Maharashtra Local Body Election Exit Poll: राज्यातील 264 नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून या निकालात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालाआधी आलेल्या एक्झिट पोलने मविआची मात्र धाकधुक वाढवली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप बाहुबली ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापैकी कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा झेंडा फडकणार? याबाबत एक्झिट पोलने मोठा अंदाज वर्तवला आहे.
कोकणात कुणाचा झेंडा?
कोकणातील सावंतवाडी, रत्नागिरी, कणकवली, मालवण, रत्नागिरी, अंबरनाथ, बदलापूर, उरण डहाणूमधील लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच एक्झिट पोलने कोकणात महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकणात भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळण्याचा अंदाज असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 10 जागांवर विजयी होऊ शकतात. दुसरीकडे, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मात्र प्रत्येकी एकच जागा मिळणार आहे. कोकणात ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा धक्का बसणार असून दारुण पराभवाचा अंदाज वर्तवला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कमळ फुलणार?
पश्चिम महाराष्ट्रातील नगरपंचायत तसेच नगरपरिषदांच्या निकालाकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांमधील बड्या नेत्यांची प्रतिक्षा पणाला लागली आहे. कधीकाळी राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही महायुतीचाच बोलबाला पाहायला मिळणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील 71 नगरपरिषदांपैकी 27 जागांवर कमळ फुलताना दिसत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला 12 नगरपालिकांमध्ये मोठे यश मिळताना दिसत आहे तर शिंदे गटाचे 7 नगराध्यक्ष बसणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. या भागात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र मोठा धक्का बसताना दिसत आहे. शरद पवार गटाला केवळ दोन तर काँग्रेस आणि ठाकरे गटाला केवळ 1 जागेवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर 21 जागांवर इतर उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world