22 hours ago

Maharashtra Rain Live Updates: राज्यात एकीकडे नवरात्रोत्सवाचा जल्लोष सुरु असतानाच पावसानेही धुमाकूळ घातला आहे. पुढील पाच दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी आगामी पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.२८ आणि २९ सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रशासनाने सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Sep 28, 2025 12:12 (IST)

LIVE Updates: जायकवाडी धरणात पाण्याची होणार मोठी आवक

- जायकवाडी धरणात पाण्याची होणार मोठी आवक 

- नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार

- दुपारी 12 वाजता तब्बल 57 हजार 426 क्यूसेक पाणी नांदूरमध्येमेश्वर बंधाऱ्यामार्गे जायकवाडीच्या दिशेने सोडले जाणार

- नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच असल्याने विसर्गात केली जाते आहे टप्प्याटप्प्याने वाढ

- गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा

Sep 28, 2025 10:33 (IST)

LIVE Updates: नाशिकच्या देवळाली ते लहवीत स्टेशन दरम्यान मालगाडीत बिघाड

- नाशिकच्या देवळाली ते लहवीत स्टेशन दरम्यान मालगाडीत बिघाड

- मालगाडीच्या प्रेशर पाईपमध्ये बिघाड झाल्याने जवळपास दीड तासापासून रेल्वे गाड्या खोळंबल्या

- वंदे भारत, तपोवन एक्स्प्रेस देवळाली कॅम्प जवळ थांबवल्या

- पुढील 15 ते 20 मिनिटात काम पूर्ण होऊन वाहतूक पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती

Sep 28, 2025 10:32 (IST)

LIVE Updates: ठाणे जिल्ह्यासह काही भागात रेड अलर्ट

नवी मुंबई भारतीय हवामान खात्याने (IMD) आज पहाटेपासून ठाणे जिल्ह्यासह काही भागात रेड अलर्ट जारी केला आहे. 

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, NDRF, SDRF व लष्कर सतर्क आहे. 

नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, जुन्या/धोकादायक इमारतींपासून दूर राहण्याचे व गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिका सज्ज – आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व आपत्ती निवारण कक्षांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

आपत्कालीन मदत – नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता फक्त प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व गरज भासल्यास जवळच्या विभागीय कक्षाशी किंवा महापालिका मुख्यालयाशी संपर्क साधावा.

घाबरू नका, सतर्क राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा.असे आव्हान नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबई करांना केले आहे.

Sep 28, 2025 10:26 (IST)

LIVE Updates: जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग, पैठण शहरात पाणी घुसण्याची शक्यता

जायकवाडी धरणातून 1 लाख 32 हजार क्यूसेकने  पाण्याचा विसर्ग 

पैठण शहरात पाणी घुसण्याची शक्यता 

गोदावरी काठावरील नागरिकांना अलर्ट

Advertisement
Sep 28, 2025 10:25 (IST)

LIVE Updates: एसी लोकलला पावसाचा फटका; चक्क एसी लोकलमध्ये पावसाचे पाणी

पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका; चक्क एसी लोकलमध्ये पावसाचे पाणी

पश्चिम रेल्वे वर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका.

चक्क एसी लोकलमध्ये पावसाचे पाणी.

एडवोकेट आशिष राय यांच्याकडून ऐसी लोकलमधील पावसाचे पाणी गळण्याचा व्हिडिओ पोस्ट

पश्चिम रेल्वे वरील रात्री अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या AC लोकलमधील प्रकार.

Sep 28, 2025 09:31 (IST)

Rain News LIVE Update: आज पुण्यात पुन्हा पावसाचा ऑरेंज अलर्ट

आज पुण्यात पुन्हा पावसाचा ऑरेंज अलर्ट 

मध्यम पावसाचा इशारा वेध शाळेकडून वर्तवण्यात आला आहे 

पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून संभाजीनगर, जळगाव, पुणे , रत्नागिरी येथे पुढील ३ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे येण्याची शक्यता आहे

तसेच ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे

Advertisement
Sep 28, 2025 09:30 (IST)

Rain LIVE Updates: वसई विरार नालासोपारा शहरात मुसळधार पाऊस

 वसई विरार  नालासोपारा शहरात मुसळधार पाऊस

शहरातील सखल भागात पाणी साचलं

नालासोपारा येथील गला नगर, तुळींज परिसरात पाणी साचले

रात्री पासूनच पावसाची दमदार बॅटिंग सुरू

वसई विरार नालासोपारा सह पालघरच्या ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस

पालघर जिल्ह्याला हवामान खात्याचा आज आणि उद्या रेड अलर्ट

Sep 28, 2025 09:30 (IST)

LIVE Updates: मनमाडला रात्रीपासून पावसाचा हाहाकार

नाशिकच्या  मनमाड, येवला नांदगाव परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत  असल्याने कांदा, मका, बाजरी, भुईमूग या खरिपाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, तर फळबागा, भाजीपाला पिकांना पावसाचा फटका बसला असून, जनावरांचा चाराही भिजल्याने चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे.दिवाळी दसरा कसा साजरा करणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Advertisement
Sep 28, 2025 08:56 (IST)

Mumbai Rain LIVE Update: मुंबईत परत एकदा पावसाला जोर

- मुंबईत परत एकदा पावसाला जोर 

- मुंबईसह उपनगरात पावसाच्या मुसळधारा

- दुपारी 3 वाजता समुद्राला उधाण येणार

Sep 28, 2025 07:37 (IST)

Mumbai Rain LIVE Update: मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट

- मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट 

- मुंबईत रात्रभर पाऊस, ठिकठिकाणी 60 ते 75 मिमी पावसाची नोंद 

- समुद्राला देखील येणार त्यामुळे नागरिकांची काळजी घ्यावी 

- मुंबईवर काळे ढग दाटून आले असून आणखी जोरदार पाऊस होण्याची शक्यता

Sep 28, 2025 07:12 (IST)

Jalgaon Rain Live Updates: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून चाळीसगाव तालुक्यासह परिसरातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झुडपले आहे. डोंगरी व तितुर या नद्यांना पूर आला असून त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने रात्री सुरक्षित स्थळी हलवले आहे. चाळीसगाव शहरातील हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून शहरातील सखोल भागात पाणी साचले आहे. तर अग्निशमन दलाने संपूर्ण रात्र शहरात गस्त घालून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Sep 28, 2025 07:11 (IST)

LIVE Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची संततधार

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पैठणच्या जायकवाडी धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जात आहे. विसर्ग वाढवला जात असल्याने गोदावरी काठच्या नागरिकांना प्रशासनाकडून लाऊड स्पीकर वरून सूचना दिल्या जात आहे

Sep 28, 2025 07:10 (IST)

LIVE Updates: जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे पुन्हा उघडले

जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे पुन्हा उघडले

यावर्षी तिसऱ्यांदा जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले

पाण्याची आवक वाढल्याने जायकवाडी धरणाचे 9 आपत्कालीन दरवाजे देखील उघडले

जायकवाडी धरणातून 94320 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

गोदाकाच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा