Nagar Parishad Elections Results 2025 : राज्यातील नगर परिषद आणि नगपंचायत निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचं श्रेय हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसंच सर्व नेत्यांच्या समन्वयाला दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेना हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा तर अजित पवारांचा राष्ट्रवादी हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. महायुतीची ही कामगिरी आगामी महापालिका निवडणुकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं चांगली कामगिरी केलीय. पर उद्धव ठाकरेंची शिवसेना (शिवसेना उबाठा) आणि शरद पवारांची राष्ट्रवादी (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) पक्षाची मोठी वाताहात झाली आहे. महापालिका निवडणुकांपूर्वी दोन्ही पक्षांसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे.
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे प्रत्येक कल, सर्व अपडेट्स, निकाल आणि त्याचे सविस्तर विश्लेषण हे तुम्हाला दिवसभर 'NDTV मराठी' वर वाचायला मिळणार आहे. दिवसभरातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स वाचण्यासाठी हा लाईव्ह ब्लॉग नियमित अंतरानं रिफ्रेश करा.
Local Body Election Results 2025 Live: महायुती आली नाही तिथंही काम करणार - मुख्यमंत्री
Local Body Election Results 2025 Live: जिथे महायुती आली तिथे आणि जिथे आली नाही तिथेही आम्ही काम करणार आहोत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Local Body Election Results 2025 Live: मुनगंटीवारांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Local Body Election Results 2025 Live: पक्षाला दारं असूच नये, पक्ष हा बिनदाराचाच असला पाहिजे. फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहे की नाही? हे पाहिलं पाहिजे. पक्षात झालेल्या प्रवेशाचा पक्षाला फायदाच झाला. सुधीरभाऊंना कोणती ताकद कमी पडली असेल तर आम्ही ती महापालिका निवडणुकीत देऊ.
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: भाजपा नंबर 1 पक्ष , वाचा मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
Local Body Election Results 2025 Live: भारतीय जनता पार्टी हा 2014 पासून शहरातील तसंच ग्रामीण भागातील पक्ष बनला आहे. या निवडणुकीनंतर भाजपा हा महाराष्ट्राचा नंबर 1 पक्ष असल्याचं पुन्हा सिद्ध झालं आहे.
Local Body Election Results 2025 Live: 'हा' टीम भाजपाचा विजय - मु्ख्यमंत्री
Local Body Election Results 2025 Live: भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. सर्व नेत्यांनी उत्तम समन्वय केला, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मी या निवडणुकीत सकारात्मक प्रचार केला, कुणावरही टीका केली नाही. सकारात्मक कामांवर मत मागितली असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. सर्व नेत्यांनी उत्तम समन्वय केला, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मी या निवडणुकीत सकारात्मक प्रचार केला, कुणावरही टीका केली नाही. सकारात्मक कामांवर मत मागितली असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
Local Body Election Results 2025 Live: नगरपरिषदेच्या निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Local Body Election Results 2025 Live: महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. राज्यात 3300 पेक्षा जास्त भाजपाचे नगरसेवर निवडून आले. एकूण नगरसेवकांपैकी 48 टक्के नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Local Body Election Results 2025 Live: राष्ट्रवादीला 16 जागा पण, नगराध्यक्ष भाजपाचा
Local Body Election Results 2025 Live: लातूर जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि एका नगर पंचायतीच्या निकालात सर्वाधीक धक्का देणारा निकाल अहमदपूर नगर परिषदेचा मानला जातोय कारण राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे 16 नगरसेवक निवडून आले असताना नगराध्यक्ष पद मात्र भाजपानं जिंकलंय.
सहकार मंत्र्यांची सर्व ताकत पणाला लागली असतानाही बाबासाहेब पाटील यांना नगराध्यक्ष पदाची जागा गमवावी लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेक माजी नगरसेवकांना तिकीट नाकारल्यामुळे हा पराजय झाल्याच्या चर्चा आहेत.
Local Body Election Results 2025 Live: पुर्व विदर्भात कुणाची सरशी पाहा संपूर्ण यादी
पूर्व विदर्भ- एकुण जागा ५५
भाजप- ३३
काँग्रेस- १३
शिवसेना- ३
राष्ट्रवादी (श.प.) -१
राष्ट्रवादी(अ.प.) - १
इतर- ४
Local Body Election Results 2025 Live: येवल्यात निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी
येवल्यात निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी...परस्पर विरोधात गुन्हा दाखल
Local Body Election Results 2025 Live: विदर्भात कुणाला किती जागा, पाहा संपूर्ण लिस्ट
नागपूर- २७
भाजप- २२
काँग्रेस- १
शिवसेना- २
राष्ट्रवादी (श. प.)- १
इतर- १
वर्धा- ६
भाजप- ३
काँग्रेस- २
इतर- १
गडचिरोली- ३
भाजप- ३
चंद्रपूर - ११
ॉ
काँग्रेस- ७
भाजप- २
शिवसेना- १
अपक्ष- १
भंडारा- ४
भाजप- २
राष्ट्रवादी (अ.प.)- १
इतर- १
गोंदिया- ४
काँग्रेस- ३
भाजप- १
Local Body Election Results 2025 Live: भाजप मंत्र्याच्या पत्नीचा पराभव, भुसावळमध्ये चमत्कार
जळगाव ब्रेक
भुसावळ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने केले वस्त्रोद्योग मंत्र्यांचे वस्त्रहरण
भुसावळ मध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना मोठा धक्का
संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार गायत्री भंगाळे 1 हजार 800 मतांनी विजयी
भुसावळमध्ये रजनी सावकारे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी घेतली होती सभा
मुख्यमंत्र्यांची सभा होऊनही भुसावळ मध्ये भाजपला मोठा धक्का
भुसावळ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांची खेळी यशस्वी
Local Body Election Results 2025 Live: पैठणमध्ये पराभूत उमेदवारांकडून दगडफेक
छत्रपती संभाजीनगर :
पैठण मध्ये दोन पराभूत उमेदवारांमध्ये वाद झाला. वादा नंतर दोन्ही उमेदवारांच्या गटाकडून दगडफेक करण्यात आली. यात पाच जण जखमी झाले आहेत. दोन्ही पराभूत एकमेकांना पराभूत करण्यात जबाबदार असल्याचा वाद विकोपाला गेला. दोन्ही पराभूत उमेदवार आणि त्यांचे गट एकमेकांसमोर भिडले. पैठणच्या नेहरू चौक मध्ये निवडणुकीच्या वादावरून दगडफेक झाली.
Local Body Election Results 2025 Live: पश्चिम महाराष्ट्र भाजप अव्वल, मविआची पिछेहाट
पश्चिम महाराष्ट्र
भाजप 19
अजित पवारांची राष्ट्रवादी 14
शिंदे यांची शिवसेना 14
काँग्रेस 3
शरद पवारांची राष्ट्रवादी 3
ठाकरेंची शिवसेना 1
स्थानिक आघाडी -6
----
एकूण -60
Local Body Election Results 2025 Live: मुक्ताईनगर मध्ये भाजपाच्या पराभवानंतर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
मुक्ताईनगर मध्ये भाजपच्या पराभवाला भाजपचेच भाजपचे नेते जबाबदार ?
भाजपच्या मोठ्या नेत्यांनी रक्षा खडसे यांना साथ न दिल्याने रक्षा खडसे या निवडणुकीत एकाकी पडल्या
मुक्ताईनगर मध्ये भाजपाचा पराभव हा भाजपच्याच नेत्यांमुळे झाल्याचा खडसेंचा त्यांचा आरोप
मुक्ताईनगर मध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे निवडणुकीच्या मतांवर परिणाम झाल्याचा खडसेंचा दावा
मुक्ताईनगर मध्ये भाजपाच्या पराभवानंतर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
Local Body Election Results 2025 Live: शिरपूर नगरपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सुपडा साफ
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतन पटेल विजयी...
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा सुपडा साफ
शिवसेना पक्षाला खाते उघडता आले नाही
महायुती मधील भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी सरळ होती लढत
आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपची एकहाती सत्ता
भाजपचे 31 तर एमआयएमचे 1 उमेदवार विजयी
आमदार अमरिशभाई पटेल यांचे सुपुत्र चिंतन पटेल नगराध्यक्ष पदी विजयी...
Local Body Election Results 2025 Live: धुळ्याच्या शिरपूरमध्ये भाजप रॅलीवर दगडफेक
धुळ्याच्या शिरपूरमध्ये भाजपच्या विजयी रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. शहरातून ही रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी काही जणांनी ही दगडफेक केल्याचे समजते. या घटनेनंतर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
Local Body Election Results 2025 Live: सुधिर मुनगंटीवारांचा पक्षाला घरचा आहेर
चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला मिळालेल्या दारुण पराभवावर ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षावर चांगलीच नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने वडेट्टीवार यांना बळ दिले आणि माझ्या पक्षाने माझी शक्ती हिरावून घेतली, असे गंभीर विधान करीत त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. पक्षाने गटबाजीला पोषक वातावरण तयार केले. शनि शिंगणापूरनंतर आमचा एकमेव पक्ष असे आहे, जिथे दरवाजे सतत उघडे असतात, असे म्हणत पक्षात बाहेरून येणाऱ्यांवर आणि या धोरणावरही जोरदार प्रहार केला.
Local Body Election Results 2025 Live: चंद्रपूरमध्ये वडेट्टीवारांनी आपली ताकद दाखवली
चंद्रपूर
काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी गड राखला!
ब्रम्हपुरी नगरपरिषद २३ पैकी २१ जागांवर काँग्रेस विजयी
काँग्रेस २१
भाजप १
घड्याळ १
Local Body Election Results 2025 Live: पंढरपूरात मोठा उलटफेर
भाजप आमदार समाधान अवताडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही ठिकाणी पराभव स्विकारावा लागला आहे. पंढरपूरमध्ये प्रणिता भालके या विजयी झाल्या आहेत. भाजपला पंढरपुरात हा मोठा धक्का बसला आहे.
Local Body Election Results 2025 Live: हा महायुतीचा विजय, रविंद्र चव्हाण
आजचे यश महायुतीचे यश आहे. 122 ते 134 जागांवर भाजपाचे नगराध्यक्ष निवडले जातील. तीन हजार पेक्षाही जास्त भाजपा नगरसेवक निवडून येतील असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
Local Body Election Results 2025 Live: रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचा निकाल जाहीर
रायगड.
नगराध्यक्ष
महाड - शिवसेना शिंदेगट
श्रीवर्धन - शिवसेना उबाठा
रोहा - राष्ट्रवादी, अजित पवार गट.
पेण - भाजप
मुरुड - राष्ट्रवादी, अजित पवार गट.
अलिबाग - शेकाप.
खोपोली - शिवसेना शिंदे गट
कर्जत - राष्ट्रवादी. अजित पवार.
माथेरान - शिवसेना, शिंदे गट
उरण - महाविकास आघाडी.
