Maharashtra LIVE Blog: राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाच्या चर्चांनी जोर धरला आहे. राज ठाकरेंनी जाहीर मुलाखतीमधून घातलेली साद त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेला तात्काळ प्रतिसाद यामुळे मनसे- शिवसेना पुन्हा एकत्र येण्याबाबत एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार या काका पुतण्यांमध्ये वाढलेल्या गाठीभेटींमुळे पवार कुटुंबीयही एकत्रित येण्याच्या वाटेवर आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरुनच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा मृत्यू
काश्मीर पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीच्या अतुल मोने यांचा मृत्यू झाला आहे. अतुल मोने डोंबिवली पश्चिमेकडे ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहत होते. अतुल श्रीकांत मोने कुटुंबासह फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते. मुलगी बायको यांच्यासह त्यांचे नातेवाईकांची तीन कुटुंब गेल्याची माहिती समोर येत आहे. अतुल मोने रेल्वे मध्ये परेल वर्क शॉप सेक्शन इंजिनियर पदी कार्यरत असल्याची माहिती आहे. मोने यांचे नातेवाईक काश्मीरला रवाना झाले आहेत.
जम्मूच्या चेंबर अँड बार असोसिएशनचे उद्या संपूर्ण बंदचे आवाहन, मेहबूबा मुफ्तीनी दिला पाठिंबा
भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी अनंतनागमधील पहलगामच्या बैसरनमध्ये संयुक्त शोध मोहीम सुरू
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही केला पहलगाम हल्ल्याचा निषेध
RSS ने ही केला पहलगाम हल्ल्याचा निषेध
जम्मू कश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी व्यक्तींची प्रकृती स्थिर
जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथे आज दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्यातील माणिक पटेल आणि सी. बालाचंद्रो हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहलगाम हल्ल्याचा केला निषेध
अमेरिकेचे उपराष्ट्रापती जेडी व्हान्स यांनी व्यक्त केला शोक
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल अमेरिकेचे उपराष्ट्रापती जेडी व्हान्स यांनी शोक व्यक्त केला, ते म्हणाले - "आमच्या प्रार्थना पीडितांसोबत आहेत. असं ते म्हणाले.
दिल्ली अलर्ट जारी
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांना पर्यटन स्थळे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
मुरलीधर मोहळ पुण्यातील पर्यटकांच्या संपर्कात
दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. जगदाळे आणि गनबोटे कुटुंबाच्या मी संपर्कात आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या आणि मदतीच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कौस्तुभ यांच्या मुलीशी माझा संपर्क झाला आहे. त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय व अन्य मदत, उपचार दिले जात आहेत. या मुलीसमोरच तिच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कडक शब्दांत याची निंदा केली आहे. आवश्यक ती सर्व कडक कारवाई केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरमध्ये रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आम्ही काळजीने सर्व गोष्टी करीत आहोत, असं केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी सांगितलं.
अमित शाह यांनी घेतली मुख्यमंत्री ओमरअब्दुल्ला यांची भेट, उच्चस्तरीय बैठक सुरू
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह श्रीनगरला पोहोचले
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरला पोहोचले आहेत.
पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळी प्रत्यक्षदर्शिंची प्रतिक्रीया
पहलगाम हल्लानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. "आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. हा हल्ला जम्मू-काश्मीरचा विकासाकडे जाणारा प्रवास थांबवण्याचा प्रयत्न होता. या हल्ल्याची दखल पंतप्रधानांनी घेतली आहे. गृहमंत्री अमित शाह तिथे पोहोचत आहेत. कठोर कारवाई केली जाईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
नाव आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या - एकनाथ शिंदे
प्रगती जगदाळे या महाराष्ट्रातील पर्यटका बरोबर आपण बोललो आहे. तिच्यासमोर तिच्या वडिलांना आणि काकांना नाव विचारून गोळ्या घातल्या अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्या खूप घाबरलेल्या होत्या असं ही शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातील काही पर्यटक जखमी झाले आहेत. सरकारच्यावतीने त्यांच्याशी संपर्क सुरू आहे. हा देशावरचा भ्याड हल्ला आहे. नाव आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या. याला करारा जवाब दिला जाईल असं शिंदे म्हणाले.
पुण्यातील पाच पर्यटक जखमी
असावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे,कौस्तुभ गाबोटे आणि संगीता गाबोटे हे पर्यटक जखमी आहेत. हे सर्वजण पुण्याच्या कर्वेनगर इथले रहिवाशी आहेत. ते फिरण्यासाठी पहलगामला गेले होते.
