24 minutes ago

केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्यपीठ म्हणून ओळख असणाऱ्या त्र्यंबकेश्वर महादेवाचे ते दर्शन घेतील त्यानंतर मालेगाव तालुक्यातील अजंग गावी माजी सैनिकांनी सुरु केलेल्या व्यंकटेश्वरा फार्मला ते भेट देणार आहेत. या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीचे नाराज नेते छगन भुजबळ अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.

Jan 24, 2025 21:43 (IST)

एस.टीच्या भाडेवाढीस मान्यता

एस.टीच्या भाडेवाढीस मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ 25 जानेवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.  हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये  14.95  टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक 25 जानेवारी 2025 पासून अंमलात येईल असे निर्देश राज्य परिवहन प्राधिकरणाने दिले आहेत.

Jan 24, 2025 19:08 (IST)

कल्याण- डोंबिवलीतून 5 बांगलादेशींना पकडले

मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत टाटानाका येथील देशमुख होम्सच्या मागच्या बाजूला गांधीनगर झोपडपट्टी आणि कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरात बांगलादेशी राहत असल्याची माहिती कल्याण पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे महात्मा फुले पोलीस ठाणे तसेच मानपाडा पोलीस ठाण्याचे स्वतंत्र पथके तयार करत या दोन्ही ठिकाणी सापळा रचला. या छाप्यादरम्यान गांधीनगर झोपडपट्टी मधून चार बांगलादेशी नागरिक तर कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून एक बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. यामधील चार महिला आरोपी आहेत. हे पाच ही बांगलादेशी नागरिक विना परवाना भारतात राहत असल्याचे आढळून आले आहे.

Jan 24, 2025 17:48 (IST)

बीड जिल्ह्यातील 173 कोटींचा पिक विमा घोटाळा प्रकरणी, 726 सेवा केंद्रांवर कारवाईस प्रारंभ

बीड जिल्ह्यातील 173 कोटींचा पिक विमा घोटाळा प्रकरणी, 726 सेवा केंद्रांवर कारवाईस प्रारंभ झाला आहे. देवस्थान जमीन किंवा जमीन नसताना तसेच शासनाच्या जमिनीवर तब्बल 173 कोटी 90 लाख रुपयांचा बोगस पिक विमा भरल्याचे प्रकरण 2023 मध्ये समोर आले होते. आता या प्रकरणात कृषी विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. बोगस पिक विमा भरणारे जिल्ह्यातील 726 ग्राहक सेवा केंद्रांवर कारवाई होणार आहे. यामध्ये परळी तालुक्यातील 38 सेवा केंद्रांना तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नोटीसा बजावून खुलासा मागवला आहे. 

Jan 24, 2025 17:13 (IST)

वक्फ दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत मोठा गदारोळ

वक्फ दुरुस्ती विधेयकावर संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला. यानंतर  विरोधी पक्षांच्या 10 खासदारांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. निलंबित खासदारांमध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए राजा, असदुद्दीन ओवैसी, नासिर हुसेन, मोहिबुल्लाह, एम अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीमुल हक आणि इम्रान मसूद यांचा समावेश आहे. 

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्यावर टीका केली आहे. विरोधकांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं नाही, दुर्लक्ष केलं जातं असल्याचा आरोप त्यांनी केला.

Advertisement
Jan 24, 2025 16:44 (IST)

मंत्रालयाबाहेर झाडावर चढून तरुणाचे आंदोलन

मंत्रालयाबाहेर झाडावर चढून एका तरुणाने आंदोलन केलं. झाडावर चढलेला तरुण हा नाशिक जिल्ह्यातील गिरनानगर गावचा रहिवासी आहे. सुनील तुकाराम सोनवणे असं या तरुणांचं नाव आहे. गिरनानगर ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता पवार यांनी ग्रामपंचायतमधे जो भ्रष्टाचार केला आहे त्याची चौकशी करावी अशी त्याची मागणी आहे. संबंधित तरुणाने याबाबत जिल्हापरिषद पंचायत समितीकडे तक्रार करून देखील कारवाई होत नसल्यामुळे, मंत्रालयाच्या मुख्य दरवाजाच्या जवळ असलेल्या झाडावर चढून अर्धा तास आंदोलन केलं.

Jan 24, 2025 15:33 (IST)

Amravati News: अमरावतीच्या मोर्शी येथे 19 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या

- अमरावतीच्या मोर्शी येथे 19 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या..

- सकाळी आठ वाजताच्या सुमारातील घटना..

- अमरावती मोर्शी रोडवरील येरला गावाजवळ शेताच्या धुर्यात आढळला मृतदेह..

- सुनील चवरे असे मृत युवकाचे नाव आहे..

- मोर्शी शहरातील श्रीकृष्ण पेठ येथील मृतक रहिवासी असल्याची माहिती..

- पोलीस घटनास्थळी दाखल..

- घटनेचा पंचनामा करीत मृतकाच शवविच्छेदन करिता पोलिसांनी पाठवला

Advertisement
Jan 24, 2025 15:31 (IST)

Mumbai News: राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. नागरीकांना या सेवा त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हाव्यात याकरीता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात "मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष” सुरु करण्यात येणार असून याबाबत शासननिर्णय २२ जानेवारी २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. 

Jan 24, 2025 14:20 (IST)

Walmik Karad: वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

वाल्मीक कराड याच्यावर परवा रात्रीपासून उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या 45 क्रमांकाच्या वाड मध्ये वाल्मीक कराडवर उपचार सुरू आहेत. या वॉर्डत पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. या वार्डात रुग्णालय प्रशासनाचे सीसीटीव्ही नाहीत मात्र पोलीस प्रशासनाने सीसीटीव्हीची तात्पुरती व्यवस्था केल्याची समजते

Advertisement
Jan 24, 2025 14:19 (IST)

Shivsena News: उदय सामंत यांचा ठाकरेंना धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी उबाठाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी राजीनामा दिला होता. आज बंड्या साळवी यांच्यासह काही उबाठाचे पदाधिकारी, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उबाठाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला.. मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत या सर्वानी रत्नागिरी येथे भव्य कार्यक्रमात प्रवेश केला. उपविभाग प्रमुख दत्ता तांबे, विभाग प्रमुख अप्पा घाणेकर, पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर आदींनी शिंदे सेनेत पक्षप्रवेश केला..

Jan 24, 2025 14:18 (IST)

Chandrapur News: बँक नोकरभरती विरोधात चंद्रपूरमध्ये मोर्चा

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुरू असलेल्या नोकर भरतीत आरक्षण डावलल्याचा आरोप करीत उमेदवारांनी आज मोर्चा काढला. जिल्हा बँकेत भरावयाच्या सुमारे साडेतीनशे पदांच्या भरतीची प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे. परीक्षेच्या पहिल्याच पेपरला तांत्रिक अडचण आल्याने पेपर रद्द करावा लागला. बँक संचालकांनी पैसे घेवून आधीच उमेदवार निश्चित केल्याचा आरोपही झाला. या संपूर्ण भरती प्रक्रियेत आरक्षण डावलण्यात आल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ता मनोज पोतराजे यांनी बँकेच्या मुख्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले आहे. 

Jan 24, 2025 14:18 (IST)

Chandrapur News: बँक नोकरभरती विरोधात चंद्रपूरमध्ये मोर्चा

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुरू असलेल्या नोकर भरतीत आरक्षण डावलल्याचा आरोप करीत उमेदवारांनी आज मोर्चा काढला. जिल्हा बँकेत भरावयाच्या सुमारे साडेतीनशे पदांच्या भरतीची प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे. परीक्षेच्या पहिल्याच पेपरला तांत्रिक अडचण आल्याने पेपर रद्द करावा लागला. बँक संचालकांनी पैसे घेवून आधीच उमेदवार निश्चित केल्याचा आरोपही झाला. या संपूर्ण भरती प्रक्रियेत आरक्षण डावलण्यात आल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ता मनोज पोतराजे यांनी बँकेच्या मुख्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले आहे. 

Jan 24, 2025 14:17 (IST)

Amit Shah Nashik Visit: अमित शहांनी घेतले संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे दर्शन

श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे देखील केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दर्शन घेतलं..

आज लाखो वारकरी त्रंबक नागरिक दाखल झाले असून उद्या संत निवृत्तीनाथ महाराज समाधी यात्रा सोहळा आहे. तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री गिरीश महाजन केंद्रीय मंत्री मधुकर मोहोळ हे देखील त्यावेळी उपस्थित होते

यावेळी मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर त्यांनी मराठी वेशभूषा असलेली गांदी टोपी देखील परिदांन करून दर्शन घेतले आणि वारकऱ्यांसोबत चर्चा केली. उद्या होणाऱ्या उत्सव सोहळ्याच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंदिर परिसरातून आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरेने घेतलेला एक आढावा..