शिवसेना शिंदे - 3
उबाठा - 2
राष्ट्रवादी अजित पवार 3
शेकाप 1
भाजपा 1
Local Body Election Results 2025 Live: माजलगावमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का
बीड ब्रेक:
राष्ट्रवादी शरद पवार गटाने उघडले खाते
माजलगावमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी
अजित पवार गटाला मोठा धक्का
आमदार प्रकाश सोळंके यांना गड राखता आले नाही
शिफा बिलाल चाऊस यांचा विजय
Local Body Election Results 2025 Live: कोपरगावमध्ये पुन्हा एकदा काळे विरुद्ध कोल्हे
कोपरगाव नगरपरिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि हाय-व्होल्टेज ठरलेल्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाच्या (कोल्हे गट) पराग संधान यांनी विजयाचा झेंडा फडकावला आहे.
नगराध्यक्षपदासाठी झालेल्या या ऐतिहासिक लढतीत पराग संधान यांना १८,५०३ मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे (आ.काळे गट) उमेदवार ओमप्रकाश कोयटे यांना १८,०९४ मतांवर समाधान मानावे लागले. पराग संधान ४०९ मतांनी विजयी
Local Body Election Results 2025 Live: अहिल्यानगर नगरपरिषद निकाल
अहिल्यानगर नगरपरिषद निकाल
शिर्डी
जयश्री विष्णू थोरात भाजपा
राहाता
स्वाधीन गाडेकर भाजपा
श्रीरामपुर
करण ससाणे कॉग्रेयचस
संगमनेर
मैथिली तांबे - संगमनेर सेवा समिति
राहुरी
भाऊसाहेब मोरे- तनपुरे गट विजयी
नेवासा
करणसिंह घुले - शिवसेना शिंदे
देव़ळाली प्रवरा
सत्यजित कदम भाजपा
कोपरगाव
पराग संधान vs ओमप्रकाश कोयटे मतमोजणी सुरु.. पराग संधान 100 मतांनी आघाडीवर
अहिल्यानगर दक्षिण
पाथर्डी भाजप अभय आव्हाड
श्रीगोंदा भाजप सुनिता खेतमाळीस
शेवगाव शिवसेना शिंदे माया मुंडे
जामखेड भाजप प्रांजल चिंतामणी
Local Body Election Results 2025 Live: नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी
भंडारा
नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी.
साकोली सेंदुरवाफा नगरपरिषदेत भाजपच्या देवश्री कापगते यांचा विजय.
Anchor: भंडारा जिल्ह्यातील साकोली सेंदुरवाफा नगरपरिषदेत भाजप च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवश्री कापगते यांचा 2600 मतांनी विजय झाला असून नाना पटोले यांच्या मतदारसंघातील महत्वाची नगरपरिषद असलेली साकोली सेंदुरवाफ पुन्हा एकदा भाजपच्या हातात आली आहे.
Local Body Election Results 2025 Live: देवळी येथे अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण ठाकरे विजयी
वर्धा ब्रेकींग
- देवळी येथे अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण ठाकरे विजयी
- भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांचा 1600 मतांनी पराभव
- माजी खासदार रामदास तळस यांच्या पत्नी शोभा तडस भाजप कडून होत्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
- माजी खासदार रामदास तडस यांना जबर धक्का
- रामदास तडस यांच्या देवळी नगरपरिषदेवरील सुमारे ३५ वर्षांपासूनच्या सत्तेला पराभवाचा धक्का
Local Body Election Results 2025 Live: परभणीत काँग्रेसला मोठा धक्का, एक ही नगराध्यक्ष निवडून आला नाही
परभणी
नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार
भाजप -
1. प्रतापराव देशमुख (मराठा) (जिंतूर नगरपरिषद)
2. मिलिंद सावंत (SC) (सेलू नगरपरिषद)
शिवसेना -
1. अंजली महेश कोकड (कोमटी OBC)(मानवत नगरपरिषद)
2. आसेफ खान (पठाण, मुस्लिम)(Open)(पाथरी नगरपरिषद)
राष्ट्रवादी (अप)-
1. उर्मिला केंद्रे (वंजारी, OBC)(गंगाखेड नगरपरिषद)
कॉग्रेस - 0
शिवसेना (उबाठा)-
1. प्रेमला संतोष एकलारे (वानी OBC)(पूर्णा नगरपरिषद)
राष्ट्रवादी (शप) - 0
अपक्ष -
1. परमेश्वर राजेभाऊ कदम (मराठा)(परिवर्तन आघाडी)(सोनपेठ नगरपरिषद)
Local Body Election Results 2025 Live: धाराशीवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का
धाराशिव - पक्षनिहाय
भाजप - 4 ( 3 विजयी 1 जागेचा निकाल येणे बाकी)
शिवसेना शिंदे - 3
स्थानिक आघाडी - 1 ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )
शिवसेना उबठा - 0
काँग्रेस - 0
राष्ट्रवादि काँग्रेस अजित पवार - 0
राष्ट्रवादि काँग्रेस शरद पवार - 0
तुळजापूर - विनोद पिटू गंगणे भाजप १७७० मतांनी विजय
कळंब - सुनंदा शिवाजी कापसे २२५४ मतांनी विजयी
धाराशिव - नेहा राहुल काकडे, भाजपा आघाडी निकाल येणे बाकी
नळदुर्ग - बसवराज धरणे भाजप 563 मतांनी विजयी
मुरूम - बापूराव पाटील भाजपा ४०१९ मतांनी विजयी
उमरगा - किरण गायकवाड शिवसेना ६२४२ मतांनी विजयी
भूम - संयोगिता संजय गाढवे, 198 आलम प्रभू शहर विकास आघाडी ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )
परांडा - झाकीर सौदागर, शिवसेना 189 मतांनी विजयी
Local Body Election Results 2025 Live: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला बारामती नगर परिषदेमध्ये मोठा धक्का
बारामती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला बारामती नगर परिषदेमध्ये मोठा धक्का
2 अपक्ष
1 तुतारी
1 RSP
1 BSP
अशा पाच जागेंवरती अजित पवार गटाचे उमेदवार पराभूत
Local Body Election Results 2025 Live: पुणे जिल्ह्यात अजित पवारांनी ताकद दाखवली
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडून आलेले नगराध्यक्ष
१ बारामती सचिन सातव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
२ लोणावळा राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
३ तळेगाव संतोष दाभाडे भाजपा महायुती
४ दौंड दुर्गादेवी जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
५ चाकण मनीषा गोरे शिवसेना
६ शिरूर ऐश्वर्या पाचरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
७ इंदापूर भरत शाह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
८ सासवड आनंदी काकी जगताप,भाजपा
९ जेजुरी जयदीप बारभाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
१० भोर रामचंद्र आवारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
११ आळंदी प्रशांत कुराडे भाजपा
१२ जुन्नर सुजाता काजळे शिवसेना एकनाथ
१३ राजगुरुनगर मंगेश गुंडा शिवसेना एकनाथ शिंदे
१४ वडगाव मावळ आंबोली ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
१५ मंचर राजश्री गांजले शिवसेना एकनाथ शिंदे
१६ माळेगाव सुयोग सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
१७ उरुळी फुरसुंगी संतोष सरोदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार
Local Body Election Results 2025 Live: माढ्याच्या सर्व नगरपालिकांमध्ये भाजपचा पराभव
माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा , कुर्डूवाडी , सांगोला आणि अकलूज अशा चारही नगरपालिकेमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माढा मतदार संघातील नगरपालिकेत मोहिते पाटील गटाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या वर्चस्वा दिसून आला. सांगोल्या शिवसेना शिंदे गड जरी निवडून आला असला तरी अप्रत्यक्षपणे शहाजी बापू पाटील यांना मोहिते पाटील यांची साथ लाभली होती. त्यामुळे माढ्यातील चार नगरपालिकांवर मोहिते पाटील पॅटर्न दिसून येतोय.
Local Body Election Results 2025 Live: सातारा जिल्ह्यात भाजपचा दबदबा, राष्ट्रवादीला मोठा धक्का
साताऱ्यातील सात भाजपचे नगराध्यक्ष विजयी
म्हसवड - पुजा विरकर
रहिमतपुर - वैशाली माने
वाई- अनिल सावंत
मेढा - रूपाली वाराघडे
मलकापुर - तेजस सोनवले
सातारा - अमोल मोहिते
फलटण - समशेरसिंह नाईक निंबाळकर
राष्ट्रवादी (अजित दादा ) दोन नगराध्यक्ष
महाबळेश्वर - सुनिल शिंदे
पाचगणी - दिलीप बगाडे
Local Body Election Results 2025 Live: नांदेड जिल्हा 13 पैकी 11 पालिका निकाल जाहीर
नांदेड जिल्हा 13 पैकी 11 पालिका निकाल जाहीर
भाजप 3
राष्ट्रवादी ap 3
मराठवाडा जनहित पार्टी 2
शिंदे सेना 2
काँग्रेस 2
हदगाव आणि किनवट मोजणी सुरू आहे
Local Body Election Results 2025 Live: हिंगोलीत शिंदेंचा भाजपला जोरदार धक्का
शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्यानंतर शिवसेना आमदार संतोष बांगर यांची विजयी रॅली..
हिंगोली जिल्हा एकनाथ शिंदे चा बालेकिल्ला आमदार बांगर..
शिवसेना शिंदे गटाचा कळमनुरी आणि हिंगोली दोन्ही नगरपरिषदांवर विजय..
आमदार बांगर यांचे बंधू श्रीराम बांगर नगरसेवक पदी तर वहिनी हिंगोली नगराध्यक्षपदी विजयी..
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीचे सध्याचे चित्र
नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीचे सध्याचे चित्र
भाजप 127
शिवसेना 47
राष्ट्रवादी 34
काँग्रेस 27
उबाठा 07
राष्ट्रवादी शप 06
स्थानिक आघाडी 39
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेस शिवसेनेची बाजी
संभाजीनगर नगराध्यक्ष फायनल निकाल
संभाजी नगर एकूण 7 नगर अध्यक्ष
भाजप : 1
शिवसेना : 2
राष्ट्रवादी अप : 1
उद्धव शिवसेना : 1
काँग्रेस : 2
राष्ट्रवादी शप : 0
------------------------------------------------------------
गंगापूर : राष्ट्रवादी अप -- संजय जाधव विजयी...
खुलताबाद : काँग्रेसचे अमिर पटेल विजयी...
फुलंब्री ( पंचायत ) : ubt राजेंद्र ठोंबरे 1797 मतांनी विजयी...
वैजापूर : भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी 6 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी
पैठण : शिवसेनेच्या विद्या कावसानकर विजयी
सिल्लोड : शिवसेनाचे समीर सत्तार विजयी
कन्नड : काँग्रेसच्या शेख फरीन बेगम विजयी...
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: जालन्यात राजेश टोपे यांना धक्का
जालन्यातील 3 नगर परिषदेपैकी 2 नगर परिषदेवर भाजपने झेंडा फडकावलाय.परतूरमध्ये आधी काँग्रेसच्या ताब्यात असलेली नगर परिषद आता भाजपने ताब्यात घेतलीय.या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियांका राक्षे विजयी झाल्या आहेत.तर अंबडमध्ये भाजपने सत्ता राखलीय. या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी विजयी झाल्या आहेत.अंबड मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांना यामुळे धक्का बसलाय.तर भोकरदनमध्ये आधी काँग्रेसच्या ताब्यात असलेली नगर परिषद राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ताब्यात आलीय या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार समरीन मिरझा विजयी झाल्याने काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह भाजप नेते रावसाहेब दानवे यांना धक्का बसलाय.
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सावंतवाडीत भाजप तर कणकवलीत राणेंना धक्का
सिंधुदुर्ग निकाल
सावंतवाडी : नगराध्यक्षपद उमेदवार श्रद्धाराजे भोसले विजयी : भाजप
वेंगुर्ला : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप, विजयी : भाजप
मालवण : नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, विजयी, शिंदे सेना
कणकवली : संदेश पारकर, शहर विकास आघाडी, विजयी
वेंगुर्ला पक्षीय बलाबल
भाजप 16
शिंदे सेना 1
ठाकरे सेना 3
नगराध्यक्ष : दिलीप उर्फ राजन गिरप भाजप
सावंतवाडी
भाजप 11
शिंदे शवसेना 7
ठाकरे सेना 1
कांग्रेस 1
नगराध्यक्ष : श्रद्धाराजे भोसले भाजप
मालवण
भाजप 5
शिंदे सेना 10
ठाकरे सेना 4
अपक्ष 1
नगराध्यक्ष : ममता वराडकर शिंदे सेना
कणकवली
भाजप 9
शहर विकास आघाडी 8
नगराध्यक्ष : संदेश पारकर शहर विकास आघाडी
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: पालघरमध्ये शिवसेना भाजप समसमान जागा
BREAKING
पालघर,डहाणू, जव्हार नगरपरिषद नगराध्यक्ष आणि वाडा नगरपंचायत नगराध्यक्ष अंतिम निकाल
पालघर नगर परिषद
1) उत्तम घरत -- शिव सेना शिंदे गट (विजयी)
2) कैलास म्हात्रे -- भाजप (पराभूत)
---------------------------------
डहाणू नगर परिषद
1) राजू माच्छी -- शिंदे गट (विजयी)
2) भरत राजपूत -- भाजपा पराभूत
............
जव्हार नगर परिषद
1) पूजा उदावंत -- भाजपा (विजयी )
2) रशमीन रियाझ मणियार -- NCP शरद पवार गट (महाविकास आघाडी) (पराभूत)
-------------------------
वाडा नगर पंचायत
1) रीमा गंधे -- भाजपा (विजयी )
2) हेमांगी पाटील -- शिवसेना शिंदे गट (पराभूत)
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सिंधुदुर्गात कुणाला धक्का
सिंधुदुर्ग
सावंतवाडी : नगराध्यक्षपद उमेदवार श्रद्धाराजे भोसले विजयी : भाजप
वेंगुर्ला : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप, विजयी : भाजप
मालवण : नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर, विजयी, शिंदे सेना
कणकवली : संदेश पारकर, शहर विकास आघाडी, विजयी
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: पुणे जिल्ह्यात कुणाची हवा?
शिरूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार
ऐश्वर्या पाचर्णे, अजित पवार गट
माजी आमदार अशोक पवार यांना धक्का
--------------
जुन्नर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार
सुजाता काजळे, शिवसेना शिंदे गट
खासदार अमोल कोल्हे व माजी आमदार अतुल बेनके यांना धक्का
--------------
चाकण नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार
मनिषा गोरे, शिवसेना शिंदे गट
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना धक्का
----------------
राजगुरुनगर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार
मंगेश गुंडाळ, शिवसेना शिंदे गट
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना धक्का
-----------------
मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार
राजश्री गांजाळे, शिवसेना शिंदे गट
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार आढळराव पाटील यांना धक्का
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: कोल्बापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा दबदब
कोल्हापूर ब्रेकिंग
नगराध्यक्ष विजयी उमेदवार आणि पक्ष
तेरा पैकी 4 शिवसेना शिंदे गट, भाजप 3, राष्ट्रवादी अजित पवार 2, जनसुराज्य 2, काँग्रेस 2
पेठवडगाव : काँग्रेस + स्थानिक आघाडी -विद्याताई पोळ
शिरोळ : काँग्रेस योगिता कांबळे
चंदगड : भाजप : सुनिल काणेकर
आजरा : भाजप - अशोक चराटी
हुपरी : भाजप - मंगलराव माळगे
मुरगूड : शिवसेना शिंदे - सुहासिनीदेवी पाटील
हातकणंगले : शिवसेना शिंदे -
जयसिंगपूर : शिवसेना शिंदे - संजय पाटील
कुरुंदवाड : शिवसेना शिंदे - मनीषा डांगे
मलकापूर : जनसुराज्य - रश्मी कोठावळे
पन्हाळा : जनसुराज्य - जयश्री पवार
गडहिंग्लज : राष्ट्रवादी अजित पवार - महेश तुरबतमठ
कागल : राष्ट्रवादी अजित पवार गट - सविता माने
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: जयंत पाटलांनी इश्वरपूरचा गड राखला
विभाग - पश्चिम महाराष्ट्र
नगर परिषद - विटा
शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काजल म्हेत्रे विजयी
एकूण जागा – 26
नगरसेवक निकाल
भाजप - 4
अजित पवारांची राष्ट्रवादी -
काँग्रेस -
शिंदे यांचे शिवसेना - 22
ठाकरेंची शिवसेना -
शरद पवार राष्ट्रवादी -
इतर –
-------------------
नगर परिषद - ईश्वरपूर
नराध्यक्षपदाचे शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विजयी
एकूण जागा – 30
नगरसेवक निकाल
भाजप - 2
अजित पवारांची राष्ट्रवादी - 3
काँग्रेस -
ठाकरेंची शिवसेना - 2
शरद पवार राष्ट्रवादी - 23
इतर –
---------------
सांगली शिराळा नगरपंचायत
नगराध्यक्ष पद शिवसेना शिंदे गटाचे
पृथ्वीसिंग नाईक आघाडीवर
शिवसेना-भाजपा ११
दोन्ही राष्ट्रवादी आघाडी ६
जागावर आघाडीवर
---------------------------
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: नाशिकमध्ये मविआचा सुपडा साफ
नाशिक जिल्हा ११ नगर परिषद
११ पैकी ८ जागांचा निकाल हाती
महायुती
भाजप - २
राष्ट्रवादी अजित पवार गट - ३
शिंदे सेना - ३
महाविकास आघाडी
ठाकरे सेना - ०
राष्ट्रवादी शरद पवार गट - ०
काँग्रेस - ०
1.भगूर - अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी
2.पिंपळगाव बसवंत - भाजपचे डॉ. मनोज बर्डे विजयी
3.सिन्नर - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विट्ठलराजे उगले विजयी ( माणिकराव कोकाटे यांनी गड राखला)
4.ओझर - भाजपच्या अनिता घेगडमल आघाडीवर
5.त्र्यंबकेश्वर - भाजपचे कैलास घुले आघाडीवर
6 इगतपुरी - शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे विजयी
7.येवला - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र लोणारी विजयी ( भुजबळ समर्थक विजयी भुजबळांनी गड राखला)
8.मनमाड - शिंदेंच्या शिवसेनेचे बबलू पाटील आघाडीवर
9.नांदगाव - शिंदे सेनेच्या सागर हिरे विजयी
10.सटाणा - शिंदेंच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील विजयी
11.चांदवड - भाजपचे वैभव बागुल विजयी
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: विदर्भात भाजपची सरशी, काँग्रेसची पिछेहाट
राजुरा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अरुण धोटे विजयी
अरुण धोटे काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांचे सख्खे लहान बंधू
एकूण जागा - 21
काँग्रेस + शेतकरी संघटना युती - 16
भाजप - 04
अपक्ष - 01
-----------------------
काटोल मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरद पवार व शेकाप च्या संयुक्त उमेदवार अर्चना देशमुख 2376 मतांनी विजयी
--------------------------
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत नगराध्यक्ष पदावर विजयी -
भाजप - 9
काँग्रेस - 1
शिंदे शिवसेना - 1
शेकाप -राष्ट्रवादी शरद पवार - 1
-----------------------------
उमरेड
भाजपच्या उमेदवार प्राजक्ता कारू 5198 मतांनी आघाडीवर
भाजप 11
काँग्रेस 5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: नगरपालिका निवडणुकीत कोणाची मुसंडी, पहिल्या 3 मध्ये कोण?
नगरपालिका निवडणुकांचे निकाल आता हाती येत आहेत. त्यानुसार 129 ठिकाणी भाजपने मुसंडी मारली असून त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे आघाडीवर आहेत. तर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचे 47 उमेदवार हे आघाडीवर आहे. तर काँग्रेसने सर्वांनाच चकीत करत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. काँग्रेसचे 35 उमेदवार आघाडीवर आहेत. तर अजित पवारांचे ३२, शिवसेना ठाकरे गट ९तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ८ उमेदवार आघाडीवर आहेत.
Local Body Election Results 2025 Live: सांगली जिल्ह्यात कोणाचे वर्चस्व
सांगली जिल्हा 6 नगर परिषद / 2 नगरपंचायत
1 ) ईश्वरपूर नगरपरिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आनंदराव मलगुंडे विजय
2 ) आष्टा नगरपरिषद राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विशाल शिंदे विजयी
3 ) तासगाव नगरपरिषद स्वाभिमानी विकास आघाडीच्या विजया सावंत विजयी
4 ) पलूस नगरपरिषद काँग्रेसच्या संजीवनी पूदाले विजयी
5 ) विटा नगरपरिषद शिवसेना शिंदे गटाचे काजल म्हेत्रे विजयी
6 ) जत नगरपरिषद भाजपाचे रवींद्र आरळी विजयी.
7) आटपाडी नगरपंचायत भाजपाचे उत्तम जाधव विजयी
8 ) शिराळा नगरपंचायत शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीसिंग नाईक विजयी..
Local Body Election Results 2025 Live: वर्ध्यातला नगराध्यक्षपदाचा पहिला निकाल भाजपाकडे
वर्धा ब्रेकिंग
वर्ध्यातला नगराध्यक्षपदाचा पहिला निकाल भाजपाकडे
सिंदी रेल्वे नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार राणी स्नेहल कलोडे विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुनीता कलोडे यांचा केला दारुण पराभव
Local Body Election Results 2025 Live: भाजपाचा गेवराई नगर परिषदेत मोठा विजय
गेवराई नगरपालिकेत गेवराईचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांना मोठा धक्का
भाजपाचा गेवराई नगर परिषदेत मोठा विजय
माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी पंधरा वर्षांची सत्ता कायम राखली
भाजपच्या गीता त्रिंबक बाळराजे पवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजयी
राष्ट्रवादी अजित गटाचे आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित यांना मोठा धक्का
पवारांच्या माध्यमातून मंत्री पंकजा मुंडे यांनी गेवराई वर्चस्व राखले.