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन त्यांनी माहिती घेतली आहे. पहलगाम हे त्यांच्या कार्यक्षेत्रात येतं. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. दिलीप डिसले, अतुल मोने असं मृत्यू झालेल्या पर्यटकांचं नाव आहे. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी आहेत. जखमींमधील एक पनवेलचे तर उर्वरित 1 महाराष्ट्रातील कोणत्या भागातील, याचा शोध घेतला जातोय. जखमींची काश्मीर प्रशासनाने कळविलेली नावे : माणिक पटेल पनवेल, एस. भालचंद्रराव अशी आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
महाराष्ट्रातून काश्मीरला झालेल्या बुकींग रद्द
महाराष्ट्रातून कश्मीरला झालेलं बुकींग रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे काश्मीरच्या पुढील सर्व सहली रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
श्रीनगरमध्ये उघडले कंट्रोल रूम
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केली होती रेकी
पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरच्या काही पर्यटन स्थळांची रेकी केली होती. त्यात काही हॉटेलची रेकी केली होती अशी माहिती समोर येत आहेत. त्यात पहेलगामच्या हॉटेल्सचाही समावेश आहे. तीन पेक्षा जास्त दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे ही समजत आहे.
मृत आणि जखमी पर्यटकांत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरातचे पर्यटक
अमित शाहांसोबत IB प्रमुखही काश्मीर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मृत आणि जखमी पर्यटकांत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरातचे पर्यटक असल्याचीही माहिती समोर येत आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पहलगामला रवाना
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पहलगामला रवाना झाले आहेत. पहलगामच्या बैसरन येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
पहलगाम हल्ल्याची लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेनं घेतली जबाबदारी
पहलगाम हल्ल्याची लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेनं जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. तर सात पर्यटक हे जखमी झाले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
पहलगाम हल्ल्यात पुण्याचे पर्यटक जखमी
जम्मू काश्मीरमधील पहेलगाम मध्ये झालेल्या दहशतवाडी हल्ल्यात पुण्यातील पर्यटकांचा शोध सुरु
पुण्यातील दोन जण जखमी असल्याची माहिती
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पहेलगामच्या प्रशासनाशी संपर्क सुरू
एकूण 5 जणांचं कुटुंब जम्मू-काश्मीरमध्ये गेल होत फिरायला
प्राथमिक माहितीनुसार या कुटुंबातील दोन जण जखमी आहेत
तर तीन जणांना आर्मी बेस कॅम्पवर ठेवण्यात आलं आहे
पेहलगाम हल्ल्यात पुण्याचे दोन पर्यटक जखमी
पेहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात पुण्यातील दोन जण गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. 5 जणांचे कुटुंब पहेलगामला गेले होते. त्यातील दोन जण गोळीबारात जखमी झाले आहेत. तीन महिला सुरक्षित आहे. त्याना सैन छावणीत ठेवण्यात आलं आहे.
पहलगाम हल्ल्यात कर्नाटकच्या पर्यटकाचा मृत्यू
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. हा पर्यटक शिमोगा इथला रहिवाशी आहे. मंजूनाथ असं त्याचं नाव आहे. ते आपल्या पत्नीसह काश्मीरला फिरायला गेले होते. त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा ही होता.
ना'पाक' प्रयत्न यशस्वी होवू देणार नाही, मोदींनी खडसावले
ना'पाक' प्रयत्न यशस्वी होवू देणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडसावले आहे. दहशतवादा विरोधात आम्ही लढत राहू असंही मोदी म्हणाले. ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना कुठल्या ही स्थिती सोडलं जाणार नाही असं ही ते म्हणाले.
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली झाली आहे. त्यांची बदली व्यवस्थापकीय संचालक मत्य उत्पादन या ठिकाणी करण्यात आली आहे. बीडच्या जिल्हाधिकारीपदी विवेक जॉन्सनस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्तीसगडमध्ये चकमक: 3 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षल्याचा खात्मा
चकमकीत 3 लाख रुपयाचा बक्षीस असलेला नक्षल्याचा केला खात्मा. गुण्डीपुरी आरपीसीचा मिलिशिया प्लाटून कमांडर वेल्लावाचमचा झाला खात्मा. मारला गेलेला नक्षली अम्बेली ब्लास्ट मध्ये होता सामील
नक्षल विरोधी अभियान राबवीत असताना झाली चकमक चकमक स्थळावरून 01 नग 315 बोर Rifle, पोच, विस्फोटक व अन्य माओवादी सामग्री हस्तगत.
काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, पर्यटकांना केलं लक्ष्य
काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य केलं गेलं आहे. या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात 6 पर्यटक गंभीर जखमी असल्याची माहिती ही समोर येत आहे. हा हल्ला पहलगाममधील बैसरण परिसरात झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि भारतीय लष्कराने घटनास्थळी पोहोचली असून, परिसराची नाकाबंदी करून तपास सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी पर्यटकांवर गोळीबार केला. हल्लेखोर मोटारसायकलवरून आले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे, परंतु याबाबत पुष्टी झालेली नाही.
LIVE Updates: मुंबईतील सर्व जमिनीच्या लँड स्कॅमचे बादशाहा उद्धव ठाकरे: आशिष शेलार
भाजपने गरवारे क्लब येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत मंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी भाजपकडून कार्यशाळेच आज आयोजन करण्यात आल आहे
बीजेपीवाले जमिनी घेतील आणि उद्योजकांना अशी टीका करतायत. मुंबईत 1 स्क्वेअर फुटची किंमत 1 लाख रुपये आहे… तुमची 25 वर्ष पालिकेत सत्ता होती मुंबईतील जमीन बिल्डरांना देण्याच पाप हे उद्धव ठाकरे यांनी केल आहे हे उद्धव ठाकरे आम्हाला प्रश्न का विचारत आहेत…
कोणतीही जागा बिल्डरला जाणार नाही हे मी आताच सांगतोय
LIVE Updates: विक्रोळीत 36 वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या
विक्रोळीत 36 वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या
सुमन सूरज निर्मल असे या महिलेचे नाव असून ती आपल्या पतीसोबत विक्रोळी पूर्व परिसरात रहात होती
महिलेचा पती हा रात्रपाळी करून घरी पहाटे 5.30 वा आल्यानंतर ही घटना उघडकीस आली
पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून त्याने या घटनेची माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली
घटनास्थळी आरोपीचा शोध घेण्यासाठी डाॅगस्काॅड, फिंगरप्रिंट आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक दाखल झाले आहेत
अधिक तपास विक्रोळी पोलिस करत आहेत
LIVE Updates: धक्कादायक! पुण्यात टोळक्याकडून दांपत्याला बेदम मारहाण
पुण्यातील पाषाण भागात धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत पाच जणांच्या टोळक्याकडून पती पत्नीला मारहाण
हॉर्न का वाजवला म्हणून पाषाण सर्कल येथे दामत्याला पाच जणांकडून मारहाण
आरोपींकडून पती-पत्नीला धमकवल्याचा देखील प्रकार
पुण्यातील चतुःसृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
तर तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक
LIVE Updates: भंडारा जिल्ह्यात दुचाकीला बोलेरो पिकअपची धडक.... 4 जणांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यातील पाथरी येथे दुचाकीचा बोलेरो पिक अप वाहनाने धडक दिली यात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तुमसर तालुक्यातील पाथरी गावाजवळ एकाच दुचाकीने चार जण रात्री 11 वाजेच्या सुमारास जात असताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पिक अप गाडीने जोरदार धडक दिली याच तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला जख्मी असल्याने तीला रूग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान या महिलेचा सुद्धा मृत्यू झाला आहे. मृत्कांमध्ये पाच वर्षीय मुलीचा देखील सहभाग आहे. कैलाश मरकाम, पारबता मरकाम, यामिनी कंगाली 5 वर्षीय, व दुर्गा कंगाली असे मृत्कांचे नाव आहे. या संदर्भात गोबरवाही पोलिसांनी चालकविरुध गुन्हा दाखल केला आहे.
LIIVE Updates: सुप्रिया सुळे पुन्हा उपोषणाला बसणार
खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बसणार उपोषणाला
उद्या सकाळी सिंचन भवन बाहेर उपोषणाला बसणार
पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा योजनेसाठी करणार आंदोलन
जलसंपदा विभागाविरोधात सुळे करणार आहे उपोषण
या आधी सुळे यांनी बनेश्वर येथील ७०० मीटर रस्ता करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केले होते उपोषण
Pune News: पोर्शे अपघात प्रकरण: ससूनमधील दोन डॉक्टर निलंबित
पुणे पोर्श अपघात प्रकरणी डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हलनोर यांची वैद्यकीय परिषदेची सदस्यता निलंबित.
Sangli News: सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू, गावावर शोककळा
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुर्ली येथील बीएसएफ जवान रियाज उर्फ अमर मिरासो इनामदार या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीएसएफ रियाज उर्फ अमर मिरासो इनामदार हे गुजरात येथे सेवा बजावत होते. ते नुकतेच सुट्टी वर आले होते. आपल्या कुटुंबासह सासरी गेले होते. तेथून चारचाकीने आपल्या बुर्ली या मुळगावी परतत असतानाच अथणी जवळ त्यांच्या चारचाकी आणि बसची धडक होऊन झालेल्या अपघातात जवानाचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी गंभीर जखमी असून तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जवान रियाज (अमर) मिरासो इनामदार यांच्यावर सकाळी ठीक 8 वाजता बुर्ली येथे शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आले.
