जाहिरात
1 month ago

Maharashtra  Elections 2026 Live Updates: महाराष्ट्राच्या राजकारणात 29 महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा सुरु आहे. आज महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. सायंकाळी पाचनंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार असून दोन दिवसांनी मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज्यभरात सभा, रॅलींचा धडाका पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये दिग्गजांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून अखेरच्या दिवशी सर्वच नेते मोठे शक्तीप्रदर्शन करतील त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. 

Election Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचाही प्रचाराचा धुरळा

महानगरपालिका निवडणूक प्रचारात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी १४ महानगरपालिका क्षेत्रात २६ सभा घेतल्या तसेच ३३ पदयात्रा केल्या.

Election Update: प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्यातील २९ महानगरपालिकांमधील निवडणुकांच्या प्रचारासाठी झंझावती दौरा केला. राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकांमध्ये प्रचार सभांचा धडाका लावला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्यातील सर्व महापालिका निवडणुकांमध्ये सुमारे ३५ प्रचार सभा घेतल्या ,तर सुमारे २५ ते ३० प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Election News: उल्हासनगरमध्ये 50 लाखांची कॅश पकडली, मोठा गोंधळ

उल्हासनगर ब्रेकिंग

उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरातील चौकात  पैशाने भरलेली बॅग पकडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला.  एका रिक्षात काही लोक पैसे भरलेली बॅग घेऊन जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  काही अपक्ष उमेदवारांनी पैसे एका पक्षाचे असल्याचे सांगत घातला गाेंधळ. या प्रकरणाचा तपास पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.  हे पैसे कशासाठी आणि कोणी आणले ? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Pune News: अजित पवारांच्या सल्लागाराची केवळ प्राथमीक चौकशी - पुणे पोलीस

डिझाईन बॉक्स कार्यालयावर छापा नव्हे, केवळ प्राथमिक चौकशी  असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी संबंधित डिझाईन बॉक्सच्या पुणे कार्यालयावर क्राईम ब्रांचने छापा टाकल्याच्या चर्चांना पुणे पोलिसांनी पूर्णविराम दिला आहे. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले की,

“आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही केवळ तपासणी केली. या ठिकाणी कोणतीही छापा टाकण्याची कारवाई किंवा जप्ती करण्यात आलेली नाही.” क्राईम ब्रांचचे पथक पुण्यातील डिझाईन बॉक्स कार्यालयात गेले असले तरी, ती नियमित चौकशी आणि कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी होती, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये पसरवण्यात येत असलेल्या “छापा” किंवा “मोठी कारवाई” अशा बातम्या अफवा ठरत असून, सध्या या प्रकरणात कोणतीही गुन्हेगारी कारवाई, एफआयआर किंवा जप्ती झालेली नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Pune News: अजित पवारांच्या सल्लागाराची क्राईम ब्रँचकडून चौकशी

अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अग्रवाल यांच्या कार्यालयावर क्राईम ब्रँचचे अधिकारी धडकले होते. त्यांनी पाच मिनिटे चौकशी करून ते तिथून परत गेल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात अजित पवारांसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची चौकशी झाली. 

BMC Election: प्रचार संपल्यानंतर आदित्य आणि अमित ठाकरे हुतात्मा चौकात

मुंबई महापालिकेचा प्रचार संपल्यानंतर युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे ह्यांनी आज हुतात्मा चौक येथे मुंबईसाठी प्राण अर्पण करणाऱ्या १०७ हुतात्म्यांना अभिवादन केले.

Maharashtra Election LIVE: महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला, आता घरोघरी प्रचारावर भर

Maharashtra Election LIVE: महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला आहे. प्रचाराचा आज 13 जानेवारी हा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचार संपला. आता उमेदवार घरोघरी प्रचारावर भर देतील. 15 तारखेला मतदान होणार आहे. तर सोळा तारखेला मतमोजणी होणार आहे.  

Election LIVE: थोड्याच वेळाच प्रचार थंडावणार

Maharashtra Election LIVE: महापालिका निवडणुकीचा प्रचार थोड्याच वेळात थंडावणार आहे. संध्याकाळी साडेपाचनंतर प्रचार थंडावेल. त्यानंतर उमेदवार घरोघरी प्रचार करण्यावर भर देतील. घरोघरी जावून प्रचार करण्याला परवानगी देण्यात आली आहे. 

ZP Election: 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान

१६ जानेवारी प्रसिद्धी 

नामनिर्देशन पत्र स्विकारणे १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६ 

नामनिर्शेन पत्राची छाननी २२ जानेवारी 

उमेदवारी माघारी २७ जानेवारी दुपारी तीन वाजे पर्यंत 

अंतिम उमेदवारीची यादी निवडणूक चिन्ह वाटप २७ जानेवारी दुपारी साडेतीन नंतर 

मतदानाचा दिनांक ५ फेब्रुवारी सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यत 

मतमोजणी दिनांक ७ फेब्रुवारी सकाळी दहा वाजल्या पासून 

ZP Election: दोन कोटी पेक्षा जास्त मतदार मतदान करणार

२. ०९ कोटी एकूण मतदार आहे.  पुरूष मतदार आहेत.  १.०२ कोटी स्त्री इतर मतदार ४७३ आहेत. 

७३१ सदस्य जिल्हा परिषदेसाठी निवडून द्यायचे आहेत. 

१४६२ पंचायत समिती सदस्य निवडून द्यायचे आहेत. 

ZP Election: निवडणुकीत खर्चाची मर्यादा आयोगाने केली जाहीर

जिल्हा परिषदेत ९ लाख पंचायत समिती ६ लाख खर्च करता येणार आहे. असे निवडणूक खर्चाची मर्याद आयोगाने जाहीर केली आहे.  

ZP Election: २५ हजार मतदान केंद्रावर मतदान होणार

एकूण जवळपास 25 हजार मतदान केंद्र असतील.  प्रचार मतदानाच्या चोवीस तास आधी थांबेल. अचारसंहीत लागू झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 

ZP Election: कोकण,मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात निवडणूक

ZP Election: पुणे सातारा, सांगली, संभाजीनगर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सोलापूर, धाराशीव, लातूर या  जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होणार आहे. 

ZP Election: ५० टक्के आरक्षण असलेल्या ठिकाणी निवडणूक होणार

५० टक्के आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व मतदान हे ईव्हीएमवर घेण्यात येणार आहे. १ जुलै ची मतदार यादी वापरली जाणार आहे. ३ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे. 

Election NEws: १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर

१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक होणार.  राज्य निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 

Maharashtra Election LIVE: जिल्हा परिषद पंचायत समितीन निवडणुकांची घोषणा

Maharashtra Election LIVE: जिल्हा परिषद पंचायत समितीन निवडणुकांची घोषणा १२ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहे. आरक्षणा शिवाय या जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे. 

BMC Election: वरळीत शिवसेनेचे दोन्ही गट आमने- सामने

अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या रॅली समोर शिवसैनिकांची घोषणाबाजी. 

मुंबईच्या नाम जोशी मार्ग परिसरामध्ये किशोरी पेडणेकर यांच्या प्रचारासाठी अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची रॅली जात होती

विरुद्ध दिशेने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार वंदना गवळी यांची रॅली येत होती. 

बावला मशीद परिसरात दोन्ही रॅली समोरासमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

Chandrapur News: गौतमी पाटील यांचा चंद्रपुरात काँग्रेससाठी रोड शो

काँग्रेसने आज प्रचारात सर्व शक्ती पणाला लावत आज प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनाही प्रचारात उतरवले. गौतमी पाटील यांचा आज बाबूपेठ ते गांधी चौक असा पाच किलोमीटरचा रोड शो त्यांनी केला. मतदारांना अभिवादन करीत त्यांनी काँग्रेससाठी मते मागितली. आज चंद्रपूर शहरातील सर्व दिशांनी रॅली काढून काँग्रेसने आज प्रचारात रंग भरला. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांनी आजपर्यंत स्वतंत्र सभा घेतल्या. मात्र आज हे दोघेही एकत्र सभा घेत असून, गौतमी पाटील यांना उतरवून प्रचारात ग्लॅमर ओतण्याचे कामही काँग्रेसने केले. चंद्रपुरात येऊन मला छान वाटले. लोकांचे भरभरून प्रेम मिळाले, अशा भावना गौतमी पाटील यांनी व्यक्त केल्या. 

Bhiwandi News: भिवंडी महापालिकेत अचारसंहिता भंगाचा गुन्हा

भिवंडीतील कामतघर येथील भाग्यनगरमध्ये भाजपा उमेदवार शाम अग्रवाल यांचा मुलगा कुशाग्र अग्रवाल हे दोन ते तीन कार्यकर्त्यासह प्रचार करीत होते. याच दरम्यान अपक्ष उमेदवार नितेश ऐनकर, मयुर चौधरी व त्यांचे ४०ते ५० अनोळखी कार्यकर्ते व भाजपाचे उमेदवार शाम अग्रवाल याचा  मुलगा कुशाग्र अग्रवाल, केशव अग्रवाल व त्यांचे ४० ते ५० अनोळखी कार्यकर्ते समोर आले. भिवंडी निजामपुर महानगरपालिकेची निवडणूक आचारसंहिता चालु आहे. असे  असताना देखील संबंधित पक्षाचे उमेदवारानी परवानगिशिवाय  रात्री उशिरा जमाव करून  एकमेकांना शिवीगाळी करत होते. यामुळे महापालिका क्षेत्रात शांतताभंग केली. तसेच दोन्ही पक्षाचे उमेदवार व कार्यकर्त्यांनी जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून जमाव निर्माण करत परिस्थीती तणावपुर्ण केली. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. यामुळे अपक्ष उमेदवार नितेश ऐनकर, मयुर चौधरी व त्यांचे ४० ते ५० अनोळखी कार्यकर्ते तसेच भाजपा पक्षाचे उमेदवार शाम अग्रवाल, कुशाग्र अग्रवाल,  केशव अग्रवाल व त्यांचे ४० ते ५० अनोळखी कार्यकर्ते यांच्यावर  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Dhule Nnws: महानगरपालिकेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंत्री आदिती तटकरेंचा धुळेकर नागरिकांशी संवाद

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंत्री आदिती तटकरे या आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आल्या होत्या, यावेळी त्यांनी शहरातील झुलेलाल मंदिरात भगवान झुलेला यांचे दर्शन घेत मतदारांशी संवाद साधला, यावेळी आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणीची भेट घेतली... यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, या शहराचा पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यानंतर शहराचा पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम सोडवला जाईल, तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याबाबत विरोधकांकडून सांगण्यात येत असले तरी ही योजना कधीही बंद होणार नसून तुमचा आनंद आम्ही हिरावून घेणार नसल्याचे सांगत ही योजना कायम राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले...

Navi Mumbai: भाजपच्या जाहीरनाम्याचा मनसेने केला निषेध

नवी मुंबई भाजपा जाहीरनाम्याचा निषेध .

जाहीरनाम्यात पालिका शाळेत केजी ते पीजी हिंदी सक्तीचा समावेश .

शिवसेना व मनसे शिवशक्तीने भाजपचा जाहीरनामा फाडत तीव्र शब्दात केला निषेध.

