Maharashtra Mumbai Rain LIVE Update: राजधानी मुंबईमध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. मंगळवारी झालेल्या तुफान पावसाने मुंबईची लाईफलाईनसह वाहतूक सेवाही ठप्प झाली होती. सर्वत्र पाणी साचल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. आज पहाटेपासून मात्र मुंबईत पावसाचा जोर ओसरल्याचे दिसत आहे. राज्य आपत्कालिन कार्य केंद्राने पुढील 12 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, चंद्रपूर हे जिल्हे आणि पुणे घाट, नाशिक घाट या परिसरासाठी रेड अलर्ट दिला आहे.
Mumbai Rain LIVE Update: मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई सगळ्या ट्रेन रद्द
पुणे
मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई सगळ्या ट्रेन उद्यासाठी रद्द
एकूण ७ ट्रेन रद्द तर ४ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले
पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या उद्या रद्द
पुणे मुंबई मध्ये सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे गाड्या करण्यात आल्या रद्द
Maharastra Rain News LIVE Updates: कोयना धरण परिसरातील नवजा येथे 387 मिलिमीटर पावसाची नोंद
कोयना धरण परिसरातील नवजा येथे 387 मिलिमीटर पावसाची नोंद
गेल्या चोविस तासात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये तुफान पाऊस
कोयना धरण परिसरात गेल्या 24 तासात 270 मिलिमीटर पाऊस
महाबळेश्वर परिसरात 308 मिलिमीटर पाऊसाची नोंद
कोयना धरणात प्रतिसेकंदाला 1 लाख 21 हजार क्युसेक्स पाण्याची आवक
105 टिएमसी पाणी साठ्याच्या धरणात 102 टीएमसी पाणीसाठा
Mumbai Rain: इंडिगो कडून नवीन अडवायसरी जाहीर
इंडिगो कडून नवीन अडवायसरी जाहीर केली आहे
मुंबईला आज देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे
अशात काही विमाने उशिराने धावण्याची शक्यता आहे
त्यामुळे नागरिकांना वेळेच नियोजन बाहेर पडण्याची मागणी केली आहे
Maharashtra Rain: जोरदार पावसामुळे लोणावळ्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी
महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने 'रेड अलर्ट' जारी केला आहे. यामुळे लोणावळा शहर आणि आजूबाजूच्या परिसरातही मुसळधार पाऊस पडत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून, लोणावळा नगरपरिषदेने शहरातील सर्व माध्यमांच्या, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना बुधवारी, २० ऑगस्ट आणि गुरुवारी, २१ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
Pune News: घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम
घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम
सकाळी नऊ वाजल्यापासून खडकवासला धरणातून होणारा विसर्ग वाढवला जाणार
35 हजार क्युसेक्स वरून 39 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जाणार
नदीकाठच्या रहिवाशांना देण्यात आला आहे सतर्कतेचा इशारा
पहाटे पासून शहरातील पाऊसाने घेतली आहे काहीशी विश्रांती
Ratnagiri Rain News: रत्नागिरी जिल्ह्या,साठी आज रेड अलर्ट, सकाळपासून पावसाची संततधार
रत्नागिरी
जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट
आजही सकाळपासून पावसाची संततधार
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी काल निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात
चिपळूण शहरात शिरलेलं पुराचं पाणी ओसरलं
राजापूरमध्ये देखील शहरात घुसलेलं पाणी ओसरलं
सध्या खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहतेय
तर राजापूर तालुक्यातील कोदवली आणि लांजा तालुक्यातील काजळी नदी इशारा पातळीवरून वाहतेय
आजही मुसळधार पावसाची शक्यता आणि निर्माण झालेली स्थिती यामुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
Nashik Rain Update: - रात्रीपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू
- रात्रीपासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू
- हवामान खात्याकडून नाशिकच्या घाटमाथा परिसरात आज देण्यात आला होता रेड अलर्ट
- गंगापूर धरणातून 9 वाजता 1500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जाणार
- नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा
- जिल्ह्याचा धरणसाठा 85 टक्के असल्याने पावसाचा जोर वाढल्यास अनेक धरणांमधून टप्याटप्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर केला जाणार विसर्ग
- जिल्ह्यात 23 पैकी 11 धरणं तुडुंब तर ईतर धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा
Mumbai Rain: मुंबईला आज ऑरेंज अलर्ट
मुंबईला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे
ऑरेंज अलर्ट दिला असला तरी देखील मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे
पहाटे पासूनच या पावसाला सुरुवात झाली आहे
Kolhapur Rain: पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, सध्या नदी पातळी 39.3 फुटावर
पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, सध्या नदी पातळी 39.3 फुटावर
पावसाची संततधार कायम
सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी विसर्ग मोठ्या प्रमाणात
8 एसटीचे मार्गदर्शन तर जिल्ह्यातील चार राज्य मार्ग बंद, बंद असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्गांवरून वाहतूक
जिल्ह्यातील 68 खासगी मालमत्ताची पडझड
प्रशासनकडून सतर्क राहण्याचे आवाहन
Jalgaon Rain: हतनूर धरणाचे 30 दरवाजे उघडले
जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे 30 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 1 लाख 55 हजार 51 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचे 24 दरवाजे पूर्णपणे तर 6 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने तापी नदी काठी प्रशासनाने अलर्ट घोषित केला आहे
Mumbai Rain: वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील वाघोली गावाचा संपर्क तुटला
वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील वाघोली गावाचा संपर्क तुटला
तालुका प्रशासनाचा मोठा बेजबाबदार उघड,दोन दिवसांपूर्वी सुद्धा तुटला होता संपर्क पण अद्यापही ठोस उपाययोजना केली नाही
गावात गरोदर महिला, वृद्ध व लहान मुले।असल्याने रात्रीच्या वेळी होऊ शकते मोठी धावपळ, पण गावाचा संपर्क तुटल्याने झालीय पंचायत
Pune Rain: उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला
* उजनी धरणातून भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला...
* उजनीतून भीमा पात्रात 76 हजार 600 क्युसेकने विसर्ग सुरू...
* भीमा नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा...
* उजनी धरणाच्या 16 दरवाजातून विसर्ग सुरू...
* दौंड मधून उजनी मध्ये येत आहे 27456 क्युसेकने आवक...
Mumbai Rain LIVE Update: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दि.20 ऑगस्ट 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे याची कृपया नोंद घ्यावी.
Mumbai Rain LIVE: ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी
ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी/खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळा, जि.प. शाळा, न.पा. शाळा, अनुदानित/विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, महाविद्यालये, आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना , दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर...