20 minutes ago

Maharashtra  Elections 2026 Live Updates: महाराष्ट्राच्या राजकारणात 29 महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा सुरु आहे. आज महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. सायंकाळी पाचनंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार असून दोन दिवसांनी मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज्यभरात सभा, रॅलींचा धडाका पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये दिग्गजांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून अखेरच्या दिवशी सर्वच नेते मोठे शक्तीप्रदर्शन करतील त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. 

Jan 13, 2026 13:31 (IST)

Nashik Election LIVE Update: नाशिकमध्ये मोठी कारवाई! 54 बंडखोरांची हकालपट्टी

- नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी

- हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांसह २० माजी नगरसेवकांचा समावेश

- भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी आणि पक्षाची शिस्त मोडल्याने कारवाई

- भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून कारवाई

Jan 13, 2026 13:24 (IST)

LIVE Update: आज जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार

महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने चार वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. चार वाजता जिल्हा परिषदेच्या आचारसंहिता जाहीर होणार आहे. 

Jan 13, 2026 13:15 (IST)

Nalasopara LIVE Update: नालासोपाऱ्यात 10 लाखांची रोकड जप्त, भाजपवर आरोप

नालासोपारा पूर्वेला असलेल्या पेल्हार येथे रात्री दोनच्या सुमारास एक संशय इसमाची गाडी लोकांनी पाठलाग करून त्याला पकडला आहे त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्याकडे भाजपाची पिशवी सापडली असून गाडीच्या डिकीत एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तब्बल दहा लाखाची रोकड जप्त केली आहे. 

तसेच यावेळी भाजपचे पत्रक आणि पट्टे देखील आढळले असून,भाजप कार्यकर्त्यांकडून ही रोकड मतदारांना वाटण्यासाठी नेले जात असल्याचा आरोप केला जात आहे.  या प्रकरणी दोन आरोपिंना ताब्यात घेतलं असून  पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

Jan 13, 2026 12:47 (IST)

Jalgaon Election LIVE Update: जळगावमध्ये पैसे वाटपावरुन राडा, अपक्षांची तक्रार

जळगाव मध्ये एका पक्षाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून सदरच्या व्हिडिओसह अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली आहे. पक्षाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप करून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले असून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. दरम्यान सदरचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Advertisement
Jan 13, 2026 12:43 (IST)

Sangli Election LIVE Updates: सांगली महापालिका निवडणूक: गोपीचंद पडळकर उतरले प्रचारात

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर देखील सांगली महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचा पाहायल मिळाले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शहरातल्या अनेक प्रभागात प्रचाराचा धडाका उठवून दिला.

कुपवाड व सांगली शहरातल्या विविध प्रभागात आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून प्रचार सभा आणि रॅली काढत प्रचाराचा धडाका उडवून दिला.शहरातल्या अनेक प्रभागात आमदार गोपीचंद पडळकर यांनी पद यात्रा बरोबरच मोटरसायकल रॅली देखील काढली. 

Jan 13, 2026 12:38 (IST)

LIVE Update: अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राडा

अंबरनाथ मध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात  पालिका बाहेर राडा

काल उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकी नंतर पालिका बाहेर भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

पालिके बाहेर झालेल्या राड्याचे व्हिडिओ आले समोर

 उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा केला होता पराभव

Advertisement
Jan 13, 2026 12:08 (IST)

Nagpur Election LIVE Updates: नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शक्तीप्रदर्शन

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा  रोड शो सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेटस्वारी करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 

Jan 13, 2026 11:57 (IST)

Dhule Election LIVE Updates: धुळ्यात मविआच्या 50 हून अधिक जागा निवडून येणार: शोभा बच्छाव

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून 15 तारखेला होणाऱ्या मतदान आणि 16 तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप ही स्वबळावर निवडणूक लढवत असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती झाल्याचे पाहायला मिळाले..

महायुतीतील तिघही पक्षांच्या विरोधात हा महाविकास आघाडी एकत्र येत्या निवडणूकीच्या मैदानात उतरली होती, 16 तारखेला जाहीर होणाऱ्या निकालात महाविकास आघाडीचे 50 हून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास खासदार डॉ शोभा बचाव यांनी व्यक्त केला आहे...

Advertisement
Jan 13, 2026 10:36 (IST)

Nashik Election LIVE Updates: सिडकोतील गिरीश महाजनांच्या सभेनंतर गोंधळ

- सिडकोतील गिरीश महाजनांच्या सभेनंतर गोंधळ 

- मंत्री गिरीश महाजनांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न

- महाजनांच्या सभेत शिंदेंच्या सेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांचे कार्यकर्ते ड्रग्स पेडलर्स असल्याचा व्हिडीओ दाखवण्यात आला

- व्हिडिओ दाखवण्यात आल्यानंतर संबंधित मुलांच्या पालकांनी गिरीश महाजनांना अडवून जाब विचारण्याचा केला प्रयत्न

- त्यामुळे काही काळ निर्माण झालं गोंधळाच वातावरण

Jan 13, 2026 10:33 (IST)

Maharashtra LIVE Update: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याची शक्यता

१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता: सूत्र 

आज संध्याकाळपर्यंत आतरंसहिता जाहीर होण्याची शक्यता:

Jan 13, 2026 10:28 (IST)

Vasai Virar Election LIVE Updates: भाजप–शिवसेना महायुतीच्या प्रचारासाठी आमदार मैथिली ठाकूर विरारमध्ये

वसई–विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना महायुतीने प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पार्श्वभूमीवर पार्श्वगायिका आणि बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर यांनी हजेरी लावली.   महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वसई–विरार शहरात अनेक ठिकाणी चौक सभा घेत मैथिली ठाकूर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.  

विकास, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांचे मुद्दे मांडले. “नैतिक, स्वच्छ आणि विकासाभिमुख उमेदवार निवडून देण्याचं” आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. यावेळी त्यांनी मराठी, हिंदी आणि भोजपुरी गाणी गाऊन उपस्थित नागरिकांना आपल्या आवाजाने मंत्रामुग्ध केले. 

Jan 13, 2026 09:41 (IST)

Nashik Election LIVE Update: धक्कादायक! प्रचार करु नको म्हणत उमेदवारावर बंदूक रोखली

- नाशिकच्या सातपूर परिसरात प्रभाग क्रमांक 11 मध्ये उमेदवारावर रोखली बंदूक

- आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहीरे यांच्यावर बंदूक ताणत प्रचाराला न फिरण्याची धमकी दिल्याचा आरोप 

- घटनेनंतर जमावाने बंदूक रोखणाऱ्या तरुणाला चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात

- बंदुक ताणणारा युवक जेल मधून निवडणूक लढणारा आर पी आय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेचा कार्यकर्ता असल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप

- या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोबाईल मध्ये केला कैद

Jan 13, 2026 09:34 (IST)

PMC Election LIVE Updates: पुण्यात काँग्रेसची मोठी कारवाई; माजी महापौरांसह 20 जणांचे निलंबन

काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी महापौरसह अनेकांनी अन्य पक्षातून उमेदवारी स्वीकारली काहींनी पक्षता केला तर काहींनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असून त्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार ही सुरू केला आहे याची गंभीर दखल घेऊन प्रदेश काँग्रेसने 20 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केल आहे.

उमेदवारी न दिल्याने काँग्रेसकडून पक्षविरोधी बंडखोरी करणाऱ्या 20 जणांचे निलंबन तर माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांना कारणे दाखवा नोटीस. माजी महापौर कमल व्यवहारे,दत्ता बहिरट,संगीता तिवारी, सचिन बराटे, विजय खळदकर,मुख्तार शेख, यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. 

Jan 13, 2026 09:33 (IST)

Nagpur Election LIVE Update: 15 जानेवारी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज

 15 जानेवारी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज..

 नागपूर पालिका क्षेत्रात एकूण 24 लाख 83 हजार 112 मतदार, त्यापैकी 12 लाख 26 हजार 690 पुरुष मतदार तर 12 लाख 56 हजार 166 महिला मतदार, इतर 256

 शहरातील एकूण 3 हजार 4 मतदान केंद्रांपैकी 321 केंद्रे संवेदनशील घोषित..

 संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा, पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ आणि कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार..

या निवडणुकीसाठी 16 हजार अधिकारी कर्मचारी आणि 5 हजार पोलिस तैनात असणार..

 मतदान पथक आणि साहित्य वेळेत पोहचविण्यासाठी 504 बसेसची व्यवस्था..

Jan 13, 2026 09:32 (IST)

PMC Election LIVE Update: पुण्यात मार्केट यार्ड गुरुवारी बंद

महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे त्यामुळे मार्केट यार्ड व उपबाजार बंद राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये तसेच ग्राहकांनी खरेदीसाठी मार्केट येतात येऊ नये असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समिती कडून करण्यात आले आहे.

Jan 13, 2026 09:31 (IST)

BMC Election LIVE Updates: महायुतीच्या शिवतीर्थावरील सभेवरुन संजय राऊत यांचे टीकास्त्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या शिवतीर्थावरील सभेवरुन संजय राऊत यांचे टीकास्त्र.. ट्वीट करत डिवचलं...

Jan 13, 2026 09:29 (IST)

BMC Election LIVE Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात पैसे वाटपाचे आरोप

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात पैसे वाटपाचे आरोप... 

ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्र 193 चे उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीने पैसे वाटल्याचे अपक्ष उमेदवाराचे आणि शिंदे सेनेचे आरोप... 

ठाकरेंच्या सेनेचे हरिश वरळीकर बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलवून पैसे वाटल्याचे आरोप केले असल्याचे विडिओ समोर

ठाकरेंच्या सेनेचे माजी शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांना उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढत आहेत

याच सूर्यकांत कोळी यांनी ठाकरेंच्या सेनेचे विडिओ समोर आणले आहेत

Jan 13, 2026 09:28 (IST)

Nagpur Election LIVE Updates: नागपुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो

 महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा  रोड शो  होणार आहे 

.. मुख्यमंत्री या रोड शोच्या दरम्यान बाईकवर स्वार होऊन मतदाराशी  संवाद साधणार आहे.. 

 मुख्यमंत्र्यांच्या बाईक रॅली.. रोड शो चा मार्ग राहणार असा 

-- भारत माता चौक 

-- तीन नल चौक 

-- शहीद चौक 

-- टांगा स्टँड चौक

-- गांधी पुतळा 

-- पंडित बच्छराज व्यास चौक 

-- महाल चौक 

-- छत्रपती शिवाजी महाराज चौक

Jan 13, 2026 09:27 (IST)

PMC Election LIVE Updates: पुण्यात दिग्गज नेत्यांच्या सभा!CM देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे पुण्यात

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा देखील शेवटचा दिवस

पुणे शहरात सर्व पक्षाकडून प्रचार शिगेला

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात

मुख्यमंत्री पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघात आज घेणार प्रचार सभा

तर अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात एकूण 3 रोड शो चे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात करणार मोठ शक्ती प्रदर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात उमेदवारांच्या प्रचार रॅलीला देणार भेट

सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत राज ठाकरे निवडणुकीच्या प्रचारात

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तिन्ही दिग्गज नेते पुण्यात