Maharashtra Municiple Corporation Election Result LIVE Updates: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी अखेर थांबली. शुक्रवारी राज्यातील महानगरपालिकांचा महानिकाल लागला ज्यामध्ये महायुतीने राज्यात सर्वाधिक शहरांमध्ये सत्ता आणत विरोधकांना धक्का दिला. मुंबईसह पुण्यासह राज्यातील जवळपास 25 शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाने सत्तेची खुर्ची मिळवली. महानगरपालिकांच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे निकालानंतरही राज्यभरात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत.
Baramati LIVE Updates: अजित पवार आज कॅबिनेट बैठकीला नसणार
अजित पवार आज कॅबिनेट बैठकीला नसणार
बारामतीत कृषी प्रदर्शन उद्घाटन यासाठी शरद पवार सुप्रिया सुळे यांसह अजित पवार एकत्र उपस्थितीत राहणार
सकाळी १० वाजाता कार्यक्रम बारामतीत
महापालिका निवडणूक नंतर प्रथमच शरद पवार अजित पवार एकत्र स्टेजवर
Pune Election LIVE Updates: बारामतीमध्ये मोठी घडामोड; अजित पवार शरद पवारांच्या भेटीला
महानगरपालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर बारामतीत मोठी घडामोड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीला, बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानी अजित पवार घेणार शरद पवारांची भेट:
Jalna Election Result LIVE Updates: जालन्यात संचारबंदी लागू
धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गामधून आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी दिपक बो-हाडे,यांच्या नेतृत्वात आझाद मैदान मुंबई उपोषण आंदोलनाची हाक देण्यात आली आहे .त्यांच्या या आंदोलनाला पोलीस ठाणे आझाद मैदान यांनी परवानगी नाकारली असताना बो-हाडे हे आज मुबाईच्या दिशेने निघणार असल्याने त्याच बरोबर ज्या जिल्ह्यातून जाणार आहेत.
त्या जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुक 2026 नुसार आदर्श आचारसंहिता सुरु असल्याने त्या ठिकाणच्या पोलिसांनी ही बो-हाडे यांना परवानगी नाकारली असल्याने जालना शहर व अंबड शहराकरीता 05.00 वाजेपासून ते 24.00 वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आलीय.संचारबंदी आदेश शाळा/महाविद्यालये, दुकाने, आस्थापना यांना ही लागू असणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
Jalgaon Election Result LIVE Updates: जळगाव महापालिका निवडणुकीत 75 पैकी 43 नव्या उमेदवारांचा विजय
जळगाव महापालिका निवडणुकीत मतदारांनी बदलाला स्पष्ट कौल दिला आहे. एकूण 75 जागांपैकी तब्बल 43 जागांवर नव्या उमेदवारांनी विजय मिळवला असून त्यामुळे महापालिका सभागृहात पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या मोठी असणार आहे. परंपरागत आणि अनुभवी नगरसेवकांना धक्का देत मतदारांनी नव्या चेहऱ्यांवर विश्वास टाकल्याचे या निकालातून स्पष्ट झाले असून बदलाची अपेक्षा, कामगिरीवर आधारित मतदान आणि स्थानिक प्रश्नांवरून व्यक्त झालेला रोष या कारणांमुळे नव्या उमेदवारांना फायदा झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नव्या नगरसेवकांसमोर पाणी, रस्ते, स्वच्छता, गाळेधारकांचा प्रश्न यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांवर ठोस कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.
Nashik Election Result LIVE Updates: शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ
- नाशिकच्या प्रभाग 13 मध्ये वाद
* शिंदे शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत करण्यात आली शिवीगाळ
* नाशिकच्या सोमवार पेठ परिसरातील घटना
* पराभूत उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर अज्ञात तरुणांनी फोडले फटाके
* दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची आणि शिवीगाळ
* परिसरातील रहिवाशांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला..
