Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट! अखेर भाजप- काँग्रेसची युती, कारण काय?

Solapur APMC Market Election: या निवडणुकीची अन् युतीची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..

जाहिरात
Read Time: 2 mins

 सौरभ वाघमारे, सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वात मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या पॅनलने युती केली आहे. त्यामुळे या निवडणुकीची अन् युतीची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप-काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल केले आहे. यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके यांचा सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा दिला आहे. 

भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील सोबत येण्याचे आवाहनही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली आहे. मात्र  माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तत्पुर्वी, मागच्या निवडणुकीच्या वेळेस ही तत्कालीन पालकमंत्री भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला काँग्रेस नेते दिलीप माने यांनी पाठिंबा  दिला होता. तर आमदार सुभाष देशमुख हे विरोधी पॅनलमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

महिलेचा 91 वर्षांच्या पतीवर संशय, संतापलेल्या वृद्धाने उचललं धक्कादायक पाऊल; प्रकरण पोहोचलं कोर्टात

दरम्यान, या युतीवरुन भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतोय, यामध्ये कोणत्याही पक्षीय राजकारणचा विषय नाही. दोन्ही देशमुख हे आमचे नेते आहेत त्यांना देखील सोबत येण्याचे आवाहन आम्ही केले आहे. ‘पण इतक्या लोकांनी अर्ज दाखल केले आहे त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणे कठीण आहे पण आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतोय, असे ते म्हणाल्यात.

Advertisement

तसेच मुख्यमंत्र्यांनी सचिन दादांना सूचना केल्या होत्या त्यांनी आम्हाला आवाहन केलं त्या आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित येऊन लढण्याचा निर्णय केलाय, बाजार समितीचे हित हेच आमचे लक्ष्य आहे. सहकारच्या बाबतीत मी स्वतंत्र निर्णय घेत असतो, मी स्वयंभु आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी दिली आहे. 

नक्की वाचा: ...म्हणून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केलं मुंडन, असा फेडला नवस; पाहा PHOTO