पुणे: इंदिरा काँग्रेसला विरोध असल्याने वसंत दादांचे सरकार मीच पाडले, अशी कबुली ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडण्यामागे आपलाच हात होता अशी पहिल्यांदाच जाहीर कबुली देत शरद पवार यांनी तो किस्साही सांगितला. पुण्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
काय म्हणाले शरद पवार?
यावेळी बोलताना शरद पवार यांनी पुलोदचा प्रयत्न करत वसंतदादांचे सरकार कसे घालवले, याचा किस्सा सांगितला. "इंदिरा काँग्रेस वेगळी झाली स्वर्णसिंग काँग्रेस वेगळी साली. आम्ही लोक स्वर्ण सिंग काँग्रेसमध्ये होतो ज्यात चव्हाण साहेब होते. निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही. आय काँग्रेसला काही जागा मिळाल्या, आम्हाला काही जागा मिळाल्या. आणि शेवटी आम्ही एकत्र आलो आणि वसंतदादांना मुख्यमंत्री केलं. पण आम्हा तरुणांचा त्या वेळेला काँग्रेस (आय) वर राग असायचा" असं ते म्हणाले.
Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा 'मुड स्विंग', भारतावरील टॅरिफबाबत केली मोठी घोषणा
तसेच "आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे. त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं. वसंतदादा हे आम्हा लोकांचे नेते पण त्यांनी शेवटी हे दोघे एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता. त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्यामध्ये मी होतो. परिणाम काय झाला एक दिवस आम्ही ठरवलं दादांच सरकार घालवायचं आणि दादांचा सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो. माझ्या हातात सत्ता आली," असंही ते म्हणाले.
दरम्यान, "त्यानंतर १० वर्षानंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचा मुख्यमंत्री कुणाला करायचं यासाठी वसंतदादांनी बैठक बोलावली. त्या बैठकीमध्ये अनेक लोक होते. रामराव अधिक होते, शिवाजीराव निलंगेकर होते, आणखी अनेक नेते होते.त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली पण दादांनी सांगितलं आता बाकी कोणाच्या नावाची चर्चा नाही आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचं असेल तर पक्षाचं नेतृत्व शरदकडे द्यायचं. म्हणजे ज्या व्यक्तीचा सरकार मी पाडलं ती व्यक्ती गांधी-नेहरूंचा विचार मजबूत करण्यासाठी आम्ही काय केलं हे विसरून मोठ्या अंत:करणाने पुन्हा एकत्र येतं असं हे नेतृत्व त्या काळात काँग्रेसमध्ये होतं," असंही शरद पवार पुढे बोलताना म्हणाले.
Ajit Pawar: 'लाईन मारायला जाल तर तुमची लाईनच काढतो, टायर खालीच घेतो' अजित पवारांचा दम