जाहिरात

Nashik News: कुणी नोकरी देतं का नोकरी? डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरची खंत; एकनाथ शिंदेंविरोधात नाराजी

सातवा डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला होता. मात्र याचवेळी त्याने आपल्याला शासकीय नोकरी मिळत नसल्याची खंत जाहिरपणे व्यक्त केली होती.

Nashik News: कुणी नोकरी देतं का नोकरी? डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरची खंत; एकनाथ शिंदेंविरोधात नाराजी

Maharashtra Kesari Harshawardhan Sadgir:  गेल्याच महिन्यात पार पडलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चांगलीच चर्चेत ठरली होती. अंतिम रोमांचक सामन्यात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाडचा 4 - 2 असा पराभव करून 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 जिंकली होती. हर्षवर्धनने दुसऱ्यांदा गदा जिंकून सातवा डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला होता. मात्र याचवेळी त्याने आपल्याला शासकीय नोकरी मिळत नसल्याची खंत जाहिरपणे व्यक्त केली होती.

Purandar Airport: पुरंदरचे शेतकरी होणार मालामाल! विमानतळ मोबदल्याचे पॅकेज ठरले; प्रति एकर 'इतके' कोटी मिळणार

हर्षवर्धन सदगीर नोकरीच्या शोधात 

विशेष म्हणजे आज 38 दिवस उलटून देखिल हर्षवर्धन नोकरीपासून वंचित आहे. नाशिक महापालिकेत क्रिडा अधिकारी म्हणून काम करण्याची त्याची ईच्छा आहे, याबाबत त्याने पत्रव्यवहार करत अनेक मंत्र्यांसोबतच अधिकाऱ्यांशी देखिल अनेक वेळा संपर्क साधला आहे मात्र नक्की काम कुठे रखडलय ? अद्याप नोकरी का मिळत नाहीये ? याचे उत्तर हर्षवर्धनला मिळत नसून नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदेंविरोधात हर्षवर्धनने नाराजी व्यक्त केली आहे.

दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवून देखील मला अशी वागणूक मिळत असेल तर इतर खेळाडूंनी नक्की काय आदर्श घ्यावा ? असा प्रश्न हर्षवर्धनने NDTV मराठीच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. मला हिंदकेसरीसह आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील जाण्याची इच्छा आहे मात्र त्यासाठी मला नोकरी मिळणे आवश्यक असून सरकारने लवकरात लवकर माझ्या मागणीची दखल घ्यावी अशी विनंती देखील त्याने केली आहे.

Ahilyanagar News: रात्रीच्या अंधारात पापाचा खेळ! गर्भलिंग तपासणीचे मोबाईल नेटवर्क उद्ध्वस्त

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com