Maharashtra Live Blog: आज मुस्लीम बांधवांचा दुसऱ्या क्रमांकाचा पवित्र सण मानला जाणारा बकरी ईद हा सण साजरा केला जात आहे.ईद अल-अधा, ज्याला ईद उल-जुहा किंवा बकरी ईद असेही म्हणतात. राज्यभरात मुस्लीम बांधव एकत्र येत बकरी ईदचा सण साजरा करतात. आज बकरी ईदनिमित्त सरकारी कार्यालये बंद राहतील.
गोदावरी नदीच्या पात्रात सहा मुलं बुडाली
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणाच्या हद्दीतील मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीच्या पात्रात सहा मुलं बुडाली आहेत.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून गोदावरी नदी वाहते. दोन राज्यांच्या सीमारेषेवरून वाहणाऱ्या या नदीच्या पलीकडे, तेलंगणाच्या हद्दीत असलेल्या मेडीगड्डा धरणाजवळ संध्याकाळच्या सुमारास सहा मुलं आंघोळीसाठी गेली असता ते नदीच्या पात्रात बुडाले.
संध्याकाळपासून सुरू असलेली शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू आहे. अद्याप त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. तेलंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम राबवत आहेत. उद्या सकाळपर्यंत काही निष्पत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेमुळे नदीच्या किनाऱ्यावर कुटुंबियांचा आक्रोश सुरू असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
आषाढीसाठी 27 जून पासून विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू
आषाढी एकादशी सोहळा 6 जुलै रोजी साजरा होणार आहे. त्या पूर्वी 27 जून पासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू होणार असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक करणार आहेत.
नांदेडमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू
नांदेडमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा आणि दोन मुलींचा बुडून मृत्यू झालाय. उमरी तालुक्यातील भायेगाव येथील ही घटना आहे. 35 वर्षी महानंदा हणवते, 14 वर्षीय पायल हणवते या मायलेकी आणि 12 वर्षीय एश्वर्या हणवते या पुतणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिघींचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत.
काँग्रेस पक्षाला अकोल्यात मोठा धक्का
* काँग्रेस पक्षाला अकोल्यात मोठा धक्का
* काँग्रेस नेते व माजी महापौर मदन भरगड यांची पक्षाला सोडचिठ्ठी
* काँग्रेस पक्षातील कलह आला समोर
* 12 तारखेला अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात करणार पक्षप्रवेश
* माजी महापौर मदन भरगड हे काँग्रेस पक्षातील होते ज्येष्ठ नेते
* आज पत्रकार परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश घेतलाय.
* लवकरच अधिकृत प्रवेश हा १२ जून रोजी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित संपन्न होणार..
रायगड जिल्ह्यात उरण व अलिबागमध्ये जोरदार पाऊस
रायगड जिल्ह्यात उरण व अलिबागमध्ये जोरदार पाऊस
उरण मधील बाजारपेठत पाणी साचले. उरण परिसरात रस्त्यावर साचले पाणी.
मुख्य बाजारपेठेतील रस्ते, सातऱ्हाटी, नागाव परिसरात पाणी साचले.
अलिबाग मध्ये ही जोरदार पाऊस.
वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणची होणार कारागृहात रवानगी
वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणची कारागृहात रवानगी होणार आहे. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 19 जून पर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी.
सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या रांगा; कर्जत-लोणावळा मार्गावर पर्यटकांची गर्दी
शनिवारची सार्वजनिक सुट्टी असल्याने सायन-पनवेल महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मुंबई आणि नवी मुंबईतील हजारो पर्यटकांनी सुट्टीचा लाभ घेत कर्जत, लोणावळा, मळवली, भुशी डॅम आणि इतर निसर्गरम्य पर्यटन स्थळांकडे प्रस्थान ठेवले. परिणामी महामार्गावरील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला.
LIVE Updates: चांदवड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, वृद्ध महिलेवर हल्ला
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील भडाणे येथे बिबट्याने हल्ल्या करून एकाला ठार केल्याची घटना ताजी असताना आता चांदवडच्या राहुड गावातील पाडगण मळा येथे सुशिलाबाई उत्तम कहांडळ या साठ वर्षी वृद्ध महिलेवर हल्ला करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. वृद्ध महिलेवर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Dharashiv News: "नो प्लास्टिक" मोहिमेसाठी पंकजा मुंडे यांचा आज तीर्थक्षेत्र दौरा
"नो प्लास्टिक" मोहिमेसाठी पंकजा मुंडे यांचा आज तीर्थक्षेत्र दौरा
तीर्थक्षेत्रावरील प्लास्टिक वापर आणि प्रदूषणाचा घेणार आढावा
परळी वैजनाथ, तुळजापूर, अक्कलकोट येथील तीर्थक्षेत्रावर करणार प्लास्टिक वापरा बाबत जनजागृती
तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिर, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर इथ आढावा बैठकीचही आयोजन
सिंगल युज प्लास्टिक बॅग वापराच्या निर्बंधाच्या अनुषंगाने बैठक
तीर्थक्षेत्रावरील अधिकारी आणि व्यापारी यांच्याशी साधणार संवाद
LIVE Update: ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी
मुस्लीम बांधवांच्या सर्वात मोठ्या सणांपैकी एक ईद उल अजहा अर्थात बकरी ईद आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यागाचे प्रतिक म्हणून मुस्लीम बांधव हा सण साजरा करतात. बीडमध्ये बकरी ईद निमित्त हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज पठण केलं. मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून देशात सुख-समृद्धीसोबतच शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली.
