मण काळे याच्या सह एका महिला आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध अवैधरित्या धारदार तलवारी सारखे शस्त्र बाळगल्या प्रकरणी भारतीय हत्यार बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केलीय.या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक भागवत हे करत आहे....

Aug 09, 2025 06:31 (IST)

LIVE Updates: नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाची दुर्दशा...

नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी महामार्गाची दुर्दशा झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या खड्ड्यातून वाहन काढणं मोठं जिगरीचं काम झालं आहे एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याच्या काम केलं जात आहे मात्र दुसरीकडे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे मात्र संत गतीने काम सुरू असल्याने शहरातून जाणाऱ्या महामार्ग कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Aug 09, 2025 06:30 (IST)

LIVE Updates: आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी विकास विभागाची घेतली आढावा बैठक

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक घेतली या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह मंत्री संजय सावकारे व आमदारांची उपस्थिती होती तसेच या बैठकीत जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या आदिवासी विकास योजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला तसेच नव्या योजनांबाबत माहिती देऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही आदिवासी विकासमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या आहेत.

Aug 09, 2025 06:30 (IST)

LIVE Updates: सातपुडा आदिवासी भागात मध्य प्रदेशातील आदिवासी अतिक्रमण करतात

सातपुडा पर्वतरांगात असलेल्या आदिवासी भागांमध्ये मध्य प्रदेशातील आदिवासी अतिक्रमण करत असून मध्य प्रदेशातील आदिवासींनी महाराष्ट्रात येऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी प्रधानमंत्री धर्तीआबा जन-भागीदार अभियान कार्यक्रमात व्यक्त केला आहे. तसेच मध्य प्रदेशातील आदिवासी महाराष्ट्रात येऊन अवैध काम करत असून त्यामुळे महाराष्ट्रातील आदिवासींचे नाव खराब होत असल्याचे वक्तव्य ही संजय सावकारे यांनी केले आहे.

Aug 09, 2025 06:29 (IST)

Jalgaon News: चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकर भरतीला स्थगिती

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकर भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असून जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोकर भरती धोरण निश्चित होईपर्यंत परंपरागत नियुक्तांना मान्यता व नवीन भरती परवानगी न देण्याचे निर्देश देण्यात आल्याने ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.