DCM Sunetra Pawar Karad Phaltan Tour: अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार आज आपल्या पहिल्या दौऱ्यासाठी बाहेर पडत आहेत. आज सुनेत्रा पवार या कराड आणि फलटणच्या दौऱ्यावर आहेत. कराड येथे त्या प्रीतीसंगम बाग येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर त्या विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या कराड येथील समाधीस्थळी भेट देणार आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा पवार कराडहुन फलटणला जाणार आहेत. फलटण येथे त्या विमान अपघातावेळी अजित पवारांसोबत असलेले त्यांचे सुरक्षारक्षक दिवंगत विदीप दिलीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतील. सांत्वनपर भेटीनंतर उपमुख्यमंत्री पुन्हा मोटारीने बारामतीकडे मार्गस्थ होतील आणि सहयोग निवासस्थानी पोहचतील.
Sangli ZP Elections: 'काटे फिरले, थोड्याच दिवसात जयंत पाटील भाजपमध्ये...', बड्या नेत्याचा मोठा दावा
28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचे पोलीस सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. विदीप जाधव हे मूळचे फलटण तालुक्यातील लोणंदचे रहिवासी आहेत. 7 वर्षांपासून ते अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. याआधी आमदार रोहित पवार यांनीही विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. विपीन जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे.
सुनेत्रा पवार यांचे शरद पवार, अजित पवारांच्या पाऊलावर पाऊल!
कराडमध्ये असलेली यशवंतराव चव्हाण यांची समाधी हे पवार कुटुंबाचं उर्जास्थळ राहिलं आहे. प्रीतिसंगमावरील स्मृतीस्थळाशी अजित पवार यांचा ॠणानुबंध जुळला होता. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांना राजकीय गुरु मानत असल्याने त्यांच्या जयंती व स्मृतीदिनी कराडमध्ये त्यांच्या समाधीस पुष्पांजली वाहण्यास ते आवर्जून हजर राहत असत.
गेल्या काही वर्षात प्रकृतीच्या कारणास्तव अनेकदा खंड पडला. परंतु, काकांची ही परंपरा अजित पवारांनी कायम जोपासली. २५ नोव्हेंबर म्हणजेच यशवंतरावांच्या पुण्यतिथीदिनी अजित पवार अगदी सकाळी समाधीला पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण करणार हे निश्चित असायचे. अजित पवारानंतर सुमित्रा पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, कामकाजाची सुरुवात करण्यापूर्वी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी जात आहे.
Ajit Pawar Death : अजित दादांच्या खुर्चीला घट्ट मिठी मारली; पार्थ पवारांना अश्रू अनावर, Video
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world