14 hours ago

Maharashtra Mumbai Rain IMD Alert Update: गेल्या आठवडाभरापासून मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात आज रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिला आहे. या दरम्यान, मुसळधार ते अती मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. तसेच, आज दुपारी ३.२२ वाजता समुद्राला ४.१९ मीटर उंचीची भरती आहे.

आज सकाळपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. पुण्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्यभरात सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या, झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

Advertisement

Jul 05, 2026 13:56 (IST)

Mumbai Rain LIVE Update: महापौर रितू तावडे यांचे मुंबईकरांना विनम्र आवाहन

आपली सुरक्षितता हीच माझी प्राथमिकता...

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे मुंबईकरांना विनम्र आवाहन..

सध्या मुंबईत मुसळधार पाऊस आणि ‘रेड अलर्ट’ आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहणे सर्वात महत्त्वाचे आहे.

कृपया अनावश्यक बाहेर पडू नका

झाडांपासून दूर राहा

 वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करा

अफवांवर विश्वास ठेवू नका

 आपत्कालीन मदतीसाठी संपर्क: 1916

प्रशासनाच्या सूचनांचे कृपया पालन करावे.

Jul 05, 2026 13:55 (IST)

Mumbai Rain Update: कुर्ल्यात झाड कोसळून एकाचा मृत्यू; पावसाचा तिसरा बळी

मुंबई येथील कुर्ला परिसरामध्ये झाड कोसळून युनूस हकीमुद्दीन शेख यांचा दुर्दैव मृत्यू झाला आहे...

मुंबई येथील कुर्ला परिसरातील नौपाडा शाळा जवळ वयस्कर युनुष टाकीमुद्दिन शेख यांचा निधन झालेला आहे....

युनूस शेख यांनी कुर्ला परिसरात नवीन दुकान घेतली होती आणि त्याचा उद्घाटन कसा करावा या साठी आज दुकानात आले होते...

स्थानिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झालेला आहे.....

मुंबईकरांचा जीव एवढा स्वस्त झालेला आहे का अशा प्रश्न स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे....

घटना घडून दोन तास उलटूनही मुंबई महानगरपालिकेच्या एक ही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नाही...

एका आठवड्यात कुर्ला परिसरातील ३ जणांचे मृत्यू झाले आहे...

Advertisement
Jul 05, 2026 12:38 (IST)

Mumbai Rain Water Level: मुंबईच्या सात तलावांतील पाणीसाठा १३.१९ टक्क्यांवर; गेल्या वर्षी याच दिवशी होता ५४.२७ टक्के

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आज (५ जुलै) सकाळी ६ वाजेपर्यंत १ लाख ९० हजार ८९८ दशलक्ष लिटर (ML) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. 

हा एकूण क्षमतेच्या १३.१९ टक्के आहे. गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साठा तब्बल ५ लाख ९४ हजार ५९५ ML ने कमी आहे.  

Jul 05, 2026 12:37 (IST)

Navi Mumbai Rain Alert: रेड अलर्ट असूनही पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; दोन तरुण बेपत्ता, शोधकार्य सुरू

मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट जारी असतानाही खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली. विशेष म्हणजे, काल दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये २० आणि १९ वर्षीय दोन तरुण धबधब्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले असून, अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप दोघांचेही मृतदेह सापडलेले नाहीत.

धोक्याचा इशारा आणि सुरू असलेले शोधकार्य असूनही पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाने नागरिकांना पांडवकडा धबधब्यासह धोकादायक पर्यटनस्थळांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Jul 05, 2026 12:06 (IST)

Navi Mumbai Rain Update: नवी मुंबई वाशी सेक्टर-10 मध्ये शाळेजवळ झाड कोसळले

नवी मुंबई वाशी सेक्टर-10 मध्ये शाळेजवळ झाड कोसळले; सुदैवाने आज शाळेला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली

नवी मुंबई : नवी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे वाशी सेक्टर-10 येथील मिनी शिशुविहार शाळेजवळ मोठे झाड कोसळल्याची घटना रविवारी घडली. सुदैवाने आज शाळेला सुट्टी असल्यामुळे विद्यार्थी परिसरात नसल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

Jul 05, 2026 11:52 (IST)

Pune Rain LIVE Updates: कात्रज-कोंढवा रोडवर पाण्याची पाइपलाइन फुटली, वाहन चालकांना सावधिरीचा इशारा

कात्रज-कोंढवा रोडवरील गोकुळनगर चौकात एसबीआय बँकेसमोरील मुख्य रस्त्यावर पाण्याची पाइपलाइन फुटली.

पाइपलाइन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहू लागले.

घटनेमुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

वाहनचालकांना या मार्गावरून जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित विभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून, दुरुस्तीचे काम अपेक्षित आहे.

