Maharashtra Live Blog: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री खाते स्वत: कडे ठेवले असून अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन खाते तर एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर नगरविकासची जबाबादारी देण्यात आली आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सरकारमधील 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खाते वाटप जाहीर झाले आहे. राज्यात खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदावरुन पक्षांमध्ये रस्सीखेच होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये अटीतटीची स्पर्धा असून पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Live Update : इंदापुरात पार पडला कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचा नागरी सत्कार..
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा इंदापूरात नागरी सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष करत मंत्री भरणे यांना खांद्यावर उचलून घेत वाजत गाजत व्यासपीठावर पोहचवलं.
Live Update : आजच्या जगात नितेश राणे सारखा भाऊ मिळणं कठीण - निलेश राणे
आजच्या जगात नितेश राणे सारखा भाऊ मिळणे कठीण - निलेश राणे
आमच्या राणे कुटुंबासाठी आजचा स्पेशल दिवस आहे. याचा आनंद शब्दात सांगू शकत नाही. नितेश आज जसा आहे तसा नव्हता. मी मोठा असल्याने मला पहिल्यांदा मिळायचं, यावर तो कधी तक्रार करीत नव्हता.
राजकारणात डोकं लागतं. त्याचा योग्य वापर करावा, हे शिकणे म्हणजे नितेश राणेकडून शिकावं. यासाठी राणे फॅक्टर लागतो.
Live Update : बदली झालेले पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ पुन्हा अडचणीत
बदली झालेले पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ पुन्हा अडचणीत
खा. सोनवणे यांच्याकडून बारगळ यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल
मस्साजोग प्रकरणाता पहिल्या दिवशी फोन न उचलणे अंगलट
राज्याच्या मुख्य सचिवांना कारवाईचे निर्देश दिल्या ची सूत्रांची माहिती
Live Update : बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद फडणवीसांनी घ्यावं, सुषमा अंधारेंचं विधान
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता 14 दिवस होऊन गेले आहेत. मात्र अद्यापही या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. त्यातच देशमुख कुटुंबीयांची मस्साजोग येथे भेट घेण्यासाठी विविध राजकीय नेते येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
Live Update : कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण देशमुखांच्या खुनाचा मास्टरमाईंड शोधणार - अजित पवार
राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. मी पोलिसांना सांगितलं कोणीही असलं तरी सोडू नका. सरपंचाचा खून झाला, ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल. कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल पण संतोष देशमुख यांच्या खूनाचा मास्टरमाईंड शोधणार - अजित पवार
Live Update : भरधाव कार डिव्हायडरवर धडकली अन् घेतला पेट, प्रवाशाचा जागीच कोळसा
भरधाव कार डिव्हायडरवर धडकली अन् घेतला पेट.
एकाचा जागीच कोळसा, चौघे जखमी...
हॉटेल सुदर्शनजवळील घटना
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-अकोला बायपास वरील घटना...
अमरावती येथून खामगावमार्गे उज्जैनला दर्शनासाठी जाणाऱ्या कारमधील प्रवासी..
Live Update : बारामतीतून अजित पवार Live
Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं त्यांच्या दरे गावी आगमन
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आज त्यांच्या दरे गावी आगमन झालं आहे. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं. एकंदरीत एकनाथ शिंदे महायुतीचा खातेवाटप जाहीर झाल्यानंतर गावी येत आहेत, किती दिवस विश्रांती करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Live Update : छगन भुजबळांना मंत्रिपदातून डावलल्याने ओबीसी नेत्यांची बैठक
छगन भुजबळांना मंत्रिपदातून डावलल्याने ओबीसी नेत्यांची बैठक
भुजबळांच्या भेटीपूर्वी ओबीसी नेत्यांची पाच तास बैठक सुरू होती.
Live Update : शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात, अनेक जण जखमी
शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटी बसला अपघात, कंटेनर आणि एसटीबसमध्ये अपघात..
कोपरगावनजीक कातकडे पेट्रोलपंपाजवळ हा भीषण अपघात झाला. चालकासह सहा ते सात प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती..
