अविनाश पवार, पुणे:
QR Code On Shivneri Fort: जगभरातील शिवप्रेमींचे प्रेरणास्थान, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणारा महत्त्वाचा किल्ला म्हणजे शिवनेरी. छत्रपतींचे बालपण, त्यांची जडणघडण अन् स्वराज्य स्थापनेचे बाळकडू त्यांनी याच किल्ल्यावर घेतले. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्याबाबत एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना आता कोड स्कॅन करताच संपूर्ण ऐतिहासिक माहिती मिळणार आहे.
Pune Fraud: सावधान! इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करताय? पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला लुटलं, नेमकं काय घडलं?
शिवनेरी किल्ल्यावर क्युआर कोड..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून ओळखला जातो. देश-विदेशातून हजारो पर्यटक या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देत असतात. मात्र किल्ल्यावर फिरताना प्रत्येक वास्तू, दरवाजा आणि ठिकाणामागील इतिहास जाणून घेण्यासाठी गाईडची गरज भासत होती. आता ही अडचण दूर होणार आहे.
पुरातत्व खात्याकडून (Archaeology Department) एक विशेष मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून, याच्या माध्यमातून पर्यटकांना गाईडशिवायच संपूर्ण माहिती मिळणार आहे. किल्ल्यावर विविध ठिकाणी QR कोड बसवण्यात आले आहेत. हे कोड मोबाईल ॲपद्वारे स्कॅन केल्यावर पर्यटकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत त्या ठिकाणाचा इतिहास ऐकता आणि वाचता येणार आहे.
ॲपद्वारे मिळणार ऐतिहासिक माहिती...
या सुविधेमुळे किल्ल्यावरील प्रत्येक वास्तू, दरवाजा आणि ऐतिहासिक घटनेची माहिती थेट पर्यटकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे “शिवनेरी किल्ला आता बोलणार” अशीच भावना निर्मा नण होत आहे. लवकरच या अभिनव उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ होणार असून, यामुळे पर्यटन अनुभव अधिक समृद्ध होणार आहे.
किल्ल्यावर फिरताना विविध ठिकाणी क्युआर कोड बसवलेले असतील. हा कोड स्कॅन करताच आपल्याला भाषा निवडण्याचा पर्याय येईल. त्यानंतर संबंधित वास्तूबाबत संपूर्ण ऐतिहासिक माहिती ऐकायला मिळेल. अलिकडेच शिवनेरी किल्ल्याचा जागतिक वारसास्थळात समावेश झाला आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक शिवनेरीवर भेट देत असतात.
दरम्यान, अनेकदा शिवनेरीवर येणाऱ्या विदेशी पर्यटकांना अनेक वास्तू, ऐतिहासिक घटनांबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. अशा विदेशी पर्यटकांना या ॲपद्वारे सर्व इतिहास समजूण घेणे सोपे होणार आहे. या सुविधेमुळे किल्ल्यावरील प्रत्येक वास्तू, दरवाजा आणि ऐतिहासिक घटनेची माहिती थेट पर्यटकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे “शिवनेरी किल्ला आता बोलणार” अशीच भावना निर्मा नण होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world