1 day ago

Mumbai Rain Updates: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील विविध भागात पावसाची संततधार सुरु आहे. पुढील 3-4  तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे  नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईत अंधारमय वातावरण असून दुपारी 12.38 वाजता समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी 4.64 मि उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.  मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Jul 25, 2025 11:49 (IST)

Pune Rain Live Updates: पुणे शहराला आज पावसाचा येलो अलर्ट

पुणे शहराला आज पावसाचा येलो अलर्ट

पुण्यासह लातूर, नांदेड, नाशिक, सातारा, धाराशिव या शहरांना देखील येलो अलर्ट वेधशाळेने दिला आहे 

गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुणे शहरात विश्रांती घेतली होती मात्र गेल्या २ ते ३ दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे 

पावसाच्या संततधारेमुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्र देखील ८० टक्के पेक्षा जास्त भरले आहेत 

गेल्या यावर्षी याचवेळी धरणात १७.९८ टीएमसी पाणीसाठा म्हणजे ६१.१२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता

गेल्यावर्षी च्या तुलनेत ७ टीएमसी पाणीसाठा जास्त

खडकवासला धरणक्षेत्रात खडकवासला, पानशेत,वरसगाव,टेमघर हे धरण येतात.

यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने धरणक्षेत्रता पाणीसाठा वाढला

Jul 25, 2025 11:48 (IST)

Gadchiroli News: गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

आज गडचिरोली जिल्ह्य़ात रेड अलर्ट दिलेला असून काल पासुनच मुसळधार पाऊस सुरू आहे.

सध्या गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे  2 मार्ग बंद आहेत हेमलकसा भामरागड रस्ता (पर्लकोटा नदी)राष्ट्रीय महामार्ग-130 आणि सिरोंचा असरअली जगदलपूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग-63 

तसेच जिल्ह्यातील तालुक्यात आज सुरु असलेल्या पावसाचा मि. मी. 

१. गडचिरोली : ४२.१

2. धानोरा : 38.7

3. देसाईगंज: 37.0

4. आरमोरी: 62.5

5. कुरखेडा : 36.2

6. कोरची: 27.7

7. चामोर्शी : 42.2

8. मुलचेरा: 54.2

9. अहेरी : 67.0

10. सिरोंचा: 35.4

11. एटापल्ली: 68.4

12. भामरागड : 99.2

Jul 25, 2025 11:47 (IST)

Rain Live Updates: भंडारा जिल्ह्यात आज रेड अलर्ट जाहीर

भंडारा जिल्ह्यात आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असला तरी तशी परिस्थिती नाही.

काल रात्री हलक्या प्रतीचा पाऊस झाला असला तरी सकाळी मात्र पावसाने उसंत घेतली आहे. दुसऱ्या राज्यातून पाणी सोडण्यात आल्याने तसेच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट भागात पाण्याची पातळी वाढल्याने गोसे धरणाचे २३ दरवाजे अर्ध्या मीटर ने उघडलेले आहेत. त्यामुळे काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .अद्याप कुठे पूर किंवा रस्ते बंद झाल्याचे दिसून आलेले नाही.

Jul 25, 2025 11:05 (IST)

Mumbai Rain Update: पुढील तीन तास महत्त्वाचे! मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज

मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.  या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरु आहे.  पुढील तीन तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

Advertisement
Jul 25, 2025 10:44 (IST)

Mumbai Rain Live: मुंबई- ठाण्यात पावसाची बॅटिंग, लोकल सेवेवर परिणाम

मुंबईच्या विविध भागात पावसाची हजेरी, चाकरमान्यांची तारांबळ... मुलूंड टोलनाका परिसरात वाहतूक मंदावली, पश्चिम रेल्वेची सेवा 10 मिनिटे उशिरा

Jul 25, 2025 10:35 (IST)

Live Updates: नवी मुंबईसह, शिवाजी पार्क परिसरात जोरदार पाऊस

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच नवी मुंबईतही पावसाची बॅटिंग पाहायला मिळत असून  वाशी, सानपाडा, नेरूळ भागात पाऊस आहे. अद्याप कुठे पाणी भरलेलं नाही

Advertisement
Jul 25, 2025 10:10 (IST)

Mumbai Rain News: एसीलोकल मधून छत्री घेवून करावा लागतोय प्रवास

एसी लोकल मधून छत्री घेवून करावा लागतोय प्रवास...

