जाहिरात

Nagpur Factory Blast: नागपुरात भयंकर दुर्घटना! भीषण स्फोटात 15 जणांचा मृत्यू; 18 कामगार जखमी

Nagpur Major explosion At SBL Factory: स्फोटामध्ये अनेक कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. 

Nagpur Factory Blast: नागपुरात भयंकर दुर्घटना! भीषण स्फोटात 15 जणांचा मृत्यू; 18 कामगार जखमी

Nagpur SBL Factory Blast:  नागपूरमधून सर्वात मोठी दुर्घटनेची बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला आहेय या दुर्घटनेत 15 कामगारांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. स्फोटामध्ये 18 कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. 

नागपुरात भीषण स्फोट, 15 जणांचा मृत्यू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील बारुद कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 15 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील SBL कंपनीत आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनेक कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. 

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर सुरक्षेसाठी AI तंत्रज्ञान! अपघातांचे प्रमाण घटणार; काय आहे मास्टरप्लॅन?

सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

स्फोटानंतर कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली. या घटनेतील 18 जखमींना तातडीने उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून घटनास्थळी युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान,  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून स्फोटाची माहिती घेतली आहे. तसेच  तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.  दुर्घटनेतील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Ayatollah Ali Khamenei: मोठी बातमी: इराणचे सुप्रीम लीडर यातुल्ला अली खामेनेईंचा मृत्यू; मीडियाचा दावा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com