मुंबई: विधानसभेनंतर आता राज्याच्या राजकारणात महापालिका निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर आता मविआ वाचवण्यासाठी काँग्रेसने धावाधाव सुरु केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मविआच्या भवितव्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत हर्षवर्धन सपकाळ?
"प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मविआच्या नेत्यांना भेटण्यासाठी आलो होतो. एक चांगली चर्चा झालीं आपला महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे. महाराष्ट्र धर्म जगला तर देश जगेल पण आज भाजप धर्म आणि देश बुडवाला आला आहे. आज संघर्षाची वेळ आहे. भाजप जे लोकशाही बुडवायला निघाली आहे, त्यासाठीच संर्घष केला पाहिजे. शिवसेना आणि काँग्रेस हे सोबत कसे राहतील, याकडे लक्ष आहे..," असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
"स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भेट घेणे महत्वाचे होते. सर्वांना सोबत घेताना मी देखिल त्यांना राहूल गांधी यांच्यावर लिहिलेले पुस्तक दिले. आहे. स्थानिक स्वराज्य संस्था कश्या लढाव्या याबाबत दोन्ही पक्षाच्या आपल्या भुमिका आहे. आम्ही आमचा निर्णय सविनय सांगितला आहे..स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीत एकत्र लढायच्या? याचा निर्णय नोटिफिकेशन निघाल्यानंतर घेतला जाईल. स्थानिक पातळीवर चर्चा करून घेतला जाईल," असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
(नक्की वाचा- India Alliance इंडिया आघाडी शाबूत आहे की नाही माहिती नाही! काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या विधानामुळे खळबळ)