1 hour ago

Maharashtra LIVE Blog: काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन काल मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत. 

Apr 26, 2025 18:28 (IST)

Live Update : मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर भूखंड विक्रीसाठीची सिडकोची टेंडर प्रक्रिया स्थगित

वाशी सेक्टर 19-एफ येथील न्यू बॉम्बे मर्चंट्स कॉमन वेअरहाऊस संस्थेला सिडकोने दिलेल्या भूखंडाचा वापर रद्द करून विक्रीसाठी टेंडर प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. मात्र या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला. त्यानंतर सिडकोनं टेंडर प्रक्रिया स्थगित केली आहे. 

Apr 26, 2025 16:55 (IST)

Live Update : इराणच्या बंदरामध्ये मोठा स्फोट, 195 जखमी! पाहा Video

इराणमधील अब्बास बंदरामध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात 195 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. या बंदरातील सिना कंटेनर यार्डमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती इराणच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. राजाई बंदरात असलेल्या कंटेनरमध्ये हा स्फोट झाला. येथे वाहतुकीचे कंटेनर ठेवले आहेत, त्यात तेल आणि इतर पेट्रोकेमिकल सुविधा देखील आहेत. स्फोटातील जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत आहे. 

Apr 26, 2025 16:01 (IST)

LIVE Updates: भिवंडीतील आग आणखी भडकली, 12 तासांनतरही नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु

भिवंडीमधल्या स्वागत कॉम्पलेक्समध्ये लागलेली भीषण आग आणखी भडकली आहे. भिंवडी तालुक्यातील राहानाळ ग्रामपंचायत हद्दीतील मनीसुरत कंपाऊंड मधील स्वागत काॅम्प्लेक्स येथील प्लायवूडच्या गोदामाला पहाटे तीनच्या सुमारास ही आग लागली. या आगीत कोट्यावधी रुपयांचे प्लायवूड जळून खाक झाले आहे. 

पहाटेपासून अग्निशमन दलाचे वाहनं घटनास्थळी आहेत. त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जवळपास 70 टँकर पाण्याचा वापर करण्यात आलेला आहे.  मात्र 12 तास उलटल्यानंतरही ही आग आटोक्यात आलेली नाही. 

Apr 26, 2025 15:18 (IST)

Nashik News: चारचाकी वाहनातून तब्बल 400 किलो गोमास जप्त

पुणे  महामार्गावरील  शिंदे टोलनाक्याजवळ एका विना नंबर प्लेट च्या चारचाकीतून उग्र वास येत असल्याने. स्थानिक नागरिकांनी या वाहनाचा पाठलाग करत नाशिक पासपोर्ट कार्यालयाजवळ त्यास अडवून सदर वाहनाच्या डिक्कीतून तब्बल 400 किलो गोवंश जातीच मास जप्त केलं. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस करत आहे.

Advertisement
Apr 26, 2025 15:17 (IST)

LIVE Updates: जम्मू-काश्मीरला गेलेले नवी मुंबईतील 46 पर्यटक सुखरूप घरी परतले

जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले नवी मुंबईतील 46 पर्यटक सुखरूप घरी परतले. 

नियोजित पर्यटन दौऱ्यावर गेलेले नवी मुंबईतील रहिवासी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे उधमपूर येथे अडकून पडले होते. परतीची कोणतीच व्यवस्था नसल्याने त्यांच्यातील एका पर्यटकाने नवी मुंबई भाजप कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यांना पुढच्या काही वेळात तातडीने मदत मिळाली. आज या 46 पर्यटकांचे मुंबई विमानतळावरून नवी मुंबईतील तुर्भे गावात त्यांचे सुखरूप आगमन झाले.

Apr 26, 2025 15:16 (IST)

LIVE Updates: चंदन तस्कर टोळीवर छापा, 08 आरोपी जेरबंद...!

- सौताडा शिवारातील जामखेड रोड व वंजारा फाटा परिसरातून चंदनाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती बीड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी हि कारवाई करून 08 आरोपींना अटक केली आहे.