Local Body Election Results 2025 Live: धाराशीवमध्ये मविआला मोठा धक्का
धाराशिव - पक्षनिहाय
भाजप - 4
शिवसेना शिंदे - 2
स्थानिक आघाडी - 2
शिवसेना उबठा - 0
काँग्रेस - 0
राष्ट्रवादि काँग्रेस अजित पवार - 0
राष्ट्रवादि काँग्रेस शरद पवार - 0
तुळजापूर - विनोद पिटू गंगणे भाजप
कळंब - सुनंदा शिवाजी कापसे २२५४ मतांनी विजयी
धाराशिव - नेहा राहुल काकडे, भाजपा
नळदुर्ग - बसवराज धरणे भाजप
मुरूम - बापूराव पाटील भाजपा ४०१९ मतांनी विजयी
उमरगा - किरण गायकवाड शिवसेना ६२४२ मतांनी विजयी
भूम - सत्वशीला थोरात, जनशक्ती नगर विकास आघाडी
परांडा - विश्वजीत पाटील, जनशक्ती नगर विकास आघाडी
Local Body Election Results 2025 Live: ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिटू गंगणे विजयी
परभणीच्या जिंतूर येथे भाजपचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतापराव देशमुख हे निवडून आले आहेत, या अनुषंगाने पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि विजयी उम्मेदवारांनी जल्लोष केला.
------------
सिल्लोडमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार याचे पुत्र अब्दुल समिर विजयी
---------------------
देगलूर नगरपालिका
देगलूर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सौ. विजयामला बालाजी टेकाळे 245 मतांनी विजयी
--------------
तुळजापूर नगरपरिषदेत भाजपचे पिटू गंगणे 1770 मतांनी निवडणुकीत विजयी
ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पिटू गंगणे यांना जनतेचा विजयी कौल
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा मतदारसंघात दबदबा कायम
तुळजापुरात भाजपकडून पिटू गंगणे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अमर मगर यांच्यात लढत
दोन दिवसांपूर्वीच दोन्ही गटात झाला होता राडा
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात विरोधाकाकडून ड्रग्ज मुद्दाचा जोरदार प्रचार, मात्र 1770 मतांनी पिटू गंगणे विजयी
--------------
आंबेजोगाई मध्ये भाजपचा जल्लोष...नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा विजय झाल्यानंतर घरी आनंद उत्सव सादर करताना..
Local Body Election Results 2025 Live: महसूल मंत्री बानवकुळेच्या मतदार संघात काँग्रेसची मुसंडी
महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांच्या कामठी मतदार संघात काँग्रेस उमेदवाराने जोरदार मुसंडी मारली आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार जवळपास तीन हजार मतांनी आघाडीवर आहे. त्यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
Local Body Election Results 2025 Live: कणकवलीत राणेंना मोठा धक्का, मालवणमध्ये ही भाजप पराभूत
कणकवलीत मंत्री नितेश राणे यांना जोरदार धक्का बसला आहे. इथं भाजप उमेदवाराचा पराभव करत शिवसेना ठाकरे गटाचे संदेश पारकर हे विजयी झाले आहेत. एकीकडे नितेश राणे यांना धक्का बसला असताना दुसरीकडे त्यांचे बंधू मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आपल्याच भावाला धक्का दिला आहे. इथं शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष निवडून आल्या आहेत.
Local Body Election Results 2025 Live: निलेश राणे याची मालवणमध्ये सरशी
शिवसेना आमदार निलेश राणे यांची मालवणमध्ये सरशी झाली आहे. शिवसेनेच्या नगराध्यक्ष उमेदवार ममता वराडकर एक हजार एकोणीस मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. भाजपने या ठिकाणी राणें विरोधात जोर लावला होता. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. शेवटी त्यात निलेश राणे यांनी बाजी मारली आहे.
Local Body Election Results 2025 Live: सावंतवाडीत दीपक केसरकरांना धक्का
सिंधुदुर्ग : ब्रेकिंग
सावंतवाडीत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले विजयी
७४५ मतांनी विजयी
भाजप ११
शिंदे सेना ७
उबाठा १
कॉंग्रेस १
Local Body Election Results 2025 Live: मंत्री जयकुमार रावल यांना मतदार संघात फटका
मंत्री जयकुमार रावल यांना मतदार संघात फटका...
शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार कलावती माळी 780 मतांनी विजयी...
भाजपाच्या रजनी अनिल वानखेडे यांना पराभवाचा धक्का
मंत्री जयकुमार रावल यांच्या विधानसभा मतदार संघातच भाजपला धक्का.... राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार कलावती माळी यांना 6991 मते तर भाजपच्या उमेदवार यांना 6211 मात्र..
Local Body Election Results 2025 Live: शिवसेनेच्या सुहास कांदेंनी गड राखला, भुजबळ ही यशस्वी
नांदगाव ब्रेकिंग
नांदगावमध्ये आ.सुहास कांदे यांनी गट राखला...
नगराध्यक्षपदी सागर हिरे विजयी...
20 पैकी मध्ये 19 जागेवर शिवसेनेचे उमेदवार
विजयी....
एक जागेवर अपक्ष उमेदवार विजयी....
राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा....
-------------------------------
जळगाव अमळनेर
अमळनेर मध्ये तिसऱ्या फेरी अखेर शिवसेना शिंदे गटाचे डॉ. परीक्षित बाविस्कर 192 मतांनी आघाडीवर
(भाजप राष्ट्रवादी अजित पवार) शहर आघाडीचे जितेंद्र ठाकूर पिछाडीवर
----------------------------------
सिन्नर - पहिल्या फेरीची फायनल आकडेवारी
राष्ट्रवादी अजित पवार गट: विठ्ठल अशोक उगले 3853
भाजप: हेमंत विठ्ठल वाजे 1388
शिवसेना उ बा ठा: प्रमोद चोथवे 2755
शिवसेना शिंदे गट :नामदेव लोंढे 1869
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विठ्ठल राजे उगले 1098 मतांनी आघाडीवर
--------------------------
पाचोरा नगरपरिषदेत भाजपला मोठा धक्का
शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी पहिल्या फेरीपासून आघाडीवर
चौथ्या फेरी अखेरही शिवसेनेच्या उमेदवार सुनिता पाटील मोठ्या मताधिक्याने आघाडीवर
शिवसेनेचे आतापर्यंत 7तर भाजपाचा एक नगरसेवक विजय
भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ पहिल्या फेरीपासून पिछाडीवर
-------------------------------------
अहिल्यानगर Upadate
शिर्डी नगरपरिषद- जयश्री विष्णू थोरात भाजपा आघाडीवर ( २० महायुती नगरसेवक विजयी, ३ अपक्ष विजयी)
राहाता नगरपरिषद- स्वाधीन गाडेकर भाजपा विजयी (
कोपरगाव नगरपरिषद- पराग संधान, भाजपा ५०० मतांनी आघाडीवर ( ७ नगरसेवक भाजपा विजयी )
श्रीरामपुर नगरपरिषद - करण ससाणे कॉग्रेस आघाडीवर
संगमनेर नगरपरिषद मैथली तांबे संगमनेर सेवा आघाडी ( तर दहा नगरसेवक विजयी संगमनेर सेवा आघाडी )
---------------------------
येवल्यात समीर भुजबळ यांनी गड राखला.. भुजबळांचा पराभव करण्यासाठी येवल्यामध्ये झाली होती शिंदे गट आणि शरद पवार गटाचे अनोखी युती.. छगन भुजबळ आजारी असल्याने समीर भुजबळांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती
Local Body Election Results 2025 Live: पाचगणीत धक्कादायक निकालाची नोंद
धक्कादायक
पाचगणी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी (अजित पवार पुरस्कृत ) उमेदवार दिलिप बगाडे दोन मतानी विजयी.
फेर मतमोजणीची मागणी
अधिकृत निकाल राखून ठेवला
Local Body Election Results 2025 Live: तासगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पराभव
सांगली - तासगाव नगरपरिषदेच रोहीत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. इथं स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया बाबासाहेब पाटील 412 मताने विजयी झाल्या आहेत. आर. आर. पाटील यांचा हा पारंपारीक मतदार संघ आहे. या ठिकाणी त्यांचा मुलगा रोहीत पाटील सध्या इथं आमदार आहे. मात्र यावेळी त्यांना त्यांची नगर परिषद राखण्यात अपयश आलं आहे. इथं त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.
Local Body Election Results 2025 Live: रत्नागिरीत शिवसेनेचा दबदबा, गड राखला, काँग्रेसचाही विजय
रत्नागिरी-
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर महायुतीचा दबदबा
रत्नागिरी, चिपळूण, खेड नगरपरिषदेवर शिवसेनेचा( शिंदे सेना) झेंडा
देवरूख आणि गुहागर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा
राजापूर नगरपरिषदेत काॅग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिपे विजयी
लांजा नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा
रत्नागिरी शिवसेनेनी आपला गड राखला
Local Body Election Results 2025 Live: भास्कर जाधवांना मोठा धक्का, शिवसेनेची मुसंडी
खेड नगरपरिषदेवर महायुतीचा विजय
२१ पैकी २१ जागांवर विजय
३ भाजपा आणि १८ शिवसेना जागा विजयी
माधवी बुटाला शिवसेनेच्या नगराध्यक्ष म्हणून विजयी
14 वर्षानंतर खेड नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता
पालघर मध्ये नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उत्तम घरत विजयी
भाजपचे कैलास म्हात्रे म्हात्रे यांचा पराभव
शिंदे सेना : 19 जागांवर वोजायी..
BJP : 7
शिव सेना ठाकरे : 3 जागा.
गुहागर नगरपंचायतीमध्ये भाजप सेना युतीच्या नीता मालप 997 मताने विजयी, भास्कर जाधवांना मोठा धक्का
Local Body Election Results 2025 Live: चंद्रपूरमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी
चंद्रपूर जिल्हा
भद्रावती नगराध्यक्ष : काँग्रेस चे सुनील नामोजवार आघाडीवर
वरोरा नगराध्यक्ष : काँग्रेसचे अर्चना ठाकरे आघाडीवर
मूल नगराध्यक्ष : एकता समर्थ काँग्रेस आघाडीवर
राजुरा नगराध्यक्ष - अरुण धोटे काँग्रेस आघाडीवर
गडचांदूर नगराध्यक्ष - निलेश ताजने अपक्ष उमेदवार
नागभीड नगराध्यक्ष कॅांग्रेस आघाडीवर … सौ. स्मिता खापर्डे
भद्रावती नगराध्यक्ष काँग्रेस आघाडीवर - सुनील नामोजवर
घुघूस नगराध्यक्ष - काँग्रेस आघाडीवर -- सौ. दीप्ती सोनटक्के
भिसी नगरपंचायत -- भाजप आघाडीवर अतुल पारवे
Local Body Election Results 2025 Live: विदर्भात काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात जोरदार लढत
नागपूर
हिंगणा : वानाडोंगरी व डिगडोह येथे भाजपचे नगराध्यक्ष विजयी.
