NCP Crisis: सुनेत्रा पवारांचे राष्ट्रीय अध्यक्षपद धोक्यात? थेट पक्षातूनच चॅलेज; राष्ट्रवादीत संघर्ष शिगेला

२६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली निवडणूक अवैध असल्याचा दावा करत सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावर सच्चितानंद सिंह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Sunetra Pawar NCP Crisis News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुत्रे स्विकारल्यापासून मोठा पक्षांतर्गत कलह पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या गोटात सुनेत्रा पवार विरुद्ध  पटेल-तटकरे असा सुप्त संघर्ष सुरु असल्याच्या चर्चा नेहमीच होत असतात. अशातच आता राष्ट्रवादीमधील संघर्षाचा नवा अंक सुरु झाला असून सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदालाच थेट आव्हान देण्यात आले आहे. 

राष्ट्रवादीत नवा संघर्ष, सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदालाच चॅलेज!

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप घेतला आहे. सच्चितानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस बजावली असून अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मोठी मागणी केली आहे. २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली निवडणूक अवैध असल्याचा दावा करत सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावर सच्चिदानंद सिंह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

Advertisement

Mumbai Alert: मुंबईकरांनो सावधान! जुलै महिना धोक्याचा... 'या' तारखा लक्षात ठेवा; BMCकडून मोठा अलर्ट

सच्चिदानंद सिंह यांचे आक्षेप काय?

राष्ट्रवादीच्या सुधारित संविधानानुसार प्रफुल पटेल यांना सर्वाधिकार आहेत. 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली, ही बैठक पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात बोलावली? राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी जे पत्र दिलं त्याला सदस्यांची पूर्वपरवानगी नव्हती. त्यामुळे या  राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांची झालेली निवड संशयाच्या भोवऱ्यात आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांची निवड प्रक्रिया पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशीर आहे.  सुनेत्रा पवारांची निवड रद्द करुन पुन्हा नव्याने निवडणूक घेण्यात यावी. स्वतंत्र आणि निष्पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीत निवडणूक घ्यावी नवीन निवडणुकीपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची यादी रद्द समजावी, असे सच्चितानंद यांनी म्हटलं आहे. 

Rain News: मान्सून गायब! पावसाचे दमदार कमबॅक कधी होणार? हवामान विभागाच्या इशाऱ्याने चिंता वाढली