21 minutes ago

Maharashtra LIVE Blog:   महायुती सरकारमध्ये एकता नसल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या खात्यांवर लक्ष ठेवून असल्याचेही म्हटले जाते. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात काही निर्णयांवर ब्रेक लावला आहे. या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील आणखी एक निर्णय रद्द करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे सरकारच्या काळात मंजूर झालेली शेतकरी भवन योजना रद्द करण्यात आली आहे.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे आणि दहशतवाद्यांवर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Advertisement
Apr 30, 2025 15:41 (IST)

LIVE Updates: अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरण, कोर्टाने सरकारला झापलं

अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी सकाळी पार पडली 

कोर्टाच्या आदेशानंतरही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने कोर्टाने पुन्हा सरकारला झापल

सरकारी पक्षाने केली दंडाधिकारी अहवालाची मागणी 

दंडाधिकारी अहवालात अक्षय शिंदेच्या मृत्यूला पोलीस अधिकारी जबाबदार असल्याच नमूद

 गुन्हे शाखेचे  सह पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश 

 आज चार वाजता पुन्हा सुरू होणार सुनावणी

Apr 30, 2025 15:39 (IST)

LIVE Updates: आषाढी वारी सोहळा! 18 जूनला होणार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम देहू संस्थानकडून जाहीर करण्यात आला आहे. 18 जूनला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ही देहूतून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवणार आहे.

यावर्षी देहू संस्थान कडून 340 वा पालखी सोहळा साजरा करण्यात येत आहे. यावर्षी होणाऱ्या तुकोबांचा पालखी सोहळयाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाकडून प्रकाशित करण्यात आली. यावर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या दरम्यान रस्त्याने ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 

नवीन पालखी मार्ग हा मोठा झाल्याने त्या मार्गावर वारकऱ्यांना सावलीसाठी झाडे नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी वृक्षारोपण करून येणाऱ्या पुढील काही वर्षात याची मोठी डेरेदार झाडे तयार होतील आणि वारकऱ्यांना भविष्यात सावली निर्माण होईल असा निर्धार या वारी सोहळ्यात देहू संस्थानकडून करण्यात आला आहे.

Apr 30, 2025 15:36 (IST)

LIVE Updates: कल्याणमध्ये महाराष्ट्र कलाशाचे स्वागत

 राष्ट्रवादीतर्फे महाराष्ट्र गौरव रथ यात्रा काढण्यात आली आहे. या रथ यात्रेत देशातील नद्याचे जल आणि विविध किल्ल्यावरील माती असलेला कलश आणला जात आहे. ही यात्रा संगमेश्वरहून निघाली आहे. या यात्रा आज कल्याणमध्ये दाखल झाली. या महाराष्ट्र कलशाचे कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकात जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. ही यात्रा आत्ता वसई किल्ल्याच्या दिशने मार्गस्थ झाली आहे. या यात्रेची सांगता वसई किल्ल्यावर होणार आहे.

Apr 30, 2025 14:37 (IST)

LIVE Updates: माजी विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर यांचे निधन

विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते, माजी विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर यांचे आज 12.30 वाजताच्या सुमारास चेन्नई येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. 

Advertisement
Apr 30, 2025 13:51 (IST)

LIVE Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुक्काम आता 'वर्षा'वर!

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून वर्षा या निवासस्थानी राहायला जाणार आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते वर्षावर गेले नव्हते. अखेर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी वर्षामध्ये प्रवेश केला आहे. 

Apr 30, 2025 13:37 (IST)

LIVE Updates: केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक संपली! 3 वाजता पत्रकार परीषद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची बैठक पूर्ण झाली आहे. दुपारी ३ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची ब्रीफिंग होईल. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी सर्वांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी सीसीएस, सीसीपीए आणि सीसीईएच्या बैठकांमध्येही भाग घेतला होता.

Advertisement
Apr 30, 2025 13:33 (IST)

LIVE Updates: दिल्लीत मोठा निर्णय! राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात बदल

सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात बदल केले आहेत. माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल पीएम सिन्हा, माजी दक्षिणी आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग आणि रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना हे लष्करी सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत. राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग हे भारतीय पोलिस सेवेतील दोन निवृत्त सदस्य आहेत. बी व्यंकटेश वर्मा हे सात सदस्यांच्या मंडळावर निवृत्त परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत.

Apr 30, 2025 13:30 (IST)

LIVE Update: दिल्लीत मोठ्या घडामोडी! पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय यंत्रणांमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते.

Advertisement
Apr 30, 2025 13:17 (IST)

Kalyan News: 17 वर्षीय विद्यार्थ्याला बसने चिरडले, कल्याणमधील घटना

कल्याणमध्ये 17 वर्षीय स्कूटी स्वार एका विद्यार्थ्याला एसटी बसने चिरडले. या अपघातात अमनकुमार संदीप दुबे या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी एसटी चालक संतोष गायकवाड याला ताब्यात घेतले आहे.

Apr 30, 2025 13:09 (IST)

Satara News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावध्ये, धार्मीक कार्यक्रमाला लावणार हजेरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी दाखल. मंदिराच्या एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त ते आज दरेगावात आले असून हा कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेच ते पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

Apr 30, 2025 12:54 (IST)

LIVE Updates: मराठी IAS अधिकारी सुजाता चतुर्वेदी यांची UPSC सदस्यपदी निवड

मराठी IAS अधिकारी सुजाता चतुर्वेदी यांची UPSC सदस्यपदी निवड

सुजाता चतुर्वेदी या बिहार केडरच्या IAS अधिकारी

चतुर्वेदी या क्रीडा मंत्रालयाच्या सचिव होत्या तसेच त्यांच्याकडे श्रम मंत्रालयाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला होता

अलीकडच्या काळात UPSC च्या सदस्य पदी निवड होणाऱ्या त्या दुसऱ्या मराठी अधिकारी

एअर मार्शल अजित भोसले हे यापूर्वी UPSC चे सदस्य होते

UPSC च्या पॅनलमधे 10 सदस्य असतात त्यात आता सुजाता चतुर्वेदी या देखील असतील

Apr 30, 2025 11:37 (IST)

Pune News: पुण्यातील 50 नागरिक अजूनही जम्मू काश्मीरमध्येच: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

पुणे शहरातील 50 नागरिक अजूनही जम्मू काश्मीरमध्येच 

पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

काश्मीरमध्ये अडकलेल्या 650 लोकांशी आमचा संपर्क झाला होता, त्यापैकी 600 लोकं परत आली आहेत 

अजून 50 लोकं तिकडे आहेत ते स्वईच्छेने तिकडे थांबले आहेत 

पहिल्या २ दिववसात आमचा संपर्क झाला होता त्यानुसार नियोजन केले होते 

काही लोकांनी थांबण्याचा निर्णय घेतला आहे, कारण त्यांना काश्मिरी लोकांनी त्यांची व्यबस्था केली, असून त्यांना सुरक्षेची हमी दिली आहे

Apr 30, 2025 10:53 (IST)

LIVE Updates: महायुतीच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणेचा उद्या निकाल

Apr 30, 2025 10:33 (IST)

Pune News: पुणे विमानतळाचे वेळापत्रक बिघडले

पुणे विमानतळाचे वेळापत्रक पुन्हा बिघडले 

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वेळापत्रक सोमवारी मध्यरात्री नंतर पुन्हा बिघडल्याचे दिसून आले

पुण्यातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा 18 ते 20 विमानांना वीस मिनिटांपासून ते अडीच तासांपर्यंत उशीर झाला 

त्यामध्ये सर्वाधिक विमाने ही दिल्लीला जाणारी होती 

पुणे विमानतळावर बॅगेज सिस्टीम मध्ये काही वेळ झालेला बिघाड आणि दिल्ली विमानतळावरील एक धावपट्टी बंद केल्यामुळे विमानांना उशीर झाल्याचे सांगितलं जात आहे 

सोमवारी मध्यरात्री 12 पासून ते मंगळवारी पहाटे चार पर्यंत पुण्याहून दिल्ली, चेन्नई, नागपूर, जयपूर, लखनऊ, कोलकत्ता, बेंगलोर येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना झाला उशीर

Apr 30, 2025 10:31 (IST)

LIVE Updates: दूध संस्थेच्या निवडणुकीनंतर गोळीबार करत जल्लोष

कोल्हापुरात दूध संस्थेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर गोळीबार करत जल्लोष 

हणमंतवाडी गावांमधील धक्कादायक प्रकार 

दूध संस्थेच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर  माजी सरपंच संग्राम भापकरने यांनी केला हवेत गोळीबार

गावातील इर्षा दूध संस्था निवडणुकीत आली दिसून

हवेत गोळीबार करणारे रिल समाज माध्यमावर व्हायरल

Apr 30, 2025 09:55 (IST)

LIVE Updates: शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठा विधी

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या प्रति तूळजापूर भवानी मंदिरात शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते देवीच्या प्राणप्रतिष्ठा विधिला सुरुवात, राष्ट्रवादी चे नेते अनिल देशमुख, आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित.

Apr 30, 2025 08:47 (IST)

LIVE Updates: अक्षय तृतीयनिमित्त दगडूशेठ मंदिरात आकर्षक सजावट, 11000 आंब्याची आरस

अक्षय तृतीय निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भव्य फुलांची आरास

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

पहाटेपासूनच भाविकांची मोठी लाईन 

बाप्पाला तब्बल अकरा हजार आंब्यांचा नैवेद्य 

बाप्पाच्या मूर्तीला तब्बल 11000 आंब्याची आरस

मंदिराच्या बाहेरील परिसराला सुद्धा आकर्षक फुलांची सजावट

Apr 30, 2025 08:45 (IST)

Pune News: पुण्यातील महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार, काही विद्यार्थी निलंबित

पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग चा प्रकार समोर 

काही विद्यार्थ्यांना केलं निलंबित 

मात्र माहिती बाहेर येवू नये यासाठी महाविद्यालयाकडून खबरदारी 

थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी केली तक्रार त्यानंतर चक्र फिरली 

ससूनचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांचं या प्रकरणावर मौन 

अस्थिरोग विभागांतील विद्यार्थ्याचे रॅगिंग झाल्याची माहिती

Apr 30, 2025 08:42 (IST)

LIVE Updates: दिशा सालियन मृ्त्यू प्रकरण! वडिलांची पुन्हा हायकोर्टात धाव

दिशा सालीयन मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा खटला सतीश सालियन आणि तर्फे निलेश ओझा लढत आहेत. मागील सुनावणीला न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्याकडे हा खटला सुनावणीसाठी आला होता मात्र हा खटला या न्यायमूर्तींसमोर होऊ नये अशी वागडी निलेश ओझा यांनी केली होती. त्यानुसार या सुनावणी न्यायमूर्तींनी नोट बी फोर मी असेच सांगत खटला दुसऱ्या न्यायमूर्तींकडे देण्यात आला. आज हा खटला नेमका कोणत्या न्यायमूर्तींकडे सुनावणीसाठी येणार ,   खटल्याची सुनावणी होणार की पुन्हा पुढील तारीख पडणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Apr 30, 2025 08:09 (IST)

LIVE Updates: पहलगाम हल्ल्यानंतर पोलीस अलर्ट! पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी गस्त वाढवली

जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यंटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे अनुषंगाने संपूरण देशभरात संतापाची लाट उसळली असून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत.

या पार्श्वभूमीवर  पिंपरी चिंचवड शहरामध्ये शांतता अबाधित राखण्यासाठी व कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठया प्रमाणावर व्हिजीबल पोलीसिंग राबवले जात आहे

Apr 30, 2025 08:07 (IST)

LIVE Updates: कोल्हापुरकरांसाठी गुड न्यूज! बंगळुरु आणि हैद्राबादसाठी विमानसेवा सुरु होणार

कोल्हापूरकरांसाठी खुशखबर आहे. कोल्हापूर विमानतळावरून आता स्टार एअरवेजकडून बंगळुरू आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी येत्या 15 मेपासून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या स्टार एअरवेजकडून कोल्हापूर ते तिरुपती, अहमदाबाद, मुंबई या शहरांसाठी विमानसेवा दिली जाते. याआधी फक्त इंडिगो कंपनी या दोन शहरासाठी विमान सेवा होती. पण प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन स्टार एअरवेजने देखील याच मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Apr 30, 2025 08:02 (IST)

Accident News: ट्रकच्या धडकेत पोलीस मुख्यालयातील लिपिक ठार

दुचाकीने कर्तव्यावर जात असलेल्या गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाच्या दुचाकीला एका हायवा ट्रकने जोरदार धडक दिल्याने लिपिकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील चंद्रपूर मार्गावरील कॉम्प्लेक्सस्थित जिल्हा सत्र व न्यायालय चौकात घडली. विलास शंकर वासनिक (५७, रा. मुरखळा, ता. जि. गडचिरोली) असे अपघातात ठार झालेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे

Apr 30, 2025 08:00 (IST)

Amravati News: भाजपमध्ये अंतर्गत कलह, खासदार अनिल बोंडेंचा फोटो फ्लेक्सवरुन गायब

अमरावतीत भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीचे राजकारण चव्हाट्यावर... 

अचलपुरचे आमदार प्रवीण तायडे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावरून अनिल बोंडेंचा फोटो गायब...

तायडेच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी लागलेल्या फ्लेक्सवर भाजपा खासदार अनिल बोंडेचा फोटो नाही 

यामुळे अनिल बोंडे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता....

Apr 30, 2025 07:59 (IST)

LIVE Updates: अमरावतीत भाजप शहर जिल्हाध्यक्ष निवडीला वेग

 अमरावतीत भाजप शहर जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग...

भाजपचे जेष्ठ नेते 78 वर्षीय माजी आमदार अरुण अडसड, साहेबराव तट्टे यांनी शहर जिल्हाध्यक्ष निवडीसाठी नोंदविले मत...

अमरावतीत भाजपा शहर जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपकडून चाचपणी सुरू...

 शहराध्यक्षांसाठी राधा कुरिल, नितीन धांडे यांचे तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी नितीन गुडधे पाटील, दिनेश सूर्यवंशी यांचे नाव चर्चेत...

 

* पुढच्या आठवड्यात शहर जिल्हाध्यक्षांच्या नावांची होणार अधिकृत घोषणा...

Apr 30, 2025 07:33 (IST)

LIVE Updates: पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला गती वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी खा. नारायण राणेंचा आग्रह

वीज पुरवठा खंडित झाल्याच्या रागातून वीज अधिकाऱ्याला मारहाण चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

नारायण राणे हे भाजपाचे खासदार आहेत की शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख..? माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका

सावंतवाडीत दाखल झालेल्या नव्या एसटी बस मध्ये पहिल्याच दिवशी बिघाड ठाकरे सेनेची नाराजी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महासंचालक पोलीस पदक जाहीर

Apr 30, 2025 07:14 (IST)

LIVE Updates: पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज.. खासदारांची मेळघाट परिसरात पाहणी..

पाणी टंचाई संदर्भात खासदार बळवंत वानखडे यांची मेळघाट मधील धारणी येथे आढावा बैठक..

मेळघाट परिसरातील आदिवासी बांधवांना पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार.. खा. बळवंत वानखडे 

मे महिन्यात आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा वाढवणार.

Apr 30, 2025 07:14 (IST)

LIVE Updates: मालेगावात वक्फ सुधारणा विधेयकास आंदोलन

केंद्र सरकारने लागू केलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी नाशिकच्या मालेगावात सुरू असलेल्या तीन दिवसीय आंदोलनाचा भाग म्हणून दुसऱ्या दिवशी मुस्लिम बांधवांनी निषेध सभा घेत या विधेयकाला विरोध केला.मुस्लिम पर्सनल लो बोर्डाचे सचिव मौलाना उमरैन महेफुज रहेमान यांच्या नेतृत्वाखाली. मालेगावात सुरू असलेल्या आंदोलनात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.मुस्लिम विरोधी हा काल कायदा तात्काळ मागे घ्यावा अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.