Jan 24, 2025 14:14 (IST)

Karjat News: नाशिक सोलापूर एस टी ने घेतला पेट, मोठा अनर्थ टळला

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे क्रांती चौकात 

नाशिक सोलापूर एस टी ने घेतला पेट...

एसटी मधील तांत्रिक बिघाडाणे एसटीने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने आणि वाहकाने गाडीतील प्रवाशांना उतरून दिल्याने पुढील अनर्थ टाळला...

संपूर्ण एसटी बस जळून खाक... कर्जत नगरपरिषदचे अग्निशामक दल आग विजवण्यासाठी तातडीने मिरजगाव येथे रवाना..

मिरजगाव पोलीस घटनास्थळी दाखल..

आगीमुळे गाडीचे पाठीमागील बाजूचे टायर फुटले...

Jan 24, 2025 12:32 (IST)

Maharashtra Congress News: महिनाअखेरपर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठरणार, दोन नेत्यांची नावे चर्चेत

महिनाअखेरपर्यंत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठरणार

२७ जानेवारीला राहुल गांधींच्या महु दौ-यानंतर कॉग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होणार

27 जानेवारीला बाबासाहेब आंबेडकर यांच्या महु या जन्मस्थळी संविधान बचाव सभा घेणार आहेत

नाना पटोले यांनी स्वत:च कॉग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केलीय

काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत

 त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन नावांमध्ये रस्सीखेच सुरु आहे

काँग्रेस हायकमांडकडून सध्या अमित देशमुख आणि सतेज पाटील या दोन नेत्यांच्या नावाचा प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार सुरु आहे

अमित देशमुख आणि सतेज पाटील अशा दोन नावांची चर्चा

Jan 24, 2025 11:56 (IST)

Ram Gopal varma: अभिनेता राम गोपाल वर्माला दणका, तीन महिन्यांची कोठडी

राम गोपाल वर्मा यांना अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाचा दणका 

तीन महिने कोठडी आणि लाखांचा दंड अशी शिक्षा सुनावली 

अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिला  आदेश  

हा संपूर्ण खटला सात वर्ष चालू होता . 2018 पासून हा खटला सुरू होता 

चेक बाऊन्स झाल्या प्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्यात येत होता.

महेश चंद्र मिश्रा आसे याचिका कर्त्याचे नाव आहे. 

महेश चंद्र मिश्रा हे हार्ड डिस्क सप्लायर म्हणून काम करत होते 

अनेक वेळा सांगून देखील रांगोपाल वर्मा यांनी त्यांना पैसे दिले नाही. जो चेक दिला तो त्यानंतर बाउन्स झाला 

यामुळे मिश्रा यांनी थेट कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला 

मिश्रा यांचे वकील राजेश कुमार पटेल यांनी हा खटला चालवला

राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांची कोठडी आणि 3 लाख 72 हजार 219 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

Jan 24, 2025 11:44 (IST)

Bhandara News: भंडाऱ्यामधील फॅक्टरीत स्फोट, पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

 भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ब्लॉस्ट झाला. फॅक्टरीच्या आर के ब्रांच शेक्शन मध्ये हा ब्लॉस्ट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. साबुदाण्यासारखा कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो, त्यामध्ये हा प्लॉट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू किंवा अपघातग्रस्त झालेत अद्याप याची माहिती कळू शकलेली नाही.

Jan 24, 2025 10:45 (IST)

Chhagan Bhujbal News: भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही: छगन भुजबळांकडून स्पष्टीकरण

 अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत सहकार खात त्यांच्याकडे आहे. ओझर नाशिक येथे येऊन ते त्रंबकेश्वर येथे जाणार आहेत. अमित शहा साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत तो कार्यक्रम पाहणार आहेत आणि त्याची नोंद घेणार आहेत. मला सुद्धा त्यांचं काम बघायचे. म्हणून मी जातोय, तेथे राजकारणाची काही चर्चा होणार आहेत का? करणार आहेत का? अशा काही बातमी येतात फार काही तथ्य आहेत किंबहुना तथ्य नाहीच असे मला वाटते.. असे म्हणत छगन भुजबळ यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. 

