बळीराजाच्या मदतीला राष्ट्रवादी! सर्व MLA- MP 1 महिन्याचा पगार देणार; किती असते आमदारांचे मानधन?

Maharashtra Marathwada Rain Flood Ajit Pawar Group NCP MLA Help: बळीराजा संकटात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार खासदार एका महिन्याचा पगार मदत म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे राज्याध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली असून, महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी तुफान पाऊस झाला असून, पावसामुळे झालेल्या नुकसानाला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. सांगली, सातारा, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि अहमदनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीत पाणी साचले आहे. यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकरी "आम्ही आता कसं जगायचंय? असा आर्त सवाल आता शेतकरी करत आहेत. बळीराजा संकटात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार खासदार एका महिन्याचा पगार मदत म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. 

Jalna rain news: कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरलं, प्रश्नांचा भडीमार अन् मंत्र्यांची तारांबळ, अखेर काढता पाय

संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान,  उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत थेट पूरग्रस्त भागात भेट दिली. आज ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट देत असून, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत. अजित पवार यांनी आज पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि प्रशासनाला तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लवकरच आणखी काही मदत योजनांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले. पक्षाच्या या एकत्रित उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी खंबीरपणे उभा आहे असेही ते म्हणाले.

Advertisement

आमदारांना किती असतो पगार?

 महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांना म्हणजेच आमदारांना वेतन, भत्ते आणि अन्य सोयीसुविधा दिल्या जातात. या गोष्टी त्यांना भरघोष मिळतात. आमदारांना 10 जुलै 2024 प्रमाणे किती वेतन आणि भत्ता मिळतो ते आपण पाहाणार आहोत. महाराष्ट्र विधानमंडळातील सदस्याला दरमहा मूळ वेतन 1,82,200 रुपये इतके मिळते. त्यात महागाई भत्ता (50%) प्रमाणे दरमहा 91,100 रुपये मिळतो.