ठाणे: आगामी महानगरपालिका निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या आधी ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची बातमी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आगामी महानगरपालिका निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीसाठी आज शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा पार पडत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, विनायक राऊत,अरविंद सावंत,अनिल परब, अंबादास दानवे, भास्कर जाधव, अनंत गीते या मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मात्र यावेळी शिवसेना शिंंदे गटाच्या नेत्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांच्या गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच आनंद शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांच्या गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. आनंद दिघे यांना अभिवादन करण्याचा आम्हाला अधिकार आहे. आमच्या नेत्यांचे कॅप्टन ( संजय राऊत) येण्याने काही लोकांची इथे टरकली, फाटली. काळी मांजर सोडण्याचा प्रयत्न केला, गद्दारांची अवलाद ठाण्यात जन्मली हे आपलं दुर्दैव. या गद्दारांचे विसर्जन कळव्याच्या खाडीत काही दिवसात होईल, असं ते म्हणाले.