5 hours ago

Maharashtra LIVE BLog:  दिवाळीचा सण अवघ्या एका आठवड्यावर आला आहे त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईसह पुण्यात विकेंडमुळे नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेत त्यामुळे बाजारपेठा खुलून गेल्याचे दिसत चित्र दिसत आहे. दुसरीकडे राजकीय वर्तुळात आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. 

Oct 12, 2025 12:44 (IST)

LIVE Update: राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर! उद्धव ठाकरेंशी होणार चर्चा

राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर जाणार आहेत. ठाकरे बंधुंमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये राजकीय चर्चा होण्याचीही शक्यता आहे. 

Oct 12, 2025 10:50 (IST)

LIVE Updates: निलेश घायवळ विरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस

निलेश घायवळ विरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस

इंटरपोल ने जारी केली घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर" नोटीस

पुणे पोलिसांकडून इंटरपोल शी पत्र व्यवहारानंतर नोटीस जारी

फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते

घायवळ चा शोध घेण्यासाठी आता पुणे पोलिसांना इंटरपोल ची मदत

दि इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ॲार्गनायझेशन म्हणजेच ‘इंटरपोल’ या नावाने ही यंत्रणा ओळखली जाते

आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमधील पोलीस आणि गुन्हेगारांच्या माहितीची अंतर्गत सहकार्य या तत्त्वावर यंत्रणेचे काम चालते

Oct 12, 2025 09:30 (IST)

Pune LIVE: पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात घरफोडी

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात घरफोडी 

घरफोडी करत व्यापाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात सोन आणि रोकड लंपास 

चोरीची घटना CCTV मध्ये कैद 

घराच लॉक तोडत चोरट्यांनी मारला डल्ला 

मार्केट यार्ड पोलीस स्टेशन मध्ये २ आरोपींविरोधात गुन्हा दाखल 

आरोपी अद्याप फरार

Oct 12, 2025 09:29 (IST)

LIVE Update: आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीकडून नोटीस

आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली 

नोटीस मधे संग्राम जगताप यांच्या सातत्याने होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाच्या शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेला छेद निर्माण होतं असल्याचा उल्लेख 

शनिवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संग्राम जगताप यांना वादग्रस्त वक्तव्यांबाबत खुलासा करण्याबाबत नोटीस बजावली 

नुकतंच संग्राम जगताप यांच्याकडून दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा असं वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं होतं

Advertisement
Oct 12, 2025 07:37 (IST)

Pune LIVE Updates: शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा येणार एकत्र

शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा येणार एकत्र

 शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकत्र बैठकीला उपस्थित राहणार

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये दुपारी महत्त्वाची बैठक

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकत्र असणार

बैठकीमध्ये साखर कारखान्या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार

Oct 12, 2025 07:36 (IST)

Pune LIVE Updates: शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा येणार एकत्र

शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा येणार एकत्र

 शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकत्र बैठकीला उपस्थित राहणार

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये दुपारी महत्त्वाची बैठक

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकत्र असणार

बैठकीमध्ये साखर कारखान्या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार

Advertisement
Oct 12, 2025 07:02 (IST)

Mumbai Ahmedabad Highway Traffic: मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

गेल्या दोन तासापासून वाहतूक कोंडी

मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक

Oct 12, 2025 06:45 (IST)

Nashik News: कोयता हातात घेऊन रिल बनविणाऱ्या टवाळखोरांना घडविली अद्दल

नाशिकानंतर ग्रामीण भागातही पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्या टवाळखोराविरुद्ध धडक कारवाई सुरू केले असून, हातात कोयता घेऊन रिल बनवून समाज माध्यमांवर व्हायरल करणाऱ्या टवाळखोरांना नाशिकच्या लासलगावात पोलिसांनी चांगलीच अद्दल घडविली.विंचूर परिसरात कामानिमित्त आलेल्या पाच तरुणांनी हातात कोयता घेत “चोरोके साथ दोस्ती की है, कुत्तों के साथ होली मनायेंगे, धारा ३०२ भी लग सकता है ३०७ समझके…” संवाद असलेला दहशत पसरविणारा रिल तयार करून समाज माध्यमांवर व्हायरल केला होता.

Advertisement
Oct 12, 2025 06:44 (IST)

LIVE Update: कशेने येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी मध्ये जाहीर प्रवेश

इंदापूर येथील कशेणे ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. काम करत आलोय, काम करत राहू’ या ब्रीदवाक्याचा अवलंब करून पक्षसंघटन अधिक प्रभावी करण्यासाठी आपण अशीच वाटचाल सातत्याने करत राहू असा विश्वास रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. 

Oct 12, 2025 06:44 (IST)

LIVE Update: मंडणगड न्यायालय इमारतीचे आज लोकार्पण

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड दिवाणी कनिष्ठ न्यायालय इमारतीचं उद्द्घाटन आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने न्यायालयाच्या इमारत आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भित्तीचित्रांचे अनावरण होणार आहे. महनीय व्यक्तींच्या सुरक्षेच्यादृष्टीने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून येथे दाखल झाले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनीही येथे भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. दरम्यान या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर भूषवणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती माधव जामदार उपस्थित राहणार आहेत. 

Oct 12, 2025 06:43 (IST)

LIVE Update: कळवणमध्ये दंगेखोरांची पोलिसांनी काढली धिंड

नाशिकच्या कळवण पोलीस स्टेशनवर  दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांविरुद्ध पोलिसांनी आता 

धडक कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत १४ दंगेखोरांना ताब्यात घेतले आहे. त्याची अक्षरश: शहरातील  मुख्य रस्त्यांवरून धिंड काढीत कायदाचा बडगा उगारला आहे. त्यामुळे इतर फरार दंगलखोरांनी चांगलाच धसका घेतला असून काही दंगेखोर अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.अटक करण्यात आलेल्या दंगलखोरांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आदिवासी शेतमजुराचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचा आरोप करीत काही आदिवासी संघटनांनी कळवण पोलिस स्थानकासमोर रास्ता रोको करीत पोलिस स्थानकावर दगडफेक केली होती.

Topics mentioned in this article