36 minutes ago

Maharashtra Mumbai Rain LIVE Update:  राजधानी मुंबईमध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. मंगळवारी झालेल्या तुफान पावसाने मुंबईची लाईफलाईनसह वाहतूक सेवाही ठप्प झाली होती. सर्वत्र पाणी साचल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. आज पहाटेपासून मात्र मुंबईत पावसाचा जोर ओसरल्याचे दिसत आहे. राज्य आपत्कालिन कार्य केंद्राने पुढील 12 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, चंद्रपूर हे जिल्हे आणि पुणे घाट, नाशिक घाट या परिसरासाठी रेड अलर्ट दिला आहे.

Aug 20, 2025 13:26 (IST)

Vasai News: वसई लोहामार्ग पोलीस ठाण्यात घुसले पाणी

वसई लोहामार्ग पोलीस ठाण्यात घुसले पाणी.

रेल्वे पोलिसांना पाण्यात उभं राहून कराव लागतंय काम..

वसई रेल्वे स्टेनाकाच्या बाजूला असलेल्या लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे हाल

वसई लोहमार्ग पोलीस ठाणे नव्या सुरक्षित जागेत स्थलांतरित करण्याची मागणी

Aug 20, 2025 13:20 (IST)

Pune Rain News LIVE Updates: पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

पुणे हवामान विभागाने आज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तासांत अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालय, मुंबई येथून मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांनी नदीकाठी, नाल्याजवळ किंवा धोकादायक ठिकाणी अनावश्यकपणे न थांबता सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Aug 20, 2025 12:27 (IST)

Pune Rain LIVE Updates: पुण्यातील एकता नगर परिसरात पाण्याचा कहर; नागरिकांचा ठाम पवित्रा

खडकवासला धरणातून वाढत्या विसर्गामुळे पुण्यातील एकता नगर परिसरातील अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. आजूबाजूचा परिसर जलमय झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. मुठा नदीच्या पाण्याचा वेग वाढत असून या भागातील परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरवर्षी पुरामुळे होणाऱ्या या समस्यांवर केवळ आश्वासनेच मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे “जोपर्यंत आमच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आम्ही इथून बाहेर पडणार नाही,” असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.

सध्या खडकवासला धरणातून ४० ते ४२ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, जर पावसाचा जोर सतत कायम राहिला, तर ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे

Aug 20, 2025 12:25 (IST)

Kolhapur Rain: महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना स्थलांतर होण्याचे आवाहन

 कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन केला आहे. कोल्हापूर शहरातल्या सुतार वाडा या परिसरात सर्वात आधी पाणी पसरत असतं. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या नागरिकांना स्थलांतर होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिक ही सध्या सतर्क असल्याचे पाहायला मिळते. पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये आहे

Advertisement
Aug 20, 2025 12:23 (IST)

Pune News: पुणे शहरातील पुलाची वाडी या ठिकाणी घरांमध्ये शिरलं पाणी

पुणे शहरातील पुलाची वाडी या ठिकाणी घरांमध्ये शिरलं पाणी

पुलाची वाडी परिसरात अनेक घरांमध्ये रात्रीपासून पाणी 

मुळा मुठा नदीपात्राच्या काठावर असणाऱ्या वस्ती मधल्या घरांमध्ये पाणी 

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर घरांमध्ये शिरलं पाणी 

पुलाची वाडी परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू 

पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या सगळ्या परिसराची पाहणी 

Aug 20, 2025 12:14 (IST)

Nashik Rain LIVE Updates: - इगतपुरी तालुक्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटींग

- इगतपुरी तालुक्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटींग

- तालुक्यातील सर्वात मोठे दारणा धरण 91.72 टक्के भरले 

- दारणा धरणाचे सहा दरवाजे दोन फुटांनी उघडले 

- 10284 क्युसेकने दारणा नदीत विसर्ग सुरू 

- नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

Advertisement
Aug 20, 2025 11:21 (IST)

Ratnagiri News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाने घेतली विश्रांती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाने घेतली विश्रांती

 सिंधुदुर्ग एन एच एम अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन 700 कर्मचाऱ्यांचे 22 ऑगस्ट पर्यंत आंदोलन करणार

 वैभववाडी ते नागरिकांना विश्वासात घेऊन विकास आराखडा बनवा नगरसेवकांची मुख्याधिकाऱ्यांना विनंती 

