'दारू दुकानाला परवानगी देऊ नका, अन्यथा...', मनसे जिल्हाध्यक्षांचा आंदोलनाचा इशारा

देशी दारुच्या दुकानांचे स्थलांतर करू नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा उपाध्यक्ष राजू कुकडे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
चंद्रपूर:

वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत टेमुर्डा परिसरातील बेकायदेशीर पद्धतीने सुरेश अहिरकर यांचे देशी दारूचे किंवा इतर वाईन शॉपचे दुकान  स्थलांतरीत  केले जात आहे. तेथील गरीब, तरुण युवक नशेच्या आहारी जात आहेत त्याचबरोबर त्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, टेमुर्डा येथे देशी दारू दुकानाचे स्थलांतर करू नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व टेमुर्डा परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यादरम्यान असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(नक्की वाचा: अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीला हार्ट अटॅक! शाळेत खेळता खेळता मृत्यू; कुठे घडली घटना?)

टेमुर्डा गाव ही जवळपास 30 ते 35 गावाची बाजारापेठ आहे. या ठिकाणी जर देशी दारूच्या दुकानाला मंजुरी मिळाली तर कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. तसेच कुख्यात दारू तस्कर अंजु अन्ना यांच्या या देशी दारू दुकानाच्या माध्यमातून टेमुर्डा खांबाडा या परिसरातील गावागावात देशी दारू पुरवठा होऊन विद्यार्थी तरुण युवक यांना दारूचे व्यसण लागू शकते, त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्यही बिघडू शकते. 

Advertisement

(नक्की वाचा: अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य करणारी महिला कॉन्स्टेबल अटकेत, भोंदू बाबाच्या टोळीशी कनेक्शन उघड)

या गंभीर प्रकरणाची चौकशी करून देशी दारू दुकानाचे स्थलांतर  होऊ देऊ नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपल्या प्रशासनाविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. यासंबंधी  राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्यांनी निवेदनही दिले आहे. यावेळी अनेक महाराष्ट्र सैनिक व असंख्य नागरिकही उपस्थित होते.