एसी लोकलचे छत गळके 

महागडे तिकिट काढून ही प्रवास मात्र अडचणीचाच 

ठाणे ते सीएसएमटी सकाळी ९.०३ च्या एसी लोकलला लागली गळती 

भिजू नये म्हणून लोकलच्या डब्यात डोक्यात प्लास्टिक पिशवी आणि छत्री उघडून प्रवासी करत आहेत प्रवास..

Jul 25, 2025 09:39 (IST)

LIVE Update: मुंबईतील पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, लोकल 10 मिनिटे उशिरा

मुंबईत पावसाची संततधार सुरु असून त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. पावसामुळे लोकल ट्रेन १० मिनिटे उशिरा धावत आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. 

Advertisement
Jul 25, 2025 09:36 (IST)

Live Update: मुंबई उपनगरातील अंधेरी येथील सबवे पुल पाण्याखाली

अंधेरी पश्चिम आणि पुर्वेला जोडणारा सबवे पुल हा वाहतुकीसाठी मुख्य रस्ता मानला जातो येथून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात मात्र अनेक वर्षापासून जास्त पाऊस झाल्याने हा पूल पूर्णपणे पाण्याखाली जातो त्यामुळे अंधेरी पश्चिम ते पूर्वेकडे जाण्यासाठी हा नागरिकांना फिरून जावे लागते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरीकांची गैरसोय होते.

पालिका प्रशासनाला तर्फे कोणतीही उपाययोजना पाहायला मिळत नाही तसेच अनेक वेळा मोठ्याप्रमाणावर पावसाळात या ठिकाणी घटना देखील पाहायला मिळाल्या आहेत

Jul 25, 2025 08:59 (IST)

Live Updates: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, अंधेरी सब वे पाण्याखाली

मुंबईत आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण भागात जोरदार पाऊस सुरु असून अंधेरी सब वे पाण्याखाली गेला आहे.  रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरु आहे. 

Jul 25, 2025 08:20 (IST)

Rain News: आज वर्ध्याला ऑरेंज अलर्ट, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

आज वर्ध्याला ऑरेंज अलर्ट

जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

सकाळपासून झालीय पावसाची रिपरिप सुरू

यातच निम्न वर्धा धरणाचे पाच दरवाजे  30 सेमी ने उघडले आहे.

आर्वी तालुक्यातील उमरी व दहेगाव गोंडी ही छोटी जलाशये भरली 100 टक्के

याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचा ईशारा प्रशासनाने दिला आहे

Jul 25, 2025 07:49 (IST)

Live Updates: चंद्रपूर जिल्ह्यात शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता शाळा- महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. आणि आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आज जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस यांना सुटी जाहीर केली. दरम्यान, रात्रीपासून पावसाचा वेग मंदावला असून, मोठ्या नदी नाल्यांनी अजून पात्र सोडलेले नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.

Jul 25, 2025 07:48 (IST)

Rain Updates: पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी, भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात पावसाने परत एकदा हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी जून महिन्यातच पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली जातो. भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होते. मात्र यंदा जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाने उशिरा हजेरी लावल्याने आज पहाटेच्या सुमारास पहिल्यांदाच भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

Jul 25, 2025 07:47 (IST)

Rain Live Updates: वर्धा आणि नागपुरात ढगाळ वातावरण,

वर्धा आणि नागपुरात ढगाळ वातावरण आहे. मात्र, पावसाची किरकोळ रिपरिप सुरू आहे. ऑरेंज अलर्ट सारखा पाऊस अद्याप झालेला नसला तरी तो सकाळ नंतर होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात येत आहे. 

पूर्व विदर्भात ज्या चार जिल्ह्यांत आज रेड अलर्ट देण्यात आला आहे त्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात देखील किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याची माहिती आहे.

Jul 25, 2025 07:46 (IST)

Live Updates: मुंबई, ठाणे, रायगडला पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा अंदाज

पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Jul 25, 2025 07:46 (IST)

Mumbai Rain Update:मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये, प्रशासनाचे आवाहन

मुंबईत अंधारमय वातावरण 

दुपारी १२ः३८ वाजता समुद्राला मोठी भरती 

४.६४ मि उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता 

मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असे प्रशासनाचे आवाहन