Mazi Ladki Bahin Yojana E-KYC deadline extended : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना याबाबत आवाहन केलं होतं. १ नोव्हेंबरला दोन महिने पूर्ण झाले आहेत. दरम्यान अद्यापही अनेक महिलांनी त्यांचं ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान लाडक्या बहिणींसाठी चांगली बातमी समोर आली आहे.
आता लाडक्या बहिणींना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात एक महत्त्वाची पार पडली. या बैठकीत ई-केवायसी करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. आता लाडक्या बहिणी १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करू शकतात.
नक्की वाचा - Ladki Bahin Yojana e-KYC: एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! अर्ज भरताना घ्या 'ही' खबरदारी
ऑक्टोबरच्या सन्मान निधी वितरणास सुरुवात...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
ओटीपी येत नाही, काय कराल?
ई-केवायसी सुरू केल्यापासून लाडक्या बहिणींना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ई-केवायसीमध्ये पती किंवा वडिलांचं आधार कार्ड आणि ओटीपी अनिवार्य करण्यात आलं होतं. मात्र निराधार महिनांचं काय? ज्यांना पती आणि वडील दोघेही नाहीत अशा महिलांनी ई-केवायसी कसं पूर्ण करायचं याबाबत महिलांमध्ये साशंकता आहे. दरम्यान यासाठी लवकरच नवीन पर्याय किंवा तोडगा काढला जाणार असल्याची माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world