Jan 24, 2025 10:41 (IST)

Chandrashekhar Bawanule: उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी: चंद्रशेखर बावनकुळे

 उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी आहेत. प्रतिमा मलीन झाल्यावरही, जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही खरंतर एखाद्या नेत्यांकडून 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात.  तरी त्यांना जाग येत नाही, त्यांचा नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाही म्हणून खासदार आमदार सोडून गेले, खासदार आमदारांचे त्यांचा कुठलाही संपर्क नव्हता.  त्यांचे लोक सोडून गेल्यावर भाजपला दोष देतात.अमित शाह यांच्यावर टीका करतात, त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी संताप व्यक्त केला आहे.

Jan 24, 2025 09:09 (IST)

Raj Thackeray Nashik Visit: मनसेची नाशिक शहर आणि जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करण्याची शक्यता

- गटबाजीमुळे नाशिकच्या स्थानिक मनसे नेत्यांवर राज ठाकरे नाराज 

- मनसेची नाशिक शहर आणि जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करण्याची शक्यता

- राजीनामे दिलेल्या नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत काल राज ठाकरेंनी साधला संवाद

- स्थानिक नेत्यांबाबत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी  राज ठाकरेंकडे केल्या अनेक तक्रारी

- विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंचा पहिलाच दोन दिवसीय नाशिक दौरा

- आज दुसऱ्या दिवशी देखिल पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करण्याची शक्यता

Jan 24, 2025 09:04 (IST)

Pandharpur News: शालेय पोषण आहाराच्या तांदळात किडे , माती अन् लेंड्या,

 शालेय पोषण आहारासाठी वापरला जाणाऱ्या तांदूळ व इतर साहित्य मध्ये माती , किडे , आळ्या आढळून आले आहेत. त्यामुळे सांगोल्या तालुक्यातील कमलापूर येथील गोदामातील संपूर्ण तांदूळ इतर साहित्यांचा माल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सील केला आहे. नितीन रणदिवे आणि होणार समाजाने प्रशासनास गोदामातील तांदूळ इतर साहित्य मध्ये किडे माती असल्याचे उघडकीस आणून दिले. यानंतर तात्काळ प्रशासनाने तपासणी करत सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील गोदाम सील केले आहे.. यानंतर या गोदामाची देखभाल करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आता नितीन रणदिवे होलार समाजाकडून करण्यात येत आहे.

Jan 24, 2025 09:01 (IST)

Chakan Crime: कॉपर वायर चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

चाकण पोलिस स्टेशनच्या हद्दीत, औद्योगिक परिसरात असलेल्या महावितरणच्या विद्युत रोहित्रामधून कॉपर वायर चोरी करणाऱ्या आरोपींना चाकण पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात. या प्रकरणी चाकण पोलिसांत या आरोपींच्या विरोधात भारतीय विद्युत कायदा कलम 136 नुसार गुन्हा दाखल करत आरोपी मोहंमद तौफिक अजम अली शेख, रज्जिउद्द्दिन वारीस अली खान, सैराज अहमद हमीद उल्ला शेख, मोहंमद आसिफ अब्दुल अलीम अन्सारी , शकील मोहंमद वलास्मा चौधरी सर्व राहणार कुदळवाडी चिखली यांना अटक केलीय, त्यांच्या ताब्यातून 5 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अटक केल्याने चाकण पोलिस स्टेशन मधील दाखल कॉपर चोरीच्या 5 गुन्ह्याची उकल झाली आहे.

Jan 24, 2025 08:14 (IST)

Ambernath News: अंबरनाथमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

उल्हासनगरात वीजबिल थकलेल्या ग्राहकाची वीज कापण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञाला मारहाण झाली होती. यानंतर या तंत्रज्ञावरच संबंधित ग्राहकाने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याचा निषेध करण्यासाठी अंबरनाथ डिव्हिजनमधील महावितरण कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं.

 उल्हासनगर कॅम्प नंबर ४ भागात महावितरणकडून २५ हजार थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळं संबंधित ग्राहकानं महावितरणच्या तंत्रज्ञाला मारहाण केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा तसेच कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी ग्राहकावर याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी महावितणाचे कर्मचारी इलमोद्दीन शेख यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे संतापलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. अंबरनाथ डिव्हिजनमध्ये महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारत या गोष्टीचा निषेध केला.

Jan 24, 2025 07:57 (IST)

Amravati News: अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात 111 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक..

अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात 111 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक..

131 ग्रामपंचायत सदस्य तर पाच थेट सरपंचाची होणार निवड होणार...

अमरावती जिल्ह्यात वर्षभरापासून रखडल्या होत्या ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुका..

ग्रामपंचायत सदस्यांचे निधन, अपात्रता, राजीनामा यामुळे झाले होते पद रिक्त..

सुरुवातीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती.

परंतु आता दोन्ही निवडणुका नंतर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा हा मार्ग मोकळा झाला आहे..

पोट निवडणुकांचा 10 फेब्रुवारीपर्यंत होणार कार्यक्रम जाहीर..

Jan 24, 2025 07:56 (IST)

Palghar News: मोखाडा तालुक्यात डेंग्यु आणि चिकणगुण्याचा शिरकाव

पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या मोखाडा तालुक्यात डेंग्यु आणि चिकणगुण्याचे रूग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मोखड्यातल्या डोल्हारा गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून या गावात डेंग्युचे  4  तर चिकणगुण्या बाधित 9  रुग्ण आढळून आले आहेत. येथील नागरीकांना थंडी, ताप, हात, पाय, डोके दुखणे अशा तक्रारी जानवू लागल्या होत्या. त्यानुसार त्यांचे रक्त नमुने डहाणू येथील प्रयोग शाळेत पाठवले होते. रक्त तपासणी अहवाल  काल प्राप्त झाला असून त्यामध्ये  4  जणांना डेंग्यू आणि  9  ज्यांना चिकणगुण्याची लागण झाल्याचे आढळून आले आहेत. 

Jan 24, 2025 07:54 (IST)

Shivsena Meeting: शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची उद्या बैठक

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची उद्या शिवसेना भवन, दादर येथे बैठक...

राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना बैठकीला शिवसेना भवन येथे उपस्थित राहण्याचे आदेश... 

जिल्हाप्रमुखांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार 

आज पार पडलेल्या मेळाव्या नंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हा प्रमुखांची बैठक 

उद्या 12 वाजता शिवसेना भवन इथे जिल्हाप्रमुखांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक

Jan 24, 2025 07:53 (IST)

Amit Shah Nashik: अमित शाह आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर

 केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्यपीठ म्हणून ओळख असणाऱ्या त्र्यंबकेश्वर महादेवाचे ते दर्शन घेतील त्यानंतर मालेगाव तालुक्यातील अजंग गावी माजी सैनिकांनी सुरु केलेल्या व्यंकटेश्वरा फार्मला ते भेट देणार आहेत. फार्मला सहकार मेळावा घेत शेतकऱ्यांशी देखिल ते संवाद साधतील. 

 

दरम्यान कसा असणार आजचा अमित शाह यांचा नाशिक जिल्हा दौरा बघुयात -

सकाळी 10.45 - अहमदाबादहून BSF विमानाने नाशिककडे प्रस्थान 

सकाळी 11.45 - नाशिक एअरपोर्टवर आगमन आणि त्र्यंबकेश्वरकडे BSF हेलिकॉप्टरने रवाना 

दुपारी 12.20 ते 12.35 - त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात पूजा आणि दर्शन 

दुपारी 12.45 - त्र्यंबकेश्वरहून BSF हेलिकॉप्टरने मालेगावकडे प्रवासाला सुरुवात 

दुपारी 1.30 - मालेगाव हेलीपॅडवर आगमन आणि अजंग गावाकडे रास्तेमार्गे रवाना 

दुपारी 1.40 ते 2.55 - अजंग गावच्या वैंकटेश्वरा फार्मला भेट आणि सहकार मेळाव्याला संबोधन 

दुपारी 3.10 - मालेगावहून BSF हेलिकॉप्टरने नाशिक एयरपोर्टकडे प्रस्थान 

दुपारी 3.40 - नाशिक एयरपोर्टहून BSF विमानाने मुंबई एयरपोर्टकडे उड्डाण

Jan 24, 2025 07:52 (IST)

Saif Ali Khan: सैफ अली खानवरील हल्ल्यातील आरोपीला आज न्यायालयात हजर करणार

सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादल आज करणार न्यायालयात हजर.

शहजादची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने  वांद्रे पोलिस आज त्याला करणार न्यायालयात हजर .

पाच दिवसाच्या कोठडीत पोलिसांनी बांगलादेशातील दस्तावेज, हल्ल्यातील चाकूचे तुकडे, सिम कार्ड, मोबाईल आणि काही पुरावे जप्त केले.

पोलीस कोठडी वाढवण्यासाठी पोलिसांची मागणी होणार की न्यायालयीन कोठडी सुनावली जाणार, याकडे लक्ष.