या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. एसटी बस कंटेनरला मागून जोराची धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळली असून जखमींना कोपरगावच्या एसजेएस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
Live Update : ओबीसी बहुजन आघाडीची बैठक आज मुंबईतील महिला विकास मंडळ येथे पार पडली
ओबीसी बहुजन आघाडीची बैठक आज मुंबईतील महिला विकास मंडळ येथे पार पडली
या बैठकीत ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर पाठिंबा दर्शविला आहे
भुजबळ यांना मंत्री मंडळातून डावल्यानंतर ओबीसी नेत्यांची ही पहिली बैठक पार पडली
या बैठकीच्या समारोपवेळी छगन भुजबळ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ असा एकमुखाने नारा आणि घोषणा दिल्या आहेत
Live Update : लोकसेभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या सोमवारी परभणी दौ-यावर..
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या सोमवारी परभणीच्या दौ-यावर आहेत. परभणी दौ-यात राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. सकाळी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल, नांदेडहून ते मोटारीने परभणीला जातील.
Live Update : कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे शहरात जंगी स्वागत, पालकमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अतुल सावे छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच दाखल झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशा आणि फटाके वाजवत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तर, संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाबाबत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे अतुल सावे म्हणाले
Live Update : देवेंद्र फडणवीस संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय देतील, मंत्री जयकुमार गोरे यांचा विश्वास..
खातं मिळाल्यानंतर मंत्री जयकुमार गोरे साईचरणी लीन.. बीड घटनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय देतील, मंत्री गोरे यांचा विश्वास..
Live Update : पालकमंत्रिपदाकरिता अदिती तटकरे यांच्यासाठी मी आग्रही नाही - सुनील तटकरे
पालकमंत्रिपदाकरिता अदिती तटकरे यांच्यासाठी मी आग्रही नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार एकत्रित बसून राज्याच्या सर्व जिल्ह्याचा निर्णय घेणार आहेत. आणि ते जे काही निर्णय घेतील तो आम्हाला महायुतीतील सर्वाना मान्य असणार आहे. - सुनील तटकरे
Live Update : पुणे जिल्ह्यातून म्हाडा योजनेसाठी अर्ज करायचा शेवटची तारीख कधी?
पुणे जिल्ह्यातून म्हाडा योजनेसाठी अर्ज करायचा शेवटचा दिवस
मुदतवाढ करून 31 डिसेंबर 2024 अर्ज भरता येणार
आत्ता पर्यंत 6294 घरांसाठी पुणे जिल्ह्यातून 68 हजार अर्ज प्राप्त झालेत
अर्ज भरण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरणे बंधनकारक
Kalyan Crime: परप्रांतियांची पुन्हा मुजोरी, अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने मराठी कुटुंबाला मारहाण
कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयाने दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. उत्तम पांडे असे मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव असून पांडे यांच्या पत्नीने देखील मारहाण केली.
या मारहाणीत मराठी तरुण जखमी झाला असून तरुणाच्या पत्नी आणि आईला देखील मारहाण केली. जखमी तरुण हा पोलीस कर्मचारी असून ही मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kalyan News: कल्याणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, बेदम मारहाण
कल्याणमध्ये भाजपा पदाधिकाऱ्याला मारहाण
हेमंत परांजपे असे या पदाधिकाऱ्याचे नाव,
कल्याण पश्चिम येथील पारनाका परिसरात घडली घटना
स्कूटरवरून आलेले दोन्ही हल्लेखोर अज्ञात
बाजारपेठ पोलिसांकडून तपास सुरू
हेमंत परांजपे यांनी या प्रकरणी बोलण्यास दिला नकार
Mohan Bhagwat: आठशे वर्षानंतर हिंदू समाजाने आम्हाला आपलं म्हटलं, तो एक अन्याय - मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी अमरावतीच्या महानुभव पंथाच्या कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलं, थोडासा ज्ञानाने फुगलेल्या त्या माणसाला ब्रह्मदेव सुद्धा समजू शकत नाही, कारण धर्म हे जिकीरीच काम आहे, धर्म समजावावा लागतो, जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते या चुकीच्या समजुतीमुळे झाले असं महत्त्वाचं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलेय..धर्म समजावण्याचे काम करणारे संप्रदाय असावे लागतात असेही मोहन भागवत म्हणाले.
तसेच अगदी पहिल्यांदा मी याच स्थानावर आलो होतो, त्या वेळेला असं सांगण्यात आलं की 800 वर्षानंतर हिंदू समाजाने आम्हाला आपलं म्हटलंय, ही गोष्ट जरा मला लागली, ती बरोबर नाही. समाजाचं कुठलं अंग त्याकडे 800 वर्षे पाहिलंच नाही हा अन्यायच आहे. अशी खंत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली,
Live Updates: बनावट कागदपत्रांसह प्रवेश, सोमय्या महाविद्यालयातील 50 विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द
बनावट कागदपत्रांसह अनेकांनी सोमय्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचं चित्र आढळून आलं आहे
इतर मंडळांशी संलग्न असलेल्या शाळांमधून बनावट कागदपत्रांसह सोमय्या ग्रुपच्या तीन महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेले
अनेक विद्यार्थी प्रत्यक्षात राज्य मंडळाचे विद्यार्थी होते
त्यांना इतर बोर्डांचे विद्यार्थी म्हणून प्रवेश दिला गेला कारण त्यांच्या दस्तऐवजांची मार्गदर्शन केंद्रावर आणि महाविद्यालयांमध्ये मॅन्युअली पडताळणी करणे शक्य असल्याचं तपासणी दरम्यान आढळून आलं
केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेतील एक पळवाट ज्याचा गैरवापर रॅकेटर्सनी केला
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी, स्कोअर आपोआप अपलोड केले जातात कारण प्रवेश पोर्टल राज्य बोर्डाच्या पोर्टलशी जोडलेले आहे
या महाविद्यालयांमध्ये प्रवेश रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला
ज्यामुळे 50 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले
शहर पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे
एक दलाल, महाविद्यालयातील दोन कायम कर्मचारी आणि शिक्षण विभागाच्या मार्गदर्शन केंद्रातील एक कारकून
या घटनेनंतर, व्यवस्थापनाने मागील शैक्षणिक वर्षातही इतर बोर्डांमधून प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे
Mumbai Marathon: नवी मुंबई मनपा आयुक्तांनी पूर्ण केली 21 किलोमीटरची धाव
नवी मुंबई मनपा आयुक्तनी पूर्ण केली 21 किलोमीटरची धाव
स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे आणि महाराष्ट्र पोलीस दलाच्या फोर्स वनचे प्रमुख श्री. कृष्ण प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ.
21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनमध्ये या दोन्ही मान्यवरांचा धावपटू म्हणून सहभाग.
Mumbai Hit And Run: मुंबईत हिट अँड रन; भरधाव कारने चिमुकल्याला चिरडलं
मुंबईच्या वडाळ्यात एका भरधाव कारने चार वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली आहे. वडाळ्यातील आंबेडकर कॉलेज जवळ सुसाट कारने चिमुकल्याला धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. आयुष लक्ष्मण किनवडे असं मृत मुलाचे नाव आहे. अपघातानंतर पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
Bharat Gogawale: भरत गोगावलेंचे रायगड जिल्ह्यात जोरदार स्वागत
मंत्री भरत गोगावले यांचे रायगड जिल्ह्यात जोरदार स्वागत
कळंबोली नाका इथं गोगावले स्वागतासाठी शिवसेना पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित.
10 जेसीबी मधून गोगावले यांच्यावर पुष्पवृष्टी , भलामोठा हार.
ढोलताशांच्या गजरात रायगडमधील शिवसैनिकांचा आनंदोत्सव.
मंत्री झाल्यानंतर भरत गोगावले यांचे पहिल्यांदाच जिल्ह्यात आगमन.
महाड मतदार संघाला 20 वर्षानंतर प्रथमच मंत्रीपद..
Raj Thackeray- Uddhav Thackeray: राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र, भाच्याच्या विवाह सोहळ्याला हजेरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा विवाहसोहळा आज दादरमध्ये ुपार पडत आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. बऱ्याच महिन्यांनी दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्याने या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
Sharad Pawar Call Devendra Fadnavis: शरद पवारांचा CM देवेंद्र फडणवीस यांना फोन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यामध्ये भरलेल्या भीमथडी जत्रेला त्यांनी भेट दिली. यावेळी शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन या जत्रेला येण्याचे निमंत्रण दिलं आहे.
Ulhasnagar Crime: पार्किगचा वाद, तरुणाला बेदम मारहाण, उल्हासनगरमधील घटना
डबल पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी हटविल्याच्या रागातून एका मोटरसायकल चालकाला मारहाण झाल्याची घटना उल्हासनगरच्या चोपडा कोर्ट परिसरात घडली आहे. जखमी मोटरसायकल चालकावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उल्हासनगरमध्ये राहणारा दिपेश मल्होत्रा आणि त्याची पत्नी हे कामानिमित्त चोपडा कोर्ट समोरील झेरॉक्स सेंटरवर गुरुवारी दुपारी गेले होते. दुपारी ५ वाजताच्या सुमारास ते काम संपवून निघत असताना त्यांच्या दुचाकीच्या मागे अन्य दुचाकी उभी असल्याचे त्यांना दिसले. ती गाडी बाजूला करून ते निघत असताना त्या हटवलेल्या गाडीचा मालक तिथे आला आणि कोणाला विचारून गाडीला हात लावला? असं म्हणत दीपेश मल्होत्रा यांना त्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत दिपेश यांच्या डोळ्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Ulhasnagar Traffic: उल्हासनगरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार, महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांची समिती
उल्हासनगर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी पालिका अधिकारी, पोलीस व वाहतूक अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत एक समिती गठित करण्याचा निर्णय घेऊन वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्याचं ठरविण्यात आले आहे.
शहरातील रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग पट्टे, दुभाजकावर पांढरे आणि पिवळे पट्टे मारण्याचे आदेश यावेळी महापालिका आयुक्तांनी दिले. उल्हासनगरातील बहुतेक रस्ते अरुंद असून सुरू असलेल्या विकास कामामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वाहतुकीबाबत जनजागृतीसाठी शहरात होर्डिंग्स, चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी वेळ निश्चित करण्यात येणार असून १ जानेवारीनंतर संयुक्त मोहीम हाती घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वर्षात तरी उल्हासनगरच्या वाहतुकीला शिस्त लागते का? हे पाहावं लागणार आहे.
Ulhasnagar Fraud Doctor: उल्हासनगरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करा, पालिका आयुक्तांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
उल्हासनगर महापालिकेने बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करूनही स्थानिक पोलिस कारवाई करत नसल्याचं सांगत उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी थेट पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तक्रारीवरून कॅम्प ४ मधील ३ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले. मात्र गुन्हे दाखल होऊन २० दिवस उलटूनही विठ्ठलवाडी पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. त्यामुळं बोगस डॉक्टरांचे क्लिनिक राजरोस सुरूच आहेत. याबाबत महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई होण्यासाठी थेट ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना पत्र पाठवत नाराजी व्यक्त केली असून कारवाईची मागणी केली आहे.
Case File Against imtiaz jaleel: माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल
इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या 30 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आंदोलनात गाढवाचा वापर केल्याने हा गुन्हा नोंद झाला आहे तर आंदोलकांनी जमावबंदीचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kolhapur News: इन्स्टाग्राम लाईव्ह करुन पंचगंगेत उडी, तरुणाच्या आत्महत्येने खळबळ
मित्रांना इन्स्टावर फोनवरून लाइव्ह येण्याचे सांगून तरुणानं नदीत उडी घेत्याल्याची घटना घडलीये. आजी आणि मामासोबत झालेल्या किरकोळ वादातून हे कृत्य केलं असल्याची माहिती आहे. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. लक्ष्मीपुरी पोलिस आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून सायंकाळ पर्यंत शोधमोहीम सुरु होती. मात्र अद्यापही तरुणाचा शोध लागलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच हर्षवर्धनचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी शिवाजी पुलावर पोहोचले. पुलाजवळ वडणगेच्या दिशेला त्याची दुचाकी मिळाली. त्याने अचानक केलेल्या कृतीने नातेवाईक आणि मित्रांना धक्का बसला. या घटनेनंतर पंचगंगा नदी परिसरात बघ्यांची गर्दी जमलेली.
Mumbai Goa Highway Burning Bus: मोठा अनर्थ टळला! मुंबई- गोवा महामार्गावर धावत्या बसला आग; 34 प्रवासी बचावले
Bus Burn On Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. महामार्गावरी कोलाड इथं खाजगी प्रवासी बसला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले. धाटाव एमआयडीसी, दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्नीशमन दल , कोलाड रेस्क्यू टीम आणि पोलीस यांनी बचाव कार्य केले व आगीवर नियंत्रण आणले.
