Maharashtra Live Updates: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बडे नेते वादाच्या भोवऱ्यात अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. शिंदे गटाचे संजय गायकवाड, संजय शिरसाट, अर्जुन खोतकर आणि संदीपान भुमरे यांचे एकामागून एक प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे शिंदेंचे शिल्लेदार अडचणीत आले असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्लीचा दौरा केला. त्यामुळे त्यांचा हा दौरा देखील चर्चाच विषय ठरत आहे.
LIVE Update: मनसेचे नाशिकच्या इगतपुरीत 14 ते 16 जुलै दरम्यान होणार शिबीर
- मनसेचे नाशिकच्या इगतपुरीत 14 ते 16 जुलै दरम्यान होणार शिबीर
- मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणार शिबिर
- राज्यातील सर्व प्रदेश सरचिटणीस, उपाध्यक्ष, शहर प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष राहणार शिबिराला उपस्थित
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि शिवसेना ठाकरे गट युतीवर चर्चा होण्याची शक्यता
- राज ठाकरे राज्यातील आलेल्या नेत्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष
LIVE Updates: घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बाणेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बाणेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सुतारवाडीत घरफोडी करून 5 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल केला होता लंपास
बाणेर पोलिसांनी जवळपास 88 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्यांना ठोकल्या बेड्या
शाहरुख शेख, गुलफान अन्सारी उर्फ शेख, अर्जुन गायकवाड असे अटक केलेल्या आरोपींची नावे
घराचे दरवाजे व कडीकोंडा तोडून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम केली होती लंपास
पुणे पोलिसांनी मुद्देमाल केला हस्तगत
LIVE Updates: घनसोलीजवळ कंटेनर उलटल्याने भीषण वाहतूक कोंडी
घनसोली – ठाणे-बेलापूर महामार्गावर घनसोलीजवळ थाणेच्या दिशेने जात असलेला एक कंटेनर आज सकाळी अनियंत्रित होऊन रस्त्यावरच उलटला. या अपघातामुळे घनसोली जिओ पॉइंटपासून ते कोपरखैरणे डीमार्टपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
सकाळी कार्यालयीन वेळ असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही वेळेसाठी संपूर्ण मार्ग ठप्प झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच नवी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. कंटेनर हटवण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. दुपारी पर्यंत वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येईल.
स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, अशा अपघातांना आळा घालण्यासाठी भारी वाहनांवर वेळोवेळी निर्बंध आणि अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.
LIVE Updates: कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर PMPL ची करणार कारवाई
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर PMPL ची करणार कारवाई
अनेक कर्मचाऱ्यांवर पीएमपीएल कडून करण्यात आली दंडात्मक कारवाई
प्रवाशांसी गैरवर्तणूक आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पीएमपी प्रशासनाकडून कारवाईचा बडगा
मागील दोन महिन्यांत (मे आणि जून २०२५) जवळपास १४७४ कर्मचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई
गेल्या दोन महिन्यांत १ हजार ४७४ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून, ८ लाख ४४ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्यामध्ये मे महिन्यात सर्वाधिक ७७६ कर्मचाऱ्यांवर कारवाई
LIVE Updates: साल्हेर किल्ल्याचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश, शिवप्रेमंकडून जल्लोष...
महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेल्या नाशिकच्या सटाणा तालुक्यातील छत्रपती शिवरायांच्या साल्हेर किल्ल्याचा युनेस्को 2024 - 25 या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आल्याने शिवप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला आहे तर साल्हेर येथील ग्रामस्थ व शिवप्रेमी नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.तर साल्हेर किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे ग्रामस्थांनी आभार मानले.
Pune News: पुण्यात कोयते आणि तलवारी हातात घेत टोळक्याचा धुडगूस
पुण्यात कोयते आणि तलवारी हातात घेत टोळक्याचा धुडगूस
कात्रज परिसरात पोळक्याकडून एका तरुणावर तलवारी आणि कोयत्याने वार
सात ते आठ जणांकडून कात्रज परिसरात तरुणावर करण्यात आले वार
हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
कात्रज कोंढवा रोड परिसरात असणाऱ्या एसबीआय बँकेसमोर तरुणांचा राडा
वार केल्यानंतर पळून जाताना तरुणांनी हातात नाचवल्या तलवारी आणि कोयता
जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात करण्यात आल दाखल
ओंकार साबळे या तरुणावर करण्यात आला हल्ला
LIVE Updates: होमिओपॅथी डॉक्टरांची ॲलोपॅथी नोंदणी रद्द, तीव्र विरोधामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची माघार
होमिओपॅथी डॉक्टरांची ॲलोपॅथी नोंदणी रद्द!
'IMA'च्या तीव्र विरोधामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचा यू-टर्न.
१५ जुलैपासून सुरू होणारी CCMMP नोंदणी थांबवली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तातडीने निर्णय मागे.
होमिओपॅथी डॉक्टरांना आता ॲलोपॅथी उपचार करता येणार नाहीत.
'IMA'च्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश.
दर्जेदार वैद्यकीय सेवा सुनिश्चित करण्यासाठी 'IMA' कटिबद्ध.
डॉक्टरांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तत्काळ कारवाईचा आदेश.
LIVE Updates: तीन चोरट्यांचा सिल्लोड तालुक्यात धुमाकूळ, एकाच रात्रीत 12 चोऱ्या
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड अज्ञात तीन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन सिल्लोड तालुक्यात धुमाकूळ घातला. यात त्यांनी अजिंठा गावात 7 ठिकाणी, शिवनात 3 ठिकाणी, तर जालना जिल्ह्यातील भोरखेडा येथे दोन ठिकाणी घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. या सर्व चोऱ्या काल रात्री 12ते 2 वाजेच्या दरम्यान करण्यात आल्या आहेत.
अजिंठा येथील गांधी चौकात एक दुकान फोडताना एका इसमाने तिन्ही चौरट्यांना पाहिले.
त्याने आरडाओरड करण्याचा प्रयत्न करताच तिघांनी त्याला जिवे मारण्याची धमकी देत बदडले आणि पळवून लावले.
LIVE Update:समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर गोळीबार
समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर गोळीबार
छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर शुक्रवारी रात्री ९ वाजता दोन कर्मचाऱ्यांच्या झटापटीत अचानक पिस्तूलमधून गोळीबार होऊन थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात गोळी घुसली.
गोळीबारात भरत घाटगे हा गंभीर जखमी झाला आहे
जखमीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबारानंतर दुसरा कर्मचारी फरार