- पाटोदा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल.

- बीड जिल्ह्यात पोलिसांकडून अवैध धंद्यांवर आळा घालण्याचे प्रयत्न सु

Advertisement
Apr 26, 2025 15:15 (IST)

Pune News: पुण्यात हुल्लडबाजांकडून मनोरंजनासाठी एअरगनने गोळीबार

पुण्यात हुल्लडबाजांकडून मनोरंजनासाठी एअरगन ने गोळीबार

२ जणांनी केला एअरगन मधून गोळीबार

रस्त्यावर थांबवून हुल्लडबाजी करण्यासाठी या तरुणांनी केला गोळीबार

 पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना

साळुंखे विहार परिसरात एका इमारतीच्या घराच्या २ काचा फुटल्या

ज्या घरावर हुल्लडबाज यांनी चेष्टा करत गोळीबार केला त्या घरातील सर्व लोकं सुरक्षित

या घटनेत कोणी ही जखमी नाही

या घटनेतील एका तृतीयपंथ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

Apr 26, 2025 12:44 (IST)

LIVE Updates: पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील हापूस महोत्सव रद्द

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 

दिल्लीतील हापूस महोत्सव रद्द 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार होते

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यात पर्यटकांचा मृत्यू झाला 

देश शोकसागरात असल्यामुळे महोत्सव रद्द 

खासदार रविंद्र वायकर यांच्याकडून कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा  

३० एप्रिल - १ मे रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.

Advertisement
Apr 26, 2025 12:44 (IST)

LIVE Updates: पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील हापूस महोत्सव रद्द

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 

दिल्लीतील हापूस महोत्सव रद्द 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार होते

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यात पर्यटकांचा मृत्यू झाला 

देश शोकसागरात असल्यामुळे महोत्सव रद्द 

खासदार रविंद्र वायकर यांच्याकडून कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा  

३० एप्रिल - १ मे रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.

Apr 26, 2025 12:17 (IST)

LIVE Updates: आम्हाला सुरक्षा पुरवा...' काश्मीरी विद्यार्थ्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना पत्र

पुण्यातील काश्मीरी विद्यार्थ्यांनी लिहिलं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र 


"आम्हाला सुरक्षा पुरवा" काश्मीर विद्यार्थ्यांनी केली आयुक्तांकडे मागणी


पुण्यातील सरहद संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत काश्मीरमधील विद्यार्थी


जम्मू-काश्मीरमधील पहेलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वाटत आहे असुरक्षित 


त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करून विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची केली जात आहे मागणी

Apr 26, 2025 11:25 (IST)

LIVE Updates: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 1 ठार, 2 जखमी

मृद्धी महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील लोकेशन 207 जवळ फॉर्च्युनर चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. व अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त सर्व व्यक्ती नागपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील वाहतूक पोलीस कर्मचारी तसेच 108 आपत्कालीन सेवा, गुरु मंदिर रुग्णवाहिकेतील देशमुख तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता एकाला मृत घोषित करण्यात आले.इतर दोन जखमींवर प्रथमोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Apr 26, 2025 10:41 (IST)

LIVE Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

भाजप अध्यक्ष जे पी नड्डांपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर 

ग्राम विकास विभाग आणि राज्य पंचायत राज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळेला राहणार उपस्थित 

देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन 

दुपारी चार वाजता यशदा येथे होणार कार्यक्रम

Apr 26, 2025 10:39 (IST)

LIVE Updates: जम्मू काश्मीमधून 343 पर्यटक पुण्यात परतले

जम्मू-काश्मीरला गेेलेले ३४३ पर्यटक गेल्या दोन दिवसांत पुण्यात परतले आहेत.उर्वरित पर्यटक येत्या रविवारपर्यंत पुण्यात पोहोचतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जम्मू-काश्मीरमध्ये पुणे आणि जिल्ह्यातून काही पर्यटक स्वतंत्रपणे, तर काही सहल नियोजन करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले होते. त्यांची माहिती मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. 

या हेल्पलाइनवर आलेल्या दूरध्वनींनुसार, शहर आणि जिल्ह्यातील एकूण ६५७ पर्यटक गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे.

त्यानुसार त्यांच्याशी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

Apr 26, 2025 09:04 (IST)

LIVE Updates: आयशर टेम्पो उलटला; एकाचा जागीच मृत्यू, 25 जण जखमी

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर अंबाजोगाई महामार्गावरील धानोरा पाटी जवळ 70 जणांना घेऊन जाणारा आयशर टेम्पो उलटला आहे. यात एक जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील डफवाडी येथील रहिवासी असलेले हे लातूर जिल्ह्यातील धानोरा गावात एका लग्नाच्या रिसेप्शन साठी आले होते. कार्यक्रम आटपून परत जाताना धानोरा पाटी येथे आयशर टेम्पो उलटल्याने हा अपघात झाला आहे. जखमींवर अहमदपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.. आंबेजोगाई अहमदपूर ,किनगाव ,परभणी या ठिकाणी जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे..

Apr 26, 2025 08:51 (IST)

LIVE Updates: पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार, राज्यात पावसाचा अलर्ट

पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार 

पुण्यासह राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट 

पुणे वेधशाळेची माहिती

पुणे शहरासह सोलापूर  आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता 

तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आज आणि उद्या येलो अलर्ट 

पुणे शहरासह जिल्ह्यात देखील आज दिवसभरात पावसाची शक्यता

Apr 26, 2025 07:21 (IST)

Sangli News: काश्मीरमधून परतलेल्या पर्यटकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद

पहलगाम हल्ल्यानंतर कश्मीर मध्ये अडकलेले सांगली जिल्ह्यातील 15 पर्यटक सुखरूप परतले आहेत.या परतलेल्या पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संवाद साधला आहे.यावेळी जिल्हाधिकारी काकडे यांनी पर्यटकांशी बातचीत करत कश्मीरमध्ये आलेल्या अनुभवाची माहिती घेतली.सांगली जिल्ह्यातुन काश्मीरला पर्यटनासाठी 66 पर्यटक गेले होते,यापैकी 17 पर्यटक हे सुखरूप पणे आपल्या घरी परतलेले आहेत. तर इतर पर्यटक देखील विमान आणि रेल्वेने सांगली जिल्ह्यात परतण्यासाठी निघाले आहेत

Apr 26, 2025 07:20 (IST)

LIVE Updates: शाळा पदभरतीकरिता चाचणी कार्यक्रमाची (टी इ टी) घोषणा

शाळा पदभरतीकरिता चाचणी कार्यक्रमाची (टी इ टी) घोषणा

26 एप्रिल ते 10 मे दरम्यान ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत. नमूद परीक्षा शुल्क देखील 10 मे पर्यंत भरायचे आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन अंतर्गत तसेच शासनाच्या इतर विभागांच्या शाळांचा यात समावेश. 

उपलब्ध पदांच्या संख्येवरून उमेदवार निवडले जातील.

2018 आणि 2019 मध्ये झालेल्या परीक्षेत गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्या यादीत नाव आहे किंवा नाही ते सुद्धा नमूद करायचे आहे.

इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम अर्ज दाखल करताना नमूद करणे आवश्यक आहे.

Apr 26, 2025 07:19 (IST)

Beed News: खडकत राड्याप्रकरणी 90 लोकांवर गुन्हे दाखल

बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकत गावातील राड्याप्रकरणी 90 लोकांवर गुन्हे दाखल

पोलिसांनी 90 पैकी 45 लोकांची ओळख पटवली 

झेंड्याच्या वादावरून दोन गटात झाला होता वाद 

दोन्ही गटात तुफान दगडफेक आणि हाणामारी झाल्याची घटना

दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती