Nanded News: NDTV मराठीचा दणका! नांदेडच्या 'मटका किंग'ची 24 तासात पक्षातून हकालपट्टी

याबाबत सोमवारी (ता. 19 मे) एनडीटीव्ही मराठीने मटका किंगचा राष्ट्रवादीत प्रवेश असे वृत्त दाखवले होते. त्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश लाटकर, नांदेड: कोणालाही पक्षात प्रवेश देताना चारित्र्य तपासा , गुंड आणि दोन नंबदचे धंदे करणाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊ नका अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवेशाने अजित पवारांचे हे आदेश धुडकावल्याचे पाहायला मिळाले होते.  नांदेड शहरात मटका किंग म्हणून परिचित असलेल्या अन्वर खानला पक्षात प्रवेश दिल्यानंतर राष्ट्रवादीवर चौफेर टीका झाली होती. एनडीटीव्ही मराठीने ही बातमी लावून धरली होती. याबाबतच आता मोठी अपडेट समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहिती नुसार,  नांदेड शहरात मटका किंग म्हणून परिचित असलेल्या अन्वर खान याला अजित दादा राष्ट्रवादी पक्षाचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिला होता. याबाबत सोमवारी (ता. 19 मे) एनडीटीव्ही मराठीने मटका किंगचा राष्ट्रवादीत प्रवेश असे वृत्त दाखवले होते. त्यानंतर राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती.

आज (मंगळवार, ता. 20) राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मटका किंग अन्वर खान आणि त्याला प्रक्षात प्रवेश देण्यासाठी आग्रही असणाऱ्या व्यक्तीला पक्षातून काढून टाकल्याच सांगितलं आहे. अन्वर खान याला जो पक्षप्रवेश दिला ती आपली चूक झाली अशी कबुलीही आमदार चिखलीकर यांनी दिली आहे.

भाजपा नेते खासदार अशोक चव्हाण यांनी अन्वर खान याच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल टीका केली असून गुन्हेगारांना कोणत्याही पक्षाने राजाश्रय देऊ नये अशी भावना व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाची कान उघडनी करावी असा सल्लाही अशोक चव्हाण यांनी अजित पवार यांना दिला आहे.

Advertisement

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांचे मंत्रिमंडळात कमबॅक! महायुतीने काय साधलं? वाचा 5 मोठे मुद्दे

कोण आहे अन्वर खान?

अनवर अली खान हा प्रसिध्द मटका किंग खान आहे शिवाय त्याच्यावर मारामारी,बळजबरी जमिनीवर कब्जा करणे, बेकादेशीर शस्त्र बागळणे , हवेत गोळीबार, बायो डीझेल विकल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. शिवाय कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंघ रींदा याने घडवलेल्या संजय बियाणी हत्या प्रकरणात देखील अनवर अली खान याची संशयित म्हणून चौकशी करण्यात आली होती.

 (नक्की वाचा :  Exclusive: काश्मीरला जा, फोटो घे... ISI एजंट आणि हेर यांच्यात काय झाली चर्चा? )