Maharashtra Local Body Elections 2025: राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (मंगळवार, 4 नोव्हेंबर) ही घोषणा केली. या निवडणुकीद्वारे एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी होईल आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम (Detailed Election Schedule)
या निवडणुकीसाठी उमेदवारांना 10 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेला संपूर्ण कार्यक्रम खालीलप्रमाणे:
- अर्ज दाखल करण्याची सुरुवात: 10 नोव्हेंबर
- अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 17 नोव्हेंबर
- उमेदवारी अर्जांची छाननी: 18 नोव्हेंबर
- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 25 नोव्हेंबर
- मतदान: 2 डिसेंबर
- मतमोजणी: 3 डिसेंबर
राज्य निवडणूक आयोगामार्फत एकूण 288 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे:
नगर परिषदा: 246 (यामध्ये 10 नवनिर्मित आणि 236 मुदत संपलेल्या नगर परिषदांचा समावेश आहे.)
नगर पंचायती: 42 (यामध्ये 15 नवनिर्मित आणि 27 मुदत संपलेल्या नगर पंचायतींचा समावेश आहे. उर्वरित 105 नगर पंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही.)
( नक्की वाचा : How to Search Your Name In Voter List: मतदार यादीत नाव शोधण्याचा सोपा पर्याय, ऑफलाईनही शोधू शकता नाव )
31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्यात एकूण 1,07,03,576 मतदार आहेत. या मतदारांमध्ये 53,79,931 पुरुष मतदार, 53,22,870 महिला मतदार आणि 775 पारलिंगी मतदारांचा समावेश आहे. या सर्व मतदारांसाठी एकूण 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यांची केंद्रनिहाय मतदार यादी 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.
निवडणुकीची पद्धत आणि बहुसदस्यीय प्रभाग (Election Method and Multi-Member Wards)
नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी ही निवडणूक EVM (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) द्वारे घेतली जाईल.
नगर परिषदा:
- यांची सदस्य संख्या साधारणपणे 20 ते 75 असते.
- निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहे.
- सदस्य संख्या विषम असल्यास, एका प्रभागात 3 जागा असतील.
- मतदारांना 2 ते 3 सदस्यांसाठी आणि नगर परिषदेच्या अध्यक्षांसाठी असे एकूण मते द्यावी लागतील.
नगर पंचायती:
- येथे 17 सदस्य संख्या असते.
- मतदारांना 1 सदस्य आणि 1 अध्यक्ष अशा दोन पदांसाठी मतदान करावे लागेल.
प्रशासकीय व्यवस्था आणि कर्मचारी (Administrative Arrangements)
निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे:
निवडणूक निर्णय अधिकारी: 288
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी: 288
कर्मचारी व्यवस्था: 66,675
आरक्षित जागांचा तपशील (Details of Reserved Seats)
या निवडणुकीत प्रभाग आणि सदस्य पदांसाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे:
एकूण प्रभाग: 3,820
एकूण सदस्य संख्या: 6,859
महिलांसाठी राखीव प्रभाग: 3,492
निवडणुकीत खर्चाची मर्याद वाढवण्याचा निर्णय, किती आहे खर्च मर्यादा?
अ वर्ग, नगर परिषद, अध्यक्षपदासाठी - 15 लाख
सदस्य- 5 लाख
ब वर्ग नगर परिषद अध्यक्ष- 11 लाख 25 हजार
ब वर्ग नगर परिषद सदस्य -3 लाख 50 हजार
क वर्ग नगर परिषद अध्यक्ष- 7 लाख 50 हजार
क वर्ग नगर परिषद सदस्य -2 लाख 50 हजार
नगर पंचायत अध्यक्ष- 6 लाख
नगर पंचायत सदस्य - 2 लाख 25 हजार
दुबार मतदारांवर लक्ष (Special Note and Double Voters Check)
मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी घेतील. दुबार मतदारांवर नियंत्रणासाठी निवडणूक आयोगाने एक विशेष टूल (Tool) विकसित केले आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल. त्यांची तपासणी करून एकाच ठिकाणी मतदान करण्याची सोय दिली जाईल. अशा मतदारांना दुसऱ्या केंद्रावर मतदान न करण्याचे डिक्लरेशन (Declaration) द्यावे लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world