अद्यापही राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. मुंबई, ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. दिवसभर उकाडा आणि रात्रीचा पाऊस असं काहीसं चित्र मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
पुढील काही दिवसात राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान आज शनिवारी मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय रत्नागिरीला रेड तर पुण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यातील मराठवाडा भागतही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - Mumbai News : खड्ड्यांच्या तक्रारी अॅप आणि व्हॉट्सअॅपवर करता येणार; BMC चं स्मार्ट पाऊल
विदर्भात मोसमी वाऱ्यांची वाटचाल..
बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळील चक्राकार वाऱ्यांची स्तिती आहे. परिणामी विदर्भासह, छत्तीसगड आणि ओडिशा राज्यातील काही भागात मोसमी वाऱ्यांची वाटचाल होण्याची शक्यता आहे.