समोर आलेल्या माहितीनुसार, बसमध्ये चालक आणि क्लिनरसह 34 प्रवासी होते. खापरोबा ट्रॅव्हल्सची ही एसी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्वरी येथून मालवणकडे निघाली होती. कोलाड रेल्वे पुलाजवळ आली असता बसच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला. तेव्हां ड्रायव्हरने गाडी थांबवून पाहिले असता बसने मागील बाजूस पेट घेतल्याचे दिसले. तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर आगीचा भडका उडाला.
Satara Accident: ऊसाने भरलेली ट्रॉली नदीत कोसळली, साताऱ्यातील घटना
बहुले येथील सर्जेराव पानसकर यांचा ट्रॅक्टर ट्रॉलीत ऊस भरुन इस्लामपुर येथील राजारामबापु साखर कारखान्याकडे घेवुन निघाला होता. आज शनिवारी रात्री साडेसाठच्या सुमारास तो ट्रॅक्टर तांबवे पुलावर ऊस घेवुन कराडकडे येत असताना अचानक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोडलेला हुक अचानक तुटला. त्यामुळे नदीचे संरक्षक कठडे तोडुन ट्रॉली थेट तांबवे येथील कोयना नदीवरील पुलावरुन नदीत पडली. दरम्यान ट्रॅक्टरला दणका बसल्याने चालकाच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने तातडीने ट्रॅक्टर थांबवला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. तालुका पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात सुदैवाने त्या कोणताही जीवीत हानी झाली नाही.
Dharashiv News: कर्जाला कंटाळुन शेतकऱ्याची आत्महत्या
सलग दोन वर्षे द्राक्ष बाग फेल गेल्याने कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्याने प्रकाश जानकर चिंताग्रस्त होते, गुरुवारी संध्याकाळी शेतात केले होते विषारी औषध प्राशन , बार्शी येथे जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू, प्रकाश महादेव जानकर यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँके परंडा शाखेचे 3 लाख रुपये कर्ज तर हातउसने 3 लाख रुपये होते कर्ज, एकूण सहा लाख रुपये होते कर्ज दोन वर्षे पीक निघत नसल्याने बँकेचे व लोकांचे पैसे द्यायला नसल्याने प्रकाश महादेव जानकर या शेतकऱ्याने चिंताग्रस्त होऊन विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील 3 लाख 28 शेतकऱ्यांनी भरला पीक विमा
शासनाने केवळ १ रुपयांत पिक विमा काढण्याची सोय केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रबी हंगामातील पिक विमा योजनेतील सहभाग वाढला आहे. जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ६६३ शेतकऱ्यांनी ०२ लाख ३७ हजार ११२ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित केली आहेत. यात सर्वाधिक हरभरा पिकाचे १ लाख ४९ हजार ५७३ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे तर त्याखालोखाल कांदा, ज्वारीचा विमा काढला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग हा सर्वाधिक असून त्यानंतर कळंब तालुका तर सर्वात कमी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. कृषी विभागाच्या वतीने स्थानिक पातळीवर विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले होते.
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना मिळाली महत्त्वाची खाती
माहितीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आली असून यात जळगाव जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना महत्त्वाची खाती मिळाली आहेत. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता हे खाते कायम असून गिरीश महाजन कडे पुन्हा एकदा जलसंपदा खात्यासह मागील महायुतीच्या सरकारमधील अनिल पाटील यांच्याकडे असलेले आपत्ती व्यवस्थापनाच्या खात्याची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपामध्ये पहिल्यांदाच मंत्रिपदाची वर्णी लागलेली संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असून या तीनही मंत्र्यांच्या माध्यमातून महत्त्वाची खाती जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला आली आहेत. मात्र आता जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Ajit Pawar News: अजित पवार आज बारामती दौऱ्यावर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामती शहरातील शारदा प्रांगणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीकरांच्या वतीने भव्य नागरी सन्मान केला जाणार आहे.
सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बारामती शहरातील शारदा प्रांगणात हा सन्मान सोहळा पार पडणार असून या सोहळ्याला राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांसह पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित राहणार आहेत.
बारामती शहरातील शारदा प्रांगणामध्ये याची जय्यत तयारी करण्यात आली असून शहरात जागोजागी स्वागत कामानी देखील उभा करण्यात आल्या आहेत.