याप्रसंगी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे,शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील उपस्थित होते

Election News: ग्रेट खली उतरला प्रचाराच्या आखाड्यात

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही तास बाकी राहिले असताना प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजपा राष्ट्रवादी AP युतीच्या प्रचारार्थ दी ग्रेट खलीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. या रॅलीत भाजपचे माजी खासदार सुजय विखे आणि शहरातील महानगरपालिका उमेदवार सहभागी झाले. भीमकाय खलीला पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. विशेषतः तरुण खलीचे व्हिडिओ आणि लांबूनच सेल्फी घेताना पाहायला मिळाले विशाल गणपती मंदिरापासून मुख्य बाजारपेठ मार्गावरून ही रॅली दिल्ली गेट पर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. तरी रॅली संपल्यानंतर खलीने मोदींच्या नेतृत्वात भारत विश्वगुरू होत आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोदींचं वातावरण पाहायला मिळत असल्याचं म्हटलं आहे

Sangli News: जयंत पाटील,विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांच्या उपस्थिती निघाली काँग्रेस आघाडीची भव्य रॅली

सांगली महापालिका निवडणुकीतील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराची सांगता भव्य रॅलीने झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील काँग्रेस आमदार विश्वजीत कदम खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत सांगली शहरातल्या वेगवेगळ्या प्रभागातून आघाडीच्या उमेदवारांसह पदयात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये काँग्रेस आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शहरातल्या शंभर फुटी,एसटी स्टँड परिसरासह खणभाग या ठिकाणी काँग्रेस आघाडीकडून भव्य रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.

Pune Election News: मुख्यमंत्र्यांची पुण्यात जाहीर सभा

Pune Election News:  मुख्यमंत्र्यांची पुण्यात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पुण्याच्या विकासाची चिंता करू नका. ती जबाबदारी माझी आहे. ही महापालिका भाजपच्या ताब्यात द्या असे आवाहन त्यांनी पुण्यातील मतदारांना केले. काही लोक मनात येतील ती आश्वासने देत आहेत असं सांगत त्यांनी अजित पवारांवर यावेळी टीका केली. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असं ही ते यावेळी म्हणाले.  

Nashik Election LIVE Update: नाशिकमध्ये मोठी कारवाई! 54 बंडखोरांची हकालपट्टी

- नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी

- हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांसह २० माजी नगरसेवकांचा समावेश

- भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी आणि पक्षाची शिस्त मोडल्याने कारवाई

- भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून कारवाई

LIVE Update: आज जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार

महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने चार वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. चार वाजता जिल्हा परिषदेच्या आचारसंहिता जाहीर होणार आहे. 

Nalasopara LIVE Update: नालासोपाऱ्यात 10 लाखांची रोकड जप्त, भाजपवर आरोप

नालासोपारा पूर्वेला असलेल्या पेल्हार येथे रात्री दोनच्या सुमारास एक संशय इसमाची गाडी लोकांनी पाठलाग करून त्याला पकडला आहे त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्याकडे भाजपाची पिशवी सापडली असून गाडीच्या डिकीत एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तब्बल दहा लाखाची रोकड जप्त केली आहे. 

तसेच यावेळी भाजपचे पत्रक आणि पट्टे देखील आढळले असून,भाजप कार्यकर्त्यांकडून ही रोकड मतदारांना वाटण्यासाठी नेले जात असल्याचा आरोप केला जात आहे.  या प्रकरणी दोन आरोपिंना ताब्यात घेतलं असून  पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

Jalgaon Election LIVE Update: जळगावमध्ये पैसे वाटपावरुन राडा, अपक्षांची तक्रार

जळगाव मध्ये एका पक्षाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून सदरच्या व्हिडिओसह अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली आहे. पक्षाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप करून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले असून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. दरम्यान सदरचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Sangli Election LIVE Updates: सांगली महापालिका निवडणूक: गोपीचंद पडळकर उतरले प्रचारात

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर देखील सांगली महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचा पाहायल मिळाले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शहरातल्या अनेक प्रभागात प्रचाराचा धडाका उठवून दिला.

कुपवाड व सांगली शहरातल्या विविध प्रभागात आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून प्रचार सभा आणि रॅली काढत प्रचाराचा धडाका उडवून दिला.शहरातल्या अनेक प्रभागात आमदार गोपीचंद पडळकर यांनी पद यात्रा बरोबरच मोटरसायकल रॅली देखील काढली. 

LIVE Update: अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात राडा

अंबरनाथ मध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात  पालिका बाहेर राडा

काल उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकी नंतर पालिका बाहेर भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

पालिके बाहेर झालेल्या राड्याचे व्हिडिओ आले समोर

 उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा केला होता पराभव

Nagpur Election LIVE Updates: नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शक्तीप्रदर्शन

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा  रोड शो सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेटस्वारी करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 

Dhule Election LIVE Updates: धुळ्यात मविआच्या 50 हून अधिक जागा निवडून येणार: शोभा बच्छाव

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून 15 तारखेला होणाऱ्या मतदान आणि 16 तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप ही स्वबळावर निवडणूक लढवत असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती झाल्याचे पाहायला मिळाले..

महायुतीतील तिघही पक्षांच्या विरोधात हा महाविकास आघाडी एकत्र येत्या निवडणूकीच्या मैदानात उतरली होती, 16 तारखेला जाहीर होणाऱ्या निकालात महाविकास आघाडीचे 50 हून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास खासदार डॉ शोभा बचाव यांनी व्यक्त केला आहे...

Nashik Election LIVE Updates: सिडकोतील गिरीश महाजनांच्या सभेनंतर गोंधळ

- सिडकोतील गिरीश महाजनांच्या सभेनंतर गोंधळ 

- मंत्री गिरीश महाजनांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न

- महाजनांच्या सभेत शिंदेंच्या सेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांचे कार्यकर्ते ड्रग्स पेडलर्स असल्याचा व्हिडीओ दाखवण्यात आला

- व्हिडिओ दाखवण्यात आल्यानंतर संबंधित मुलांच्या पालकांनी गिरीश महाजनांना अडवून जाब विचारण्याचा केला प्रयत्न

- त्यामुळे काही काळ निर्माण झालं गोंधळाच वातावरण

Maharashtra LIVE Update: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याची शक्यता

१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता: सूत्र 

आज संध्याकाळपर्यंत आतरंसहिता जाहीर होण्याची शक्यता:

Vasai Virar Election LIVE Updates: भाजप–शिवसेना महायुतीच्या प्रचारासाठी आमदार मैथिली ठाकूर विरारमध्ये

वसई–विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना महायुतीने प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पार्श्वभूमीवर पार्श्वगायिका आणि बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर यांनी हजेरी लावली.   महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वसई–विरार शहरात अनेक ठिकाणी चौक सभा घेत मैथिली ठाकूर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.  

विकास, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांचे मुद्दे मांडले. “नैतिक, स्वच्छ आणि विकासाभिमुख उमेदवार निवडून देण्याचं” आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. यावेळी त्यांनी मराठी, हिंदी आणि भोजपुरी गाणी गाऊन उपस्थित नागरिकांना आपल्या आवाजाने मंत्रामुग्ध केले. 

Nashik Election LIVE Update: धक्कादायक! प्रचार करु नको म्हणत उमेदवारावर बंदूक रोखली

- नाशिकच्या सातपूर परिसरात प्रभाग क्रमांक 11 मध्ये उमेदवारावर रोखली बंदूक

- आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान आहीरे यांच्यावर बंदूक ताणत प्रचाराला न फिरण्याची धमकी दिल्याचा आरोप 

- घटनेनंतर जमावाने बंदूक रोखणाऱ्या तरुणाला चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात

- बंदुक ताणणारा युवक जेल मधून निवडणूक लढणारा आर पी आय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेचा कार्यकर्ता असल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप

- या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोबाईल मध्ये केला कैद

PMC Election LIVE Updates: पुण्यात काँग्रेसची मोठी कारवाई; माजी महापौरांसह 20 जणांचे निलंबन

काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी महापौरसह अनेकांनी अन्य पक्षातून उमेदवारी स्वीकारली काहींनी पक्षता केला तर काहींनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला असून त्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार ही सुरू केला आहे याची गंभीर दखल घेऊन प्रदेश काँग्रेसने 20 पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केल आहे.

उमेदवारी न दिल्याने काँग्रेसकडून पक्षविरोधी बंडखोरी करणाऱ्या 20 जणांचे निलंबन तर माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांना कारणे दाखवा नोटीस. माजी महापौर कमल व्यवहारे,दत्ता बहिरट,संगीता तिवारी, सचिन बराटे, विजय खळदकर,मुख्तार शेख, यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. 

Nagpur Election LIVE Update: 15 जानेवारी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज

 15 जानेवारी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज..

 नागपूर पालिका क्षेत्रात एकूण 24 लाख 83 हजार 112 मतदार, त्यापैकी 12 लाख 26 हजार 690 पुरुष मतदार तर 12 लाख 56 हजार 166 महिला मतदार, इतर 256

 शहरातील एकूण 3 हजार 4 मतदान केंद्रांपैकी 321 केंद्रे संवेदनशील घोषित..

 संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा, पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ आणि कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार..

या निवडणुकीसाठी 16 हजार अधिकारी कर्मचारी आणि 5 हजार पोलिस तैनात असणार..

 मतदान पथक आणि साहित्य वेळेत पोहचविण्यासाठी 504 बसेसची व्यवस्था..

PMC Election LIVE Update: पुण्यात मार्केट यार्ड गुरुवारी बंद

महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे त्यामुळे मार्केट यार्ड व उपबाजार बंद राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये तसेच ग्राहकांनी खरेदीसाठी मार्केट येतात येऊ नये असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समिती कडून करण्यात आले आहे.

BMC Election LIVE Updates: महायुतीच्या शिवतीर्थावरील सभेवरुन संजय राऊत यांचे टीकास्त्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या शिवतीर्थावरील सभेवरुन संजय राऊत यांचे टीकास्त्र.. ट्वीट करत डिवचलं...

BMC Election LIVE Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात पैसे वाटपाचे आरोप

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात पैसे वाटपाचे आरोप... 

ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्र 193 चे उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीने पैसे वाटल्याचे अपक्ष उमेदवाराचे आणि शिंदे सेनेचे आरोप... 

ठाकरेंच्या सेनेचे हरिश वरळीकर बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलवून पैसे वाटल्याचे आरोप केले असल्याचे विडिओ समोर

ठाकरेंच्या सेनेचे माजी शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांना उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढत आहेत

याच सूर्यकांत कोळी यांनी ठाकरेंच्या सेनेचे विडिओ समोर आणले आहेत

Nagpur Election LIVE Updates: नागपुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो

 महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा  रोड शो  होणार आहे 

.. मुख्यमंत्री या रोड शोच्या दरम्यान बाईकवर स्वार होऊन मतदाराशी  संवाद साधणार आहे.. 

 मुख्यमंत्र्यांच्या बाईक रॅली.. रोड शो चा मार्ग राहणार असा 

-- भारत माता चौक 

-- तीन नल चौक 

-- शहीद चौक 

-- टांगा स्टँड चौक

-- गांधी पुतळा 

-- पंडित बच्छराज व्यास चौक 

-- महाल चौक 

-- छत्रपती शिवाजी महाराज चौक

PMC Election LIVE Updates: पुण्यात दिग्गज नेत्यांच्या सभा!CM देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे पुण्यात

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा देखील शेवटचा दिवस

पुणे शहरात सर्व पक्षाकडून प्रचार शिगेला

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात

मुख्यमंत्री पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघात आज घेणार प्रचार सभा

तर अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात एकूण 3 रोड शो चे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात करणार मोठ शक्ती प्रदर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात उमेदवारांच्या प्रचार रॅलीला देणार भेट

सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत राज ठाकरे निवडणुकीच्या प्रचारात

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तिन्ही दिग्गज नेते पुण्यात

Listen to the latest songs, only on JioSaavn.com