* गणेश मोरे यांच्याकडून भद्रकाली पोलिसात तक्रार दाखल
Pimpri Chinchwad Election Result LIVE Updates: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल
पिंपरी चिंचवड महापालिका पक्षीय बलाबल
एकूण जागा- 128
भाजप- 84
राष्ट्रवादी- 37
शिवसेना शिंदे- 06
अपक्ष- 01
Amravati Election Result LIVE Update: अमरावती महापालिका अंतिम निकाल
अमरावती महापालिका
एकूण जागा - 87 पैकी 87 कल हाती
भाजप - 25
शिवसेना - 03
राष्ट्रवादी - 16
काँग्रेस - 14
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 01
राष्ट्रवादी (शरद पवार) -
महाराष्ट्र नवनिर्माण सेना -
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा युवा स्वाभिमान) - 28
(बसपा - 3)
(MIM - 15)
(युवा स्वाभिमान (रवी राणा) - 10)
Chhatrapati Sambhajinagar Election Result: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक अंतिम आकडेवारी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीचा अंतिम आकडेवारी
भाजप 57
एमआयएम 33
शिंदेसेना 13
उद्धसेना 06
वंचित 04
राष्ट्रवादी (अ.प) 01
राष्ट्रवादी (श. प) 01
Chhatrapati Sambhajinagar Election Result: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक अंतिम आकडेवारी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीचा अंतिम आकडेवारी
भाजप 57
एमआयएम 33
शिंदेसेना 13
उद्धसेना 06
वंचित 04
राष्ट्रवादी (अ.प) 01
राष्ट्रवादी (श. प) 01
Nashik Election Result LIVE Updates: नाशिक महानगरपालिका अंतिम निकाल
नाशिक महानगरपालिका -
एकुण जागा- १२२/१२२ जागांचा निकाल पुढील प्रमाणे
भाजप - ७२
शिंदेंची शिवसेना - २६
ठाकरेंची शिवसेना - १५
राष्ट्रवादी अजित पवार - ०४
काँग्रेस - ०३
मनसे - ०१
अपक्ष - ०१
Jalgaon Election Result LIVE Update: जळगाव महानगरपालिका अंतिम निकाल
जळगाव महानगरपालिका
एकुण जागा- 75
भाजप- 46
शिवसेना - 22
राष्ट्रवादी अ.प. -1
ठाकरे सेना -05
काँग्रेस-00
मनसे-00
शरद पवार गट-00
एमआयएम - 00
इतर- 1
Akola Election Result LIVE Updates: अकोला महानगरपालिका- अंतिम आकडेवारी
अकोला महानगरपालिका- अंतिम आकडेवारी..
एकुण जागा- 80
विजयी
भाजप - 38
शिवसेना शिंदे- 01
राष्ट्रवादी अजित पवार - 01
ठाकरे- 06
काँग्रेस- 21
मनसे-00
शरद पवार गट- 03
वंचित बहुजन आघाडी - 05
MIM 3
अपक्ष 1
शहर विकास आघाडी 01
Jalgaon Election Result LIVE Updates: जळगाव महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने उघडले खाते
जळगाव महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटाने 5 पैकी 1 जागेवर विजय मिळवत खाते उघडले असून माजी मंत्री गुलाबराव देवकरांचा मुलगा प्रफुल्ल देवकर हे विजयी झाले आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाने जळगाव महापालिकेत खाते उघडले असले महायुतीत राष्ट्रवादीला बाजूला सारल्याने चार जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पराभव झाल्याची नाराजी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केली आहे. तर अपेक्षित जागा न मिळाल्याने पक्षाची ताकद असतानाही महायुतीत पक्षाला वेगळं राहावं लागलं अशी खंतही जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे.
Wardha Election Result LIVE Updates: वर्ध्यात भाजपचा विजयी जल्लोष
वर्ध्यात भाजपा पक्षाने केला जोरदार जल्लोष
महानगर पालिकेच्या निवडणुकीत मोठं यश मिळाल्याने केला जल्लोष
भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते,सुनील गफाट पृथ्वीराज शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
भाजप कार्यालयात एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा
यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठा संख्येनी सामील झाले होते.
Jalgaon Election Result LIVE Update: जळगावमध्ये अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 अ मधील अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी आर आर विद्यालयाच्या मतदान केंद्रावर बोगस मतदार समजून एका मतदाराला मारहाण केली होती. याप्रकरणी पियुष पाटील व त्यांच्या समर्थक रवी शिंदे या दोन जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.