मोवाड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक
भाजप च्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार
दर्शना हरीश ढोरे ३९१ मतानी पुढे
कळमेश्वर ब्राह्मणी प्रभाग क्रमांक एक भाजपचे ताराचंद बांबल रंजना चालखोर विजयी
वर्धा ब्रेक
हिंगनघाट इथं दुसऱ्या फेरी फेरीनंतर भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या नयना तुळसकर 3543 मताने आघाडीवर
भंडारा
साकोली नगरपरिषद
साकोली नागराध्यक्ष उमेदवार देवश्री कापगते भाजप १४०० मताने पुढे
गडचिरोली नगरपरिषद
पहिल्या फेरीत गडचिरोली नगरपरिषदेत भाजपचे प्रणोती निंबोळकर आघाडीवर
सावनेर नगर परिषद निवडणूक २०२५ विजयी उमेदवार..
प्रभाग क्र. १ आघाडीचे
अरविंद लोधी, बागडे - विजयी
प्रभाग क्र. २ भाजपाचे
निलेश पटे, वनिता घुगल - विजयी
प्रभाग क्र. ३ भाजपाचे
राजेश गुप्ता, बालाखे - विजयी
प्रभाग क्र. ४ भाजपाचे
योगिता घोरमारे, आशिष मानकर - विजयी
प्रभाग क्र. ५ भाजपाचे
सोनाली उमाटे, शालिक मोहतुरे - विजयी
अध्यक्षपदाचे भाजप उमेदवार संजना मंगळे ११८० मतांनी आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: कणकवलीमध्ये जोरदार चुरस, पारकर आघाडीवर
कणकवलीत नगराध्यक्ष पद उमेदवार संदेश पारकर १२१ मतांनी आघाडीवर
संदेश पारकर-समीर नलावडे यांच्यात चुरस
Local Body Election Results 2025 Live: राजापूरमध्ये काँग्रेस, रत्नागिरी शिवसेना चिपळूणमध्ये भाजप विजय
रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषद शिंदे शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे विजयी
माजी आमदार बाळ माने यांची सून शिवानी माने पराभूत
श्रीवर्धन मध्ये अतुल चोगुले उबाठा चे नगराध्यक्ष पदासाठी 86 मतांनी विजयी तर सुनील तटकरे यांच्या बालेकिल्यात राष्ट्रवादी भाजप चे बाळा सातनाग यांचा पराभव...
राष्ट्रवादी (AP) 15
भाजाप 2
शिंदे गट 3
नगराध्यक्षा उबाठा.
विजयी
सिंधुदुर्ग
सावंतवाडीत भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले 871 मतांनी आघाडीवर
रत्नागिरी
चिपळूण नगर परिषद
शिंदेच्या शिवसेनेचे उमेश सकपाळ यांचा 1258 मतांनी विजय
शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव
राजापूर
राजापूर नगर परिषदमध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हुस्नबानू खलिफे विजयी
शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकर यांचा पराभव
BIG BREAKING
जव्हार नगर परिषदेवर भाजपचं कमळ फुललं
भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पूजा उदावंत विजयी.
*तर 20 पैकी 14 जागांवर भाजप विजयी.
राष्ट्रवादी अजित पवार 3
NCP शरद पवार 1
शिवसेना शिंदे 2 जागांवर विजयी विजयी.
Local Body Election Results 2025 Live: मंत्री गुलाबराव पाटील यांना जोरदार धक्का
जळगाव धरणगाव ब्रेक
जळगावच्या धरणगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का
महाविकास आघाडीच्या( शरद पवार गट) लीलाताई चौधरी तब्बल 1500 मतांनी आघाडीवर
महायुतीच्या (शिवसेना शिंदे गट)वैशाली भावे पिछाडीवर
पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीच्या लीलाताई चौधरी यांनी घेतली आघाडी
जळगाव भुसावळ
भुसावळ मध्ये भाजपाच्या रजनी सावकारे आघाडीवर
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे पिछाडीवर
नांदगाव ( नाशिक ) : ब्रेकींग..
- आ.सुहास कांदे यांनी नांदगावचा गड राखला..
- शिवसेना ( शिंदे गट ) सागर हिरे विजयी..
- शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी..
- भाजपला एक जागा राखता आली नाही...
- राष्ट्रवादीचा धुव्वा, ' भुज ' बळ कमी पडले.
जळगाव शेंदुर्णी नगरपंचायत
शेंदुर्णी नगरपंचायत मध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोविंद अग्रवाल विजयी
Local Body Election Results 2025 Live: रायगडमध्ये तटकरेंना मोठा धक्का
रायगड जिल्ह्यात सुनिल तटकरे यांना दुसरा धक्का बसला आहे. महाड पाठोपाठ श्रीवर्धन नगरपरिषदेत ही त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. इथं शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. श्रीवर्धन मतदार संघा हा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचा मतदार संघ आहे. त्यांच्यासाठी ही हा मोठा धक्का समजला जात आहे. महाडमध्ये ही तटकरेंच्या राष्ट्रवादीला पराभव स्विकारावा लागला आहे.
Local Body Election Results 2025 Live: नाशिकमध्ये महायुतीचा दबदबा
नाशिक जिल्हा - ११ नगर परिषद आघाडी स्थिती - पहिली फेरी
भगूर - अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी
पिंपळगाव बसवंत - भाजपचे डॉ. मनोज बर्डे आघाडीवर
सिन्नर - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विट्ठलराजे उगले आघाडीवर
ओझर - भाजपच्या अनिता घेगडमल आघाडीवर
त्र्यंबकेश्वर - शिंदेंच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार आघाडीवर
इगतपुरी - शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे आघाडीवर
येवला - अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी आघाडीवर
मनमाड - शिंदेंच्या शिवसेनेचे बबलू पाटील आघाडीवर
नांदगाव - शिंदेंच्या शिवसेनेचे सागर हिरे आघाडीवर
सटाणा - शिंदेंच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील आघाडीवर
चांदवड - भाजपचे वैभव बागुल आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live:महाडमध्ये गोगावले यांचा तटकरेंना जोरदार धक्का
महाड नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील कविस्कर विजयी झाले आहेत. मंत्री भरत गोगावले यांनी सुनिल तटकरे यांना जोरदार धक्का दिला आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. विधानसभेनंतर राष्ट्रवादीसाठी हा दुसरा धक्का आहे. स्नेहल जगताप यांच्यासाठी ही हा मोठा धक्का समजला जात आहे.
Local Body Election Results 2025 Live: पिंपळनेर नगरपरिषदेत भाजपचा नगराध्यक्ष विजयी
पिंपळनेर, धुळे ब्रेकिंग...
पिंपळनेर नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांना धक्का... नगराध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार डॉ. योगिता चौरे विजयी...
भाजपा विजयी उमेदवार 08
शिवसेना शिंदे गट विजयी उमेदवार 08
अपक्ष 02
Local Body Election Results 2025 Live: उरणमध्ये गेम फिरला, शरद पवारांच्या पक्षाची मुसंडी
उरण नगराध्यक्ष पदाची निवडणूक
२ फेरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष उमेदवार भावना घाणेकर १०६८ मतांनी आघाडीवर
सिंधुदुर्ग
सावंतवाडीत आतापर्यंत निवडून आलेले नगरसेवक
भाजप - 6
शिंदे शिवसेना- 2
उबाठा- 1
काँग्रेस-1
रत्नागिरी नगरपरिषद शिंदे शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल
सात हजार मतांनी आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: कोकणात शिवसेना भाजपमध्ये चुरस
जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेले दोन माजी आमदार पिछाडीवर
राजापूरमध्ये काॅग्रेसच्या हुस्नबानू खलिपे तर चिपळूण मधून शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम पिछाडीवर
श्रीवर्धन मध्ये अतुल चौगुले उबाठा चे 86 मतांनी विजय तर राष्ट्रवादी बाळा सातनाग पराभव....
सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या श्रद्धाराजे भोसले आघाडीवर
कणकवली नगरपंचायत निवडणूक
दुसरी फेरी..
भाजपचे उमेदवार समीर नलावडे २५५ मतांनी आघाडीवर
शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर पिछाडीवर
Local Body Election Results 2025 Live: डहाणू मध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये काटे की टक्कर
शिवसेना शिंदे गट आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची असलेल्या डहाणू नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गट आघाडीवर
नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माच्छी आघाडीवर
तर भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत पिछाडीवर
डहाणू मध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये काटे की टक्कर
Local Body Election Results 2025 Live: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सांगलीत मुसंडी
सांगली नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे अपडेट
विटा : एकनाथ शिंदे
ईश्वरपूर : राष्ट्रवादी शरद पवार
आष्टा : राष्ट्रवादी शरद पवार
तासगाव : राष्ट्रवादी शरद पवार
जत : भाजप
आटपाडी : भाजप
पलूस : काँग्रेस
शिराळा : एकनाथ शिंदे
या पक्षांचे उमेदवार हे आघाडीवर आहेत.
Local Body Election Results 2025 Live: कोल्हापूरमध्ये मोठा उलटफेर
मुरगुड नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा
शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक विजयी
तर सेनेच्या नगराध्यक्ष पदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील विजयी
तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4 जागांवर मिळाला विजय
हसन मुश्रीफ समरजित घाटगे यांना मुरगुड मध्ये धक्का
Local Body Election Results 2025 Live:
इंदापूर
पहिली फेरी
प्रदीप गारटकर 3641 (स्थानिक आघाडी)
भरत शहा 3522 ( राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रदीप गारडकर पहिल्या फेरीत 119 मतांनी आघाडी
Local Body Election Results 2025 Live: मंचरमध्ये शिवसेना शिंदे गटाची आघाडी
मंचर नगर पंचायत
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
राजश्री गांजाळे (शिंदेशिवसेना) - 1612
प्राची थोरात (अपक्ष) - 1563
मोनिका भालेराव (Apराष्ट्रवादी) - 1494
शिंदे शिवसेनेच्या राजश्री दत्तात्रय गांजाळे पहिल्या फेरी अखेर 49 मतांनी आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: निलंग्यात भाजप उमेदवार आघाडीवर
निलंगा नगरपालिका निवडणूक दुसऱ्या फेरीत नगराध्यक्ष पदाचे भाजपचे संजयराज हलगरकर 2162 मतांनी आघाडीवर"
पहिली व दुसरी फेरी Total
1. हलगरकर संजयराज भाजप 3812
2. हमीद शेख काँग्रेस 1650
3. लिंबन महाराज रेशमे शिवसेना ठाकरे गट 905
Local Body Election Results 2025 Live: माजी मंत्री तानाजी सावंत यांना धक्का
परंड्यातून स्थानिक जनशक्ती शहर विकास आघाडीचे विश्वजीत पाटील नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर सौदागर पिछाडीवर
जनशक्ती शहर विकास आघाडीचे तीन, शिवसेना शिंदे गटाचा एक नगरसेवक विजयी
Local Body Election Results 2025 Live: मराठवाड्यात भाजप शिवसेना काँग्रेसमध्ये चूरस
छत्रपती संभाजी नगर नगराध्यक्ष...
एकूण जागा : 7
सिल्लोड : शिवसेनाचे समीर सत्तार आघाडीवर
कन्नड : काँग्रेसचे शेख फरीन आघाडीवर
पैठण : ubt अपर्णा गोर्डे आघाडीवर
गंगापूर : राष्ट्रवादी अप -- संजय जाधव आघाडीवर
खुलताबाद : भाजप परशराम बारगळ आघाडीवर
वैजापूर : भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी आघाडीवर
शिंदे सेनेचे संजय बोरणारे पिछाडीवर
फुलंब्री ( पंचायत ) : ubt राजेंद्र ठोंबरे आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: मुदखेडमध्ये काँग्रेस उमेदवार आघाडीवर
मुदखेड नगरपरिषद निवडणूक पहिल्या फेरीची मते भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विश्रांती ताई माधव पाटील कदम यांना 1207 तर काँग्रेसच्या उमेदवार सौशिलाताई राजबहादुर कोत्तावार यांना 1298 मते मिळाली असून पहिल्या फेरीमध्ये 91 मताने काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीलाताई राजबहादुर कोत्तावार यापुढे आहेत.
Local Body Election Results 2025 Live: कोकणात जोरदार चुरस
रत्नागिरी
राजापूर नगर परिषद
शिंदे शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकर आघाडीवर
काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे पिछाडीवर
रत्नागिरी
खेड नगर परिषद
शिंदे शिवसेनेच्या माधवी बुटाला मतांनी आघाडीवर
उबाठाच्या सपना कानडे पिछाडीवर
मालवण नगराध्यक्ष उमेदवार -- ममता वराडकर ( शिंदे सेना ) पाचवी फेरी आघाडीवर
रत्नागिरी नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे 4 हजार 900 मतांनी आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: महाडमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार पिछाडीवर
महाड नगरपालिका निवडणूक पहिला फेरी अंती
शिवसेनेचे सुनील काविस्कर 71 मतांनी आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारी पिछाडीवर
Local Body Election Results 2025 Live: निलेश राणेंच्या मालवणमध्ये शिवसेनेची मुसंडी
बहुचर्चीत कणकवली नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार पिछाडीवर आहेत. संदेश पारकर यांनी इथं आघाडी घेतली आहे. मालवणमध्ये ही भाजप उमेदवाराची पिछेहाट झाली आहे. वेंगुर्ल्यातही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर आहे. निलेश राणे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला आहे. दोन्ही ठिकाणी त्यांच्या पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहे.
Local Body Election Results 2025 Live: मालवणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आघाडीवर
मालवण मध्ये शिंदेच्या शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष उमेदवार ममता वराडकर पहील्या फेरीत आघाडीवर. भाजप उमेदवार पिछाडीवर
Local Body Election Results 2025 Live: कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का
कोल्हापूर, मुरगूड नगरपरिषद
भाजप शिवसेनेचे पहिल्या फेरी चार उमेदवार विजयी
राष्ट्रवादीचा 1 आणि शाहू आघाडीचा 1 तर मुश्रीफ गटाचे प्रमुख रणजीत सिंह पाटील यांच्या पत्नी मंजुषा पाटील यांचा पराभव
मलकापूर नगरपरिषद
मलकापूर नगर परिषदेत पहिल्या फेरी अखेर महायुतीचे पाच आणि महाविकास आघाडीचे पाच उमेदवार विजयी तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रश्मी कोठावळे 44 मताने आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: पंढरपूरमध्ये भाजप उमेदवार पिछाडीवर
पंढरपुरातून भाजप उमेदवार पिछाडीवर..
पहिल्या फेरीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके 2125 मतांनी आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: भाजपला काँग्रेसची अनेक ठिकाणी जोरदार टक्कर
नगपरिषद निवडणुकीत भाजपने सुरूवातीच्या कलांमध्य ेजोरदार मुसंडी मारली आहे. आता पर्यंत 39 ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने 14 ठिकाणी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी 14 तर काँग्रेस 11 ठिकाणी आघाडीवर आहे. शरद पवार गटाने एका ठिकाणी आघाडी घेतली आहे. शिवाय उबाठाने ही चार ठिकाणी आघाडी घेतली आहे. स्थानिक आघाड्या ही पुढे आहेत.
Local Body Election Results 2025 Live सोलापूर-बार्शी नगरपरिषदेत भाजपची आघाडी
सोलापूर-बार्शी नगरपरिषद
नगराध्यक्षृ पदाच्या भाजप उमेदवार तेजस्विनी कथले
550 मतांनी आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: राजापूरमध्ये काँग्रेसची मूसंडी
रत्नागिरी
राजापूर नगर परिषद
काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे आघाडीवर
शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकर पिछाडीवर
रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन, रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर
रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन, रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: पालघरमध्ये शिवेसना उमेदवार आघाडीवर
पालघर मध्ये पहिल्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे उत्तम घरत आघाडीवर..
पहिल्या फेरीत भाजपचे कैलास म्हात्रे पिछाडीवर..
डहाणू नगरपरिषदे भाजपचे भरत राजपूत आघाडीवर.
शिंदे गटाचे राजू माच्छी पिछाडीवर..
Local Body Election Results 2025 Live: रत्नागिरीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आघाडीवर
रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषद
शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार शिल्पा सुर्वे पहिल्या फेरुत आघाडीवर
शिवसेना उबाठाच्या शिवानी सावंत-माने पिछाडीवर
Local Body Election Results 2025 Live: चिपळूण नगरपरिषदेच कांटे की टक्कर
चिपळूण नगर परिषद पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेश सकपाळ 35 मतांनी आघाडीवर.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार रमेश कदम पिछाडीवर
Local Body Election Results 2025 Live: निलंगा भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 300 मताने आघाडीवर
निलंगा भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 300 मताने आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: परतूरमध्ये भाजपची आघाडी
जालना परतूर नगर परिषद
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या प्रियांका राक्षे दोन हजार मताच्या आघाडीवर
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताबाई हिवाळे पिछाडीवर
भाजपचे दोन नगरसेवक विजयी
Local Body Election Results 2025 Live: शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी
छत्रपती संभाजीनगर....
पैठण प्रभाग क्रमांक 4 मधील शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी
संगीता मापारी आणि सुनील रासने विजयी
Local Body Election Results 2025 Live: मराठवाड्यात उबाठाने खातं खोललं
छत्रपती संभाजी नगर नगराध्यक्ष...
एकूण जागा : 7
सिल्लोड : शिवसेनाचे समीर सत्तार आघाडीवर पोस्टल
कन्नड : काँग्रेस चे शेख फरीन आघाडीवर
पैठण : उबठा च्या अपर्णा गोर्डे आघाडीवर
गंगापूर : भाजपचे प्रदीप पाटील आघाडीवर
खुलताबाद : भाजप परशराम बारगळ आघाडीवर
वैजापूर : पोस्टल मतमोजणीत भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी आघाडीवर
फुलंब्री ( पंचायत ) : भाजप सुहास शिरसाठ आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: धाराशीवमध्ये भाजपची मुसंडी
धाराशिवमध्ये मुरूम नगर परिषदेत भाजप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आघाडीवर
पोस्टल मतांमध्ये माजी मंत्री बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील यांची आघाडी
मुरूम बसवराज पाटील यांचा बालेकिल्ला, काँग्रेस मधून भाजपात प्रवेश केल्यानंतर पहिली नगरपरिषद निवडणूक
बापूराव पाटील यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजितकुमार चौधरी निवडणूक रिंगणात
पोस्टल मतांमध्ये भाजपचे बापूराव पाटील आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: वाईमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर
वाई नगरपालिका
मतमोजणीला सुरवात
राष्ट्रवादी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: हातकणंगले नगरपंचायतमध्ये काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी
हातकणंगले नगरपंचायतमध्ये काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी
Local Body Election Results 2025 Live: बारामतीमध्ये अजित पवारांचा उमेदवार आघाडीवर
बारामती नगरपरिषद मतमोजणी प्रक्रिया पोस्टल मतदान प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव आघाडीवर...
Local Body Election Results 2025 Live: बारामतीमध्ये अजित पवारांचा उमेदवार आघाडीवर
बारामती नगरपरिषद मतमोजणी प्रक्रिया पोस्टल मतदान प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव आघाडीवर...
Local Body Election Results 2025 Live: मोहोळ नगरपरिषदेचा निकाल हाती
मोहोळ नगरपरिषदेचा पहिला निकाल हाती आला आहे. प्रभाग एक मधील भाजपचे उमेदवार कांताबाई मोहिते, संतोष पाटील तर प्रभाग दोन मधील भाजपचेच उमेदवार अरुरथ वाणी आणि सुनीता ढोणे विजयी झाले आहेत. पहिल्या दोन प्रभागात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्विनी कथले यांना आघाडी मिळाली आहे.
Local Body Election Results 2025 Live: मराठवाड्यात कुणाची मुसंडी पाहा निकाल
निलंगा पहिला राऊंड भाजपचे संजय हलगरकर आघाडीवर
भोकर भाजप आघाडीवर
लोहा भाजप आघाडीवर
देगलूर काँग्रेस आघाडीवर
उमरी राष्ट्रवादी आघाडीवर
किनवट भाजप आघाडीवर
मुखेड भाजप आघाडीवर
कुंडलवाडी भाजप आघाडीवर
बिलोली मराठवाडा जनहित पार्टी आघाडीवर
धर्माबाद मराठवाडा जनहित पार्टी आघाडीवर
Local Body Election Results 2025 Live: पहिल्या कलामध्ये भाजपची मूसंडी काँग्रेसने खातं उघडलं.
भाजप ९ ठिकाणी तर काँग्रेस एक ठिकाणी आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ही एका ठिकाणी आघाडीवर आहे. शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचा मुलगा आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गटाने दोन ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर रोह्यात भाजपने आघाडी घेतली आहे. देगलूरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. चिपळूणमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे.
Local Body Election Results 2025 Live: पैठणमध्ये उमेदवार आणि पोलीसांमध्ये राडा
पैठणमध्ये मतमोजणी दरम्यान पोलीस आणि उमेदवारांमध्ये जोरदार राडा झाला आहे. मतमोजणी उशिरा सुरू झाल्यामुळे हा राडा झाला आहे. त्या आधी पोलीस आणि उमेदवार यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर हा राडा झाला.
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: नगरपरिषद मतमोजणीला सुरूवात, पहिला कल हाती
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: नगरपरिषद मतमोजणीला सुरूवात, पहिला कल हाती आला आहे. आटपाडीमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर विटामध्ये शिवसेना आघाडीवर आहे.