पाइपलाइन फुटण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एकीकडे पाऊस सुरू असताना पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

Advertisement
Jul 05, 2026 11:50 (IST)

Navi Mumbai Rain LIVE Updates: नवी मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; घणसोलीत पत्रे कोसळून वाहनांचे नुकसान

नवी मुंबईमध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनांच्या घटना घडत आहेत. घणसोली सेक्टर-10 येथील मेघ मल्हार सोसायटीजवळ एका बांधकाम प्रकल्पासाठी उभारण्यात आलेले लोखंडी पत्रे (टिन शीट) वाऱ्याच्या वेगामुळे उडून रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळले.

या घटनेत काही कार पत्र्याखाली अडकल्या असून वाहनांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत वाहनचालकांना मदत केली.

Jul 05, 2026 11:50 (IST)

Mumbai Rain Update: माहिममध्ये पावसामुळे झाडे कोसळली, वाहतुकीवर मोठा परिणाम

मुंबई मध्ये झाड कोसळण्याची घटना कमी होताना दिसून येत नाही आहे..

मुंबई येथील माहीम भागामध्ये तीन ते चार झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतुकी वरती याचा परिणाम दिसून येत आहेत.

Advertisement
Jul 05, 2026 11:43 (IST)

Gadchiroli Rain LIVE Update: भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्याला पूर; सात गावांचा संपर्क तुटला

भामरागड तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे गुंडेनूर नाल्याला पूर आला आहे. यामुळे बिनागुंडा परिसरातील पेरमलभट्टी, पुंगासूर, तुर्रेमरका, दामनमर्का, गुंडेनूर, बांगडी यासह सात गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नाल्यावरून पाणी वेगाने वाहत असल्याने सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

बिनागुंडा परिसरातील नागरिक दरवर्षी पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन आपल्या दुचाकी पूरग्रस्त भागाच्या सुरक्षित बाजूला (लाहेरी) आधीच आणून ठेवतात.या दुचाकींचा वापर करून ते पुढे लाहेरी तसेच तालुका मुख्यालय असलेल्या भामरागड येथे ये-जा करतात. मात्र, यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने नदी- नाल्यांमध्ये पाणी एवढ्या वेगाने वाढेल, असा अंदाज या परिसरातील नागरिकांना आला नाही. त्यामुळे अनेकांनी वाहन सुरक्षित स्थळी हलविले नव्हते. अचानक गुंडेनूर नाल्याच्या पाण्याची पातळी झपाटयाने वाढू लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी आपल्या दुचाकी सुरक्षितस्थळी आणण्यासाठी धावपळ सुरू केली. काहींनी वेळेत वाहने बाहेर काढली, तर अनेकांना वाढत्या पाण्यामुळे वाहने हलविणे शक्य झाले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

Jul 05, 2026 11:41 (IST)

Kalyan Rain LIVE Updates: कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये जोरदार पाऊस

 कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर या शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. अधून मधून सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचल्याने वाहन चालकांना आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी देखील हीच परिस्थिती होती. आज देखील कल्याण डोंबिवलीतील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. प्रशासनाने कितीही दावा केले तरी नागरिकांना पाणी साचल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे

Jul 05, 2026 11:40 (IST)

Raigad Rain Alert: रायगड जिल्ह्यात पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे पाली खोपोली मार्गावरील वाहतूक ठप्प

रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीच्या पाणीपातलीत मोठी वाढ झाली आहे सध्या आंबा नदी धोका पातळी ओलांडून वाहत असल्यामुळे पाली खोपोली मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे.

रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातलीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे अनेक सकल भागात हळूहळू पाणी शिरायला सुरुवात झाल्यामुळे अनेक प्रमुख मार्गावर या नद्यांच्या पुराचे पाणी आल्याने अनेक भागातील वाहतूक ठप्प पडली आहे.

पाली खोपोली मार्गावरील पाली जवळच्या  आंबा नदीचे पाणी आल्यामुळे येथील मागील एक तासांपासून वाहतूक ठप्प आहे. शिवाय भात शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यामुळे भात शेती कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

Jul 05, 2026 11:39 (IST)

Kalyan Rain LIVE Update: उल्हास नदीत पाण्याची पातळी वाढली, नागरिकांना प्रशासनाकडून सूचना

कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ठीक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. कल्याणहुन वाहून जाणारी उल्हास नदीत देखील पाण्याची पातळी वाढली आहे. प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना इशारा देण्यात आला आहे.

Jul 05, 2026 11:17 (IST)

Mumbai Rain LIVE Update: मुंबईकरांनो सावधान! आज मुसळधार पाऊस कोसळणार

"बृहन्मुंबई महानगरपालिका"चे मुंबईकरांना आवाहन 

➡️ मुंबई शहर आणि उपनगर परिसरात संततधार पाऊस सुरू असला तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष कार्यस्थळी सज्ज असून नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहे.

