Maharashtra Politics: मुंबईत मोठी घडामोड! ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंविरोधात नाराजी, सर्व खासदार मातोश्रीवर

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतींवर खासदारांनी नाराजी दर्शवली आहे. त्यामुळेच आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Politics:  राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु असतानाच शिवसेना ठाकरे गटाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकर गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतींवर खासदारांनी नाराजी दर्शवली आहे. त्यामुळेच आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे.  

Rupali Chakankar : भोंदूबाबा खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप, थेट अटकेची मागणी

शिवसेना ठाकरे गटात सध्या नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीतील संजय राऊत यांच्या घरी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंविरोधात सर्व खासदारांनी नाराजीचा सूर पाहायला मिळाला. खासदारांच्या नाराजीमुळे ॲापरेशन टायगरला बळ मिळू नये यासाठी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. 

Advertisement

काय आहेत खासदारांच्या तक्रारी...?

दिल्लीमध्ये संजय राऊत यांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये पक्षातील खासदारांनी पक्षश्रेष्ठींविरोधात तक्रारीचा पाढा वाचला. उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाहीत,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मदत केली नाही, ⁠उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला नाही⁠ आदित्य ठाकरे सुद्धा महाराष्ट्रात फिरले नाहीत, अशा तक्रारी पक्षातील खासदारांनी केल्या तसेच ⁠उद्धव ठाकरेंचा संपर्क नसल्यामुळे चिंताही व्यक्त केली आहे. 

दरम्यान, याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र महत्त्वाचे विधान केले आहे. विरोधी पक्षातील खासदारांना निधी मिळत नाही. सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपात भेदभाव केला जात आहे, अशी खासदारांची तक्रार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. याचसंदर्भात आज उद्धवजींशी सर्व खासदार चर्चा करतील, असं ते म्हणाले. 

Shivneri Fort QR Code: शिवप्रेमींसाठी मोठी बातमी! छत्रपतींचा शिवनेरी किल्ला बोलणार; QR कोड स्कॅन करताच इतिहास