Baramati News: बारामतीत लक्ष्मण हाकेंच्या प्रतिमेला मारले जोडे
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात लक्ष्मण हाके यांनी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील भिगवन चौकात जोडे मारो आंदोलन केले आहे. या आंदोलनामध्ये महिलांनी देखील सहभाग घेतला होता.
LIVE Updates: महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने मनसेची आज बैठक
आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने मनसेची आज बैठक
केंद्रिय समितीची आज आढावा बैठक पार पडणार आहे
विशेष म्हणजे मुंबईचा आढावा घेऊन मनसेची कितपत ताकत आगे याचा आढावा घेतला जाणार आहे
त्याचसोबा ठाकरे आणि मनसे एकत्र येण्यासाठी नेमकं नेत्यांचं काय मत आहे हे देखील राज ठाकरे जाणून घेणार आहेत
LIVE Updates: संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात मोठी अपडेट, अमोल खोतकरनेच पहिली गोळी झाडली
संभाजीनगरच्या दरोडा प्रकरणात मोठी अपडेट
'एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेल्या आरोपी अमोल खोतकरनेच पहिली गोळी झाडली'
दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकरच्या मैत्रीणीचा जबाब : सूत्र
एन्काऊंटरवेळी अमोलची मैत्रीण खुशी गाडीत सोबत होती
अमोलच्या मैत्रिणीचा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा
अमोलच्याच मैत्रिणीचा जबाब पोलिसांना क्लीनचिट मिळवून देऊ शकतो
LIVE Updates: येसगाव जवळ ऊसतोड कामगारांवर काळाचा घाला; दोघे जण ठार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील येसगाव जवळ ऊसतोडीसाठी मजूर घेऊन जाणारा छोटा हत्ती दुचाकीला वाचविण्याच्या नादात पलटला. यामध्ये दोन कामगार जागीच ठार झाले असून दहा जण गंभीर जखमी झाले. यात संदीप मकरंद गोफणे आणि संजय साहेबराव गायकवाड अशी मयतांची नावे आहेत.कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथून २२ ऊसतोड मजुरांना घेऊन छोटा हत्ती वाहन फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे निघाले होते. खुलताबादजवळील येसगावजवळ समोर अचानक एक दुचाकीस्वार आला. त्याला वाचविण्याच्या नादात छोटा हत्ती पलटी झाला. वाहनाने दोन ते तीन पलट्या मारल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
LIVE Update: शिवसेना शिंदे गटाचे दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलन
बकरी ईद निमित्त शिवसेना शिंदे गटाचे दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी घंटानाददोलन
लाल चौकी परिसरात पोलिसांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना अडवले
शिवसेना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
जोपर्यंत मंदिर सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
पोलीस एका धर्माला नाही तर दुसरा धर्मावर अन्याय करतात
सत्तेत असलो तरी आंदोलन करणार
त्यांचे नमाज सुरू असताना मंदिर खुलच ठेवण्यात यावं
LIVE Updates: 2 जहाल वरिष्ठ माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण
डिव्हीसीएम सपनाक्का (डिकेएसझेडसीएम गीरेड्डी पवनानंद रेड्डी याची पत्नी) सह एकूण चार डीव्हीसीएम दर्जाचे वरीष्ठ कॅडर, एक कमांडर, दोन उप-कमांडर, चार एसीएम व एक सदस्य पदावरील माओवाद्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म.रा. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे एकुण 01 कोटी 12 लाखाचे बक्षिस जाहिर केले होते
Live Updates: कृषिमंत्र्यांनी घेतली शेतकरी संघटनेची भेट
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बागलाण तालुका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांचे त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले.अवकाळी पावसाने शेतात पोळ मारून ठेवलेले कांदे खराब झाले त्यांचे पंचनामे करण्यासाठी तसेच कांदा भावातर योजनेसाठी सरकार कडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले.तर बियाण्यांचे वाढते दर व बोगस बियाण्यांबाबत कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
Nashik News: उन्हाळी सुट्टीत विद्यार्थी रमले शिबिरात
शालेय सुट्ट्यांचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवत त्यांना खेळांची व वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती व्हावी या उद्देशाने नाशिकच्या मालेगावात साथी प्रतिष्ठान व राष्ट्र सेवा दलातर्फे पाच दिवशीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून,योगासने, कॅलिस्थानी नृत्य, ॲरोबिक्स, मनोरंजनात्मक खेळ, गाणी, बुद्धिबळ प्रशिक्षण, शॉर्ट फिल्म तयार करण्याचे तंत्र, वैचारिक सुसंवाद, तंत्रज्ञान व कोडींग, जादूचे प्रयोग, चित्रकला, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन,पर्यावरण व विज्ञानावर आधारित माहिती देण्यात येत असल्याने विद्यार्थी या शिबिरात रमले आहे.