 कुडाळ डॉन बॉस्को चर्चा इमारतीला आग शॉर्टसर्किटमुळे लागली आग खुर्च्या सिलिंगपत्रे खिडक्यांच्या काचा पंखे आगीत जळाले 

 सिंधुदुर्ग नगरी येथे रेल्वे स्थानक वर पी आर एस सिस्टीम  आरक्षण सुविधेचे उद्घाटन 

 विशाल परब यांचा भाजपमध्ये प्रवेश सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे पदाधिकारी करणार परब यांचे आज सावंतवाडीत  स्वागत

Aug 20, 2025 11:19 (IST)

Sangli Rain News: कृष्णाच्या नदीपात्रात उड्या मारण्याचा थरार

सांगलीत कृष्णा नदी मध्ये पाणी पातळी वाढली असल्याने कृष्णा नदीत तरुणांचा उडीचा थरार पाहायला मिळत आहे.. दुथडी भरून वाहणाऱ्या विस्तीर्ण नदीपात्रात थरारक अशा उड्या मारून पोहण्याचा आनंद सांगली कर घेत आहेत.. आज ही तो थरार आनुभवायस मिळाला..  सांगली  आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाण्याची पातळी साडे पस्तीस फुटावर आल्यानंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी सूर, गठ्ठा मारून थरार निर्माण केला आहे.

Advertisement
Aug 20, 2025 11:15 (IST)

Raigad Rain News: पेण तालुक्यातील अंतोरे गाव पाण्याखाली !

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील अंतोरे गाव पाण्याखाली गेले आहे. सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबतच हेटवणे धरणाचे दरवाजे उघडल्याने विसर्ग वाढला आहे. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली असून मोहल्ला परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे.

हेटवणे धरणाच्या पाण्याचा विसर्ग केल्याने भोगावती नदीची पाण्याची पातळी वाढून धोका पातळीच्या वर वाहत आहे.

Aug 20, 2025 11:00 (IST)

Pune News: खडकवासलामधून मोठा विसर्ग

पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा व मुठा या नद्यांमध्ये धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. विशेषतः खडकवासला धरणातून तब्बल ४२ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

याचा सर्वाधिक परिणाम एकतानगर परिसरातील सोसायट्यांवर झाला असून, काल रात्रीपासूनच या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. नागरिक धास्तावलेले असले तरी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, “दरवर्षी आम्हाला आश्वासनं मिळतात, पण समस्या सुटत नाही. ठोस उपाययोजना न झाल्यास आम्ही घर सोडणार नाही.”

Aug 20, 2025 10:26 (IST)

Pune News: खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाl, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला  

खडकवासला धरणातून 39 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग 

भिडे पुलासह नदीपात्रातील रस्ते दुथडी भरून वाहू लागले 

मुळा मुठा नदी काठावर पाणीच पाणी 

नदी काठ परिसरातल्या मंदिरांत देखील शिरले पाणी 

नदीपत्रातील वाहतूक कालपासून पूर्णपणे बंद 

नदीपात्रात अनेक ठिकाणी महानगरपालिका आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात 

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Aug 20, 2025 10:16 (IST)

Raigad Rain News LIVE Updates: रायगड जिल्ह्यातील महाड आणि माणगावमध्ये पुर परिस्थिती

रायगड जिल्ह्यातील महाड आणि माणगावमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी पुर परिस्थिती आहे.  येथुन वाहणाऱ्या सावित्री, काळ, गांधारी या प्रमुख नद्यांसह सर्वच उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत.  याचा परिणाम महाड आणि माणगाव शहरांच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे.  त्याच बरोबर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात असलेला पहायला मिळत आहे.  सवित्री, कंडलिका, आंबा, बाळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहे.  एकंदरीत रायगडमध्ये पाऊस आणि पुर या बाबत चिंता जनक परिस्थिती आहे.

Aug 20, 2025 10:14 (IST)

Pune Rain News LIVE Updates: पुण्यात एकतानगर परिसरात सोसायट्यांमध्ये पाणी; नागरिकांचा प्रशासनाला विरोध

पुण्यातील सततच्या पावसामुळे मुळामुठा नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून एकतानगर परिसरातील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. दरवर्षी अशीच समस्या उद्भवत असल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत.

प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन केले असले तरी, रहिवासी घर सोडण्यास तयार नाहीत. नागरिकांनी, “ही समस्या कायमस्वरूपी सोडवा, अन्यथा आम्ही बाहेर येणार नाही,” असा ठाम पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासन, फायर ब्रिगेड आणि बचाव पथक सोसायटीबाहेर प्रतीक्षेत उभे आहेत. मात्र नागरिकांच्या भूमिकेमुळे बचावकार्याला अडथळा निर्माण झाला असून परिस्थिती गंभीर झाली आहे.

Aug 20, 2025 10:12 (IST)

Nashik News: नाशिक जिल्ह्याचा उपयुक्त पाणीसाठा 92 टक्क्यांवर

- नाशिक जिल्ह्याचा उपयुक्त  पाणीसाठा 92 टक्क्यांवर

- जिल्ह्यातील 7 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

- 10 वाजता गंगापूर धरणांतून 2657 क्यूसेक पाणी गोदापत्रात सोडले 

- पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गातही केली जाणार वाढ

Aug 20, 2025 09:36 (IST)

Satara Rain News LIVE Updates: साताऱ्यातील धरणांंमध्ये पाणी पातळीत वाढ, 350 हून अधिक कुटुंब स्थलांतरीत

सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व धरणांमधील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे  कोयना, कृष्णा, वेण्णा, उरमोडी नद्यांना पूर आला आहे... सध्या पाटण सातारा महाबळेश्वर वाई येथील 350 हून अधिक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.... याविषयीचा आढावा घेतला आहे

सातारा जिल्ह्यातून धरणांमधून सुरू असलेला विसर्ग पुढील प्रमाणे 

1) Koyna Dam - 95300 Cusecs

2) Dhom Dam - 17340 Cusecs

3) DhomBalkwadi Dam -  7733 Cusecs

 4) Kanher Dam  - 14919Cusecs

5) Urmodi Dam -8936 Cusecs

6) Tarali Dam - 4235 Cusecs

7) Veer Dam -  55887 Cusecs

Aug 20, 2025 09:12 (IST)

Raigad Rain News LIVE Updates: रायगड जिह्यात आज पावसाचा रेड अलर्ट

रायगड जिल्ह्यात आज सलग सहाव्या दिवशी पावसाचा मुक्काम आहे. आज हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिलाय. जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून मध्यम ते किरकोळ स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. 

कुंडलिका, आंबा, पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. दरम्यान नवी मुंबई महापालिकेच्या मोर्बे  धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्यात. पावसाचा जोर कमी असला तरी दाट ढगाळ वातावरण आहे. आजही जिल्ह्यात सर्व शाळा कॉलेजे सना सुट्टी देण्यात आली आहे.

Aug 20, 2025 09:11 (IST)

Navi Mumbai Rain News LIVE Updates: नवी मुंबई मुसळधार पावसामुळे मोरबे धरण 100% भरले

नवी मुंबई मुसळधार पावसामुळे मोरबे धरण 100% भरले असून 

नवी मुंबईकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे 

आज (20 ऑगस्ट) पहाटे 3.10 वाजता धरणाचे दरवाजे 25 सें.मी.ने उघडण्यात आले.

 धावरी नदीत 1123 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

धरणाची पूर्ण क्षमता (८८ मी.) गाठल्याने नवी मुंबईच्या जलसमृद्धतेत वाढ झाली असून आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

Aug 20, 2025 09:10 (IST)

Mumbai Rain News LIVE Update: मुंबईच्या पावसाचा लोकलला फटका

सलग तिसऱ्या दिवशी सतत पडत असलेल्या पावसामुळे याचा फटका लोकल लाइन वर दिसून येत आहे...

पश्चिम रेल्वे त्याच बरोबर हर्बर ट्रेन देखील १५ ते २० मिनिट उशिरा ने धावत असल्याने लोकांची प्रचंड गर्दी ठाणे रेल्वे स्थानकावर दिसून येत..

ठाणे स्टेशन वरती तिकीट TT ने पण मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी करत आहे...

Aug 20, 2025 09:09 (IST)

Raigad Rain News LIVE Update: वरंध घाटात दरड कोसळली

रायगड ब्रेकिंग :

०  वरंध घाटात दरड कोसळली

०  सार्वजनिक बांधा काम विभागामार्फत दरड हटवण्याचे काम सुरु

०  रायगड आणि भोर म्हणजेच पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्यामुळे बंद

Aug 20, 2025 09:07 (IST)

Mumbai Rain LIVE Update: सलग तिसऱ्या दिवशी ठाण्यात पावसाचे 'ठाण ' कायम

सलग तिसऱ्या दिवशी ठाण्यात पावसाचे 'ठाण ' कायम

वंदना डेपो परिसर जलमय

महानगरपालिकेकडून सक्षम पंप च्या साह्याने पाणी निचरा करण्याचं काम सुरू... 

रेड अलर्ट असल्यामुळे  वंदना बस डेपो परिसरात प्रवाशांची संख्या कमी... 

आत्तापर्यंत १८०.३० मिलिमीटर होऊन अधिक पावसाची नोंद...

Aug 20, 2025 09:06 (IST)

Mumbai Rain News Local Train LIVE Update: पावसामुळे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा, तिन्ही मार्गावरील लोकलची स्थिती काय?

मुंबईमधील तुफान पावसाचा रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आजही तिनही मार्गांवरील लोकलचा खोळंबा झाला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे १५ मिनिटे उशिराने तर पश्चिम रेल्वे १० मिनिटे उशिरा धावत आहे.

Aug 20, 2025 08:59 (IST)

Mumbai Rain LIVE Update: राज्यात सहा लाख हेक्टर क्षेत्रावरचे नुकसान

राज्यात सहा लाख हेक्टर क्षेत्रावरचे नुकसान 

कृषी विभागाची आकडेवारी 

प्राथमिक नुकसान 

नुकसान आनखी वाढेल

Aug 20, 2025 08:58 (IST)

Mumbai Rain Updates: समुद्र खवळणार, पावसाचा रेड अलर्ट, मुंबईकरांसाठी पुढील चार तास महत्त्वाचे

मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसासह अधूनमधून ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.



Aug 20, 2025 08:31 (IST)

Mumbai Rain LIVE Update: मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई सगळ्या ट्रेन रद्द

पुणे 

मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई सगळ्या ट्रेन उद्यासाठी रद्द 

एकूण ७ ट्रेन रद्द तर ४ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले 

पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या उद्या रद्द 

पुणे मुंबई मध्ये सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे गाड्या करण्यात आल्या रद्द

Aug 20, 2025 08:20 (IST)

Maharastra Rain News LIVE Updates: कोयना धरण परिसरातील नवजा येथे 387 मिलिमीटर पावसाची नोंद

कोयना धरण परिसरातील नवजा येथे 387 मिलिमीटर पावसाची नोंद

गेल्या चोविस तासात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये तुफान पाऊस

कोयना धरण परिसरात गेल्या 24 तासात 270 मिलिमीटर पाऊस

महाबळेश्वर परिसरात 308 मिलिमीटर पाऊसाची नोंद

कोयना धरणात प्रतिसेकंदाला 1 लाख 21 हजार क्युसेक्स पाण्याची आवक

 105 टिएमसी पाणी साठ्याच्या  धरणात 102 टीएमसी पाणीसाठा

Aug 20, 2025 07:35 (IST)

Mumbai Rain: इंडिगो कडून नवीन अडवायसरी जाहीर

इंडिगो कडून नवीन अडवायसरी जाहीर केली आहे

मुंबईला आज देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे

अशात काही विमाने उशिराने धावण्याची शक्यता आहे

त्यामुळे नागरिकांना वेळेच नियोजन बाहेर पडण्याची मागणी केली आहे

Aug 20, 2025 07:33 (IST)

Maharashtra Rain: जोरदार पावसामुळे लोणावळ्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी

महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केला आहे. यामुळे लोणावळा शहर आणि आजूबाजूच्या परिसरातही मुसळधार पाऊस पडत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून, लोणावळा नगरपरिषदेने शहरातील सर्व माध्यमांच्या, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना बुधवारी, २० ऑगस्ट आणि गुरुवारी, २१ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

Aug 20, 2025 07:28 (IST)

Pune News: घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम 

सकाळी नऊ वाजल्यापासून खडकवासला धरणातून होणारा विसर्ग वाढवला जाणार 

35 हजार क्युसेक्स वरून 39 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जाणार 

नदीकाठच्या रहिवाशांना देण्यात आला आहे सतर्कतेचा इशारा

पहाटे पासून शहरातील पाऊसाने घेतली आहे काहीशी विश्रांती

Aug 20, 2025 07:21 (IST)

Ratnagiri Rain News: रत्नागिरी जिल्ह्या,साठी आज रेड अलर्ट, सकाळपासून पावसाची संततधार

रत्नागिरी

जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट

आजही सकाळपासून पावसाची संततधार

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी काल निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात

चिपळूण शहरात शिरलेलं पुराचं पाणी ओसरलं

राजापूरमध्ये देखील शहरात घुसलेलं पाणी ओसरलं

सध्या खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहतेय

तर राजापूर तालुक्यातील कोदवली आणि लांजा तालुक्यातील काजळी नदी इशारा पातळीवरून वाहतेय

आजही मुसळधार पावसाची शक्यता आणि निर्माण झालेली स्थिती यामुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

Aug 20, 2025 07:19 (IST)

Nashik Rain Update: - रात्रीपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू

- रात्रीपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू

- हवामान खात्याकडून नाशिकच्या घाटमाथा परिसरात आज देण्यात आला होता रेड अलर्ट

- गंगापूर धरणातून 9 वाजता 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जाणार

- नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा 

- जिल्ह्याचा धरणसाठा 85 टक्के असल्याने पावसाचा जोर वाढल्यास अनेक धरणांमधून टप्याटप्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर केला जाणार विसर्ग

- जिल्ह्यात 23 पैकी 11 धरणं तुडुंब तर ईतर धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

Aug 20, 2025 07:18 (IST)

Mumbai Rain: मुंबईला आज ऑरेंज अलर्ट

मुंबईला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे

ऑरेंज अलर्ट दिला असला तरी देखील मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे

पहाटे पासूनच या पावसाला सुरुवात झाली आहे

Aug 20, 2025 07:16 (IST)

Kolhapur Rain: पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, सध्या नदी पातळी 39.3 फुटावर

पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, सध्या नदी पातळी 39.3 फुटावर 

पावसाची संततधार कायम 

सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी विसर्ग मोठ्या प्रमाणात 

8 एसटीचे मार्गदर्शन तर जिल्ह्यातील चार राज्य मार्ग बंद, बंद असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गांवरून वाहतूक 

जिल्ह्यातील 68 खासगी मालमत्ताची पडझड

प्रशासनकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Aug 20, 2025 06:42 (IST)

Jalgaon Rain: हतनूर धरणाचे 30 दरवाजे उघडले

 जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे 30 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 1 लाख 55 हजार 51 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचे 24 दरवाजे पूर्णपणे तर 6 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने तापी नदी काठी प्रशासनाने अलर्ट घोषित केला आहे

Aug 20, 2025 06:41 (IST)

Mumbai Rain: वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील वाघोली गावाचा संपर्क तुटला

वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील वाघोली गावाचा संपर्क तुटला

तालुका प्रशासनाचा मोठा बेजबाबदार उघड,दोन दिवसांपूर्वी सुद्धा तुटला होता संपर्क पण अद्यापही ठोस उपाययोजना केली नाही

गावात गरोदर महिला, वृद्ध व लहान मुले।असल्याने रात्रीच्या वेळी होऊ शकते मोठी धावपळ, पण गावाचा संपर्क तुटल्याने झालीय पंचायत

Aug 20, 2025 06:41 (IST)

Pune Rain: उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला

* उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला...

* उजनीतून भीमा पात्रात 76 हजार 600 क्युसेकने विसर्ग सुरू...

* भीमा नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा...

* उजनी धरणाच्या 16 दरवाजातून विसर्ग सुरू...

* दौंड मधून उजनी मध्ये येत आहे 27456 क्युसेकने आवक...

Aug 20, 2025 06:40 (IST)

Mumbai Rain LIVE Update: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दि.20 ऑगस्ट 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे याची कृपया नोंद घ्यावी.

Aug 20, 2025 06:39 (IST)

Mumbai Rain LIVE: ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी/खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळा, जि.प. शाळा, न.पा. शाळा, अनुदानित/विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, महाविद्यालये, आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना , दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर...