2 months ago

महायुतीच्या नेत्यांची वादग्रस्त विधानांची मालिका काही थांबत नसल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सरकारी निधीवरुन केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. पाहिजे तेवढा निधी घ्या, आपल्या बापाचा जात नाही, असे वक्तव्य त्यांनी केले, ज्यावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Aug 04, 2025 18:30 (IST)

LIVE Update: डान्सबार तोडफोड प्रकरणी मनसे नेते योगेश चिले यांच्यासह 8 जणांना जामीन मंजूर

पनवेल येथील ऑर्केस्ट्रा आणि बार तोडफोड प्रकरणे मनसे प्रवक्ते योगेश  चिले यांच्यासह 8 जणांना पनवेल न्यायालयाने जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.  या वेळेला जामीन मंजूर झाल्यानंतर मनसे नेते योगेश चिले आणि गजानन काळे यांनी नवी मुंबई आणि पनवेल मधील डान्सबार बाबत आम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्तांना यांना निवेदन देणार आहोत असं सांगितलं.  15 दिवसाची ही वेळ असणार  त्यानंतर आम्ही धडक पणे कारवाई  पनवेल नवी मुंबई शहरात करणार आहेत असं ते म्हणाले. 

Aug 04, 2025 16:08 (IST)

संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई वेळी जोरदार राडा

संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई वेळी जोरदार राडा झाला आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथबा सोबत स्थानिकांची झडप झाली. यावेळी सौम्यलाठी चार्जही करण्यात आला. 

Aug 04, 2025 15:49 (IST)

पहिल्यांदा जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार - संजय शिरसाट

सर्वोच्च न्यायालयाने जो आज निकाल दिला त्या पद्धतीने निवडणूक होतील. प्रभाग रचना काम सुरू झाले आहे. महापालिका प्रभाग रचना 6 ऑगस्ट रोजी निवडणूक आयुक्त कडे दाखल होतील. पहिले जिल्हा परिषद निवडणुका होईल नंतर महापालिका होतील.

Aug 04, 2025 15:47 (IST)

माजी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची ED कडून चौकशी सुरू

माजी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची  ED कडून चौकशी सुरू

 ED कडून पवार दाम्पत्याला चौकशीसाठी ED च्या वरळी कार्यालयात हजर राहण्यासाठी बजावलं होतं समन्स

ईडीच्या पथकाने २९ जुलै रोजी  पवारांच्या वसई येथील शासकीय निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित १२ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या.

Advertisement
Aug 04, 2025 15:42 (IST)

LIVE Update: पंढरपुरात शिवसेनेच्या दोन गटात तुफान राडा

शिवसेनेच्या दोन गटांमध्ये पंढरपूरमध्ये राड शिवसेनेचे परक नेते शिवाजी सावंत यांच्या राजीनामे नंतर आज पंढरपूर शासकीय विश्राम गृहात बैठक बोलावण्यात आली होती पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला डावलल जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यांच्या समर्थनात अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते त्यानंतर पक्षाचे निरीक्षक संजय कदम यांनी बैठक बोलावली होती त्यांच्या समोरच दोन गट एकमेकांविरुद्ध भिडले. सोलापूर जिल्ह्यात शिवाजी सावंत विरुद्ध महेश साठे असे दोन गट निर्माण झाले आहेत

Aug 04, 2025 11:39 (IST)

LIVE Updates: ठाकरे बंधूमुळे मुंबई महापालिकेत भाजप अलर्ट मोडवर

ठाकरे बंधूमुळे मुंबई महापालिकेत भाजप अलर्ट मोडवर

मुंबई भाजपच्या आज विविध सेलच्या बैठका

मुंबईच्या प्रत्येक वॉर्डचा आढावा घेतला जाणार

मुंबईतील मराठी, हिंदी भाषिक व गुजराती मते वळवण्यासाठी रणनिती ठरणार

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी बोलावली बैठक

बैठकीला मुंबईचे आमदार, प्रमुख नेते आणि  विविध सेलचे प्रमुख उपस्थित राहणार

आशिष शेलार, गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर बैठकीसाठी उपस्थित

Advertisement
Aug 04, 2025 08:31 (IST)

LIVE Updates: देशभरात शिवसेना वाढवण्यासाठी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

देशभरात शिवसेना वाढवण्यासाठी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

इतर राज्यातही शिवसेनेचा प्रचार व विस्तार केला जाणार

त्यासाठी शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते व खासदार यांच्यावर जबाबदारी

प्रत्येक ज्येष्ठ नेत्यावरती एका राज्याची जबाबदारी

त्या राज्याचा दौरा करून आढावा घेऊन पक्षाची बांधणी त्या राज्यात करावी लागणार

आनंदराव अडसूळ, गजानन कीर्तिकर, नीलम गोरे, रामदास कदम, अशा इतर नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

Aug 04, 2025 07:49 (IST)

Live Update: लातूर जिल्ह्यातील 44 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबीत

र्जेदार आणि योग्य दरात खते बियाने किटक नाशके शेतकऱ्यांना मिळावीत त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग अलर्ट असून 2873 कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 44 कृषा सेवा केंद्रांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत. तर तपासणी दरम्यान अनियमितता आढळून आल्याने कीटकनाशक विक्री करणाऱ्या एका आणि 28 बियाणे विक्रेत्यांवर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला शिवाय उदगीरात एक आणि निलंग्यात दोन असे तीन गुन्हे अनधिकृत साठा प्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान शेतकऱ्यांना शंका आल्यास तत्काळ कृषी विभागाकडे तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Advertisement
Aug 04, 2025 07:26 (IST)

LIVE Update: निवळी येथे गणपतीपुळे रोडवर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी

निवळी येथे गणपतीपुळे रोडवर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी 

 निवळी - गणपतीपुळे रोडवरची घटना

 वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही 

जिल्ह्यात गॅस टॅंकर पलटी होण्याची मागील दोन महिन्यातील तिसरी घटना 

टॅंकर पलटी झाल्यानंतर गॅस लिकेजचा कोणताही धोका नाही 

 जखमी टँकर चालकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले

Aug 04, 2025 07:14 (IST)

LIVE Update: आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दुसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी

बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे,श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी भाविकांनी रविवारी मध्यरात्रीपासून मंदिरामध्ये दर्शनसाठी रांगा लावल्या आहेत, पोलीस निरीक्षक गणपत राहिरे आणि देवस्थानचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी प्रभू नागनाथाची सपत्नीक महापूजा केली व दुग्धाभिषेक केल्यानंतर मध्यरात्रीनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक औंढा नागनाथ येथे दर्शनासाठी दाखल झाले असून 'हरहर महादेव', 'बम बम भोले' जयघोषात  मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.. भाविकांची गर्दी लक्षात घेता नागनाथ मंदिर परिसरात पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे...

Aug 04, 2025 06:41 (IST)

LIVE Update: चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

जागेचा मालक आणि ठेकेदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा झाला होता मृत्यू

छत्रपती संभाजीनगरच्या भोईवाडा भागात घडली होती घटना

मौलाना महेफुजुर रहेमान, उबेद उरहेमान  ठेकेदार जाकीर असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव 

मागील चार-सहा महिन्यांपासून हे खड्डे खोदलेले होते.

Aug 04, 2025 06:27 (IST)

LIVE Update: चिनी बेदाण्यावर बंदीसाठी द्राक्ष बागायतदाराचा सांगलीत होणार मोर्चा

चिनी बेदाण्यावर बंदी घालावी आणि चिनी बेदाणा विकणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी द्राक्ष बागायतदार 6 ऑगस्ट रोजी सांगलीत मोर्चा काढण्यात येणार आहे. सांगली महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. 

Aug 04, 2025 06:26 (IST)

LIVE Update: मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची खालापूर ऑर्केस्ट्रा बारवर रात्री धडक

पनवेल येथील शेकापच्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या बारच्या मुद्द्यानंतर पनवेल मधील मनसे आक्रमक होत काल पनवेल तालुक्यातील बार फोडल्यानंतर आज रायगड मधील मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या सह टीम ने  खालापूर तालुक्यातील सर्व ऑर्केस्ट्रा बार ची पाहणी केली. 

Aug 04, 2025 06:25 (IST)

LIVE Update:नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने भाजीपाल्याची आवक वाढली.....

नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असल्याने भाजीपाल्याची आवक चांगली वाढली आहे त्यामुळे भाजीपाल्याचे दरात काही प्रमाणात घट झाली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याच्या दिलासा मिळणार आहे गेल्या काही महिन्यापासून भाजीपाल्याची आवक घटली असल्यामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भेटले होते त्यामुळे भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात काहीशी घसरण झाल्याने गृहिणींच्या आर्थिक गणित पुन्हा बसणार आहे. टमाटे साठ रुपये किलो, वागले ८० रुपये किलो, गिलके ८० रुपये किलो, त्यासोबत कोबी मेथी या भाज्यांचे दर देखील १०० च्या आत आले आहेत त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणितात काहीशी फरक पडला आहे.