Maharashtra Live Blog Updates: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी मीरा रोडमध्ये सभा झाली. त्यांनी या भाषणात हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, असा इशारा राज्य सरकारला दिला. दुसरीकडे ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी निवडणूक आयोगासह, भाजप शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. देशाला अशांत, अस्थिर करण्याचे भाजपचे धोरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
परिया-काकूरच्या घनदाट जंगलात 6 नक्षलवाद्यांना करण्यात आलं ठार
छत्तीसगडच्या परिया-काकूरच्या घनदाट जंगलात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीनंतर एकूण ०६ माओवाद्यांना ठार करण्यात आले आहेत. त्यांचे मृतदेह सापडले आहेत, ज्यात पीएलजीए प्लाटून क्रमांक ०१ च्या ०४ महिला कॅडरचा समावेश आहे. पीएलजीए प्लाटून क्रमांक ०१ कमांडर आणि विभागीय समिती स्तरावरील माओवादी राहुल पुनीम यांचा चकमकीत मृत्यू होणे हा अबुझंमाड परिसरातील माओवाद्यांसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. या पलटणाचा वापर प्रामुख्याने वरिष्ठ माओवादी नेत्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी केला जात होता.
रत्नागिरी शहरातील चौघांचा आरेवारे येथील समुद्रात बुडून मृत्यू
रत्नागिरी शहरातील चौघांचा आरेवारे येथील समुद्रात बुडून मृत्यू
आज संध्याकाळी अंदाजे 6.30 वाजताची घटना
दहा जणांचा ग्रुप फिरण्यासाठी म्हणून गेला होता आरेवारेच्या समुद्रकिनारी
समुद्रात पोहत असताना चौघांना लाटेने केले गिळंकृत
चारही जणांचा दुर्दैवी अंत
Live Updates: पुण्यात गुंडाचा राडा सुरूच
पुण्यात गुंडाचा राडा सुरूच
पुण्यातील गोखले नगर भागात पुन्हा गाड्यांची तोडफोड
गोखले नगर परिसरात 3 आरोपींकडून दुचाकी गाड्यांची तोडफोड
परिसरात दहशत माजवण्यासाठी आरोपींकडून वाहनांची तोडफोड
हातात पालघन घेत केलं वाहनांचं मोठं नुकसान
सोन्याच्या भावात 800 रुपयांची तर चांदीच्या भावात 1 हजार रुपयांची वाढ
सोन्याच्या भावात 800 रुपयांची तर चांदीच्या भावात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटीसह सोन्याचे भाव 1 लाख 1 हजार 249 रुपयांवर तर जीएसटीसह चांदीचे भाव 1 लाख 16 हजार 390 रुपयांवर पोहोचले आहे. जीएसटीविना सोन्याचे भाव 98 हजार 300 रुपये तर जीएसटी विना चांदीचे भाव 1 लाख 13 हजार रुपयांवर आहेत. जागतिक घडामोडीच्या परिणामामुळे सोन्याचे भाव पुन्हा एक लाखांच्या पार झाल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली आहे.
सावली बारच्या आरोपांवरून रामदास कदमांची सारवासारव
अनिल परब हा अर्धवट वकील आहे , बदनामीसाठी त्याने हे केलं
या आधी सुद्धा उद्धव ठाकरे आणि अनिल परब विरोधात गोष्टी केल्या आहेत
योगेश कदम मंत्री झालेत हे त्यांना खुपतं आहे
सावली बार आणि रेस्टाॅरंट आम्ही बंद केले आहे तिथे फक्त आॅरक्रेस्ट्रा चालत होता
सावली बार हा आम्ही चालवायला शेट्टी नावच्या व्यक्तीला दिला आहे
बदनामी करण्यासाठी हे केलं गेलं
अनिल परब यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार
Live Updates: पुण्यात ओला-उबेर, रिक्षा चालकांचा अनिश्चितकालीन संप
पुण्यात ओला-उबेर आणि रिक्षा चालकांनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. मीटरवर भाडे लागू करावे, ई-बाईक टॅक्सी सेवा बंद करावी, अशा मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. संपामुळे विमानतळ, स्टेशन आणि शहरात प्रवाशांचे हाल सुरू असून, प्रवासासाठी वाढीव दर आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, प्रशासनाने नियमबाह्य दर आकारल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
Live Updates: पुण्यात इंजिनिअरच शिक्षण घेणाऱ्या टॉपर विद्यार्थ्याकडून सोन्याची चोरी
पुण्यात इंजिनिअरच शिक्षण घेणाऱ्या टॉपर विद्यार्थ्याकडून सोन्याची चोरी
कॉलेजचा टॉपर विद्यार्थी सोने चोरताना CCTV मध्ये कैद
पुणे पोलिसांनी कर्नाटक राज्यात ट्रॅप लावून तरुणाला केली अटक
पुण्यात चोरी करून तरुण पळाला कर्नाटकला
कर्नाटक येथून आरोपीला पुणे पोलिसांकडून करण्यात आली अटक
पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना
५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी आरोपीकडून केला जप्त
Live Updates: पुण्यात इंजिनिअरच शिक्षण घेणाऱ्या टॉपर विद्यार्थ्याकडून सोन्याची चोरी
पुण्यात इंजिनिअरच शिक्षण घेणाऱ्या टॉपर विद्यार्थ्याकडून सोन्याची चोरी
कॉलेजचा टॉपर विद्यार्थी सोने चोरताना CCTV मध्ये कैद
पुणे पोलिसांनी कर्नाटक राज्यात ट्रॅप लावून तरुणाला केली अटक
पुण्यात चोरी करून तरुण पळाला कर्नाटकला
कर्नाटक येथून आरोपीला पुणे पोलिसांकडून करण्यात आली अटक
पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना
५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी आरोपीकडून केला जप्त
Live Updates: चंद्रभागेत तीन महिला बुडाल्या
चंद्रभागा नदीमध्ये आज सकाळी तीन महिला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाले आहेत. यामध्ये दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील सुनीता सपकाळ आणि संगीता सपकाळ अशा दोन महिला भाविकांची नावे आहेत. तिसऱ्या महिला भाविकांचा चंद्रभागा नदीत शोध सुरू आहे. उजनी धरणातून गेल्या 2 दिवसापूर्वी मोठ्या क्षमतेने पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नदी पात्रात अधिकचे पाणी असल्याने या महिला भाविक बुडाल्या.
Beed News: जिल्हा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह: कैद्याकडून जप्त करण्यात आला गांजा
बीडच्या कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत असून एका कैद्याजवळ 100 ग्रॅम गांजा आढळून आला.. या कैद्याने एका बॉलमधून हा गांजा आणण्याचा प्रकार उघडकिस आला असून आता या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. बीड जिल्हा कारागृहात संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड सह अन्य साथीदार देखील न्यायालयीन कोठडीत असून यापूर्वी येथे कैद्यामध्ये मारहाणीच्या घटना देखील घडल्या होत्या.. आता तर थेट गांजा आढळून आलेले कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे..
Beed News: बीडमध्ये तरुणाला बेदम मारहाण
- बीड शहरात पेठ बीड भागातुन आणखी एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर.. तीन ते चार जणांकडून बेदम मारहाण.
- मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ आला समोर.
- आकाश माने असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बीड शहरातील बहिरवाडी परिसरात घरी जाऊन मारहाण केली.
- तर मारहाण करणाऱ्यांमध्ये फरार कुख्यात आरोपी सिद्धार्थ जाधव, रोहित जाधव आरोपींचा समावेश. चोरी, मारहाण, गोळीबार, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
- मारहाण 8 दिवसांपूर्वी केली आहे मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे..
- दहशतीमुळे अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे.
Live Updates: दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक
इंडिया आघाडीची उद्या बैठक
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी इंडिया आघाडीची बैठक
ऑनलाइन पद्धतीने बैठक पार पडणार
ऑनलाइन पद्धतीने बैठकीला सगळे प्रमुख नेते लावणार हजेरी
मोदी सरकारला घेरण्याची रणनीती ठरवली जाणार
आम आदमी पार्टी बैठकीला जाणार नाही.
टीएमसी ने बैठकीला जाण्यास नकार दिला होता परंतु ॲानलाईन बैठक असेल तर टीएमसी सहभाग घेणार
ॲापरेशन सिंदूर, वोटर लिस्ट रिवीजन, विमान अपघात अशा अनेक मुद्द्यांवर रणनीती ठरविली जाणार
Live Updates: मुंबई गोवा महामार्गावर टँकरला आग
मुंबई गोवा महामार्गावर टँकरला आग
केमिकल वाहून नेणारा टँकर असल्याची प्राथमिक माहिती
राजापूर तालुक्यातील पन्हाळे माळवाडी येथील घटना
गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता टँकर
टँकरच्या चाकांनीही घेतलाय पेट
आग विझवण्यासाठी अजूनही यंत्रणा दाखल नाही
स्थानिक लोकांकडून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक थांबवली
LIVE Updates: कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय
- कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय
- केंद्रीय नोडल संस्थांच्या खरेदी केंद्रांवर आता असणार राज्य शासनाचे नियंत्रण
- नाफेड आणि NCCF च्या केंद्रावर दक्षता समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी
- राज्यातील एकूण 13 केंद्रांवर समितीची स्थापना
- महसूल, पणन विभाग, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समितीमध्ये असणार समावेश
- या दोन्ही संस्थांकडून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीत गैरव्यवहार होत असल्याच्या शेतकरी तसेच शेतकरी
संघटनांकडून शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या तक्रारी
LIVE Updates: अखेर छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाला टाळे
अखेर छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाला टाळे
बालगृहात मुलींचे छळ केल्याप्रकरणी बालगृहाला टाळे लागले आहे
बालगृहातील ६४ मुलींना राज्यातील वेगवेगळ्या ३ संस्थांमध्ये स्थलांतरित करण्यात आले
उर्वरित मुलींना पालकांकडे सोपविण्यात आले
विद्यादीप बालगृहातील मुलींवर होणाऱ्या अन्यायाला NDTV मराठीने वाचा फोडला होता.
NDTV मराठीने दाखवली पीडित मुलींची आपबीती
Live Updates: जळगावमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने घेण्यात आली आढावा बैठक
जळगाव मध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली असून समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण जातनिहाय जनगणना तसेच आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.
Live Updates: नक्षली चकमक 6 नक्षली ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना संपवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, नारायणपूर जिल्ह्यात ऑपरेशन मान्सून सुरू झाले आहे. महाराष्ट्राच्या अबुझमाड सीमेवर सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांना घेरण्यासाठी दल संयुक्त ऑपरेशन चालवत आहे. मृतांमध्ये नक्षल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहॆ पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या नेत्यांवर पकड घट्ट केली आहे.