Pune News: स्वारगेट अत्याचार प्रकरण: विशेष सरकारी वकीलपदी अजय सुहास मिसार यांची नियुक्ती
स्वारगेट बलात्कार प्रकरणात विशेष सरकारी वकीलपदी अॅड. अजय सुहास मिसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतेच आरोपपत्र सादर केले आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात 25 फेब्रुवारी रोजी तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 28 फेब्रुवारी रोजी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली.
Pune News: पुण्यात पावसाळ्यापूर्वीच होणार रस्त्यांची दुरुस्ती
पुणे शहरात पावसाळ्यापूर्वीच होणार रस्त्यांची दुरुस्ती
पुणे महापालिकेकडून रस्त्यांच्या कामासाठी 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर
यंदा पावसाळ्यापूर्वीच पुणे शहरातले रस्ते होणार चकाचक
पुणे महापालिकेकडून शहरातील रस्ते खड्डे मुक्त करण्याचा प्रयत्न
65 कोटी रुपयांच्या कामांना पालिकेच्या पूर्वगणन समितीने (इस्टिमेट कमिटी) मान्यता दिली असून, लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार
Amravati News: उपचारातील हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावला, अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार
अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मधील पिंपरी निपाणी येथील नारायण लक्ष्मण मेश्राम यांना दोन दिवसांपूर्वी विषबाधा झाली होती. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला होतं. दरम्यान इरविन रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या उपचारात हलगर्जीपना केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय, डॉक्टरांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही डेडबॉडी घेणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसेवेत कशा पद्धतीने हलगर्जीपना सुरू आहे हे समोर आलंय.
Sangli News: आष्टा परीसरात गव्या रेड्याचा मुक्त संचार,शेतीची नासधूस..
सांगलीच्या आष्टा परिसरामध्ये गवा रेड्याचे मुक्त वावर पाहायला मिळत आहे. शहरातील शिंदेमळा-बावची रोडवर नव्याचा मुक्त वावर असल्याचं पाहायला मिळालं,तर नागरिकांच्या मध्ये भीतीच वातावरण पसरलेला आहे,या गव्याकडून आष्टा परिसरातल्या शेतीचे देखील मोठ्या नुकसान करण्यात आला आहे.मुक्त संचार करणाऱ्या गव्याकडून गहू,केळी आणि ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे.ग्रामस्थ आणि प्राणी मित्रांकडून या गाव्यला हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.मात्र आष्टा परिसरामध्येच गवा रेडा फिरत असल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीच वातावरण पसरला असून वन विभागाकडून विभागाचा बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी करण्यात येत आहे.
Akola News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
अकोल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना ठाकरे कटाचे जिल्हाप्रमुख गोपाल उर्फ आशिष रामराव दातकर यांनी त्यांच्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये सुरू असलेल्या 50 लाख रुपयांच्या विकासकामाच्या बदल्यात अकोटच्या जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून 5 लाख रुपयांची खंडणी मागितली होती... जेव्हा अधिकाऱ्याने ही रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली तेव्हा सदस्याने अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ केली.. आणि जीवे मारण्याची धमकी दिली. असा आरोप अधिकाऱ्यांनी केला होता...
Amravati News: तापमानात अमरावतीचा देशात चौथा क्रमांक
तापमानात अमरावती शहर देशात चौथ्या क्रमांकावर...
सोमवारी अमरावती शहराचे तापमान हे 44.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले..
एप्रिल महिन्यातील सर्वात उच्चांक तापमान हे काल नोंदवल्या गेले..
पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज..
Ratnagiri News: रत्नागिरीमधील तीन तालुक्यात पाणी टंचाई
रत्नागिरी, खेड, चिपळूण या तीन तालुक्यातल्या 15 गावांमधील 38 वाड्यांमध्ये पाणीटंचाई.. 7 टँकरद्वारे पाणीपुरवठा
राजापूर तालुक्यातील सौंदळ येथे आढळला प्रौढाचा मृतदेह.. रेल्वेची धडक लागल्याचा अंदाज
तीर्थ दर्शनाची जिल्ह्यातील पहिली रेल्वे शनिवारी जाणार आयोध्येकडे
जलसंपदा विभागाने प्रलंबित असणारी भूसंपादनाची कामे मार्गी लावावीत - जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे निर्देश
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बाजारपेठेतील व्यापारी रस्त्यावरील धुळीमुळे त्रस्त
राजापूर तालुक्यातील दोन गावांना पाणीटंचाईची झळ.. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी