Amol Mitkari: 'माझ्या लढाईचं हेच फळ', विधान परिषद नाकारल्यानंतर मिटकरींचा थेट इशारा

विधान परिषदेच्या शर्यतीमधून अमोल मिटकरींचा पत्ता कट झाला आहे. विधानपरिषदेचे तिकीट गेल्यानंतर अमोल मिटकरींनी ट्वीट करत जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Amol Mitkari News:  विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. दिवंगत नेते अजित पवार यांचे विश्वासू अमोल मिटकरी यांना पुन्हा एकदा संधी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र विधान परिषदेच्या शर्यतीमधून अमोल मिटकरींचा पत्ता कट झाला आहे. विधानपरिषदेचे तिकीट गेल्यानंतर अमोल मिटकरींनी ट्वीट करत जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

Nashik News: कुणी नोकरी देतं का नोकरी? डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरची खंत; एकनाथ शिंदेंविरोधात नाराजी

काय म्हणालेत अमोल मिटकरी? 

"माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल ही मानसिक तयारी २९ जानेवारीलाच केली होती दादा.. हरकत नाही. दादा तुमच्यासाठी 'एक संधी' काय अशा 'हजार संधी' हा अमोल मिटकरी ओवाळून टाकेल. तुमची लढाई कालही लढत होतो, आजही लढत आहे आणि उद्याही लढत राहील , या लढाईत कोणी सोबत असो अथवा नसो न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबवणार नाही तीच तुम्हाला खरी श्रद्धांजली ठरेल! अपघाताचं सत्य समोर येईपर्यंत मी शांत बसणार नाही, वेळ पडल्यास याहीपेक्षा मोठी किंमत चुकवेल, जान भी देंगे" असा थेट इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात विधान परिषद निवडणुकीसाठीचे वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारण्याऐवजी अंबादास दानवेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेस नाराज झाल्याची चर्चा असून काँग्रेसही आपला उमेदवार या निवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

एकीकडे या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या बैठकीतून एकनाथ शिंदे हे तडकाफडकी निघून गेले. शिवसेनेचे नेते आणि उपनेते यांची बुधवारी रात्री बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत नीलम गोऱ्हे यांना पुन्हा विधान परिषदेवर उमेदवारी देऊ नये अशी मागणी करण्यात आली. ही बैठक सुरू असतानाच एक फोन आल्याने एकनाथ शिंदे हे बैठक सोडून तातडीने निघून गेले.

Purandar Airport: पुरंदरचे शेतकरी होणार मालामाल! विमानतळ मोबदल्याचे पॅकेज ठरले; प्रति एकर 'इतके' कोटी मिळणार