Local Body Election Results 2025 Live: राज्यात नगरपरिषदांच्या मतमोजणीला सुरूवात
Local Body Election Results 2025 Live: राज्यात नगरपरिषदांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. थोड्याच वेळात पहिला कल हाती लागेल. त्यानंतर राज्यातलं नगरपरिषदांचा कल कुणाकडे आहे हे स्पष्ट होणार आहे. सत्ताधारी तीन्ही पक्षांमध्ये सध्या चुरच असल्याचं दिसून येत आहे. पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
Maharashtra Local Body Election Results 2025 Live नगरपरिषद मतमोजणी केंद्रावर गोंधळ, पोलीसांनी केला लाठीचार्ज
बीडमध्ये मतमोजणी केंद्रावर उमेदवारी आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ केला होता. त्यामुळे पोलीसांना सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी काही वेळ तणाव निर्माण झाला आहे. मतमोजणीच्या काही वेळ आधीच हा प्रकार घडला.
Local Body Election Results 2025 Live: लातूरमध्ये मतमोजणीला सुरूवात
Local Body Election Results 2025 Live: लातूरमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. लातूर जिल्ह्यातील धर्माबाद नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. निकाल थोड्याच वेळात अपेक्षित आहे. निलंगा इथे ही मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
Local Body Election Results 2025 Live: सांगोल्यात स्ट्राँग रूमचे दरवाजे उघडले
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी लढत असलेल्या सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी आता स्ट्राँग रूम उघडण्यात आले आहे. तब्बल 26000 मतदारांनी केलेल्या मतदानाचा कौल आता ईव्हीएम मधून बाहेर येणार आहे. यासाठी स्ट्राँग रूम उघडून प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होताना दिसत आहे. पुढील २० ते २५ मिनिटात लता मोजणी प्रक्रिया सांगोल्यातून सुरू होईल. सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
Local Body Election Results 2025 Live: उरणमध्ये मतमोजणी आधी जोरदार राडा
उरण नगरपरिषदेच्या मतमोजणी केंद्रावर जोरदार राडा झाला आहे. नाष्ट्याचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक इसम स्ट्राँग रुममध्ये घुसला होता. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी यावर आक्षेप घेतला होता. मतमोजणी सुरू होण्याआधी कुणालाच प्रवेश नसताना इसम स्ट्राँग रुममध्ये गेला कसा ? असा प्रश्न तहसिलदार भावना घाणेकर यांना करण्यात आला.
Local Body Election Results 2025 Live: मतमोजणी आधीच जळगावमध्ये विजयाचे बॅनर
जळगावच्या चाळीसगावमध्ये निकालापूर्वीच विजयाचे बॅनर झळकले आहेत. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तथा आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. चाळीसगावमध्ये भाजपच्या प्रतिभा चव्हाण विरुद्ध राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी पद्मजा देशमुख यांच्यात लढत होत आहे. मात्र विजयापूर्वीच चाळीसगावमध्ये प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत.
Local Body Election Results 2025 Live: सांगोल्यातत वेळेत स्ट्राँग रूम न उघडल्याने उमेदवारांमधून नाराजी
सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी नऊ वाजून गेले तरी अद्याप स्ट्राँग रूम उघडली नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने, मारुती बनकर आणि विश्वेश झपके या तिन्ही उमेदवारांनी एकत्रित येऊन आयोगाच्या विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. वेळेत स्ट्राँग रूम उघडली गेली नाही, त्यामुळे उमेदवार नाराज असून मतमोजणी पूर्वीच सांगोल्यात आता उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणेतील कलगीतुरा पाहायला मिळत आहे.
Local Body Election Results 2025 Live: धाराशीवमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आधीच खरेदी केला गुलाल
धाराशिवमध्ये निकालापूर्वी भाजपकडून गुलालाची खरेदी करण्यात आली आहे. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या संपर्क कार्यालयात गुलालाच्या गोण्या ठेवण्यात आल्या आहेत. गणेश उत्सवाच्या काळात ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून वापरलेलं गाणं वापरत मल्हार पाटील फॅन क्लब पेजवरून गुलाल पोत्याचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. धाराशिव नगर परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आमने-सामने आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचाही स्वतंत्र उमेदवार त्यामुळे तिरंगी लढत होत आहे. धाराशिव नगरपरिषदेसाठी खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Local Body Election Results 2025 Live: शिंदखेडा नगरपंचायतीत कोण बाजी मारणार?
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायतीच्या मतमोजणीची तयारीही तालुका प्रशासनाने पूर्ण केली आहे. अवघ्या काही तासातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. शिंदखेडा नगरपंचायतीची मतमोजणी ही सहा टेबल वरून मोजली जाणार असून साधारणतः 6 फेऱ्या होणार आहेत. अवघ्या एक ते दीड तासात निकाल हाती येण्याची शक्यता प्रशासकीय तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकृमार देवरे यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
Local Body Election Results 2025 Live: निकाला आधीच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
अक्कलकोटमध्ये मतमोजणी सुरू होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला सुरुवात केली आहे. फटक्यांची आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. मतमोजणी सुरु होण्याआधीच अक्कलकोटमध्ये अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांच्या अभिनंदनाचे बॅनर अक्कलकोट शहरात झळकले आहेत. अक्कलकोटमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे. ज्यामध्ये भाजपतर्फे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी, काँग्रेसतर्फे अशपाक बळोरगी, शिवसेना शिंदे गटातर्फे रईस टिनवाला हे उमेदवार आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा इतका आत्मविश्वास आहे की मतमोजणी सुरु होण्याआधीच मिलन कल्याणशेट्टी यांचे नगराध्यक्ष म्हणून अभिनंदनाचे बॅनर शहरभर लावण्यात आलेत.
Local Body Election Results 2025 Live: कोण बाजी मारणार? कोणाला मात मिळणार पाहा LIVE
Local Body Election Results 2025 Live: कोल्हापूरात बॅनर लावण्यावरून वाद
कोल्हापूरच्या कागलमध्ये निवडणुक निकालापूर्वी लावलेल्या बॅनरवर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. कागलमध्ये निकाला आधीच अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. निवडणूक आयोगाने बॅनर लावणाऱ्यांना आधीच निकाल सांगितला आहे का? असा एका उमेदवारांकडून सवाल केला आहे. ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा आहे का असाही प्रश्न या निमित्ताने विचारण्यात आला आहे. पोलीस प्रशासनानं या बॅनरवर कारवाई कारवाई करायला हवी अशी मागणी केली आहे.
Local Body Election Results 2025 Live: धाराशीवमध्ये शिवसेना ठाकरे गट बाजी मारणार?
धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच एक नंबर राहील असा दावा आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. भाजप एक नंबरचा पक्ष होणार असेल तर भाजपाचे किती, आणि इतर पक्षातील फोडाफोडी करून आणलेली किती उमेदवार विजयी होणार हे ही पाहावे लागले असं म्हणत त्यांनी भाजपला चिमटा काढला आहे. धाराशिव, कळंब, उमरगा नगर परिषदेत ठाकरे गटाचे नगराध्यक्ष विजयी होणार असे ही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Local Body Election Results 2025 Live: मागील वेळी काय स्थिती होती, त्याची आकडेवारी काय होती?
मागील 246 नगर परिषद व 42 नगर पंचायत मिळून एकूण सदस्य संख्या – 5739
मागील पक्षनिहाय विजयी सदस्य संख्या...
भाजपा – 1602
शिवसेना – 844
काँग्रेस – 1102
NCP. – 936
MNS –. 12
BSP –. 27
Other –. 601
Indp –. 569
Aghadi – 46
2025 ला 288 नगराध्यक्ष व 6952 सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीत
12–12 नगरपरिषद व पंचायत नव्याने गठित झाल्या आहेत.
Local Body Election Results 2025 Live: बाळासाहेब थोरातांच्या संगमनेरमध्ये काय होणार?
अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी काहीच वेळात सुरू होणार आहे. यातील संगमनेर, कोपरगाव आणि शिर्डी नगरपरिषद निकालाकडे सर्वांच लक्ष लागले आहे. तर कोपरगाव नगरपरिषद निवडणूकीकडे संवेदनशील म्हणून पाहील जात आहे. सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Local Body Election Results 2025 Live: जालना जिल्ह्यात 3 नगराध्यक्षांसह 65 नगरसेवकांच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला
न्यायालयाच्या निर्णयामुळे पुढे ढकललेल्या जिल्ह्यातील तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. भोकरदन, परतूर आणि अंबड या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होणार आहे. तीन नगराध्यक्षांसह 65 नगरसेवकांचे राजकीय भवितव्याचा फैसला आज होणार आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, राजेश टोपे, राजेभाऊ देशमुख, सुरेशकुमार जेथलिया, या नेत्यांची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागणार आहे. पूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता या निवडणुकीकडे लागले आहे..दरम्यान मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनच्या वतीने तीनही मतमोजणी केंद्रावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Local Body Election Results 2025 Live: साताऱ्याचा गड कोण राखणार?
सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एक नगरपंचायतीची मतमोजणी प्रक्रियेला सुरवात होणार आहे. सातारा शहराबरोबर, फलटण, कराड, महाबळेश्वर, वाई इथलं चित्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे. यामध्ये सातारा शहरातील दोन राजे एकत्र आल्यामुळे एकहाती भाजपकडे सत्ता जाईल असे दिसते. तर फलटण येथे राजे गट विरूद्ध माजी खासदार रणजित यांच्यातील लढत महत्त्वाची राहिल. तर महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटा विरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची चुरस पहायला मिळाली आहे. तसेच वाईमध्ये राष्ट्रवादी विरोधात भाजप अशी लढत पहायला मिळाली. या ठिकाणी मंत्री मकरंद पाटील विरोधात मंत्री जयकुमार यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.
Local Body Election Results 2025 Live: पालघरमध्ये शिवसेनेला विजयाची आशा
पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उत्तम घरत यांनी सकाळी मतमोजणीपूर्वी पालघर मधील अंबामाता मंदिरात येऊन मनोभावे दर्शन घेतले आहे. निकालाची धाकधूक असताना उमेदवा्रांकडून देवाला साकडं घालणं सुरू केलं आहे. सलग 5 वेळा नगरसेवक आणि त्यात चार वेळा उप नगराध्यक्ष पद भुषावलेल्या आणि आता पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उत्तम घरत यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
Local Body Election Results 2025 Live: शहाजी बापूंच्या सांगोल्यात काय होणार?
सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी थोड्या वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रतिनिधी हे मतमोजणी केंद्रावर येण्यास सुरुवात झाली असून पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त लागला आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे सांगोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा झाल्या होत्या. भाजपा विरुद्ध शिवसेना अशा लढ्यात सांगोल्याचा नगराध्यक्ष कोण होणार. याची चर्चा सर्वत्र आहे.