➡️ रेल्वे, बेस्ट तसेच इतर सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत सुरू असून, मुंबईतील जनजीवनही नियमितपणे सुरू आहे.

➡️ भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात आज , दिनांक ५ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिला आहे.

➡️ या दरम्यान, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. 

➡️ अधूनमधुन ताशी ५५ ते ६५ किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचीही दाट शक्यता आहे.नागरिकांनी झाडाखाली थांबू नये. तसेच, वाहने पार्क करू नयेत. 

➡️ तसेच, आज दुपारी ३.२२ वाजता समुद्राला ४.१९ मीटर उंचीची भरती आहे. 

➡️ या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच, प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.  

➡️ आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा

Jul 05, 2026 11:06 (IST)

Pune Rain LIVE Update: पुण्यात संततधार पावसाचा फटका; सोसायटीची सीमाभिंत पार्किंग शेडवर कोसळली

पुण्यात संततधार पावसाचा फटका; सोसायटीची सीमाभिंत पार्किंग शेडवर कोसळली

आज (दि. ५ जुलै) पहाटे ३.२४ वाजता जांभूळवाडी रोडवरील समृद्धी लेक सोसायटीमध्ये संततधार पावसामुळे सीमाभिंत पार्किंग शेडवर कोसळली.

घटनेची माहिती मिळताच कात्रज आणि सिंहगड अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

फॅब्रिकेशन कर्मचाऱ्यांच्या मदतीने लोखंडी अँगल ग्राइंडरने कापून तसेच पत्रे बाजूला करून बचावकार्य करण्यात आले.

बचाव मोहिमेदरम्यान पार्किंगमध्ये अडकलेली ७ चारचाकी वाहने सुरक्षित बाहेर काढण्यात आली.

तसेच ७ दुचाकी वाहनेही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

प्रभारी उपअग्निशमन अधिकारी संतोष भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य पार पडले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने कार्यवाही करून परिसर सुरक्षित केला.

संततधार पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Jul 05, 2026 11:02 (IST)

Pune Rain LIVE Update: पुण्यात झाड कोसळल्याने वाहतूक बंद;अग्निशमन दलाची तातडीची कारवाई

पुण्यात पावसामुळे झाड कोसळून रस्ता बंद; अग्निशमन दलाची तातडीची कारवाई

पुण्यातील वाकडेवाडी, बॉम्बे-पुणे रोडवरील जोग सेंटर परिसरात स्फूर्ती सोसायटीकडे जाणारा रस्ता झाड कोसळल्याने पूर्णपणे बंद झाला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

इलेक्ट्रिक चेन सॉ, कुऱ्हाड, दोरी आणि फायर एक्सच्या सहाय्याने झाडाचे तुकडे करून हटविण्यात आले.

अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

प्रभारी तांडेल हरीश बुंदेले यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य पार पडले.

फायरमन सुरेश पवार आणि राजेंद्र महाडिक यांनी कारवाईत सहभाग घेतला.

मदतनीस कुणाल खांडरे आणि वाहन चालक नितीन सूर्यवंशी यांनीही बचाव मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

सततच्या पावसामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Jul 05, 2026 11:01 (IST)

Mumbai Rain LIVE Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आवाहन, समुद्रकिनारी जाऊ नका

मुंबईमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी...

मुंबई येथील दादर चौपाटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी...

मुंबईकरांना पुढचे तीन तास महत्त्वाचे असणार आहे, हवामान विभागाच्या माध्यमातून रेड अलर्ट मुंबईला जाहीर करण्यात आलेला आहे....

प्रशासनाच्या वतीने लोकांना आवाहन करण्यात आलेला आहे  समुद्र किनारी जाण्यापासून टाळावा जेणेकरून कुठलाही धोका सर्वसामान्य मुंबईकरांना निर्माण होणार नाही..

मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनाच्या वतीने समुद्रकिनारी यंत्रणा देखील सज्ज केली आहे...

Jul 05, 2026 11:00 (IST)

Mumbai Rain LIVE Update: शिवाजी पार्कमध्ये महाकाय झाड कोसळले

शिवाजी पार्क पडले महाकाय झाड 

झाड थेट रस्त्यावर त्यामुळे वाहतूक झाली बंद 

झाडाखाली चार चाकी वाहन दबले 

वाहनातील चालक बाहेर असल्याने सुद्धा युवाने मोठी घटना टळली

Jul 05, 2026 10:59 (IST)

Mumbai Rain LIVE Update: मुंबईकरांसाठी तीन तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा मोठा इशारा

मुंबईत पुढील तीन तास मुसळधार पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असेही आवाहन करण्यात आले आहे.