2 months ago

Maharashtra Municiple Corporation Election Result LIVE Updates:  महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी अखेर थांबली. शुक्रवारी राज्यातील महानगरपालिकांचा महानिकाल लागला ज्यामध्ये महायुतीने राज्यात सर्वाधिक शहरांमध्ये सत्ता आणत विरोधकांना धक्का दिला. मुंबईसह पुण्यासह राज्यातील जवळपास 25 शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाने सत्तेची खुर्ची मिळवली. महानगरपालिकांच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे निकालानंतरही राज्यभरात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. 

Jan 17, 2026 17:36 (IST)

"अमरावती महापालिकेत महायुतीच्या सत्तेत NCP अजित पवार गट सहभागी होणार नाही"

"अमरावती महानगरपालिकेत महायुती सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सहभागी होणार नाही .भाजपसोबत रवी राणा किंवा त्यांचा पक्ष असेल तर, आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही. ही भूमिका आधीपासूनच आमची आहे", असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार संजय खोडके यांनी केलं आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यासोबत जाण्यास आमदार संजय खोडके यांनी नकार दर्शवला आहे.

Jan 17, 2026 16:57 (IST)

Maharashtra Election 2026 : "मताला पंधरा-पंधरा हजार रुपये देऊनही नगरसेवक निवडून आले नाहीत"

परभणी महानगरपालिकेत पालकमंत्री स्वतःच्या प्रभागाचे नगरसेवक निवडून आणू शकल्या नाही. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी परभणीत ठाकरे गटाचे  खासदार संजय जाधव यांनी केली आहे. परभणी महानगरपालिकेत महाविकास आघाडीचे निवडून आलेल्या नगरसेवकांच्या सत्कार कार्यक्रमात शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे खासदार जाधव बोलत होते. पुढे बोलताना खासदार जाधव यांनी पालकमंत्री यांनी विरोधकांच्या मागे पोलीस लावली, पंधरा- पंधरा हजार रुपये मतासाठी वाटले तरी मात्र भाजप परभणी महापालिका जिंकू शकली नाही, भाजप आता केवळ पैसे वाटा आणि मत घ्या अशी ओळख झाल्याची टीका खासदार जाधव यांनी केली आहे.

Jan 17, 2026 16:54 (IST)

Maharashtra Election 2026 : पिंपरी चिंचवडच्या निकालानंतर राजकीय वैमनस्यातून कार पेटवली

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर थेरगाव परिसरात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने कार पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून,राजकीय वादातून हे कृत्य केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,थेरगाव प्रभाग २३ मधील शिवसेना शिंदे गटाचे पराभूत उमेदवाराचे चुलत भाऊ आकाश बारणे यांची कार मध्यरात्री पेटवून देण्यात आली. एक व्यक्ती बाटलीतील ज्वलनशील पदार्थ गाडीवर ओतून काडेपेटीने आग लावली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Jan 17, 2026 16:42 (IST)

Maharashtra Election 2026 Latest Update : महापौर बनल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच व्हिजन सुरु होणार - CM

"ज्या प्रकारचा विजय पुणे आणि पिंपरी-चिंचवडने दिलेला आहे, त्या विजयाचा आनंद तर आहेच. पण त्याही पेक्षा आता जबाबदारीचं भान होत आहे. इतका मोठा विजय हा जनतेनं दाखवलेला विश्वास आहे. विकासावर, मोदीजींच्या विजयावर, भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर हा विश्वास आहे. म्हणून या विश्वासाला पात्र होण्यासाठी मेहनत करावी लागेल.महापौर बनल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून जो काही व्हिजन आम्ही मांडलेला आहे, तो व्हिजन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे. पुणे आणि पिंपरची चिंडवडची आमची नेतेमंडळी आहे, त्यांचं मी अभिनंदन करेन.अतिशय मेहनत करून त्यांनी निवडणुकीला महत्त्व दिलं", अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

Advertisement
Jan 17, 2026 12:01 (IST)

Kolhapur Election Result LIVE Updates: कोल्हापुरात काँग्रेसने कडवी झुंज दिली: सतेज पाटील

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने कडवी झुंज सगळ्यात चर्चेचा विषय ठरली. काँग्रेसने 34 जागा मिळवत महापालिकेत एक नंबरचा पक्ष ठरला आहे. काँग्रेसच्या अनेक स्ट्रॅटेजी ह्या महायुतीसाठी खडतर प्रवास ठरल्या. फक्त सहा जागानी काँग्रेसची कोल्हापूर महापालिकेवरील सत्ता हुकली. मात्र असं असलं तरी राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीला काँग्रेसने तगडं आव्हान दिलेलं हे या निकालातून स्पष्ट झालं. यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आम्ही चांगली लढत कोल्हापुरात दिली आहे, अशी प्रतिक्रिया दिली. 

Jan 17, 2026 11:59 (IST)

Maharashtra Election Result LIVE Update: जनतेने आम्हाला कामाची पोचपावती दिली, भरत गोगावले

महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिलीय. जनतेने आम्हाला स्वीकारत आमच्या कामाची पोचपावती दिल्याचं गोगावले यांनी म्हटलं आहे. एम एम आर क्षेत्रातील यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं असून मुंबईचा महापौर महायुतीचा व्हावा ही संकल्पना पूर्ण होताना दिसत असल्याचं गोगावले म्हणाले.

Advertisement
Jan 17, 2026 11:58 (IST)

Sangli Election Result LIVE Updates: सत्ता आणि पैशाचा प्रचंड वापर, तरी काँग्रेस आघाडीला यश: आमदार विश्वजीत कदम

 सांगली महापालिकेमध्ये भाजपा पाठोपाठ काँग्रेसने देखील चांगले यश मिळवले आहे.काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 33 जागांवर निवडणूक लढवल्या होत्या, त्यामध्ये 18 जागांवर काँग्रेसला यश मिळाला आहे,भाजपाला 39 जागा मिळाल्या असून भाजपा पाठोपाठ काँग्रेस हा महापालिकेतील दोन नंबरचा पक्ष ठरला आहे.तर भाजपाकडून सत्ता आणि पैशाचा प्रचंड वापर त्या निवडणुकीत करण्यात आला, मात्र तरीही काँग्रेस आघाडीने निवडणूक ताकतीने लढत,भाजपाची लाट थोपवल्याचे आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.

Jan 17, 2026 11:56 (IST)

Nashik Election Result LIVE Updates: नाशिक महापालिकेवर सत्ता मिळाल्याने पालकमंत्री पदावर भाजपचा दावा बळकट

नाशिक महापालिकेवर 2017 पेक्षाही अधिक जागांवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे दरम्यान यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावर भाजपचा दावा अधिक बळकट मानला जात असून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये शुक्रवारी महापालिकेतील विजयानंतर पत्रकार परिषदेत केलेलं एक वक्तव्यही चर्चेत ठरते आहे.

'पालकमंत्री मिळाले तर अधिक चांगलं होईल, सगळ्या पक्षात एकमत होऊन पालकमंत्री केल्यास कुंभमेळ्याचे काम करायला अधिक बळकटी मिळेल' असं त्यांनी बोलून दाखवत पालकमंत्री नसतानाही मी 72 जागा निवडून आणल्याचेही स्पष्ट केले. 

Advertisement
Jan 17, 2026 11:03 (IST)

Chhatrapati Sambhajinagar Election Result: संभाजीनगरमध्ये भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरावर हल्ला

भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरावर लाठ्या काठ्यांसह तुफान दगडफे

शहरातील गांधी नगरमध्ये मध्यरात्री झाली दगडफेक 

भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावर झाली दगडफेक

तुमच्यामुळे निवडणूक हरलो म्हणत शिंदे सेनेच्या उमेदवार मिल्लू चावरिया याच्या टोळक्याने दगडफेक केल्याचा आरोप

टोळक्याकडून झालेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

दगडफेक प्रकरणी १४ जणांविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Jan 17, 2026 10:26 (IST)

Chhatrapati Sambhajinagar Result Update: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार?

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे,

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार?

भाजप सूत्रांची माहिती?

सत्ता स्थापनेसाठी 58 जागा लागतात,भाजपला 57 जागांवर विजय मिळाला आहे

संभाजीनगरमध्ये भाजपकडून एक हाती सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू

शिवसेनेच्या बाल किल्ल्यात पहिल्यांदाच भाजपची जोरदार मुसंडी

Jan 17, 2026 08:47 (IST)

Baramati LIVE Updates: अजित पवार आज कॅबिनेट बैठकीला नसणार

अजित पवार आज कॅबिनेट बैठकीला नसणार 

बारामतीत कृषी प्रदर्शन उद्घाटन यासाठी शरद पवार सुप्रिया सुळे यांसह अजित पवार एकत्र उपस्थितीत राहणार 

सकाळी १० वाजाता कार्यक्रम बारामतीत 

महापालिका निवडणूक नंतर प्रथमच शरद पवार अजित पवार एकत्र स्टेजवर

Jan 17, 2026 08:46 (IST)

Pune Election LIVE Updates: बारामतीमध्ये मोठी घडामोड; अजित पवार शरद पवारांच्या भेटीला

महानगरपालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर बारामतीत मोठी घडामोड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीला, बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानी अजित पवार घेणार शरद पवारांची भेट: 

Jan 17, 2026 08:38 (IST)

Jalna Election Result LIVE Updates: जालन्यात संचारबंदी लागू

धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गामधून आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी दिपक बो-हाडे,यांच्या नेतृत्वात आझाद मैदान मुंबई उपोषण आंदोलनाची हाक देण्यात आली आहे .त्यांच्या या आंदोलनाला  पोलीस ठाणे आझाद मैदान यांनी परवानगी नाकारली असताना बो-हाडे हे आज मुबाईच्या दिशेने निघणार असल्याने त्याच बरोबर ज्या जिल्ह्यातून जाणार आहेत.

 त्या जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुक 2026 नुसार आदर्श आचारसंहिता सुरु असल्याने त्या ठिकाणच्या पोलिसांनी ही बो-हाडे यांना परवानगी नाकारली असल्याने जालना शहर व अंबड शहराकरीता 05.00 वाजेपासून ते 24.00 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आलीय.संचारबंदी आदेश शाळा/महाविद्यालये, दुकाने, आस्थापना यांना ही लागू असणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. 

Jan 17, 2026 08:27 (IST)

Jalgaon Election Result LIVE Updates: जळगाव महापालिका निवडणुकीत 75 पैकी 43 नव्या उमेदवारांचा विजय

 जळगाव महापालिका निवडणुकीत मतदारांनी बदलाला स्पष्ट कौल दिला आहे. एकूण 75 जागांपैकी तब्बल 43 जागांवर नव्या उमेदवारांनी विजय मिळवला असून त्यामुळे महापालिका सभागृहात पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या मोठी असणार आहे. परंपरागत आणि अनुभवी नगरसेवकांना धक्का देत मतदारांनी नव्या चेहऱ्यांवर विश्वास टाकल्याचे या निकालातून स्पष्ट झाले असून बदलाची अपेक्षा, कामगिरीवर आधारित मतदान आणि स्थानिक प्रश्नांवरून व्यक्त झालेला रोष या कारणांमुळे नव्या उमेदवारांना फायदा झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नव्या नगरसेवकांसमोर पाणी, रस्ते, स्वच्छता, गाळेधारकांचा प्रश्न यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांवर ठोस कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.

Jan 17, 2026 08:22 (IST)

Nashik Election Result LIVE Updates: शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ

- नाशिकच्या प्रभाग 13 मध्ये वाद

* शिंदे शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत करण्यात आली शिवीगाळ

* नाशिकच्या सोमवार पेठ परिसरातील घटना

* पराभूत उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर अज्ञात तरुणांनी फोडले फटाके 

* दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची आणि शिवीगाळ

* परिसरातील रहिवाशांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला..

* गणेश मोरे यांच्याकडून भद्रकाली पोलिसात तक्रार दाखल

Jan 17, 2026 08:10 (IST)

Pimpri Chinchwad Election Result LIVE Updates: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल

पिंपरी चिंचवड महापालिका पक्षीय बलाबल

एकूण जागा- 128 

भाजप- 84  

राष्ट्रवादी- 37

शिवसेना शिंदे- 06

अपक्ष- 01

Jan 17, 2026 08:05 (IST)

Amravati Election Result LIVE Update: अमरावती महापालिका अंतिम निकाल

अमरावती महापालिका

एकूण जागा - 87 पैकी 87 कल हाती

भाजप - 25

शिवसेना - 03

राष्ट्रवादी - 16

काँग्रेस - 14

शिवसेना (उद्धव ठाकरे) - 01

राष्ट्रवादी (शरद पवार) - 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना -   

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा युवा स्वाभिमान) - 28

(बसपा - 3)

(MIM - 15)

(युवा स्वाभिमान (रवी राणा) - 10)

Jan 17, 2026 07:59 (IST)

Chhatrapati Sambhajinagar Election Result: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक अंतिम आकडेवारी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीचा अंतिम आकडेवारी

भाजप 57

एमआयएम 33

शिंदेसेना 13

उद्धसेना 06

वंचित 04

राष्ट्रवादी (अ.प) 01 

राष्ट्रवादी (श. प) 01

Jan 17, 2026 07:59 (IST)

Chhatrapati Sambhajinagar Election Result: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक अंतिम आकडेवारी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीचा अंतिम आकडेवारी

भाजप 57

एमआयएम 33

शिंदेसेना 13

उद्धसेना 06

वंचित 04

राष्ट्रवादी (अ.प) 01 

राष्ट्रवादी (श. प) 01

Jan 17, 2026 07:57 (IST)

Nashik Election Result LIVE Updates: नाशिक महानगरपालिका अंतिम निकाल

नाशिक महानगरपालिका -

एकुण  जागा- १२२/१२२ जागांचा निकाल पुढील प्रमाणे

भाजप - ७२

शिंदेंची शिवसेना - २६

ठाकरेंची शिवसेना - १५

राष्ट्रवादी अजित पवार - ०४

काँग्रेस - ०३

मनसे - ०१

अपक्ष - ०१

Jan 17, 2026 07:56 (IST)

Jalgaon Election Result LIVE Update: जळगाव महानगरपालिका अंतिम निकाल

जळगाव महानगरपालिका

एकुण  जागा- 75

भाजप- 46

शिवसेना - 22

राष्ट्रवादी अ.प. -1

ठाकरे सेना -05

काँग्रेस-00

मनसे-00

शरद पवार गट-00

एमआयएम - 00

इतर- 1

Jan 17, 2026 07:55 (IST)

Akola Election Result LIVE Updates: अकोला महानगरपालिका- अंतिम आकडेवारी

अकोला महानगरपालिका- अंतिम आकडेवारी..

एकुण जागा- 80

विजयी

भाजप -  38

शिवसेना शिंदे- 01

राष्ट्रवादी अजित पवार - 01

ठाकरे- 06

काँग्रेस- 21

मनसे-00

शरद पवार गट- 03

वंचित बहुजन आघाडी - 05

MIM 3

अपक्ष 1

शहर विकास आघाडी 01

Jan 17, 2026 07:52 (IST)

Jalgaon Election Result LIVE Updates: जळगाव महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने उघडले खाते

जळगाव महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने 5 पैकी 1 जागेवर विजय मिळवत खाते उघडले असून माजी मंत्री गुलाबराव देवकरांचा मुलगा प्रफुल्ल देवकर हे विजयी झाले आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने जळगाव महापालिकेत खाते उघडले असले महायुतीत राष्ट्रवादीला बाजूला सारल्याने चार जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पराभव झाल्याची नाराजी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केली आहे. तर अपेक्षित जागा न मिळाल्याने पक्षाची ताकद असतानाही महायुतीत पक्षाला वेगळं राहावं लागलं अशी खंतही जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे. 

Jan 17, 2026 07:50 (IST)

Wardha Election Result LIVE Updates: वर्ध्यात भाजपचा विजयी जल्लोष

वर्ध्यात भाजपा पक्षाने केला जोरदार जल्लोष 

महानगर पालिकेच्या निवडणुकीत मोठं यश मिळाल्याने केला जल्लोष

भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते,सुनील गफाट पृथ्वीराज शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

भाजप कार्यालयात एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा

यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठा संख्येनी सामील झाले होते.

Jan 17, 2026 07:46 (IST)

Jalgaon Election Result LIVE Update: जळगावमध्ये अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 अ मधील अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी आर आर विद्यालयाच्या मतदान केंद्रावर बोगस मतदार समजून एका मतदाराला मारहाण केली होती. याप्रकरणी पियुष पाटील व त्यांच्या समर्थक रवी शिंदे या दोन जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.