Local Body Election Results 2025 Live: निवडणुकांचे कल कुणाच्या बाजूने? पाहा विश्वेषण
Local Body Election Results 2025 Live: हिंगोलीतही मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण
राज्यात चर्चेत असलेल्या हिंगोलीच्या नगरपरिषद निवडणूकचे निकाल काही वेळात हात येणार आहेत. मतमोजणी करता प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. आज दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तर दुपारी एक वाजेपर्यंत हिंगोलीतील तीनही नगरपरिषद निवडणुकीचे निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान मतमोजणी कक्षा बाहेर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..
Local Body Election Results 2025 Live: वाशिमच्या जनतेचा कौल कुणाच्या बाजूने?
वाशिम जिल्ह्यातील कारंजा,वाशिम,रिसोड,मंगरुळपीर या 4 नगरपरिषद आणि मालेगांव या एका नगर पंचायतसाठी पार पडलेल्या निवडणूकीची आज मतमोजणी होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून 10 वाजता पासून मतमोजणी सुरू होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी 35, तर सदस्य पदासाठी 547 अशा एकूण 582 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी 990 पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Local Body Election Results 2025 Live: कणकवली, मालवणमध्ये कोण बाजी मारणार?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत यासाठी निवडणूक मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सावंतवाडी नगरपरिषदेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात खरी स्पर्धा दिसून येईल. भाजप युवानेते विशाल परब आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांची सावंतवाडीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळेल. या व्यतिरिक्त मालवण नगपरिषदेमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार निलेश राणे आणि ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे भाजप विरुद्ध कणकवली शहर विकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर होईल. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी समीर नलावडे आणि शहर विकास आघाडीकडून ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळेल. एकंदरीत केंद्रात आणि राज्यात महायुतीमध्ये एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वबळाचा नारा दिल्याने ही निवडणूक दोघांसाठीही प्रतिष्ठेची बनली आहे. यामध्ये भाजप की शिवसेना तुल्यबळ ठरतात हे पाहावे लागेल.
Local Body Election Results 2025 Live: विजयी मिरवणूक काढण्यावर बंदी
पंढरपुरात मतमोजणी प्रक्रिया नंतर कुठल्याही प्रकारे विजयी उमेदवाराला मिरवणूक काढता येणार नाही. तसेच बाईक रॅलीवरही प्रतिबंध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दुचाकी गाड्या मॉडीफाय करून सायलेन्सर लावून दरोडे फिरणार असतील तर त्यांच्यावर थेट कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे निकालाच्या पार्श्वभूमीवर 22 लोकांना दोन दिवसांसाठी तडीपार व 70 लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहे. त्यामुळे पंढरपूर मध्ये निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन एक पाऊल पुढे येताना दिसतय.
Local Body Election Results 2025 Live: वर्धा जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठी थोड्याच वेळात मतमोजणी
वर्धा जिल्ह्यातील सहा नगरपालिकांची एकूण 59 टेबल वरून मतमोजणी होणार आहे. त्यासाठी कर्मचारी सज्ज झाले आहेत. यासोबतच पोस्टल बॅलेट पेपरमधील मतमोजणीसाठी ही स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकूण 59 टेबलावरून सहाही नगरपालिकामध्ये मतमोजणी होणार आहे. वर्धेमध्ये एकूण सहा नगराध्यक्षासाठी 43 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. तर 166 नगरसेवकांसाठी एकूण 791 उमेदवार रिंगणात आहेत.
Local Body Election Results 2025 Live: गडचिरोली येथील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाकरिता प्रशासन सज्ज
गडचिरोली जिल्ह्यात एकूण तीन ठिकाणी झालेल्या नगर परिषदेचा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. गडचिरोली शहरातील कृषी महाविद्यालयात स्ट्राँग रूम तयार करण्यात आली होती. या ठिकाणावर 10 वाजता पासून मतमोजणी होणार आहे. त्याकरिता प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं आहे. काही अनुचीत घटना घडू नये याकरता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
Local Body Election Results 2025 Live: पंढरपुरात आठ वाजता उघडणार स्ट्राँग रूम
पंढरपुरात मतमोजणी आज होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीतही स्ट्राँग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त असून आठ वाजता सर्वपक्षीय उमेदवार प्रतिनिधींच्या साक्षीने स्ट्राँग रूम उघडली जाईल. यानंतर प्रत्यक्ष दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारणपणे दुपारी दीड वाजेपर्यंत पंढरपूरचा निकाल पूर्णपणे हात येणार आहे.
Local Body Election Results 2025 Live: जळगाव जिल्ह्यात 16 नगरपरिषद व दोन नगरपंचायतींसाठी 160 टेबल116 फोऱ्या होणार
जळगाव जिल्ह्यात आज 16 नगर परिषद व दोन नगरपंचायतीचे निकाल लागणार असून सकाळी दहा वाजल्यापासून या मतमोजणी जळगाव जिल्ह्यात सुरुवात होणार आहे. एकूण 16 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीसाठी 116 फोऱ्या होणार असून 160 टेबल हे लावण्यात आले आहेत. सर्वात आधी शेंदुर्णी नगरपंचायतीचा निकाल आज जाहीर होईल. त्या ठिकाणी मतदारांची संख्या ही कमी आहे. मतमोजणीत आधी टपाली मतपत्रिकांची मतमोजणी होणार आहे नंतर प्रभागनिहाय मतमोजणी होणार
आहे
Local Body Election Results 2025 Live: कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगरपालिकांची आज मतमोजणी
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानासाठी आज मतमोजणी होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी 56 उमेदवारांनी, तर 263 सदस्यपदांच्या जागांसाठी 809 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. जयसिंगपूरला पाच, कागल-हातकणंगलेला सात फेऱ्या होणार आहेत. निकालासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज आहे. मतमोजणी सुरू झाल्यापासून तासाभरात म्हणजे अकरा वाजेपर्यंत निकालाचा कल कळेल असा अंदाज आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय पोलिस बंदोबस्त तैनात आहे. केंद्राच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. गेल्या दहा वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीचा जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणारा हा निकाल असेल, त्यामुळे कार्यकर्त्यांप्रमाणेच त्याबद्दल धाकधूक आहे.
Local Body Election Results 2025 Live: मतमोजणीला सकाळी दहा वाजता होणार सुरूवात
Local Body Election Result LIVE: धाराशीवमध्ये कोणाची सरशी होणार?
धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. परंडा येथे शिवसेनेकडून झाकीर सौदागर हे मैदानात आहेत, तर त्यांच्या विरोधात स्थानिक आघाडीचे विश्वजीत पाटील हे रिंगणात आहेत. भूम येथे दोन्ही स्थानिक विकास आघाड्यांमध्ये लढत होत आहे. या दोन्ही ठिकाणी राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मोठी ताकद लावली होती. तर त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे, सुजित सिंह ठाकुर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी एकत्रित येऊन लढा दिल्याने दोन्ही ठिकाणच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या होत्या. त्यामुळे याठिकाणी काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Local Body Election Result LIVE: यवतमाळमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य
यवतमाळ नगरपालिकेची मतमोजणी सकाळी दहा वाजल्यापासून धामणगाव रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरू होणार आहे. मतमोजणीच्या 29 फेऱ्या होणार आहेत. या दरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी ठिकाणी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा आहे.
Local Body Election Result LIVE: पालघरमध्ये मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण
पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार या तीन नगरपरिषद आणि वाडा नगर पंचायतीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मत मोजणाला सुरवात होणार आहे. पालघरमध्ये चारही ठिकाणच्या मिळून नगरसेवक पदासाठी 318, तर नगराध्यक्षपदासाठी
17 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भविष्य आज ठरणार आहे. पालघरमधील मतमोजणी केंद्रावर मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
Local Body Election Result LIVE: शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर राहील
राज्यात दोन टप्प्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल हाती येणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आजच्या निकालात भाजप एक नंबरचा आणि शिंदेंची शिवसेना दोन नंबरचा पक्ष ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Local Body Election Result LIVE: भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरणार- सावे
राज्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती यायला काही तास शिल्लक राहिले आहेत. अशात आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झाली आहे. भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार असून, आम्ही केलेल्या विकास कामाची ही पोचपावती असणार असल्याचं मंत्री अतुल सावे म्हणाले आहे.
Partur Nagar Parishad Election Result LIVE Update: परतूर नगरपरिषदेत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार: बबनराव लोणीकर
परतूर नगर परिषदेच्या निकालापूर्वी आमदार बबनराव लोणीकर यांनी भारतीय जनता पक्ष ताकतीने ही निवडणूक लढला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती होती.वेगवेगळ्या विचाराचे पक्ष एकत्र लढले मात्र आम्ही ताकतीने लढल्याने निकाल हा हजार टक्के भाजपाच्याच बाजूने असेल, परतूर मध्ये नगराध्यक्ष सह दहा जागा भारतीय जनता पक्षच जिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 700 कोटींची शहरात विकास कामे झाल्याने ही निवडणूक आम्ही लढल्याने विजय आमचाच असेल, असा विश्वास आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला आहे.
Jalna Local Body Election LIVE Updates: भोकरदनमध्ये ही भाजपा नंबर एकचचा पक्ष ठरेल: आमदार संतोष दानवे
भोकरदन नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला काही क्षणात सुरवात होणार आहे.भोकरदन नगर परिषद सह राज्यात भक्कम स्थितीत असल्याने अतिशय समाधान कारक निकाल भाजपच्या बाजूने लागतील.जनतेचा प्रतिसाद, मागील काळात झालेले विकास काम आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जो जनतेला विश्वास आहे.
याच विकासकामांच्या माध्यमातून जनतेसमोर गेल्याने राज्यातून सर्वदूर भारतीय जनता पक्षाच्या चांगलं यश मिळेल.व भोकरदन मध्ये सुद्धा आमचा पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरेल अतिशय चांगला प्रतिसाद आणि परिवर्तनाची लाठ त्या ठिकाणी असल्यामुळे क्रमांक एकचा पक्ष ठरणार असल्याचा विश्वास आमदार संतोष दानवे यांनी व्यक्त केला आहे.
Jalna Local Body Election Result LIVE Updates: अंबड नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार: आमदार नारायण कुचे
आजचा अंबडनगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असेल, सर्वच नगरसेवक विजयाच्या दिशेने घोडदौड करतील 12 वाजेवर्यंत 100% निकाल हे समोर येतील भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष होईल असा विश्वास भाजपा आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त करत राज्यात ही भारतीय जनता पार्टी नंबर एक वर राहील असा दावा ही त्यांनी केला आहे.
Naga Parishad- Nagar Panchayat Election Result: आज 288 जागांसाठी मतदान, कोण मारणार बाजी?
राज्यातील 264 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. तसेच सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार 24 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि 76 नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान घेतले गेले. या सर्व नगरपंचायत तसेच नगरपरिषदांची मजमोजणी आज 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार आहे. या नगरपरिषद तसेच नगरपालिकेच्या निकालात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.