Beed Election Result 2025: निकालाआधी बीडमध्ये मोठी घडामोड! विद्यमान आमदाराचा भाऊ हद्दपार

जयसिंह पंडित व पुतण्या पृथ्वीराज पंडित यांच्यासह भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे पुतणे शिवराज पवार यांना गेवराई व बीड तालुक्यांतून 48 तासांसाठी हद्दपार केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड:

Beed Local Body Election Result: राज्यातील नगरपरिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांसाठी निवडणूक प्रशासन तसेच पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. या निकालाच्या आधी बीडमध्ये मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. बीडमध्ये  विद्यमान आमदार अमरसिंह पंडित यांच्या भावाला तथा माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या पुतण्याला  48 तासासाठी बीड गेवराईतून हद्दपार करण्यात आले आहे. 

बीडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई नगर नगरपरिषद  निवडणुकीच्या मतदानादिवशी झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपच्या समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षाची दखल घेत, पोलिसांनी आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित व पुतण्या पृथ्वीराज पंडित यांच्यासह भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे पुतणे शिवराज पवार यांना गेवराई व बीड तालुक्यांतून 48 तासांसाठी हद्दपार केले आहे.

Konkan Western Maharashtra Exit Poll 2025: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात कुणाची मुसंडी? धक्कादायक एक्झिट पोल समोर

 मतदानाच्या दिवशी बाळराजे पवार आणि जयसिंह पंडित यांच्या गटात मोठा राडा झाला होता. या घटनेमुळे मतमोजणीच्या वेळी पुन्हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी गेवराईत तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. हद्दपारीच्या कारवाईत एकूण 43 जणांचा समावेश असून, या सर्वाना मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

बीड पोलिसांनी ही कारवाई करत पावले उचलल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शांततेत मतमोजणी पार पाडण्यासाठी प्रशासनाने ही मोहीम राबवली आहे. नागरिकांनी शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Maharashtra Local Body Election Results 2025 Live नगरपरिषद निवडणुकांमध्ये कुणाची होणार सरशी? वाचा सर्व अपडेट