Maharashtra Weather Update: नैऋत्य मोसमी पावसाने (Monsoon) माघार घेतल्यानंतरही पाऊस महाराष्ट्राचा पिच्छा सोडयला तयार नाही. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात नागरिकांची चिंता वाढली आहे. कारण, या अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सावट थेट दिवाळीवर कायम आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज, 21 ऑक्टोबरपासून ते थेट 25 ऑक्टोबरपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा कायम आहे. कोकण (Konkan), गोवा, मराठवाडा (Marathwada) आणि मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) या काळात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिवाळीच्या उत्साहावर विरजण
गेल्या दोन महिन्यांमध्ये मराठवाड्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात पूरपरिस्थिती (Flood Situation) होती, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. जनावरे दगावली, घरे पडली आणि शेतीचेही अपरिमित नुकसान झाले. या नुकसानीतून सावरत असतानाच, आता ऐन दिवाळीसारख्या मोठ्या सणासुदीच्या तोंडावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या इशाऱ्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
दिवाळीपर्यंतचा हवामान विभागाचा सविस्तर अंदाज
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 21 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. म्हणजेच, पुढील 5 दिवस राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहील. हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे.
प्रत्येक दिवसाचा जिल्हावार अलर्ट (21 ते 25 ऑक्टोबर )
21 ऑक्टोबर
जिल्हे: रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), लातूर (Latur), नांदेड (Nanded), परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli), वाशिम (Washim), अकोला (Akola), यवतमाळ (Yavatmal), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli).
इशारा: यलो अलर्ट
22 ऑक्टोबर
जिल्हे: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव (Dharashiv), लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा (Buldhana).
इशारा: यलो अलर्ट
23 ऑक्टोबर
जिल्हे: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर (Solapur), धाराशिव, लातूर, बीड (Beed), नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा (Wardha), चंद्रपूर, गोंदिया (Gondia), गडचिरोली.
इशारा: यलो अलर्ट
24 ऑक्टोबर
जिल्हे: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर (Nagar), सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती (Amravati), यवतमाळ, वर्धा, नागपूर (Nagpur), चंद्रपूर, गडचिरोली.
इशारा: यलो अलर्ट
25 ऑक्टोबर
जिल्हे: रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भ (Vidarbha).
इशारा: यलो अलर्ट
दिवाळीच्या सणासुदीच्या काळात नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे गांभीर्याने पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.